🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

बुधवार, नोव्हेंबर ०१, २०२३

नायगाव अधिवक्ता संघाच्या वतीने जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा

 

जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस 

नायगाव/संजय चिखले मरवाळीकर

मराठा आरक्षणासाठी नायगाव येथील अधिवक्ता संघ ही सरसावला आहे.सबंध महाराष्ट्रासह तालुक्यात मराठा आरक्षणावरून राण पेटलेला पाहुन मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश व्हावा व मराठा आरक्षणासाठी सराटी येथे उपोषण करित असलेल्या मनोज जरांगे यांना पाठबळ मिळावे यासाठी मराठा समाजाचा ओबीसी समावेश आरक्षणाचा मुद्द्यावर लवकरात लवकर निर्णय व्हावा या अनुषंगाने एक ठराव संमत करून तो ठराव नायगाव तहसीलदार मंजुषा भगत यांचेकडे सुपूर्द करण्यात आला.

नायगाव अभिवक्ता संघ नेहमीच वेगवेळ्या सामाजिक कार्यात अग्रेसर असतो. तालुक्यातील व संबंध राज्यातील मराठा बांधवांची मराठा आरक्षणाची मागणी व अवश्यकता लक्षात घेऊन अंतरवली सराटी येथे अमरण उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास नायगाव अभिवक्ता संघाच्या पाठिंब्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करून घेण्यात आला त्याचीच एक प्रत आज दि. 01 नोव्हेंबर रोजी सदर ठराव नायगाव तहसीलदार सौ. मंजुषा भगत यांचेकडे सुपूर्द करण्यात आला. 
यावेळी नायगाव अभिव्यक्ता संघाचे अध्यक्ष ऑडव्होकेट निलेश देशपांडे नावंदीकर,ऑडव्होकेट एस.बी. इंगोले, ऑडव्होकेट एस.बी.कुलकर्णी, ऑडव्होकेट एस.एन. जाधव, ऑडव्होकेट बी.पी. कवळे, ऑडव्होकेट तुम्मेदवार साहेब, ऑडव्होकेट एस.बी.कदम, ऑडव्होकेट सोमठाणकर, ऑडव्होकेट कोकणे मॅडम, ऑडव्होकेट ऑडव्हकेट हसनाळे मॅडम, ऑडव्हकेट शुभम पवळे, ऑडव्हकेट मांजरमकर आदींची उपस्थिती होती...

शनिवार, सप्टेंबर २३, २०२३

इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे भव्य स्मारक उभारण्याच्या कामाला गती द्यावी – उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

 

आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे 
संपादक- संजय पाटील चिखले

7767912933

मुंबई, दि. २१/०९/२०२३ :- आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे हे आदिवासी बांधवांसह सर्वांचे श्रद्धास्थान आहेत. नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यात वासाळी येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्याची आदिवासी भागातील आमदारांची मागणी आहे. या मागणीचा विचार करून आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक प्रेरणास्थान तसेच आजूबाजूचा परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करावा. यासंदर्भातील कामे गतीने पूर्ण करावीत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे भव्य स्मारक उभारण्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस आमदार सुनील शेळके, चंद्रकांत नवघरे, माणिकराव कोकाटे, अपर मुख्य सचिव (वित्त) नितीन करीर, प्रधान सचिव नियोजन सौरभ विजय, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, पर्यटन संचालक बी.एन.पाटील यांच्यासह पुणे विभागाचे विभागीय आयुक्त सौरभ राव, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, नाशिकचे जिल्हाधिकारी आदी मान्यवर दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकाची जागा इगतपुरी व कळसूबाई शिखर परिसराला लागून आहे. स्मारकापासून कळसूबाई शिखरापर्यंत रोप-वे च्या कामासाठी केंद्र सरकारकडून पर्वतमाला योजनेतून निधी मिळणे शक्य आहे. त्यासाठी प्रयत्न करावा, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
स्मारकाबरोबर आजूबाजूचा परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित केल्यास परिसरातील आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होवू शकतो. यासाठी आदिवासी विकास विभागाचा निधी वापरून या परिसराचा विकास करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
सिद्धेश्वर धरण परिसराचे सुशोभीकरण व विकास वृंदावन बागेच्या धर्तीवर करण्यासाठी जलसंपदा विभाग प्रयत्न करीत आहे. यासाठी पर्यटन विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेऊन पुढील निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी बैठकीत सांगितले.

Tags: #आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे #स्मारक #इतिहास

शुक्रवार, ऑगस्ट २५, २०२३

दूध व दुग्धजन्य पदार्थात भेसळ केल्यास होणार कायदेशीर कारवाई

 


नांदेड/संपादक संजय पाटील चिखले 
नांदेड (जिमाका) दि. 24 ऑगस्ट 2023 :- दूध व दुग्धजन्य पदार्थामध्ये होणाऱ्या भेसळीला पायबंद घालण्यासाठी जिल्ह्यात जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्यावतीने पथक निर्माण करुन जिल्ह्यातील दूध व दुग्धजन्य पदार्थाची तपासणी करण्यात येत आहे. या तपासणी मोहिमेत दोषी आढळून येणाऱ्यांवर कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे.
तरी सर्व उत्पादक, विक्रेते व सहकारी, खाजगी दुग्ध प्रकल्प, दुग्धजन्य पदार्थ निर्माते, दुकानदार यांनी दूध व दुग्धजन्य पदार्थामध्ये भेसळ होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी डॉ. एस.एस. बळवंतकर यांनी केले आहे. जिल्ह्यातील दूध व दुग्धजन्य पदार्थामध्ये मोठया प्रमाणात भेसळ करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दूध व दुग्धजन्य पदार्थाच्या उत्पादनामध्ये व मागणीमध्ये मोठया प्रमाणात तफावत निर्माण होवून जिल्ह्यात दूध व दुग्धजन्य पदार्थाचा कृत्रिम फुगवटा होत आहे.
त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना रास्त भाव मिळत नाही. याशिवाय दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळीमुळे लोकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे नियुक्त केलेल्या पथकामार्फत जिल्ह्यात तपासणी मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Popular posts लोकप्रिय पोस्ट