दि. ०२/०३/२०२१
आरोपी लोकसेवक श्री.बाळू महादेव जगे वय ५१ वर्ष तलाठी सजा मोराळ ता.आष्टी जि.बीड यांनी ३०००/- (तीन हजार रुपये) लाच मागणी केल्यावरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड यांचेकडुन कारवाई
- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : बीड
- पोलीस स्टेशन पोलीस ठाणे : आष्टी
- गुन्हा नोंद कलम : कलम ७, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८
- आरोपीचे नांव व कार्यालय : श्री.बाळु महादेव बनगे वय ५१ वर्ष तलाठी सजा मौराळा ता.आष्टी जि.बीड
- मगणी केलेली लाच रक्कम : ३०००/- ( तीन हजार रूपये)
थोडक्यात माहिती : दिनांक १४/०१/२०२१ रोजी तक्ररदार यांनी तक्रर दिली की, तक्ररदार यांचे वडीलाचे नावावरील मौजे वनदेवाडी ता.आष्टी येथील शेत जमीन तहसीलदार आष्टी यांचे वाटणीपत्र आदेशाने तक्ररदार व त्यांचे भाउ,बहीन,आई,वडील यांचे नावे करण्यासाठी तसेच आनुदान मिळवुन देणेसाठी व तकारदार यांचे आई वडील यांचे पगार चालु करण्यासाठी ४५०० रुपये लाचेची मागणी करत आहेत. सदर तकारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,बीड येथे तक्रार दिली.
सदर तकारीच्या अनुषंगाने दिनांक १४/०१/२०२१ रोजी पंचा सम्ष पडताळणी केली असता लोकसेवक श्री. बाळु बनगे यांनी ४५०० रुपयांची मागणी करुन तडजोडअंती ३००० रुपये स्विकारण्याचे मान्य केले. त्यावरून आज दिनांक ०२.०३.२०२१ रोजी सापळा लावला असता लोकसेक्क यांनी पंचासमक्ष ३०००/- रुपये
लाच मागणी करुन लाच रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यावरुन श्री.बाळू महादेव बनगे वय ५१ वर्ष तलाठी सजा
मोराळ ता.आष्टी जि.बीड यांचे विरुद्ध पोलीस ठाणे आष्टी येथे कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सदरची कारवाई मा.डॉ. राहुल साठे,पोलीस अधीक्षक, लाप्रवि औरंगाबाद, मा.डॉ. अनिता जमादार, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि औरंगाबाद, श्री.बाळकृष्ण हनपुडे पाटील, पोलीस उप अधीक्षक, बीड यांचे मार्गदर्शनााली पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र परदेशी, व पोलीस अमलदार श्री.श्रीराम गिराम,भरत गारदे व चालक अमलदार मोरे ,ला.प्र.वि.बीड युनिट यांनी कारवाई केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबददल तकार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांचेशी संपर्क साधवा.
संपर्क पत्ता : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,बीड
संकेतस्थळ : acbwebmail@mahapolice.gov.in
ई-मेल : - dyspacbbeed@mahapolice.gov.in
2) dyspacbbeed@gmail.com
ऑनलाईन तकार ॲप्लीकेशन : acbmaharashtra.net
टोल फ्री क्रमांक : १०६४
दुरध्वनी क्रमांक : ०२४४२-२२२६४९
व्हॉटस अप क-९९३०९९७७००]
पोलीस अधीक्षक,लाप्रवि,औरंगाबाद ८८८८८०७२९९
अपर पोलीस अधीक्षक,लाप्रवि,औरंगाबाद :- ९८८११००८१२३
पोलीस उप अधीक्षक लापवि,बीड ९१५८६३२६२६
(बाळकृष्ण पुडे पाटील)
पोलीस उपअधिक्षक लाचपत प्रतिबंधक विभाग बीड.
✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा




















