🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

गुरुवार, जानेवारी ०६, २०२२

बातमीची दखल : नांदेड जिल्ह्यात शालेय व्यवस्थापन समित्या पुनर्गठित करण्याला सुरुवात ! शिक्षणाधिकारी (प्रा) यांनी तात्काळ काढले आदेश ; परंत जिल्हाधिकाऱ्याच्या निर्णयामुळे निवडी लांबणीवर ?

 


नायगाव,दि.०६ डिसेंबर २०२१ :  "शाळा व्यवस्थापन समिती (SMC) व पालक शिक्षक संघ (PTA) यांना शाळा सुरू होईपर्यंत दिलेली मुदतवाढ संपुष्टात आणून नव्याने समित्या  स्थापन कराव्यात" या मथळ्याखाली २३ डिसेंबर २०२१ रोजी व "धर्माबाद तालुक्यात शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन होऊ शकते तर नायगावसह इतर तालुक्यांना काय अडचण आहे? ते कुणाच्या आदेशाची वाट पाहत बसले आहेत? गटशिक्षण अधिका-यांमध्ये त्यांच्या स्तरावर आदेश काढण्याची हिम्मत नाही का? की अधिकार नाहीत" या मथळ्याखाली ३० डिसेंबर २०२१ रोजी नांदेडन्यूजअपडेटब्लॉग च्या माध्यमातून लगातार दोन बातम्या घेतल्या होत्या.याची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्रा) यांनी काल दिनांक ०५ जानेवारी रोजी "शालेय व्यवस्थापन समिती व पालक शिक्षक संघ बाबत" नांदेड जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी यांचे नावे आदेश काढले आहेत.

सविस्तर माहिती अशी की,कोरोनामुळे शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडी रखडल्या होत्या.०४ जून २०२० च्या शासन निर्णयानुसार खालील अटिंवर शाळा सुरू होईपर्यंत शालेय व्यवस्थापन समित्यांना मुदतवाढ देण्यात आली होती.
शाळा व्यवस्थापन समिती,पालक शिक्षक संघ व कार्यकारी समिती यांची मुदत समाप्त होत असल्यास व शाळा सुरु होण्यापूर्वी त्या नव्याने स्थापन करणे शक्य नसल्याने त्यांची कार्ये विनाअडथळा पार पाडणे आवश्यक असल्याने त्यांना शाळा सुरु होईपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे असे शासनाने परिपत्रकात म्हटले होते.
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये शाळा सुरु होईपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.ज्यांची मुदत समाप्त झाली आहे अथवा शाळा सुरु होण्यापूर्वी समाप्त होणार आहे त्यांनाच फक्त वरील आदेश लागू राहील.
*शैक्षणिक वर्ष २०२०-२१ सुरु झाल्यानंतर उक्त समिती / संघ नियमाप्रमाणे नव्याने स्थापन करण्यात यावेत.*  असेही परिपत्रकात स्पष्ट नमूद करण्यात आले होते.यानुसार महाराष्ट्रातील इतर जिल्हात शालेय व्यवस्थापन समिती यांच्या निवडी होत होत्या व त्याच्या बातम्या वृत्तपत्रातून प्रसारित होत होत्या तरी नांदेड शिक्षण विभाग झोपेतच होते. 
२३ डिसेंबर रोजी च्या बातमीची दखल घेऊन गडगा येथील केंद्रप्रमुख कपिल गारटे सर यांनी मिटिंगमध्ये उपस्थित केलेल्या मुद्यावरुन नायगाव च्या गट शिक्षणाधिकारी यांनी २४ डिसेंबर च्या मिटिंगमध्ये तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी यांना ०४ जून २०२० मधील मुद्दा क्रमांक ०५ नुसार शालेय व्यवस्थापन समितीच्या पुनर्गठना बाबत तोंडी सूचना दिल्या होत्या.परंतु काही शाळेचे मुख्याध्यापक तोंडी सूचनेवरून समित्यांचे पुनर्गठन करण्याच्या तयारीत होते पालकांना समिती निवडी संदर्भात निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आल्या.निवडीच्या तारखाही निश्चित करण्यात आल्या. तर काही शाळा वरिष्ठांच्या आदेशाची वाट पहात होते.त्यांच्यामध्ये एक प्रकारे संभ्रम निर्माण झालेला होता.निवड केलं तर काय होते ? अशी भिती त्यांच्या मनात होती.शाळा स्तरावर कुठल्याही हालचाली दिसून येत नव्हत्या. 

सलग दोनदा लावलेल्या बातमीची दखल घेत उशीरा का होईना शिक्षण विभागाने शालेय व्यवस्थापन समितीच्या पुनर्गठना बाबत नुकत्याच ०५ जानेवारी रोजी सूचना दिल्या होत्या.आता जिल्हाधिकाऱ्यांनी १० जानेवारी ते ३० जानेवारी पर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे या शालेय व्यवस्थापन समितीच्या पुनर्गठना चा विषय पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

Popular posts लोकप्रिय पोस्ट