🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

शनिवार, जुलै ३१, २०२१

DCP सारख्या ज्या IPS मंडळी आहेत, जे स्वतःला पृथ्वीवरचे समजतच नाहीत,परग्रहावरुन कुठुनतरी आपण आलेले आहोत, खालच्या वर्गाचे जे दुय्यम दर्जाचे कर्मचारी आपले पारंपरिक गुलाम आहेत असे समजून चालतात वागतात म्हणत... दत्तात्रय नाईक नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने ऑडिओ क्लिप केली व्हायरल

 

Audio

विरार,दि 31 जुलै 2021 : बिर्याणीच्या ऑर्डरची ती ऑडिओ क्लिप हे षडयंत्र’म्हणा-या पुणे परिमंडळ 1 च्या DCP प्रियंका नारनवरेच्या विरुद्ध एका दत्तात्रय नाईक नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने चॅलेंज देत दुसरी ऑडिओ क्लिप व्हायरल केली आहे.

विरार येथील दत्तात्रेय काशिनाथ नाईक या पोलीस कर्मचाऱ्यांने व्हायरल केलेल्या ऑडिओ क्लिप मध्ये असे म्हटले आहे की, 

"DCP सारख्या ज्या IPS मंडळी आहेत, जे स्वतःला पृथ्वीवरचे समजतच नाहीत,परग्रहावरुन कुठुनतरी आपण आलेले आहोत, खालच्या वर्गाचे जे दुय्यम दर्जाचे कर्मचारी आपले पारंपरिक गुलाम आहेत असे समजून चालतात वागतात.

आणि मग लिडरशिपच्या गोष्टी करतात,लिडरशिप म्हणून तुम्ही सौजन्याचा, प्रामाणिकपणाचा,कर्तव्यपरायणतेचा,सचोटिचा आदर्श तुम्हाला घालून द्यायचे असेल तर तुम्ही असं जेवण बिवण स्वतः साठी, आपल्या नव-यासाठी आणण्यासाठी अशी अधिनस्त कर्मचा-यांना तुम्ही मुळात आदेशच द्यायचे नाही.तुम्ही म्हणता की ते क्लिप हि इडिटिंग केलेली आहे थोडासा संवाद माझा आहे, म्हणजे असं आहे का? तुम्हाला फक्त मटन बिर्याणीच हवी होती, नंतर बोंबिल,नंतर सुप तुमचं एका ह्याच्यावरपण भागत नाही आहे हे अशी आणि तुम्ही शिस्त आणि कमांडिंगच्या आणि कंट्रोलिंगच्या नेतृत्वाच्या गोष्टी करता का तुम्ही? तुमच्यासारखं नेतृत्व लाभलय म्हणून तर सत्यानाश होत आलाय पोलीस डिपार्टमेंटचा,तुमच्या हातात पोलीसांचं भवितव्य दिलेलं आहे आणि तुम्ही स्वतःसाठी आपल्या नव-यासाठी जेवणं जेवणावळी मागवता आपल्या हद्दीतल्या हॉटेलवरुन आणि तुम्हाला एवढी पण शिस्त नाही की सोशल मिडियावर जे स्पष्टिकरण देताय ते तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेतली का? हे अशा प्रकारचं सोशल मिडिया वरती जर स्पष्टिकरण ची क्लिप एखाद्या तुमचा अधिनस्त पुलीस कर्मचारी देलता तर तेवढा त्याला शोकात तुम्ही दिली असती.तुम्हाला काय वाटतं तुम्ही मार्क्सवरुन आलेले आहेत का मंगळावरुन, काय बुधावरुन काय म्हणजे IPS म्हणजे काय? यशस्वीतेचं किंवा एकदम प्रामाणिकपणाचं अत्युच्च मानबिंदू आहे का? तुम्हीच तर असे खायचं एक आणि दाखवायचं एक करुन पोलीस खात्याला वेठिस धरलेलं आहे तुमच्या सारख्या अधिका-यांनी आणि आता उघड झालं तर बचावासाठी नको ते मुद्दे मांडताय तुम्हाला ब्लॅकमेल करतयं,काय ते पोलीस कॉन्स्टेबल तुम्हाला ब्लॅकमेल करणार आणि ते एवढे जर चोर आहेत, भ्रष्टाचारी आहेत त्यांनी हाहाकार माजवला होता, पंधरा पंधरा वर्षे ते एका ठिकाणी होते त्यांचं कंबर्ड तुम्ही मोडलं म्हणून तुमच्याकडे ते द्वेष भावनेनं,आणि बदला सुड भावनेने तुमच्यावर ते षडयंत्र रचत आहेत अशा नालायक माणसांना जेवण आणायला सांगता कशाला नव-यासाठी बिर्याणी साजूक तूपातली,काहीच वाटत नाही तुम्हाला असं स्पष्टीकरण देताना.आता तुम्हीही व्हायरल केली ना माझं नाव दत्तात्रेय काशिनाथ नाईक आहे.राहणार विरार हे घ्या हे ऐका तुम्ही जशी तुमची क्लिप व्हायरल झाली ती मी पण करतो ऐका.असे म्हणत स्वतः ची ऑडिओ क्लिप व्हायरल केली आहे."


पुण्यातील एका महिला पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल होत आहे. या मॅडम मटण बिर्याणीची ऑर्डर आणायला आपल्या कर्मचाऱ्याला सांगत आहे. महत्वाची बाब म्हणजे त्यांना ही बिर्याणी फुकट हवी आहे. आपल्या हद्दीतील हॉटेलमध्ये पैसे देण्याची गरज काय? असंही त्या आपल्या कर्मचाऱ्यांना सांगताना या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे. ही ऑडिओ क्लिप व्हायरल होत असताना हा प्रकार गंभीर आहे. याची चौकशी करण्याचे आदेश आपण दिल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे. त्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्यांयाने ऑडिओ क्लिप म्हणजे एक षडयंत्र असल्याचा आरोप टीव्ही 9 शी बोलताना केलाय.


DCP प्रियंका नारनवरेची व्हायरल ऑडिओ क्लिपवर प्रतिक्रिया

“अजून चौकशी झालेली नाही. माननीय गृहमंत्री साहेबांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. त्यात जे सत्य आहे त बाहेर येईल. तसंच मी स्वत:ही तक्रार दाखल करणार आहे. चौकशी होऊ द्या. त्यातून सगळं कळेल. पोलीस विभागाची गरिमा राहावी म्हणूनच मी इथे आल्यापासून प्रामाणिकपणे काम करत आहे. जे चुकीचे लोकं होते त्यांना वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला, सरळ करण्याचा प्रयत्न केला. जे चुकीचे प्रकार होत होते ते थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आज माझ्या नावाने हे व्हायरल केलं गेलं आहे. माननीय गृहमंत्रीसाहेब बोलले आहेत आणि चौकशी योग्यरितीने झाली तर ते शक्य होईल.”

‘प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना त्रास दिला जातो’

“माझ्या कार्यालयात काही कर्मचारी होते. त्यांना काढण्यासाठी मी पाऊल टाकलं होतं. त्यांचे भरपूर हितसंबंध होते, या गोष्टीमुळे वातावरण खराब होत होतं. म्हणून मी त्यांना पोलीस स्टेशनला परत पाठवलं. हे लोकं दुखावलेले आहेत. काही सिनिअर्सचा त्यांना पाठिंबा आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं केलं गेलेलं आहे. हा एकप्रकारे मला गुंतवण्याचा प्रकार आहे. बदलीच्या वेळेलाच अशी गोष्ट का केली गेली. मी गृहमंत्र्यांना याबाबत माहिती देणार आहे. पोलीस विभागात काय सुरु आहे हे सगळ्यांना माहिती आहे. इथे प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना त्रास दिला जातो. मात्र, येणाऱ्या काळात ही परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा आहे. अशावेळी माध्यमांनीही सर्व बाबी तपासून अशा बातम्या देणं गरजेचं आहे,” असं मत महिला पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केलंय.


पुणे पोलीस दलात खळबळ माजवणाऱ्या ‘त्या’ ऑडिओ क्लिपची गृहमंत्र्यांनी घेतली दखल; आयुक्तांना दिला आदेश

पोलीस आयुक्तांना अहवाल सादर करत योग्य ती कारवाई करण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश

नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याचं फोनवरील संभाषण चांगलंच व्हायरल होत आहे. पुण्यातील डीसीपी मॅडमला एसपी हॉटेलची बिर्याणी हवी आहे, तीही मोफत! डीसीपी मॅडमची ही फर्माईश आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय. डीसीपी मॅडमच्या या कारभाराला वैतागलेल्या कर्मचाऱ्यांनी थेट पोलीस महासंचालकांनाच पत्र लिहिलं आहे. दरम्यान, आम्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीत.

जवळपास 5 मिनिटाची ही ऑडिओ क्लिप आहे. त्यात डीसीपी मॅडम मटण बिर्याणी, प्रॉन्स आणि अजून एका नॉन व्हेज भाजीची ऑर्डर द्यायला आपल्या कर्मचाऱ्याला सांगत आहेत. त्यांना हे सगळं एका चांगल्या हॉटेलमधून हवं आहे. हे पदार्थ जास्त तेलकट, तिखटही नको आहेत. त्याचबरोबर त्याची चव चांगली असावी असाही त्यांचा हट्ट आहे. या डीसीपी मॅडम फक्त ऑर्डर देऊन थांबल्या नाहीत. तर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी आपल्या हद्दीतील हॉटेलमध्ये पैसे का द्यायचे? असा सवालही केलाय. तो कर्मचारी मात्र यापूर्वी आपण नेहमी पैसे देऊनच खाद्यपदार्थ आणल्याचं सांगतोय. अशावेळी मॅडम महोदय त्या कर्मचाऱ्याला सर्व खाद्यपदार्थ फुकट आणण्यासाठी बजावत असल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे.

मॅडमच्या पतीला मटण बिर्याणी आवडते तर त्यांना चिकन बिर्याणी. फोनवर ऑर्डर देताना त्या हॉटेल चालकाने पैसे मागितल्यास हद्दीतील पोलीस निरीक्षकाकडे तक्रार करा, असंही त्या आपल्या कर्मचाऱ्याला सांगायला विसरत नाहीत. डीसीपी मॅडमच्या या कारभाराला वैतागलेल्या कर्मचाऱ्यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं आहे. भ्रष्टाचार वाढवणाऱ्या या अधिकारी महिलेची खाबुगिरी रोखण्याची आणि चौकशी करण्याची मागणी आता केली जात आहे.

सातवा वेतन आयोग : शासकीय माध्यमिक आश्रमशाळेचा महा लाचखोर मुख्याध्यापक 5,000 रुपये लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून ताब्यात घेतले

 


*== प्रेसनोट ==*

*यशस्वी सापळा*

▶️ *युनिट -* नाशिक.

▶️ *तक्रारदार-* पुरुष,वय-35, रा.पिंपरखेड, ता.दिंडोरी , जि. नाशिक 

▶️ *आरोपी-* राजेंद्र दामू कळसाईत, वय - 51 , मुख्याध्यापक , शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, पिंपरखेड,ता-दिंडोरी, जि. नाशिक वर्ग-2 अराजपत्रीत                                                         

▶️ *लाचेची मागणी-* 6000 

तडजोडी अंती 5000/₹

▶️ *लाच स्विकारली-* 5000/₹

▶️ *हस्तगत रक्कम-* 5000/-रु, 

▶️ *लाचेची मागणी -* ता. 30/07/2021

▶️ *लाच स्विकारली -* ता. 31/07/2021

▶️ *लाचेचे कारण -*.  

तक्रारदार यांचा सातव्या वेतन आयोगाचा फरक काढून दिला त्याचे बक्षीस म्हणून यातील आलोसे यांनी तक्रार दार यांचेकडे दि.30/07/2021 रोजी रुपये 6000/- लाचेची मागणी करुन , तडजोडी अंती रु.5,000/लाचेची मागणी करून ती लाचेची रक्कम दि. 31/07/2021 रोजी अंबिका सुपर मार्केट, मेरी लींक रोड ,नाशिक समोर स्विकारली. म्हणून .                  

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत. ▶️ *सापळा अधिकारी-* पोनि. साधना भोये-बेलगावकर , ला.प्र.वि नाशिक 

▶️ **सह सापळा अधिकारी -* * उज्ज्वलकुमार व्ही पाटील पोलीस निरीक्षक , ला.प्र.वि. नाशिक   

▶️ सापळा पथक - पो हवा. चंद्रशेखर मोरे , पो हवा प्रफुल माळी , पो ना एकनाथ बाविस्कर, लाप्रवि नाशिक            

▶ *मार्गदर्शक-* *1)* मा.श्री. सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक

*2)* मा.श्री. निलेश सोनवणे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक 

३) मा.श्री सतीश भामरे 

पोलीस उप अधीक्षक -वाचक लाप्रवि नाशिक

▶ *आरोपीचे सक्षम अधिकारी-* मा. अप्पर आयुक्त आदिवासी विकास, नाशिक विभाग , नाशिक.                                                                        

--------------------------------------



*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*

अँन्टी करप्शन ब्युरो नाशिक*

*@ टोल फ्रि क्रं. 1064*

===================



" यापुढे एसटी महामंडळाच्या बसमधील आमदारांना राखीव असलेली सीट कायमची रिकामी दिसणार".....

 


  • सरकारने आता बसमध्ये सिटवर लिहलेला "आमदारांसाठी राखीव" हा शब्द कायमचा काढून टाकला तरी चालेल......

सोलापूर,दि 31 जुलै 2021 : एसटी महामंडळाच्या बसमध्ये समोरील काही सीट्स महिलांसाठी व आमदारांसाठी राखीव असतात... आमदारांसाठी राखीव असलेल्या सिट्सचा वापर सुरवातीला काही आमदारांकडून होत होता परंतु भ्रष्टाचाराने काळ्या झालेल्या हातात जसजसा पैसा जमत गेला तसतसा त्यांनी पब्लिक ट्रान्सपोर्ट च्या वापराऐवजी आपले स्वतः चे वाहन ( कार) वापरणे योग्य समजले.... परंतु एक व्यक्ती अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पाय जमिनीवर घट्ट रोवून उभा होता.... आमदारांपैकी एसटी बसचा उपयोग सर्वात जास्त महाराष्ट्रात च नाही तर देश पातळीवर जर कोणी केला असेल तर तो म्हणजे गणपतराव देशमुख यांनी.... म्हणून

आजपर्यंतच्या महाराष्ट्रातील हा सर्वात बोलका फोटो....

म्हणून त्यांच्या निधनाने मुल्याधिष्ठित राजकारण करणारा तसेच सार्वजनिक जीवनात नीतिमत्ता हाच आदर्श मानणारा लोकप्रतिनिधी पडद्याआड गेला आहे. ....राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणारा मार्गदर्शक दीपस्तंभ अंधारात नाहीसा झाला आहे. सतत अकरा (११) वेळा निवडणूक जिंकणारे तसेच महाराष्ट्राच्या राजकारणातलं अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून गणपतराव आबा यांचे नाव कायम स्मरणात राहील....  

या कोलांटउड्याच्या जगात आबांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत ध्येयनिष्ठा, पक्षनिष्ठा याला केव्हांच गालबोट लागू दिले नाही..... यशवंतराव चव्हाण नंतर महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक चळवळीतला सुसंस्कृत चेहरा म्हणून गणपतराव एकमेव आहेत.... 

 आबांना भावपूर्ण श्रद्धांजली

एका व्रतस्थ लोकसेवकाचा प्रवास संपला ! माजी मंत्री भाई गणपतराव देशमुख यांना राज्यपाल, मुख्यमंत्री यांनी वाहिली श्रद्धांजली

 


मुंबई, दि. ३० जुलै २०२१

सोलापूर : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख Ganpatrao Deshmukh यांचे सोलापूर येथे उपचारादरम्यान निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते ९४ वर्षांचे होते. गणपतराव देशमुख हे मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची पित्ताशयाची शस्त्रक्रिया देखील पार पडली होती.

आमदार गणपतराव देशमुख हे सलग 54 वर्षे सांगोला विधानसभेचे सदस्य होते. एकाच पक्षात राहून एकाच मतदार संघातून सलग 11 वेळा निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदला गेला आहे. याची गिनीज बुकात देखील नोंद कऱण्यात आली आहे.

1962 ते 1995 पर्यंत ते सलग आमदार म्हणून निवडून आले. 1995 साली आमदार शहाजी बापू पाटील यांनी गणपतराव देशमुख यांचा अवघ्या काही मतांनी पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी 2019 पर्यंत आमदार म्हणून काम केेले. 2019 ची निवडणूक त्यांनी न लढवता, नातू डाॅ.निकेत देशमुख यांना उमेदवारी दिली. परंतु शहाजी बापू पाटील यांच्याकडून अनिकेत यांचा पराभव झाला.

रोजगार हमी मंत्री असताना गणपतराव देशमुख यांनी दुष्काळी सांगोला तालुक्याला डाळिंबा सारख्या पिकाची लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहान दिले. त्यांच्या प्रयत्नामुळेच आज सांगोल्याची डाळिंब उत्पादनात देशात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. सत्वशील, चारित्र्यसंपन्न, निष्कलंक अशी त्यांची आजही राज्यभरात ओळख आहे. सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राच्या वाटचालीत त्यांचा मोलाटा वाटा आहे. देशातील महिलांसाठीची पहिली सुतगिरणी देखील त्यांनीच सुरु केली. पाणी, रोजगार आणि शेती या क्षेत्राशी त्यांचा मोठा व्यासंग आहे.

गणपतराव देशमुख यांची कारकीर्द एक दृष्टिक्षेप

शेतकरी कामगार पक्षाकडून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघाचे 11 वेळा प्रतिनिधित्व

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांपासून ते देवेंद्र फडणवीसांबरोबर केले काम

गणपतराव देशमुख राजकारणात येण्यापूर्वी नामवंत वकील म्हणून सांगोला परिसरात सुपरिचित होते.

1962 साली देशमुखांनी शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकली

आणीबाणीच्या काळात गणपतराव देशमुखांना तुरुंगवास भोगावा लागला.

1972 च्या निवडणुकीमध्ये गणपतरावांना सांगोल्याचे सध्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र, दोनच वर्षात झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये पुन्हा निवडून आले.

1977 साली गणपतरावांनी महाराष्ट्र विधानसभेच 'विरोधीपक्ष नेते' पद सांभाळले

1978 च्या शरद पवारांच्या पुलोद सरकारमध्ये मंत्री झाले आणि 1999 ला गणपतरावांची काँग्रेसच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली

2019 च्या निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली आणि नातू डॉ.अनिकेत देशमुख यांनी निवडणूक लढवली

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम.करुणानिधी यांनी 12 वेळा निवडणूक लढली आणि जिंकली गणपतरावांनी 12 वेळा निवडणूक लढवली आणि 11 वेळा जिंकली.

एसटी बस ने प्रवास आणि साधी राहणी यामुळे गणपतराव लोकप्रिय होते.


शेकापचे नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले आहे. गणपतराव देशमुख अजातशत्रू होते. त्यांच्या निधनाने राज्य विधानमंडळाने एक चालते बोलते विद्यापीठ गमावले आहे - राज्यपाल

ज्येष्ठ शेकाप नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्र्यांना शोक. राजकारणात साध्या, सात्विक विचारसरणीचा मापदंड निर्माण करणारे व्यक्तिमत्व हरपले - मुख्यमंत्री

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक चळवळीचं ध्येयनिष्ठ, सुसंस्कृत नेतृत्वं काळाच्या पडद्याआड - उपमुख्यमंत्री

राज्यातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनामुळे एका व्रतस्थ लोकसेवकाचा प्रवास संपला, या शब्दात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

गणपतराव देशमुख यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना ते म्हणाले की, भाई एक निस्पृह आणि चारित्र्यवान नेते होते. शेतकरी, कष्टकरी व गरिबांप्रती ते आयुष्यभर कटिबद्ध राहिले. तत्व, मूल्य आणि विचारधारेशी कधीही तडजोड केली नाही. त्यांची लोकप्रियता अफाट होती व त्यामुळेच मतदारांनी त्यांना प्रदीर्घ काळ आपले प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी सोपवली. जनतेच्या या विश्वासाला त्यांनी कधीही तडा जाऊ दिला नाही. प्रामुख्याने सांगोला परिसरासाठी त्यांनी मोठे काम केले. टेंभू-म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून या भागाला पाणी देण्यासोबतच सहकार व शिक्षण क्षेत्रातही त्यांनी भरीव कामगिरी केली.

मागील अनेक वर्ष विधिमंडळात त्यांचे काम जवळून बघण्याची संधी मला मिळाली. महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणि विधिमंडळाच्या कामकाजाचा ते एक चालता-बोलता विश्वकोश होते. प्रचंड ज्ञान आणि अफाट कार्यक्षमता असलेले महाराष्ट्रातील एक प्रमुख नेते असतानाही त्यांनी कधी बडेजाव केला नाही. आयुष्यभर त्यांची राहणी अगदी साधी राहिली. मागील विधानसभा निवडणुकीत ते ९३ वर्षांचे असताना सुद्धा पुन्हा त्यांनीच उभे रहावे, यासाठी तेथील जनता आग्रही होती. यातून अगदी नव्वदीतही त्यांची लोकप्रियता, जनसंपर्क आणि लोकांचा विश्वास कायम होता, हे दिसून येते. भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे- अशोक चव्हाण 

महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि जेष्ठ नेते #गणपतराव_देशमुख यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील एक जेष्ठ नेत्रूत्व हरपले आहे. शेत मजूर, कष्टकरी या वर्गासाठी त्यांनी केलेले काम हे ऐतिहासिक आणि अनुकरणीय असे आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली- एकनाथ खडसे

शुक्रवार, जुलै ३०, २०२१

लाच प्रकरण : कनिष्ठ सहाय्यकाकडून 1,000 रुपये लाच घेताना महा लाचखोर तालुका आरोग्य अधिकाऱ्यासह लाचखोर डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात


  •  दोन डॉक्टर अडकले एसीबीच्या जाळ्यातमानधनाचे
  •  बिल मंजूर करण्यासाठी घेतली हजाराची लाच

मानधनाचे बिल मंजुर करण्यासाठी प्रत्येकी हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या दोघं डॉक्टरांना एसीबीच्या (ACB) पथकाने रंगेहात पकडले. आज दुपारी लाच धुळे एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली.

शिंदखेडा तालुक्याच्या नरडाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कनिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत असलेल्या तक्रारदाराने त्याने केलेल्या एनआरएचएम अंतर्गतच्या कामाच्या मानधनाचे १७ हजार रुपयांचे बिल मंजुर करण्यासाठी आरोग्य विभागाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भुषण पंडीत मोरे (वय ३४ रा.वर्षी ता.शिंदखेडा) आणि डॉ.पंकज बारकु वाडेकर (रा.दत्त कॉलनी,साईमंदिराजवळ देवपुर,धुळे) यांनी प्रत्येकी हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार केली.

एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी करून आज दुपारी सापळा रचला. डॉ.मोरे आणि डॉ.वाडेकर हे या दोघांनी प्रत्येकी १ हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची काम सुरु आहे. ही कारवाई एसीबीचे नाशिक विभागाचे पोलिस अधिक्षक सुनिल कडासने, अपर पोलिस अधिक्षक निलेश सोनवणे, सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस उपअधिक्षक सुनिल कुराडे, निरीक्षक झोडगे, राजन कदम, शरद काटके, जयंत साळवे, संतोष पावरा, प्रशांत चौधरी, कृष्णकांत वाडीले, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, महेश मोरे, कैलास जोहरे, पुरुषोत्तम सोनवणे,गायत्री पाटील, संदीप कदम,सुधिर मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

गुरुवार, जुलै २९, २०२१

लाच प्रकरण :आज दोन लाचखोर नांदेड परिक्षेत्रातील एसीबी पथकाच्या जाळ्यात ! एक तालुका कृषी अधिकारी तर दुसरा शाखा अभियंता

 


Respected sir/madam 

* Demand CASE

➡युनिट       :- नांदेड  

➡तक्रारदार  :- पुरुष वय 26  वर्ष 

➡आरोपी  लोकसेवक  :- 1)श्री रमेश लक्ष्मण पसलवाड, वय 57 वर्ष, व्यवसाय नोकरी तालुका कृषी अधिकारी, बिलोली जि .नांदेड रा. राजगढ़ नगर, छत्रपती चौक नांदेड.

(वर्ग -2)

➡ तक्रार प्राप्त  :- दिनांक  07/07/2021

➡ लाचमामागणी पडताळणी दिनांक :- 16/07/2021   

➡ लाच मागणी रक्कम:- 15,000/- रुपये   तडजोडीअंती 12,000/- रु.

➡ कारण:-

            यातील आरोपी लोकसेवक यांनी  तक्रारदार यांचे नवीन कृषी सेवा केंद्र  सुरू करण्यासाठी शेती उपयोगी खत, बियाणे,औषधे  विक्रीचे परवान्यांचा प्रस्ताव कृषी अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे पाठवण्यासाठी 15,000/- रु. लाचेची मागणी करून तडजोडीअंती 12,000/- रु. लाच मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.

➡️मार्गदर्शक:- मा. श्रीमती कल्पना बारवकर,पोलीस अधीक्षक ला.प्र.वि.नांदेड परिक्षेत्र नांदेड 

मा. श्रीमती अर्चना पाटील,अप्पर पोलीस अधिक्षक ला. प्र.वि. नांदेड  परिक्षेत्र नांदेड    

➡  So  :- श्री. विजय डोंगरे, पोलिस उपअधीक्षक, ला. प्र. वि. नांदेड

  ➡️TLO:- श्री अरविंद हिंगोले, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.नांदेड   

ACB नांदेड, टीम पोना एकनाथ गंगातिर्थ, जगन्नाथ अनंतवार, ईश्वर जाधव, नरेंद्र बोडक


Respected Madam, *यशस्वी सापळा कार्यवाही*

➡ युनिट :- लातूर

➡ तक्रारदार :- पुरूष, वय- 31 वर्ष  

➡ आरोपी - ज्ञानदेव प्रल्हादराव सुडे वय 54 वर्षे, पद-शाखा अभियंता वर्ग-3 नेमणूक- उप अभियंता, (यांत्रिकी) यांत्रिकी उप विभाग, जिल्हा परिषद लातूर, जि. लातूर रा. बार्शी रोड अश्वमेध हॉटेल च्या पाठीमागे लातूर, जि. लातूर 

➡ लाचेची मागणी- 60,000/- ते 65,000/- रुपये तडजोडी अंती लाचेची रक्कम 40.000 रुपये

➡ लाचेची मागणी/पडताळणी दिनाक:- 27/07/2021

➡ लाच स्विकारली:- नाही

➡ लाचेचे कारण :- तक्रारदार यांनी जिल्हा परिषद, अंतर्गत पाणी पुरवठा विभागामार्फत केलेल्या मौजे ग्रामपंचायत आर्वी मध्ये पाणीपुरवठा सुरळीत केलेल्या कामाच्या बिलाचे एम.बी.(मोजपुस्तिका) करण्यासाठी व प्रलंबित असलेले 7,40,000 /-रुपये बिल मंजूर करण्याकरिता तक्रारदार यांच्याकडे 60,000/- रुपये ते 65,000/- लाचेची मागणी करून तडजोडी अंती 40,000/- रुपये लाच मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.

➡ आरोपी :- आरोपी अटक नाही.

➡ यशस्वी सापळा दिनांकः- 29/07/2021 रोजी जिल्हा परिषद लातूर.

➡ मार्गदर्शन:-  

श्रीमती कल्पना बारवकर,

पोलिस अधीक्षक,

नांदेड परिक्षेत्र.

श्रीमती अर्चना पाटील, 

अपर पोलिस अधीक्षक,

नांदेड परिक्षेत्र.

➡ TLO :- पोलीस निरीक्षक कुमार 

दराडे

➡ SO :- पोलिस उप अधीक्षक माणिक बेद्रे

लातूर ACB टीम

बुधवार, जुलै २८, २०२१

गौण खनिज वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसवण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांचे आवाहन

 


  • गौण खनिज वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसवण्याचे आवाहन

नांदेड,दि. 27 जुलै 2021  :-जिल्ह्यात मोठया प्रमाणात अवैध खनिजाची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. रात्री बेरात्री अवैध वाहतूक होत असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होऊन अपघात घडत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील गौणखनिज वाहतूक करणाऱ्या चालक-मालकांनी आपल्या वाहनांवर तात्काळ जीपीएस यंत्रणा बसवून घ्यावी, अन्यथा अशा वाहनांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे. 


फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 133 नुसार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यातील गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनासाठी जीपीएस यंत्रणा बसविण्याचे आदेश निर्गमीत केले आहेत. जिल्ह्यात तसेच प्रामुख्याने शहरात ट्रक, टिप्पर, हायवा आदी वाहनांनी गौणखनिजाच्या वाहतुकीचे नियमन करणे आवश्यक आहे. याबाबत सर्व गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी याची नोंद घ्यावी, असेही आवाहन केले आहे.

मंगळवार, जुलै २७, २०२१

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन ! जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी ; 2 दिवसाचे रोजगार मेळाव्या”चे ऑनलाईन आयोजन

 


  • पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन 
  • सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींनी सहभाग घेण्याचे आवाहन

TUESDAY, JULY 27, 2021

नांदेड,दि. 27 जुलै 2021 :- जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी 29 व 30 जुलै 2021 या कालावधीत 2 दिवसाचे “पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्या”चे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कैलास इमारत, कैलासनगर वर्कशॉप रोड नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे. 


नामांकित कंपनीच्यावतीने बेरोजगार उमेदवारांना या मेळाव्यात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ऑनलाईन मुलाखती घेण्यात येणार आहेत. किमान शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी व कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या रोजगार मेळाव्यास जास्तीत जास्त ऑनलाईन अर्ज करावेत. कंपनीचे प्रतिनिधी आपल्याशी ऑनलाईन (स्काईप, व्हॉटसॲप, फोन आदीद्वारे) संपर्क साधून आपली ऑनलाईन मुलाखत घेतील. अधिक माहितीसाठी रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा दुरध्वनी क्रमांक 02462-251674 वर सपंर्क साधवा.


कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या http://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर रोजगार इच्छूक उमेदवारांना जॉब सिकर ऑप्शनमध्ये नाव नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. जॉब सिकर ऑप्शन या लिंकवर क्लिक करुन आपल्या युजरनेम व पासवर्डचा वापर करुन लॉगीन करावे. प्रोफाईल मधील पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या लिंकवर क्लिक करावे. रोजगार मेळाव्याचा नांदेड जिल्हा निवडून फिल्टर या बटणावर क्लिक करावे. नांदेड जिल्हा पंडित दीनदयाल ऑनलाईन जॉब Fair 3 मेळावा असे दिसेल. त्यातील Action या पर्यायाखालील दोन बटणांपैकी पहिल्या बटणावर क्लिक केल्यास मेळाव्याची माहिती दिसेल. तर दुसऱ्या बटणावर क्लिक केल्यास मेळाव्यात उपलब्ध रिक्त पदे दिसतील व क्लिक केल्यानंतर एक संदेश येईल. हा संदेश काळजीपूर्वक वाचून I Agree बटणावर क्लिक करावे. रोजगार मेळाव्यात उपलब्ध असलेली पदे (पदाचे नाव, शैक्षणिक अहर्ता, आवश्यक कौशल्य, अनुभव, वयोमर्यादा, आरक्षण) दिसेल. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, कौशल्य यानुसार पदाची निवड करावी व अर्जाच्या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर एक संदेश दिसेल हा संदेश काळजी पूर्वक वाचून ओके बटणावर क्लिक करावे. रोजगार मेळाव्यामध्ये आपला ऑनलाईन सहभाग नोंदविला जाईल अशा प्रकारचा संदेश दिसेल अशी माहिती रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी दिली.


Nanded Rojgar Melava 2021 : नांदेड येथे खाजगी नियोक्ता करीता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा – 3 चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन (नोंदणी) करावी. ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 29 ते 30 जुलै 2021 आहे.

मेळाव्याचे नाव – ऑनलाईन पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा – 3

भरती – खासगी नियोक्ता (Private Employer)

राज्य – महाराष्ट्र (Maharashtra)

विभाग – औरंगाबाद (Aurangabad)

जिल्हा – नांदेड (Nanded)

मेळाव्याची तारीख – 29 ते 30 जुलै 2021 आहे.


अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा  👇

https://rojgar.mahaswayam.in/#/home/index


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

whatsapp sharing button Sharetelegram sharing buttonfacebook sharing button

आज प्रकाशित झालेल नवीन सराव पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

whatsapp sharing button Sharetelegram sharing buttonfacebook sharing button

Nanded Job Fair 2021

 0

 Share

 PREV POST

UPSC Recruitment 2021 : UPSC अंतर्गत 422 पदांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु

NEXT POST 

MMRCL Bharti 2021 | मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2021

Most Popular

 Join Newsletter

Join Newsletter

Subscribe our newsletter to stay updated.

Enter your e-mail ..

Subscribe

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधीची माहिती उपलब्ध करून देणेकरिता आणि विविध स्पर्धा परीक्षांचे सराव पेपर्स उपलब्ध करून देण्याकरिता या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे.

• Email: vkclindiabusiness@gmail.com

• Phone: 7756971964


Most Viewed

खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत मुलाखती आयोजित

ESIC Pune Recruitment 2021 | ESIC पुणे भरती करिता मुलाखती आयोजित

तलाठी भरती पेपर 124

Editors' Picks

दहावीच्या परीक्षा रद्द; बारावीच्या परीक्षा मे मध्ये अपेक्षित!

UPSC Recruitment 2021 : UPSC अंतर्गत 422 पदांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु

Mahatransco Bharti 2021 | 10 वी उत्तीर्णांना संधी – महापारेषण भरती…

Opinion

Pravara Sahakari Bank Ahmednagar Bharti 2021 : प्रवरा सहकारी बँक…

चालू घडामोडी सराव पेपर 22-March 2021

ACTREC Mumbai Recruitment | ACTREC मुंबई मध्ये विविध पदांकरिता भरती

© 2021 - Rojgar Nokari Sandarbh. All Rights Reserved.Website Design: VKCL


रविवार, जुलै २५, २०२१

कोलंबीच्या मन्ना महाराज यांचा आज शिखर शिंगणापूर येथे अमृत महोस्त्व

 


नायगाव,दि 25 जुलै 2021 :  प.पू. श्री. मन्ना महाराज कोलंबीकर यांचा अमृत महोत्सव (७५ वी) व शांती सोहळा शके १९४३, नाम संवत्सरे मिती आषाढ कृ. तृतीया,

सोमवार दि. २६/०७/२०२१ रोजी श्री श्री. शंभू महादेवाच्या नगरीत शिखर शिंगणापूर जिल्हा सातारा येथे अर्थव मंगल कार्यालय, श्री गुप्तलिंग पेट्रोल पंप गुप्तलिंग,येथे अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळा साजरा होत आहे. 

   

   या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती ब आशिर्वचन - प. पु. शंकराचार्य जी, करवीर पीठ, कोल्हापूर. श्रीमंत छ. कल्पनाराजे भोसले, सातारा.

स. भ. श्री. सोन्ना महाराज रामदासी, सज्जनगड संस्थान. वेदमूर्ती श्री. बाळासाहेब शंकर खटावकर, वरुड श्री. वेदमूर्ती श्री. मधुर शास्त्री जोशी त्र्यंबकेश्वर व नाशिक, वरुड, शिखर शिंगणापुर येथील ब्रम्हवृंद, श्री. कल्याणपंत कुलकर्णी (ब्र. हनुमंत महाराज संस्थान, वावरहिरे) यांची राहणार आहे.

   - कार्यक्रमाची रुपरेषा अशी आहे. ६ ते ९ : दशविध स्नानस. ९ ते १० : श्री. शंभू महादेव दर्शन व अभिषेक.१० ते ११ : अल्पोपहार स. ११ ते १ : ऐंद्री शांती व शिवलीलामृत पारायण गणेश पुजन, होमहवन, दिपोत्सव तुलाभार (धान्य, सुवर्ण, तैलतुला, ग्रंथ, तुला)दुपारी . १ ते ३ : महाप्रसाद

सायंकाळी. ३ ते ५ सायंकाळी.५ ते ६ विलासबुवा गरवारे, सि. कुरोली यांचे किर्तन ह.भ.प.नंतर मनोगत कार्यक्रम होणार आहे.त्यानिमित्ताने नांदेड जिल्ह्यातील भक्त गणना येण्याचे आ व्हान शिंगणापूर...येथील मना महाराज सत्कार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

मंत्रालयातील लिफ्टमॅनचा पगार ऐकून उपमुख्यमंत्री अस्वस्थ झाले खरे पण...

 


  • मंत्रालयातील लिफ्टमॅनचा पगार ऐकून उपमुख्यमंत्री झाले अस्वस्थ
  • कंत्राट दोन कंपन्यांना देण्यात आले आहे. त्या कामगारांना किती पगार देतात,सरकार कंपन्यांना प्रत्येक कामगारामागे किती पैसा देते याची विसंगती पुढे शोधण्यात आली नाही.

मुंबई : मुंबईतील मंत्रालयात दररोज मंत्र्यांसह शेकडो लोकांची ये-जा होत असते. यावेळी मंत्रालयातल्या लिफ्टचाही तेवढ्याच प्रमाणात वापर होत असतो. याच मंत्रालयातील लिफ्टमधून वर जात असतानाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक किस्सा समोर आला असून त्यातून त्यांची सर्वसामान्यांविषयी असणारी आपुलकी पुन्हा एकदा समोर आली आहे.अजित पवार नवीनच उपमुख्यमंत्री झाले होते. त्यावेळी ते मंत्रालयातल्या लिफ्टमधून वर जात होते. त्यावेळी अजित पवारांनी लिफ्टमधल्या लिफ्टमनला त्याचा पगार विचारला. काय किती पगार मिळतो तुला अशी विचारणा त्यांनी लिफ्टमनला केला. त्यावर लिफ्टमन म्हणाला, साहेब ८,००० हजार रुपये मिळतात. हे ऐकताच अजित पवार अस्वस्थ झाले.

कामगारांना 15 हजार रुपये किमान वेतन असलं पाहिजे असा कायदा आहे. असा कायदा असतानाही चक्क मंत्रालयातल्या लिफ्टमनला फक्त 8 हजार रुपये कसे मिळतात, असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला. त्यानंतर अजित पवारांनी अधिकाऱ्यांना यासंबंधीची माहिती घेण्यास सांगितले.एका वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, समोर आलेल्या माहितीनुसार, मंत्रालयात लिफ्टमन, सफाई कामासाठी मनुष्यबळाचे कंत्राट दोन कंपन्यांना देण्यात आले आहे. त्या कामगारांना किती पगार देतात, सरकार कंपन्यांना प्रत्येक कामगारामागे किती पैसा देते याची विसंगती पुढे शोधण्यात आली नाही.

लाच प्रकरण : महा लाचखोर महिला सहायक अधीक्षक अभियंतासह लाचखोर पंटर वरिष्ठ लिपिकास लोकसेवकाकडून 10 हजाराची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून दोन्ही लाचखोरांच्या मुसक्या आवळल्या

 


आदरणीय सर, जयहिंद

सापळा अहवाल 

दि 24/07/2021

▶️ युनिट  - औरंगाबाद

▶️ तक्रारदार- 

      पुरुष, वय- 39 वर्ष

▶️ आरोपी  लोकसेवक :- 1) श्री. मनसुब रामराव बावसकर,  वय 57 वर्ष, व्यवसाय :- वरीष्ठ लिपिक,  (वर्ग 3) अधीक्षक अभियंता कार्यालय पाटबंधारे मंडळ औरंगाबाद  ता. जि. औरंगाबाद ,

 आलोसे क्र. 2 ) श्रीमती संजीवनी पंटर वरिष्ठ लिपिक गर्जे, वय 57 वर्ष, सहायक  अधीक्षक अभियंता (वर्ग 1)  अधीक्षक अभियंता कार्यालय, पाटबंधारे  मंडळ औरंगाबाद. 

➡️लाच मागणी, लाच स्वीकारली दिनांक - 24/07/2021

➡️लाचेची मागणी-  10,000/- रुपये

➡️लाच स्वीकारली-10,000/ रूपये.                

▶️  कारण - यातील तक्रारदार यांचे जालना येथून औरंगाबाद येथे विनंती बदली करण्यासाठी  आरोपी क्र.1 यांनी 10,000/ - रुपये लाचेची मागणी करुन पंचासमक्ष स्वीकारले व  आलोसे क्र.2 यांनी आरोपी क्र. 1 यांना लाच घेण्यासाठी प्रोत्साहन देऊन, घेतलेल्या 10,000-/ रुपये लाचेच्या रक्कमेचे स्वत: पंच साक्षीदार समक्ष समर्थन केले.

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.

▶️ सापळा अधिकारी, - कुमारी शुभांगी सूर्यवंशी ,पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि.औरंगाबाद.

▶️मार्गदर्शक-मा. डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद

मा.श्री.ब्रह्मदेव गावडे -प्रभारी 

अपर पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि.औरंगाबाद

मा.श्री मारोती पंडित पोलीस उप अधीक्षक,ला. प्र .वि. औरंगाबाद 

➡️सापळा पथक -

पोअं/रवींद्र काळे , पोअं/राजेंद्र सिंनकर, पोअं/अशोक नागरगोजे चालक पोअं/चांगदेव बागुल ला.प्र.वि,औरंगाबाद.

शनिवार, जुलै २४, २०२१

उलट सापळा कारवाई : परिवहन महामंडळाच्या ड्रायव्हरने त्याच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी लाच देऊ केल्याने एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून ताब्यात घेतले



Respected sir/madam 

* TRAP CASE 

➡युनिट :- नांदेड  

➡तक्रारदार :- लोकसेवक, पुरुष, वय 49 वर्ष 

➡आरोपी :- आनंद सखाराम तिगोटे, वय 33 वर्षे, व्यवसाय नोकरी वाहक क्र. 16562 रा.प.म. नांदेड आगार , रा. संभाजी चौक, सिडको, नांदेड.

➡ तक्रार प्राप्त :- दिनांक 23/07/2021

➡ लाच देणे पडताळणी दिनांक :- 24/07/2021

➡ सापळा दिनांक :- 24/07/2021, पो स्टे नांदेड ग्रामीन

➡ लाचेची रक्कम:- 3000/- रु. 

➡ कारण:- लोकसेवक/तक्रारदार यांचेकडे आरोपी यांचे विरुद्ध दाखल पो स्टे नांदेड ग्रामीण गूरनं 513/2021 कलम 294, 506 भादवि. गुन्ह्याचा तपास असुन सदर गुन्हयात चार्जशिट न पाठविता फायनल रिपोर्ट पाठविण्यासाठी व गुन्हयाचे तपासात मदत करण्यासाठी आरोपी यांनी लोकसेवक/तक्रारदार यांना 3000/- रुपये लाच देऊन अयोग्य कर्तव्य करण्यासाठी प्रवृत्त केले आहे.   

➡ मार्गदर्शक:- 

मा.श्रीमती कल्पना बारवकर, पोलीस अधिक्षक, ला. प्र. वि. नांदेड परिक्षेत्र नांदेड.

मा.श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. नांदेड परिक्षेत्र नांदेड.

➡ So :- श्री. विजय डोंगरे, पोलिस उपअधीक्षक, ला. प्र. वि. नांदेड

➡ TLO :- श्री. राहुल पखाले, ला.प्र.वि. नांदेड, 

ACB नांदेड टीम- पोहेकाॕ. बालाजी तेलंगे, पोना गणेश तालकोकुलवार, सचिन गायकवाड, चापोना मारोती सोनटक्के



लाच प्रकरण : महा लाचखोर उप विभागीय पोलीस अधिकाऱ्याने तब्बल 2 कोटी रुपयांची लाच मागणी करून 10 लाख रुपयांची लाच आपल्या पंटर पोलीस नाईक मार्फत स्विकारताना एसीबी पथकाने दोन्ही लाचखोरांच्या मुसक्या आवळल्या



परभणी,दि 24 जुलै : तक्रारदार यांना दाखल गुन्हामध्ये मदत करण्यासाठी आरोपी क्र १ उप विभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल याने २ कोटी रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडी अंती १ कोटी ५० लाख रुपयाची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याने तसेच सदर रकमेपैकी आरोपी क्र २ गणेश चव्हाण पोलीस नाईक याने रु १० लाख लाचेची रक्कम स्विकारली म्हणुन गुन्हा नोंद.

यातील तक्रारदार यांचे मित्राचा अपघाती मृत्यु झाले बाबत ०३/०५/२०१ रोजी सेलू पोलिस ठाणे जि.परभणी येथे गुन्हा रजि क्रमांक १२०/२०२१ भादवि कलम ३०४(अ), २७९,४२७ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्हयातील मयत याचे पत्नी सोबत यातील तक्रारदार याचे झालेले मोबाईल वरील संभाषण व्हायरल झाल्याने दिनांक ९/०७/२०२१ रोजी यातील आरोपीत क्र.१ उप विभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल याने तक्रारदार यांना त्याचे कार्यालयात बोलावून तुझी व्हायरल झालेली क्लीप मी ऐकली असून यातून तुला बाहेर पडायला २ कोटी रुपये दयावे लागतील असे बोलून तक्रारदार यांना वारंवार फोन करून अश्लील भाषेत शिविगाळ करून २ कोटी रुपये लाचेची मागणी केली.

तक्रारदारास आरोपीत लोकसेवकास लाच दयावयाची नसल्याने त्यानी लाच प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे दि २२/०७/ २०२१ रोजी प्रत्यक्ष येवून लेखी तक्रार दिली. वरिष्ठाचे आदेशाने सदर तक्रारीवर कार्यवाहीसाठी लाचलुचपत

प्रतिबंध विभाग, मुंबई यांना निर्देश देण्यात आले.

त्यानुसार दि २३/०७/२०२१ रोजी तक्रारदार यांच्या तक्रारीवरून पडताळणी केली असता, यातील आरोपी लोकसेवक क्र १ उप विभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल याने तक्रारदार याचेकडे वर नमुद्र गुन्हयात मदत करण्यासाठी २ कोटी रु लाच मागणी करून तडजोडी अंती १ कोटी ५० लाख रुपये इतक्या रक्कमेच्या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर काही वेळातच केलेल्या सापळा कारवाई दरम्यान आरोपीत लोकसेवक क्र २ गणेश चव्हाण पोलीस नाईक यास तक्रारदार यांचे भावाकडून १० लाख रुपये लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुबई विभागातर्फे नागरीकाना आवाहन करण्यात येते की भ्रष्टाचारा सबंधीत काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई विभागाशी संपर्क साधावा.


मा.आदरणीय सर,

➡️1) पो स्टे सेलु जिल्हा परभणी 

➡️2) गु.र.नं.233/2021 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये   

➡️3) फिर्यादी - प्रवीण पांडुरंग बनगोसावी वय 35 वर्ष पोलिस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई मो नंबर 8975572388

➡️4)आरोपी- 1) 1)श्री राजेंद्र रामकरण पाल वय 55वर्ष सेलू उपविभागीय पोलिस अधिकारी 2) श्री गणेश लक्ष्मणराव चव्हाण वय 37 वर्ष पोलीस नाईक क्र 1121 नेमणूक मानवत पोलिस स्थाने सध्या संलग्न उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय सेलू ता. सेलू जि. परभणी      

➡️5) गु.घ.ता.वेळ ठीकाण- दिनांक 23/07/2021रोजी चे 20.42 ते 23.59 वा दरम्यान तक्रारदार यांचे राहते घरी मोंढा सेलू ता सेलु पश्चिमेस 00.50 किमी बिट क्रमांक 01 

➡️6) गु.दा. ता. वेळ— दिनांक /24/07/2021 चे 13.29 वाजता स्टे डा नं 20

➡️7) खुलासा - वरील तारीख वेळी व ठिकाणी यातील नमूद आरोपी लोकसेवक श्री राजेंद्र रामकरण पाल सेलू उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी तक्रारदार श्री राहुल भिकूलाल कासट यांच्याकडून कायदेशीर परिश्रमीकाखेरीज परितोषण म्हणून भ्रष्ट व बेकायदेशीर मार्गाने दोन कोटींची मागणी करून दीड कोटी रु स्वीकारण्याचे कबूल करून त्यापैकी रु 10,00,000 इतकी लाचेची रक्कम स्वीकारले म्हणून माझी लोकसेवक 1)श्री राजेंद्र रामकरण पाल सेलू उपविभागीय पोलिस अधिकारी व लोकसेवक 2) श्री गणेश लक्ष्मणराव चव्हाण पोलीस नाईक क्र 1121 नेमणूक मानवत पोलिस स्थाने सध्या संलग्न उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय सेलू ता. सेलू जि. परभणी यांचे विरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये कायदेशीर फिर्याद दिली आहे म्हणून गुन्हा दाखल .        

➡️8)तपासी अधीकारी- पोनि पुरी ला. प्र. वि. परभणी मो. न 9922456222 घटनास्थळी भेट दिली  

➡️9) दाखल अंमलदार- पोउपनि माळगे मो.नंबर 9561931740 पोस्टे सेलू 

➡️10)आरोपी अटक -आहे

➡️ 11) मिळाला माल- 500 रु दराच्या भारतीय चलनाच्या 2000 नोटा एकूण माल 10,00,000 रुपये नगदी ➡️12)उशीराचे कारण: नाही

मुंबई कडे जाणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द ! द.म.रे जनसंपर्क कार्यालय नांदेड



दक्षिण मध्य रेल्वे

जनसंपर्क कार्यालय, नांदेड

प्रेस नोट क्र. ४५ दिनांक २३ .०७.२०२१

आदरणीय संपादक साहेब, 

नमस्कार 

विषय : मुंबई कडे जाणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द

संदर्भ : मध्य रेल्वे चे पत्र क्र. ०७/४४४ दिनांक २३.०७.२०२१

मध्य रेल्वे ने सूचित केल्या नुसार , मध्य रेल्वे मधील इगतपुरी-कसारा-कल्याण घाटांमध्ये अति पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे तसेच काही ठिकाणी रेल्वे पटरी वर आलेल्या पाण्यामुळे तर काही ठिकाणी रेल्वे पटरी वाहून गेल्यामुळे मध्य रेल्वे ने काही रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. या पैकी नांदेड विभागातील पुढील गाड्या पुढे दिलेल्या तारखेस रद्द करण्यात येत आहेत.

क्र. गाडी संख्या कुठून - कुठे दिनांक शेरा

१ ०११४१ मुंबई-आदिलाबाद नंदीग्राम विशेष २४, २५, २६ आणि २७ जुलै, २०२१ पूर्णतः रद्द

२ ०११४२ आदिलाबाद-मुंबई नंदीग्राम विशेष २५, २६, २७ आणि २८ जुलै, २०२१ पूर्णतः रद्द

३ ०७६११ नांदेड-मुंबई राज्य राणी विशेष २४, २५, २६ आणि २७ जुलै, २०२१ पूर्णतः रद्द

४ ०७६१२ मुंबई-नांदेड राज्य राणी विशेष २५, २६, २७ आणि २८ जुलै, २०२१ पूर्णतः रद्द

५ ०७६१३ पनवेल-नांदेड पनवेल विशेष २५, २६, २७ आणि २८ जुलै, २०२१ पूर्णतः रद्द

६ ०७६१४ नांदेड-पनवेल पनवेल विशेष २४, २५, २६ आणि २७ जुलै, २०२१ पूर्णतः रद्द

७ ०७६१७ नांदेड-मुंबई तपोवन विशेष २४, २५, २६ आणि २७ जुलै, २०२१ पूर्णतः रद्द

८ ०७६१८ मुंबई-नांदेड तपोवन विशेष २५, २६, २७ आणि २८ जुलै, २०२१ पूर्णतः रद्द


आदरणीय संपादक महोदयांना विनंती आहे हि बातमी आपल्या वर्तमान पत्रात प्रसिद्ध करावी. 

जनसंपर्क कार्यालय, नांदेड

शुक्रवार, जुलै २३, २०२१

नांदेड जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 29.2 मि.मी. पाऊस

 


  • जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 29.2 मि.मी. पाऊस 

नांदेड,दि.23 जुलै :- जिल्ह्यात शुक्रवार 23 जुलै 2021 रोजी सकाळी वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 29.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 360.7 मिलीमीटर पाऊस झाला आहे. 

जिल्ह्यात शुक्रवार 23 जूलै रोजी सकाळी वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणेकंसात एकूण पाऊस : नांदेड- 29.6 (361.7), बिलोली- 60.3 (437.4), मुखेड- 14.4 (318.6), कंधार-17.1 (324.6), लोहा-25.7 (362.3), हदगाव-15.9 (311.4), भोकर- 20.3 (370.8), देगलूर-31 (330.7), किनवट- 21.9 (438), मुदखेड- 37.9 (397), हिमायतनगर-55.4 (373), माहूर- 3 (284), धर्माबाद- 87.7 (427.4), उमरी- 32.3 (398.7), अर्धापूर- 10.2 (378.9), नायगाव- 42.2 (352.5) मिलीमीटर आहे.

लाच प्रकरण : महा लाचखोर तहसिलदाराला 30,000 रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला



  • 30 हजाराची लाच घेताना तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात ; लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ

भंडारा, दि 23 जुलै 2021 : अवैध वाळू वाहतूक सुरु ठेवण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच ( Bribe) स्विकारताना भंडारा जिल्ह्यातील (Bhandara district) मोहाडी तालुक्याचे तहसीलदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा (Anti Corruption Trap ) रचून अटक (arrest) केली. देविदास बोंबुर्डे (Devidas Bomburde) असे ला घेताना रंगेहाथ पकण्यात आलेल्या तहसीलदाराचे (Tehsildar) नाव आहे. एसीबीने केलेल्या या सापळा (Anti Corruption Trap) कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार हे वाळू व्यावसायिक असून त्यांच्याकडे असलेल्या 2 ट्रॅक्टरने अवैधरित्या वाळू वाहतूक सुरु आहे. ही वाहतूक सुरु ठेवण्यासाठी तहसीलदार देविदास बोंबुर्डे यांनी प्रति ट्रॅक्टर 15 हजार याप्रमाणे दोन ट्रॅक्टरचे 30 हजार रुपये हप्ता मागितला. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (anti corruption bureau) तक्रार दिली.

तक्रारदार यांच्या तक्रारीची शहानिशा करुन शुक्रवारी (दि. 23 ) सापळा रचून तहसीलदार यांना 30 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.

आरोपी तहसीलदार विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

लाचलुचपत विभागाने एका बड्या अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्याने जिल्ह्यातील इतर भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

ब्रेकींग न्यूज : कोर्टात शपथ पत्र सादर न केल्याने मु.का.अ.वर्षा ठाकुरला 5000 ₹ चा दंड ! जिल्हा अंतर्गत बदली धोरणाची कोर्टात सुनावणी

📢📢📢 औरंगाबाद उच्च न्यायालय  वार्ता 📢📢📢


  • कोर्टात शपथ पत्र सादर न केल्याने CEO NANDED यांना 5000₹ चा दंड..
  •    जिल्हा अंतर्गत बदली धोरणाची कोर्टात सुनावणी

औरंगाबाद/नांदेड : आज दि.23/07/2021 रोजी जिल्हा अंतर्गत बदली धोरण शासन आदेश ग्राम विकास विभाग दि.07/04/2021 तसेच जिल्हा परिषद नांदेड यांनी घोषित केलेली (दि.28/04/2021रोजीची यादी) अवघड क्षेत्र यादी यासंदर्भातील आपले प्रकरण रिट याचिका बोर्डावर होते. सुनावणी दरम्यान कोर्टाला 

 मा.सुविध कुलकर्णी (वकील औरंगाबाद) यांनी कोर्टाला गेल्या तीन तारखांपासून ज़िल्हा परिषद यांचे वकील तारिक पुढे ढकलत आहेत व शपथ पत्र देखील दाखल करत नाही. त्यामुळे मा उच्च न्यायालय यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना रु 5,000/- दंड ठोठावला व पुढील तारखेस शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले. 

पुढील सुनावणी 3 आठवडे नंतर ठेवली आहे.

   नांदेड जि.प.येथे अवघड क्षेत्राची यादी घोषित करत असताना निकषपात्र शाळा अवघड क्षेत्राच्या यादीतुन वगळण्यात आल्या वारंवार निवेदने व विनंती करूनही यादीत सुधारणा न केल्यामुळे किनवट-माहूर तालुक्यातील शिक्षकांनी कोर्टात याचिका दाखल केली होती.


ॲड सुविध कुलकर्णी

     औरंगाबाद.

रमेश बनकर व इतर

जि.प.नांदेड (याचिकाकर्ते)

गुरुवार, जुलै २२, २०२१

लाच प्रकरण : तलाठ्याच्या पंटरला 8,000/- लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने मुसक्या आवळल्या



*Respected sir*

*Trap Case Report:*

➡ घटक :- सातारा

➡ तक्रारदार :- पुरुष 36 वर्ष.

➡ आरोपी :- (खाजगी इसम)

 सुनील श्रीधर पाटील वय 41 वर्षे राहणार - घर नं.19 बुधवार पेठ कराड ता. कराड जि. सातारा

➡️ पडताळणी :- दि.22/07/2021.

➡️सापळा :- दि.22/07/2021

➡️ लाचेची मागणी :- 10,000/- रुपये 

➡️ लाच स्वीकारली:-तडजोडीअंती 8,000/- रुपये.

➡ हकीकत :- यातील आरोपी खाजगी इसम हा कराड नगरपरिषद कराडचे इमारतीत असले तलाठी कार्यालयात कराड शहर सजाचे जंगम तलाठी यांचे हाताखाली कामास असुन तक्रारदार यांचे वडिलांचे नावे कराड शहर सिटी सर्वे नंबर 341 अ /2+3 ब मध्ये 128.93 चौ.मी. वर असलेल्या जागेवरील इमारतीचे 7/12 उताऱ्यावरील दि कराड अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लि कराड यांचा बोजा कमी करून त्यावर तक्रारदार यांचे पत्नीचे नावे सदरची जागा व इमारत होऊन त्यावर दि कराड अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लि कराड यांचा बोजा चढवून तसा 7/12 उतारा तलाठी कार्यालय, कराड येथून मिळवून देण्यासाठी बेकायदेशीर मार्गाने आपल्या वैयक्तिक प्रभावाचा वापर करून काम करून देण्यासाठी आरोपी खाजगी इसम यानी 10,000/- रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडी अंती 8000/- रुपये लाच रक्कम स्विकारली .

➡ सापळा पथक : -

पोलीस उपअधीक्षक - श्री.अशोक शिर्के 

पो. ना. राजे 

पो. शि. काटकर, भोसले

ला.प्र.वि. सातारा युनिट .

➡मार्गदर्शन अधिकारी :- 

श्री. राजेश बनसोडे,पोलीस अधीक्षक, लाप्रवि पुणे परिक्षेत्र.

श्री.सुहास नाडगौडा,अपर पोलीस अधिक्षक,लाप्रवि पुणे.

लाच प्रकरण : महा लाचखोर ग्रामसेवकाच्या समत्तीने लाचखोर ग्रामपंचायत पाणी पुरवठा कर्मचा-यास 7,000/- रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून दोन्ही लाचखोरांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.

 

*लाच मागणी गुन्हाअहवाल** 

▶️ *युनिट -* अहमदनगर

▶️ *तक्रारदार-* पुरुष वय- ४३ वर्ष, रा.रेल्वे स्टेशन, राहुरी, ता. राहुरी. जि.अहमदनगर

▶️ **आरोपी* = १) नवनाथ बाळासाहेब धसाळ , वय ३७ वर्ष, धंदा - नौकरी, पाणि पुरवठा कर्मचारी, ग्रा.प.तांदुळवाडी, ता- राहुरी, जि. अहमदनगर.  

रा.धसाळ वस्ती, तांदुळवाडी, ता- राहुरी,जि. अहमदनगर

२) अभय भाऊराव सोनवणे, वय ४८ वर्ष, ग्रामसेवक, तांदुळवाडी ग्रामपंचायत, तालुका- राहुरी, जिल्हा- अहमदनगर.

 राहणार- विक्रम ससाणे यांचे फ्लॅट मध्ये, पहिला मजला, अहमदनगर रोड, तिसगाव, तालुका पाथर्डी

▶️ *लाचेची मागणी-* ७०००/-₹ 

▶️ *लाचेची मागणी -* ता.१६/०३/२०२१

▶️ *लाचेचे कारण* - यातील तक्रारदार यांच्या पहिल्या पत्नीने त्यांचे नावे असलेली तांदुळवाडी शिवार गट न ४९ पैकी २ आर ही जमीन तक्रारदार यांच्या दुसऱ्या पत्नीचे नावे नोटरी करून दिली.त्या प्रमाणे ग्रामपंचायत रजिस्ट्री नोंद घेऊन देण्याचे काम ग्रामसेवक सोनवणे यांचे कडून करून देण्यासाठी यातील आरोपी धसाळ यांनी पंचा समक्ष व लोकसेवक सोनवणे यांचे उपस्थितीत दि.१६/०३/२०२१ रोजी लाच मागणी पडताळणी दरम्यान तक्रारदार यांचे कडे ७०००/- ₹ लाचेची मागणी त्याच दिवशी ५०००/- रुपये व उर्वरित २०००/- ₹ नंतर स्वीकारण्याची तयारी दर्शविली व त्यास लोकसेवक सोनवणे यांची संमती असल्याने गुन्हा दाखल. लोकसेवक सोनवणे व धसाळ यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन गु र न ५७९/२०२१, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७(अ), १२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे

▶️ *सापळा अधिकारी*:- श्याम पवरे, पोलीस निरीक्षक ला.प्र. वि. अहमदनगर

 ▶️ *पर्यवेक्षण अधिकारी** हरीष खेडकर, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, अहमदनगर

▶ *सापळा पथक:-* दिपक करांडे, पोलीस निरीक्षक, पो ना.रमेश चौधरी, विजय गंगुल, पो अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे, चालक पोलीस नाईक- राहुल डोळसे.

▶ **मार्गदर्शक* -*मा.श्री सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक

▶मा.श्री निलेश सोनवणे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि नाशिक.

 ▶️ मा.श्री.सतिश भामरे, वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक.

▶ *आरोपीचे सक्षम अधिकारी:* मा.मुख्य कार्यकारी अधिकारी , जि.प. अहमदनगर .

-------•••••••••••••••••••••••--------

 *सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*

अँन्टी करप्शन ब्युरो, अहमदनगर

दुरध्वनी- ०२४१- २४२३६७७

*@ टोल फ्रि क्रं. १०६४*

लाच प्रकरण : महा लाचखोर पाटबंधारे कालवा निरीक्षकाला 1,000/- रुपयाची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून ताब्यात घेऊन केला गुन्हा दाखल

 

*यशस्वी सापळा अहवाल*

▶️ *युनिट -* धुळे

▶️ *तक्रारदार-* पुरुष,वय-35 वर्ष.

▶️ *आरोपी*:- 1)तुषार दिलीप दलाल वय- 40वर्ष पद- कालवा निरीक्षक वर्ग-3,पाटबंधारे उपविभाग शिरपूर रा.प्लॉट क्र.19 पित्रेश्वर कॉलनी शिरपूर ता.शिरपूर जि.धुळे 

▶️ *लाचेची मागणी-* 1000/-₹

▶️ *लाच स्वीकारली*-1000/

▶️ *लाचेची मागणी -* ता. 19/07/2021

     **लाच स्वीकारली* -ता. 19/07/2021

▶️ *लाचेचे कारण* - तक्रारदार यांची मौजे पिंपळे ता.शिरपूर येथील शेत जमीन लाभ क्षेत्रात येत नसल्याबाबत ना हरकत दाखला कार्यकारी अभियंता धुळे पाटबंधारे विभाग धुळे यांच्या कडून तयार करून देण्याच्या मोबदल्यात 1000 रुपयांची लाचेची मागणी केली, त्या अनुषंगाने सापळा कारवाई केली असता आलोसे यांनी 1000 रु स्वतःच्या आर्थिक फायदया साठी स्वीकारले. पंच साक्षीदार समक्ष सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

▶️ *सापळा अधिकारी* 

प्रकाश झोडगे, पोलीस निरीक्षक

    ला.प्र.वि.धुळे

 ▶️ *सहा. सापळा अधिकारी*

मंजितसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक

ला.प्र.वि.धुळे

▶ *सापळा पथक*:- सुनील कुराडे, पोलीस उप अधिक्षक, ,पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे,पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, पोह/ जयंत साळवे,शरद काटके, कैलास जोहरे, राजन कदम, पुरुषोत्तम सोनवणे, कृष्णकांत वाडीले, प्रशांत चौधरी, भूषण खलानेकर,भुषण शेटे,संदीप कदम, महेश मोरे, संतोष पावरा, सुधीर मोरे, गायत्री पाटील ला. प्र. वि. धुळे.         

www.acbmaharashtra.gov.in         

▶ **मार्गदर्शक* -

*मा.श्री सुनील कडासने सो.* पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक 

*मा.श्री निलेश सोनवणे सो.* 

अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक 

*मा.श्री.सुनिल कुराडे* पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि.धुळे

 **मा.श्री.सतिष भामरे* वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय ,ला.प्र.वि. नाशिक.

 *▶ सक्षम अधिकारी*- मा.अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण जळगाव.

===================

*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*

*अँन्टी करप्शन ब्युरो,धुळे.*

    संतोषी माता चौक धुळे.

*@ दुरध्वनी क्रं. 02562-234020*

*@ मोबा.क्रं. 9922447946,9657009727*

*@ टोल फ्रि क्रं. 1064*

===================

बुधवार, जुलै २१, २०२१

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित ‘लोकराज्य’चा जुलै महिन्याचा अंक प्रकाशित

 

मुंबई, दि. 20 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या ‘लोकराज्य’चा जुलै महिन्याचा अंक प्रकाशित झाला आहे. राज्यात राबवण्यात येत असलेल्या वनमहोत्सव व वनीकरण कार्यक्रमाबाबतची माहिती देणारा विशेष लेख या अंकात समाविष्ट आहे. तसेच अहिंसा आणि लोककल्याण या तत्त्वांचा जागर करणाऱ्या श्रीचक्रधरस्वामी यांच्या अवतारकार्याला 800 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याची ओळख सर्वसामान्यांना व्हावी, नव्या पिढीने त्यांचे तत्वज्ञान समजून घ्यावे, यासाठी विशेष लेखांचा विभाग हे या अंकाचे वैशिष्ट्य आहे.

या अंकात पर्यावरण विभाग राबवत असलेल्या विविध योजना, कोरोनामुक्त गाव मोहीम, बीडचा पिकविम्याचा पॅटर्न, कुलाळवाडीची वैशिष्ट्यपूर्ण शाळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना इत्यादी माहितीच्या लेखांचा तसेच शेतीतील नव्या प्रयोगांनी महाराष्ट्र अधिक समृद्ध होत असून ‘विकेल ते पिकेल’ या योजनेच्या यशकथांचाही समावेश करण्यात आला आहे. महत्त्वपूर्ण घडामोडी व मंत्रिमंडळ निर्णयांचा थोडक्यात आढावाही या अंकात घेण्यात आला आहे. हा अंक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच https://mahasamvad.in/?p=44127 या लिंकवर वाचण्यासाठी मोफत उपलब्ध आहे.

लोकराज्य जुलै-२०२१.pdf

Tags: लोकराज्य

मतदान प्रक्रियेत मतदारांच्या अधिक सहभागासाठी स्वीप-2021 मोहिम प्रभावीपणे राबवू -जिल्हाधिकारी


नांदेड

दि. 20 जुलै 2021 :- लोकशाही प्रक्रियेत मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावणे हे सक्षम नागरिकत्वाचे द्योतक असून प्रत्येकांनी आपला मतदानाचा हक्क बजावणे महत्वाचे आहे. जिल्ह्यातील नागरिकांमध्ये मतदानांविषयी अधिकाधिक जनजागृती व्हावी या उद्देशाने स्वीप जनजागृती मोहिम हाती घेतली असून जिल्हा प्रशासनातर्फे ती प्रभावीपणे राबविली जाणार आहे. कोविड-19 च्या या काळात मतदानाची प्रक्रिया आरोग्याच्यादृष्टिने अधिक सुरक्षित कशी होऊ शकेल याची काळजी जिल्हा प्रशासन घेत आहे. यादृष्टिने स्वीप-2021 मोहिमेंतर्गत अधिकाधिक जनाजागृती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीप-2021 कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत ते बोलत होते. 

बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रशांत शेळके, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्र आणि जनसंवाद विभागाचे संचालक डॉ. दिपक शिंदे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

या कार्यक्रमांतर्गत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्था, दिव्यांग, वंचित व्यक्तींसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्था व सामाजिक माध्यमाद्वारे स्वीप जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील मतदारांमध्ये मतदानाविषयी अधिक जनजागृती होण्यासाठी वेबिनारचे आयोजन करणे, मतदार साक्षरता क्लब निर्माण करणे, चुनावी पाठशाला या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थी समिती स्थापन करण्यात येणार आहे. तसेच विविध शैक्षणिक संस्थेत वाद-विवाद स्पर्धा, रंगीत तालिम, परिसंवाद, पथनाट्या आदी उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. मतदानाचा हक्क बजावतांना दिव्यांग, तृतीयपंथी यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मतदार साक्षरता व मतदान प्रक्रियेतील सहभाग वाढविण्याचा पद्धतशीर कार्यक्रम (स्वीप)

प्रारूप मतदार यादीच्या मापदंडांची ... एकापेक्षा अधिक मतदारांना एकच ओळखपत्र क्रमांक.

मंगळवार, जुलै २०, २०२१

कृषी सेवक भरती 2019 प्रकरण : लातूरच्या विभागीय कृषी सहसंचालकाने 94 उमेदवारांना सोडले वा-यावर ! 75 उमेदवारांना दिले नियुक्ती पत्र ; मात्र उर्वरित उमेदवारांच्या नियुक्तीला दिली जात आहेत उडवाउडवीची उत्तरे _पात्र उमेदवारांचे दादा भुसेंना साकडे



  • कृषी सेवकांना नियुक्ती देण्यास टाळाटाळ
  • पात्र उमेदवारांचे कृषिमंत्री भुसे यांना निवेदन

नांदेड : कृषी सेवक भरती २०१९ मध्ये लातूर विभागाकडून १६९ पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. यात नोव्हेंबर २०१९ मध्ये अंतिम निवड यादी जाहीर करून कागदपत्रांची पडताळणी झाली. यातील फक्त ७५ उमेदवारांना नियुक्ती दिली. उर्वरित ९४ उमेदवारांना अद्याप नियुक्ती देण्यात आली नसल्याची तक्रार पात्र उमेदवारांनी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

लातूर कृषी सहसंचालक विभागांतर्गत २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करून १६७ जागांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. यातील निवड झालेल्या ७५ उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आले. परंतु उर्वरित ९४ उमेदवारांना विभागीय पदोन्नती परीक्षानुसार विभागात कार्यरत असलेले कृषी सहायकांना कृषी पर्यवेक्षक पदोन्नती दिल्यानंतर नियुक्ती देण्यात येईल, यासाठी काही महिने लागणार, असे आश्वासन विभागाकडून दिले.

मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला व कार्यालयीन कामकाज बंद असल्याने वेळ लागेल, अशी कारणे देऊन विभागाने तीन महिने वेळ वाढवून दिली. आता कार्यालयीन कामकाज सुरू झाले तरी विभागीय परीक्षा कधी होईल व उर्वरित उमेदवारांना नियुक्ती मिळेल. अजून किती वेळ लागेल याबाबत सविस्तर माहिती मिळत नाही. फक्त प्रतीक्षा करा एवढेच उत्तर विभागाकडून मिळत आहे. इतर विभागात मात्र पदोन्नती देण्यात आली. तसेच उर्वरित उमेदवारांना नियुक्ती देण्यात येत असल्याची माहिती मिळाली. यामुळे लातूर सहसंचालक विभागातील पात्र असलेल्या ९४ कृषी सेवकांना नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री भुसे यांच्याकडे आकाश सूर्यवंशी तसेच राहुल कावळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

कृषी सेवक भरती 2019 लातूर जाहिरात



2021 पासून निर्मल ज्युनिअर कॉलेजचा केवळ 50 विद्यार्थ्यांसाठीचा गुणात्मक कार्यक्रम जाहीर

 


  • अकरावी- बारावी विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी...

 नांदेड,दि 20 जुलै 2021 : कोरोना या जागतिक महामारीमध्ये संपूर्ण जग स्तब्ध असतांना सगळ्यात जास्त जर नुकसान कोणत्या क्षेत्राचे झाले असेल तर, ते शिक्षण क्षेत्राचे झाले आहे.बरेच गुणवान विद्यार्थी नैराशेत गेल्याचे चित्र समोर येत आहे. अशा विद्यार्थ्यांना गरज आहे ती योग्य समुपदेशनाची व त्याच्या अंगी असलेली गुणवता बाहेर काढण्याची.

     सतत दोन वर्षांपासून विद्यार्थी हे *Quality- education* पासून दूर आहेत. त्यामुळे त्यांना आता कुठल्या गर्दीच्या ठिकाणी क्लास लावणे हे पालकांना आर्थिक व विद्यार्थ्यांना करिअर साठी धोक्याचे ठरू शकते.

   अशाच विद्यार्थ्यांच्या मनाचा वेध घेऊन आम्ही त्यांच्या यशाची जबाबदार घेणार आहोत.

  इयत्ता दहावीतून अकरावीमध्ये प्रवेश करणाऱ्या व मेडिकल किंवा आय आय टी क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या *केवळ 50 विद्यार्थी मेडिकलसाठी व 50 विद्यार्थी आय आय टी* साठी असे एकूण 100 विद्यार्थ्यांसाठी आम्ही दर्जेदार कोचिंग व आधुनिक हॉस्टेल आणि कॉलेजची सुविधा उपलब्ध करून देत आहोत.

    भारतातील *दिल्ली, कानपुर, वाराणसी, नोएडा, सीवान, हैदराबाद येथील तज्ञ प्राध्यापक* सोबत घेऊन विद्यार्थ्यांची सम्पूर्ण जबाबदारी स्वीकारत आहोत.

   गुणवत्तेच्या बाबतीत मागील *20 वर्षांपासून निर्मलने आपले स्थान टिकवून ठेवले आहे,* 

   कोरोना काळात केवळ विद्यार्थी त्याच्या इच्छित ध्येयपासून दूर जाऊ नये म्हणून *संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. पालमकर* यांनी महाराष्ट्रातील नामांकित संस्थेशी टाईप करून वरील सुविधा उपलब्ध करून देत आहेत.

   मर्यादित संख्या असल्यामुळे विद्यार्थ्यांनी ताबडतोब सम्पर्क साधावे असे आवाहन करण्यात आले.

संपर्क:

 *निर्मल विद्यालय व ज्युनियर कॉलेज,* 

 *निर्मल हॉस्टल* 

माणिक नगर, एअरपोर्ट रोड, तरोडा नांदेड.431605

Mob 9422363333

1)90% च्या वरती दहावी गुण प्राप्त विद्यार्थ्यांसाठी खूप मोठे डिस्काउंट असेल.

2) 80% च्या वरती दहावी गुण प्राप्त विद्यार्थ्यांसाठी डिस्काउंट असेल.

3) *ऑनलाइन /ऑफलाइन कोचिंग तसेच होस्टेल व कॉलेजची सुविधा (व्होकेशनल अभ्यासक्रमासह) उपलब्ध आहेत.*

सोमवार, जुलै १९, २०२१

नायगाव तालुक्यातील मरवाळी येथे गावच्या पूर्व दिशेला असलेल्या ओढ्यावर पुल बांधण्याची नागरिकांची मागणी



नायगाव,दि 18 जुलै 2021 : तालुक्यातील मरवाळी येथे रविवारी सायंकाळी 3 वा पाऊस पडायला सुरुवात झाली.तब्बल दोन तास मुसळधार पाऊस पडला.दोन तासाच्याच मुसळधार पावसाने गावच्या पुर्व दिशेला असलेल्या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर आला होता.सद्या शेतकरी शेतातील पिकांची निंदनी,कोळपणी करण्यात व्यस्थ आहेत.पाऊस पडणे कमी झाल्यानंतर शेतीच्या कामासाठी शेताकडे गेलेल्या शेतकरी,शेतमजूरांना हा ओढा पार करून घराकडे जावे लागले.ओढ्यातून जाताना लोकांना पूराचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे ओढ्याला कंबरेपर्यंत पूर आलेला होता,पूर ओसरल्याशिवाय लोकांना घराकडे जाणे शक्य झाले नाही.पूर ओसरल्यानंतर ही परिस्थिती आहे,तर पूर चालू असतानाचे चित्र कसे असेल याची कल्पना केलेलीच बरी.

देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरी अजून या ओढ्यावर पुल बांधण्यात आलेला नाही.या ओढ्यावर पुल बांधण्यासाठी आतापर्यंतच्या सरपंचांनी लोकप्रतिनिधींकडे मागणी केल्याची नोंद सापडत नाही तसेच जिल्हा परिषद सदस्य,आमदार,खासदार या पैकी कोणत्याही लोकप्रतिनिधींना गावकऱ्यांना पावसाळ्यात भेडसावणाऱ्या या जटील समस्येकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळाला नाही.

गावच्या पुर्व दिशेला शंभर घरांची वस्ती आहे,इथल्या लोकांना वेगवेगळ्या कामांसाठी गावात जावे लागते,मोठा पाऊस पडल्यानंतर ओढ्याला पूर आल्यावर महिला लहान मुलांना कसरत करावी लागते,रात्रीच्या वेळी अंधारात या ओढ्यातून जाणे अशक्य आहे.वस्तीवरील लोकांचा गावाशी संपर्क होत नाही.रात्रीच्या वेळी लोकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते.अशा परिस्थितीमध्ये सापांचीही भिती लोकांच्या मनात असते.

हा रस्ता कोपरा,मरवाळी तांडा मार्गे नरसी,तालुक्याचे ठिकाण असलेल्या नायगावला जातो,नायगाव जवळ पडत असल्यामुळे मोटरसायकल धारक जास्त करून याच रस्त्याचा वापर करतात तसेच धानोरा,मुगाव गावालापण हा रस्ता जोडला गेला आहे.विशेष म्हणजे कोपरा हे गाव मरवाळी ग्रामपंचायतीला जोडलेले असल्याने तेथील नागरिकांचा ग्रामपंचायतीशी संबंध येतो तसेच मरवाळी तांडा येथे शासन अनुदानित खाजगी प्राथमिक ते पोस्ट बेसिक आश्रम शाळा असल्याने शाळेसाठी मरवाळी येथील विद्यार्थी येत असतात अशा वेळी विद्यार्थ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो.तसेच मुगाव येथे प्राथमिक आरोग्य उप केंद्र आहे.मरवाळी हे गाव उप केंद्रांतर्गत येते.या उप केंद्राचा मरवाळीसाठी फारसा उपयोग होत नसला तरी गावात येणाऱ्या कर्मचा-यास मात्र पूराचा त्रास झाल्याशिवाय राहणार नाही.

गावच्या उत्तर दिशेला पाझर तलाव आहे.हा तलाव आजून भरलेला नाही.पाझर तलाव भरून वाहू लागल्यावर दिवस रात्र या ओढ्याला पूर चालू असतो.पावसाळ्याचे चार महिने लोकांना नाईलाजास्तव अशाच परिस्थितीत काढावे लागतात.


दुसरा व्हिडिओ गावच्या पश्चिम दिशेला असलेल्या ओढ्याचा आहे,येथे ओढ्यावर असलेल्या पुलावरून पाणी वाहत होते.पूराचे पाणी पुलावरुन वाहत असताना लोकं जीव मुठीत धरून जाताना दिसत आहेत.मरवाळी गावाच्या पश्चिम दिशेला सुद्धा शंभर घरांची वस्ती आहे तसेच या दिशेला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देखील आहे.सद्याला शाळा सुरू झाली नाही अन्यथा मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन पूर आल्यावर शाळकरी मुलांना शाळेत जाणे,शाळा सुटल्यावर घरी येणे जिकरीचे आहे.गावासाठी हायवेला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे.मुखेड,गडगा,मांजरम,नरसी,नायगावला जायचे असेल तर याच मार्गाने जावे लागते.गावक-यांसाठी ईकडे आड तिकडे विहीर अशी गत झाली आहे.

गावच्या पुर्व दिशेला असलेल्या ओढ्यावर पुल बांधण्याची तसेच गावाच्या पश्चिम दिशेला असलेल्या पुलाची उंची वाढवण्याची गावकऱ्यांनी मागणी केली आहे. गावकऱ्यांच्या मागणीकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे.

रविवार, जुलै १८, २०२१

नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी 72 तासामध्ये विमा कंपनीस कळवावी



नांदेड,दि.17:- नांदेड जिल्ह्यात मागील दोन-तीन दिवसांपासून अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी नाल्यांना पुर येऊन शेती क्षेत्राचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अशावेळी विमा संरक्षित क्षेत्राला नुकसान भरपाई मिळण्यासाठी झालेल्या नुकसानीची पूर्वसुचना शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीस 72 तासामध्ये कळविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केले आहे.


प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भुस्खलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे नुकसान झाल्यास त्याची भरपाई विमा कंपनीकडून अटी व शर्तीनुसार होते. नैसर्गीक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसुचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिकस्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येते. या जोखीमेंअंतर्गत पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा पाणी ओसंडून वाहिल्याने अथवा पुराचे पाणी शेतात शिरून दिर्घकाळ जलमय राहिल्यामुळे विहिर किंवा शेती क्षेत्राचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे नुकसान भरपाई दावा दाखल करता येतो. विमा दावा मंजूर होण्यासाठी झालेल्या पीक नुकसानीची माहिती / पुर्वसुचना विमा कंपनीस देणे अत्यावश्यक आहे. पीक विमा धारक शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअर वरून Crop Insurance (क्रॉप इन्शुरंन्स) हे ॲप डाउनलोड करून त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती भरावी  किंवा 18001035490 या टोल फ्री क्रमांकावर  संपर्क साधावा. ज्यांना शक्य आहे त्यांनी supportagri@iffcotokio.co.in या पत्यावर ई- मेलवर नुकसानीची पुर्वसुचना द्यावी.

काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी वरील माध्यमांद्वारे विमा कंपनीस पुर्वसुचना देऊ न शकल्यास तालुका प्रतिनिधी, इफ्को टोकीयो विमा कंपनी किंवा संबधीत तालुका कृषि अधिकारी कार्यालयास  किंवा आपल्या  गावातील संबधित कृषि  सहाय्यक यांचेकडे ऑफलाईन अर्ज सादर करु शकतील याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले.

शनिवार, जुलै १७, २०२१

Suspension | नगर जिल्ह्यातील पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी यांचे तडकाफडकी निलंबन ; SP मनोज पाटील यांची कारवाई



संगमनेर :– कर्तव्यात कसूर करत असल्याचे आढळून येत असल्याने संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील (Sangamner City Police Station) पोलीस उपनिरीक्षक रोहिदास अशोक माळी (police Sub-Inspector Rohidas Ashok Mali) यांच्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील (superintendent of police Manoj Patil) यांनी तडकाफडकी निलंबनाची कारवाई (Suspension action) केली आहे. या कारवाईमुळे (Suspension) पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तर शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळा हे संमनेर शहर पोलीस ठाण्यात काही वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाल्याने ते वेळोवेळी रजेवर गेले होते. त्यांच्या कार्यपद्धतीबाबत पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख (Police Inspector Mukundrao Deshmukh) हे नाराज होते. त्यांनी याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने (Sub-Divisional Police Officer Rahul Madane) यांना माहिती दिली होती. राहुल मदने यांनी उपनिरीक्षक माळी यांच्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना अहवाल पाठवला होता. या अहवालाची गंभीर दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील (superintendent of police Manoj Patil) यांनी दिनांक 15 जुलै रोजी आदेश काढून उपनिरीक्षक रोहिदास माळी यांना तडकाफडकी निलंबित (Suspension) केले.

'या’मुळे केले निलंबित

पोलीस अधीक्षक कार्यालयातून काढण्यात आलेल्या निलंबनाच्या आदेशात माळी यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कामकाज न करता स्वत:च्या मनाप्रमाणे वागणे,

वरिष्ठांना गुन्हे निर्गती करणेबाबत वेळोवेळी सूचना देऊनही या गुन्ह्याचा तपास न करता वरिष्ठांच्या आदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे. ड्युटीवर वेळेत न येणे,

कोरोना उपचाराबाबत वरिष्ठांना कोणतीही माहिती न देणे,

कोरोना काळात रजेवर असतानाही पोलीस स्टेशन गुन्हे प्रकरणाचे कामकाज केल्याच्या नोंदी घेऊन बेकायदेशीर काम करणे असा ठपका माळी यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

याची चौकशी सरु असून या चौकशीत हस्तक्षेप करता येऊ नये यासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, असे आदेशात म्हटले आहे.


शुक्रवार, जुलै १६, २०२१

लाच प्रकरण : महानगरपालिकेतील शिक्षण विभागाचा महा लाचखोर सहायक प्रशासकीय अधिका-याला 50,000 रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून ताब्यात घेतले



*Respected sir*

*Trap Case Report:*

➡ घटक :- पुणे

➡ तक्रारदार :- महिला 37वर्ष.

➡ आरोपी :- 

लोकसेवक -शिवाजी बबन बोखारे. वय 50 वर्षे, पद- सहायक प्रशासकीय अधिकारी, वर्ग - 2, शिक्षण विभाग, पुणे महानगरपालिका.

➡️ पडताळणी :-दिनांक 12/07/2021, 13/07/2021, व 14/07/2021.

➡️सापळा दि.16/07/2021

➡️ लाचेची मागणी :- 60,000 रुपये तडजोडीअंती 50,000/-

➡️ लाच स्वीकारली :- 50,000/- रू.

➡ हकीकत :- तक्रारदार यांच्या मुलीचे शिक्षण हक्क कायदा (RTE) 2009 अन्वये ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल, बाणेर,येथे लॉटरी पद्धतीने मिळणाऱ्या प्रवेश यादी मध्ये नाव समाविष्ट करण्यात आले होते. त्याबाबतची कागदपत्रे तपासून प्रवेशासाठी ऑनलाईन मान्यता देण्यासाठी आरोपी लोकसेवक यानी 50,000/- रुपयांची लाचेची मागणी करून ती रक्कम स्विकारली .

➡ सापळा पथक : -

पोलीस उपअधीक्षक - वर्षाराणी पाटील.

पोलीस निरीक्षक - सुनिल बिले.

पो.हवा.नवनाथ वाळके,

पो.शि.किरण चिमटे,

 म.पो. शि.पूजा पागिरे,

पो. शि. चालक प्रशांत वाळके,

ला.प्र.वि.पुणे युनिट .

➡मार्गदर्शन अधिकारी :- 

श्री. राजेश बनसोडे,पोलीस अधीक्षक, लाप्रवि पुणे परिक्षेत्र. 

श्री.सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक,लाप्रवि पुणे.

श्री.सुहास नाडगौडा,अपर पोलीस अधिक्षक,लाप्रवि पुणे.

लेटलतीफ गुरूजींना सीईओंचा दणका, पाच शिक्षकांचे निलंबन



  • नांदेड जिल्हा परिषदे च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या धडक कारवाईने शिक्षकांमध्ये एकच खळबळ
  • भोकर तालुक्यातील पाच  शिक्षक तडकाफडकी निलंबीत 

नांदेड,दि. 16 जुलै 2021 

भोकर दि.16 जुलै(नांदेड न्यूज अपडेट):- भोकर येथील जिल्‍हा परिषदेच्‍या केंद्रीय प्राथमि‍क नुतन शाळेस  शुक्रवार दिनांक 16 जुलै रोजी जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी भेटी देवून शाळेची पाहणी केली. यावेळी अनुपस्थित असलेल्‍या 5 शिक्षकांना त्‍यांनी तडकाफडकी निलंबीत केले आहे.

सिईओ यांचा भोकर तालुक्‍यात आज दौरा होता. दरम्‍यान त्‍यांनी जिल्‍हा परिषदेच्‍या केंद्रीय प्राथमि‍क शाळेस भेट देवून ही कार्यवाही केली आहे. कोरोना पार्श्‍वभूमीवर शिक्षकांना शाळेत 50 टक्‍के उपस्थिती अनिवार्य आहे. 50 टक्‍के प्रमाणे आज 19 शिक्षक उपस्थित राहणे आवश्‍यक होते. परंतु शाळा भेटी दरम्‍यान 5 शिक्षक अनुस्थित आढळून आल्‍यामुळे निलंबनाची कार्यवाही करण्‍यात आली आहे. तर एका शिक्षकास कारणे दाखवा नोटीस देण्‍यात आली.

नियमानुसार शिक्षक शाळेत उपस्थित राहणे आवश्‍यक आहे. विद्यार्थ्‍यांचा अभ्‍यास पूर्ण करण्‍यासाठी ऑनलाईन प्रणालीव्‍दारे तसेच शिक्षक मित्र उपक्रमातून प्रत्‍येक विद्यार्थ्‍यांपर्यंत शिक्षण पोहोचणे आवश्‍यक आहे. याचे सर्व नियोजन शाळास्‍तरावर उपस्थित राहून शिक्षकांनी करणे आवश्‍यक आहे. परंतु येथील शाळेत शिक्षक अनुपस्थित असल्‍याने सिईओंनी चांगलेच खडसावले.

शैक्षणिक गुणवत्‍ता वाढ अभिनांतर्गत मुलांची इंग्रजी व गणित विषयाची चांगली तयारी करुन घेण्‍यासाठी प्रयत्‍न करावेत. तसेच नव-नवे उपक्रम राबवण्‍याची आवश्‍यकता आहे. माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत शाळेत वृक्ष लागवड, डिजीटल शाळा, रंगरंगोटी व सुशोभिकरण करण्‍यासाठी पुढाकार घेणे आवश्‍यक असल्‍याचे त्‍या म्‍हणाल्‍या. यावेळी त्‍यांनी पालक व विद्यार्थ्‍यांशी संवाद साधला. दरम्‍यान जिल्‍हा परिषद हायस्‍कुल भोकर, बारड व शेंबोली येथे शाळांना भेटी दिल्‍या. तसेच बारड ग्राम पंचायत व शेंबोली येथील आरोग्‍य उपक्रेंद्रास त्‍यांनी भेट देवून संवाद साधला.

मुदखेड तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल बारड, कें.प्रा.शा. बारड आणि शेंबोली वस्ती येथे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर -घुगे यांनी आज भेट दिली. जिल्हा परिषद प्रशाला बारड येथे शिक्षकांनी शाळेत होत असलेल्या उपक्रमासंबंधी माहिती दिली. नावीन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण केले. ऑनलाइन शिक्षण, सेतू अभ्यासक्रमा विषयी मुख्याध्यापिका श्रीमती तळणकर यांनी माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर -घुगे यांनी शैक्षणिक गुणवत्ता, स्वच्छ शाळा सुंदर शाळा करणे, बाला अंतर्गत शाळेची रंगरंगोटी, ॲस्ट्रॉनॉमी, खगोलशास्त्र, भाषाविषयक जाणिवा वाढवणे, बोलक्या भिंती, रोपवाटिका, नर्सरी तयार करणे आदी बाबतीत सूचना केल्या. वस्ती शेंबोली येथील शाळेस त्यांनी भेट दिली. रूपाली कांबळे, कोमल लोमटे यांनी शाळेतील उपक्रमांची माहिती दिली. ओम नावाच्या विद्यार्थ्याला आई बाबा नाहीत. हा विद्यार्थी आजीकडे राहून शिक्षण घेतो. त्यासाठी आवश्यक सर्व मदत करणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले.


तब्बल दीड वर्षानंतर शाळा सुरू झाल्या असून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी शाळेच्या दुसऱ्याच दिवशी वेळेवर हजर न राहणाऱ्या शिक्षकांना दणका दिला आहे. भोकर येथील लेटलतीफ पाच गुरूजींना निलंबित केले. या कारवाईमुळे मात्र शाळांची घंटा वाजण्यापूर्वीच शिक्षक शाळांच्या मैदानात हजर राहतील, अशी अपेक्षा आहे.

कोरोना महामारीमुळे मागील दीड वर्षांपासून शाळांची घंटा वाजलीच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू लागले होते. दरम्यान, राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात १५ जुलैपासून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील तब्बल ३९० माध्यमिक शाळांचे वर्ग सुरू झाले असून विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय असून शिक्षकांना पन्नास टक्के उपस्थितीचे आदेश आहेत. त्यात प्रत्येक शिक्षकांची कोरोना तपासणी करणेही गरजेचे आहे. कोविडमुळे विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्याची ही संधी असून प्रत्येक शिक्षकांनी स्वयंस्फुर्तपणे विद्यार्जनाचे काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी केले. ठाकूर यांनी शुक्रवारी पाच ते सहा शाळांना भेट देवून तेथील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या.

पाच शिक्षकांचे निलंबन 

भोकर तालुक्यात दौऱ्यावर असताना एका शाळेत पन्नास टक्केपेक्षाही कमी शिक्षक उपस्थित असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी ठाकूर यांनी तत्काळ पाच शिक्षकांचे निलंबन केले. या कारवाईमुळे लेटलतीफ शिक्षकांना चपराक बसणार आहे. शाळांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी कठोर परिश्रम घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

Popular posts लोकप्रिय पोस्ट