जाणून घ्या २०२१ मध्ये एसीबीच्या जाळ्यात महाराष्ट्रातील कोणत्या विभागाचे किती लाचखोर अधिकारी, कर्मचारी अडकले ते ! खातेनिहाय, संवर्गनिहाय, परिक्षेत्रनिहाय लाचखोरांची माहिती
मुंबई,दि.०२ जानेवारी २०२१ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हा महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा विभाग आहे.भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक कारभार हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ध्येय आहे. शासन नागरिकांना अनेक सेवा पुरवित असते.कोणत्याही शासकीय कामाकरीता शासकीय लोकसेवकांनी लाचेची मागणी केली तर नागरिकांनी ला.प्र.वि. शी संपर्क साधावा असे आवाहन विभागामार्फत करण्यात येत असते.लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सदैव अशा नागरिकांच्या बाजुने ठामपणे उभे राहतो आणि लाचखोरांविरूद्ध कारवाई करतो.भ्रष्टाचार मुक्त समाज राज्याला प्रगती, समृद्धी आणि सुशासनाच्या युगामध्ये घेऊन जाणार आहे.हे केवळ नागरिकांच्या सक्रिय सहभागाने व सहकार्यानेच शक्य होऊ शकते. समाजाला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी व विकासाला गती देण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सहकार्य करा. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग प्रत्येक ठिकाणी नागरिकांच्या मदतीसाठी सज्ज आहे. महाराष्ट्रातील शासकीय अधिकारी,कर्मचारी यांच्या विरोधात नागरिकांनी दिलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाद्वारे मागिल दहा वर्षांत सापळा, अपसंपदा, अन्य भ्रष...