🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

रविवार, जानेवारी ०९, २०२२

सर्वसामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्याचे काम पत्रकारच करतात-पोलीस निरिक्षक अभिषेक शिंदे

 


नायगाव,दि ०९ जानेवारी २०२१ : समाजातील वाईट प्रवृतीचा समूळ नायनाट करण्यासाठी पत्रकारांनी निर्भीडपणे लिखाण करावे,अन्यायाच्या विरोधात सर्वसामान्य जनतेचा आवाज हे पत्रकारच बुलंद करतात.पत्रकार वृत्तपत्राविना समाजाची कल्पनाच करवत नाही, चौथा स्तंभ नसेल तर समाजात अराजकता माजेल.प्रशासनावर अंकुश ठेवण्याचे काम हे पत्रकार करत असतात. लोकांच्या अडी अडचणी मांडण्याचे कार्य पत्रकारांनी सदैव करावे,मी राज्य शासनाच्या सेवेतील पाईक या नात्याने मी जोपर्यंत नायगाव पोलीस स्टेशन येथे आहे तोपर्यंत सदैव पत्रकारांच्या सोबत आहे.पत्रकारीता करत असताना समाजकंटकांकडून कुठलीही  धमकी, समस्या आल्यास पत्रकारांनी निसंकोचपणे मला अर्ध्यारात्री फोन करावा,मी सदैव पत्रकारांच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन नायगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी केले.

ते नायगाव पोलीस ठाण्याच्यावतीने दर्पणदिनानिमित्त तालुक्यातील पत्रकार बाधंवाच्या आयोजीत करण्यात आलेल्या सत्कारा प्रसंगी बोलत होते.पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या वतीने तालुक्यातील उपस्थित सर्व पत्रकारांचा पेन डायरी व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार सन्मान करण्यात आला.पोलीस ठाण्यात आयोजीत करण्यात आलेल्या या कार्यक्रमास नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सूर्यकांत सोनखेडकर, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पांडे, तालुका अध्यक्ष नागेश कल्याण, पत्रकार मित्र गजानन चव्हाण सह मान्यवर पत्रकार उपस्थित होते.

या वेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांची मार्गदर्शन पर भाषणे या प्रसंगी झाली या वेळी बोलताना त्यांनी समाज, पोलीस, आणी पत्रकार यांचा संबंध चिखल पाण्या सारखा आहे. समाजातील अन्यायग्रस्त घटकाना न्याय मिळवून देण्याचे कार्य करण्याची जवाबदारी समाजातील या दोन मुख्य घटकावर असल्याचे मनोगत या वेळी व्यक्त केले.

या कार्यक्रमास पत्रकार संघाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य एस एम मुदखेडकर, माजी तालुकाध्यक्ष मनोहर तेलंग,प्रभाकर लखपत्रेवार पंडीत वाघमारे, र विकास भुरे, आनंदा सूर्यवंशी, गोविदंटोकलवाड, गंगाधर गंगासागरे, गंगाधर ढवळे, माधव घडेकर, संजय चिखले, रामकृष्ण मोरे देगावकर, प्रकाश महिपाळे, शर्मा, पोहेका सोपानराव वळगे, इंगोले शिवाजी ईबीतदार, संजय ब्रम्हानंद चिखले, अंकुश देगावकर, शाम गायकवाड, माधव बेलकवाड, शे. अरीफ, वाघमारे राम प्रसाद चनावार सह अनेक पत्रकार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रकाश हानमंते यांनी मानले.

"दर्पण दिनी" नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनेे विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना पुरस्कार जाहीर

 


भालेराव,मिरेवाड,डाँ चव्हाण,डाँ जाधव दाम्पत्य,दत्तू पाटील,पत्रकार शेख वहाब ,पत्रकार विकास भुरे,मालेवाड यांचा समावेश

नायगाव,दि ०९ जानेवारी : "सन्मान भूमीपुत्राच्या कर्तृत्वाचा" या सामाजिक सत्कार्याच्या जाणीवेने विविध क्षेञात कृतिशील योगदान देत कर्मभुमीचा लौकिक तेजोमय करणाऱ्या ऊर्जादायी व्यक्तींना गौरविण्याची यशस्वी परंपरा जोपासत "दर्पण दिनी" नायगांव तालुका मराठी पञकार संघाच्या वतिने विविध क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या गुणिजनांना पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

माजी आमदार लोकनेते कै.बळवंतरावजी चव्हाण यांच्या स्मृति प्रित्यर्थ कलाभूषण समाजरत्न पुरस्कार ! चित्रपट अभिनेता उत्कृष्ट कलावन्त.रामेश्वर भालेराव (ज्यु.जाँनी लिव्हर) नायगांव यांना तर,यमुनाई विचार प्रतिष्ठान नायगाव,च्या वतीने कै.यमुनाबाई पवार होटाळकर यांच्या स्मृति प्रित्यर्थ साहित्य शिरोमणी पुरस्कार साहित्योपध्याय वीरभद्र मिरेवाड, नायगांव यांना जाहीर...

स्वांतञ्यसैनिक कै.किशनराव पाटील कल्याण यांच्या स्मृति प्रित्यर्थ आदर्श धन्वंतरी व उत्कृष्ट आरोग्यसेवा पुरस्कार शहरी विभागडाँ.विश्वास चव्हाण (नायगांव) याना स्वामी वैष्णवानंद बहुउद्देशीय प्रतिष्ठान मांजरम च्या वतीने, कै.शंकुतलाबाई रघुनाथराव पांडे मांजरमकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ ,ग्रामीण विभाग डाँ.ज्ञानेश्वर जाधव/ डाँ.स्वरुपा जाधव व्यंकटेश्वरा हाँस्पीटल नरसी यांना जाहीर...

माजी मंञी कै.गंगाधररावजी देशमुख कुंटूरकर यांच्या स्मृति प्रित्यर्थ उत्कृष्ट वास्तू विशारद पुरस्कार दत्ताञय पाटील पवार होटाळकर याना जाहीर...

उत्कृष्ट पञकारीता पुरस्कार स्व.पञकार अनिल कोकीळ यांच्या स्मरणार्थ स्वच्छतादूत सन्माननिय .माधवरावजी पाटील शेळगांवकर यांच्या वतिने शहरी विभाग.वहाबोद्दीन शेख, नायगांव (दै.लोकमत).यांना जाहीर... 

तर ग्रामीण विभाग स्व.पिराजीराव शिरोळे गुरुजी यांच्या स्मृती प्रित्यर्थ राजराजेश्वर प्रतिष्ठाण तर्फे., विकास मारोतराव भुरे रा.मांजरम (दै.प्रजावाणी) यांना जाहीर करण्यात आला आहे.

कै वेंकटराव पा चव्हाण यांच्या स्मृती प्रित्यर्थ इजि मालेवाड यांना धाडस या सामाजिक संघटनेच्या उत्कृष्ट कार्या बद्दल पुरस्कार 

पुरस्कार जाहीर झालेल्या सर्व पत्रकार बांधवांचे नायगाव तालुका मराठी पत्रकार संघ व विविध स्तरातून अभिनंदन होत असून त्यांच्या कार्याची दखल नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाने घेत एक नावीन्य पूर्ण उपक्रम राबवून नव्या 2022 वर्षात नव्या विचाराने ह्या पुरस्काराची घोषणा केल्या बद्दल सर्वत्र नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे स्वागत होत आहे.

Popular posts लोकप्रिय पोस्ट