पोस्ट्स

2024 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री सुधीर खोडवे यांचे उत्कृष्ट कार्या बदल पोलीस अधीक्षक नांदेड यांनी बक्षीस देवुन केला सन्मान...

इमेज
  By संजय चिखले मरवाळीकर नांदेड,दि.३० डिसेंबर: अनैतीक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथे नेमणुकीस असलेले श्री सुधीर भालचंद्र खोडवे यांनी दिनांक 10 डिसेंबर, 2024 रोजी सायंकाळी 07.30 वा. चे सुमारास नांदेड उत्तरचे आमदार श्री बालाजीराव कल्याणकर यांच्या घराजवळील स्टेट बँकेसमोर उभ्या असलेल्या कारने पेट घेतला असता बघ्याची गर्दी जमली असता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री सुधीर भालचंद्र खोडवे, हे तिथुन जात असतांना त्यांनी जमलेली गर्दी पाहुन सदर ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी चारचाकी वाहन क्रमांक एमएच-20/ईई-7982 ही जळत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी कोणीही मदतीला जात नव्हते अशावेळी त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखुन समोर असलेल्या बेकरी य आजुबाजूला असलेल्या घरातुन बकेटमध्ये पाणी घेतले आणि आगीवर नियंत्रण मिळविले. विशेष म्हणजे आग बघणारे अनेक जण होते कांही तर मोबाईलमध्ये शुटींग करीत होते परंतु कोणीही ही आग विझविण्याकरीता धावुन आले नाही. आगीमुळे निर्माण होणारा पुढील अनर्थ टळला आहे. त्यांनी या पुर्वी सुध्दा उत्तम कामगीरी केली आहे. त्या...

वृत्त क्र.1232 - स्वामित्व योजने अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतमध्ये आज सनद वाटप

इमेज
प्रधानमंत्री आभासी पद्धतीने लाभार्थ्याशी संवाद साधतील   राज्याच्या स्वामित्व योजनेला देशभरात मान्यता By संजय चिखले मरवाळीकर नांदेड दि. 26 डिसेंबर : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागाच्या स्वामित्व योजनेला देशभरात मान्यता मिळाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील 50 लाखाहून अधिक घरमालकांना मालमत्ता कार्डचे या योजने अंतर्गत वितरण करण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत उद्या दिनांक 27 डिसेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतींना सनद वाटप होणार आहे.  लाभार्थ्यांना माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, आमदार तुषार राठोड ,अन्य लोकप्रतिनिधींच्या व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सनद वाटप करण्यात येईल. तसेच देशभरातील लाभार्थ्यांशी यावेळी प्रधानमंत्री संवाद साधतील.  नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सकाळी 11 वाजता स्वामित्व योजने अंतर्गत सनद वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.  विभागात विशेष शिबिर घेवून सनद वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, महसूल, भूमीअभिलेख व अन्य विभागातील अधिकारी...

संघटन पर्व: भाजपा राष्ट्रीय सदस्यता अभियान - २०२४ अनुषंगाने भाजपा नांदेड दक्षिण ची जिल्हा कार्यशाळा संपन्न

इमेज
By संजय चिखले मरवाळीकर नांदेड,दि.२३ डिसेंबर: विष्णुपुरी, नांदेड येथील शैक्षणिक प्रतिष्ठान सहयोग कॅम्पस या ठिकाणी सोमवार, दिनांक २३ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२:०० वाजताच्या दरम्यान भारतीय जनता पार्टी नांदेड दक्षिण जिल्हा च्या वतीने सदस्यता नोंदणी अभियानाचे जिल्हा संयोजक डॉ.माधवराव पाटील उच्चेकर यांच्या विनंतीवरून जिल्हाध्यक्ष मा.डॉ.संतुकराव हंबर्डे यांचे अध्यक्षतेखाली संघटन पर्व: भाजपा राष्ट्रीय सदस्यता नोंदणी अभियान - २०२४ अंतर्गत जिल्हा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा कार्यशाळेला सुरुवात करण्या आधी दीपप्रज्वलन करून भारत माता, डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भारत माता की जय च्या जयघोषाने पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. मार्गदर्शक म्हणून विभाग संघटनमंत्री मा.संजयजी कौडगे होते, तसेच या कार्यशाळेस मा.खासदार,मा.आमदार,प्रदेश पदाधिकारी व प्रदेश कार्यकारिणी सदस्य,प्रदेश मोर्चा पदाधिकारी,जिल्हा पदाधिकारी,जिल्हा मोर्चा अध्यक्ष,आघाडी, प्रकोष्ठ, सेल जिल्हा संयोजक,मंडळ अध्यक्ष व सरचिटणीस,माजी जि. प. सदस्य,सोशल मिडिया संयोजक,सदस...

शासन मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींबाबत नक्कीच सकारात्मक निर्णय घेईल-डॉ हनुमंत भोपाळे

इमेज
  मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींची सहविचार सभा संजय चिखले पाटील मरवाळीकर नायगाव बा.(जि:नांदेड), दि.१४ डिसें २०२४- काय गोड तर काम गोड असते. कामाला सुस्वभावाची जोड असेल आणि आपल्याकडे कौशल्य अन् क्षमता असेल तर नक्कीच भवितव्य आहे, त्यामुळे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेमध्ये काम करत असलेल्या युवकांनी सकारात्मक राहून प्रशिक्षणकार्य पूर्ण करावे. नक्कीच शासन प्रशिक्षणार्थींना न्याय देईल असा आशावाद मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण संघटनेचे संस्थापक प्रोफेसर डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण राज्य संघटनेच्या वतीने नायगाव तालुक्यातील गंगणबीड येथील महादेव मंदिराच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सहविचार सभेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. महाराष्ट्रातील शैक्षणिक पात्रताधारक युवक आणि युवतींना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारकडून प्रशिक्षण घेण्याची संधी देण्यात आली आहे. बारावी पास, पदविका आणि पदवी पदव्युत्तर विद्यार्थ्यांना अनुक्रमे सहा, आठ आणि दहा हजार रूपयांचे विद्यावेतन देण्याचे निश्चित केले, पण व...

रब्बी हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर

इमेज
  प्रधानमंत्री फसल बीमा योजना संजय चिखले मुंबई, दि.१२ : राज्य शासनामार्फत रब्बी हंगामामध्ये देखील शेतकऱ्यांना एक रूपयात पीक विमा योजना लागू केली आहे. तरी शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घेऊन आपल्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा पिकाचा विमा उतरवावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२४ आहे. राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना २०१६-१७ पासून राबविण्यात येत आहे. खरीप हंगाम २०२३ पासून महाराष्ट्र शासनामार्फत एक रूपयात पीक विमा योजना लागू केली आहे. याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे. चालू रब्बी हंगाम २०२४-२५ मध्ये योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारच्या पीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in या संकेतस्थळास भेट द्या. महाराष्ट्रात रब्बी हंगामातील गहू, हरभरा तसेच रब्बी कांदा पिकासाठी भाग घेण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२४ आहे. तर उन्हाळी भात व उन्हाळी भुईमुग या पिकांसाठी ही मुदत ३१ मार्च २०२५ पर्यंत आहे. गतवर्षी रब्बी हंगाम २०२३-२४ मध्ये विमा योजनेत साधारणता ७१ लाख विमा अर्ज प्राप्त झाले होते . स्त्रोत: महासंवाद

विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या माध्यमातुन देव, देश व धर्म लक्षात ठेवून हिंदू समाजाने १००% मतदान करावे असे आवाहन संत प्रवासातून संतांनी केले

इमेज
  संत प्रवासामुळे जिल्ह्यात वातावरण भगवेमय झाले संजय पाटील चिखले मरवाळीकर नांदेड,दि.१९ नोव्हेंबर : लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुशंगाने हिंदु समाजाने १००% मतदान करावे असे आवाहन विश्व हिंदुपरिषद व बजरंग दलाच्या माध्यमातुन करण्यात आलेल्या संत प्रवासात समाविष्ट असलेल्या श्री विरुपक्ष शिवाचार्य महाराज गणाचार्य मठसंस्थान मुखेड, श्री व्यंकटाचार्य स्वामी बालाजी मंदीर संस्थान गाडीपुरा नांदेड, श्री योगीपुरन्नाथ महाराज (सोनखेड), श्री चंद्रकांत महाराज लाठकर, श्री श्रीधर महाराज कासराळीकर, श्री भुजंग महाराज, श्री दुधाटे महाराज, श्री मधुसुदन महाराज कापसीकर, इतर महाराजांनी केली.  या मागचा उद्देश हा फक्त मतदारांसह हिंदुसमाजाने १००% सहभाग नोंदवत देव, देश व धर्मासाठी मतदान करावा हाच असल्याचे विश्व हिंदु परिषदेचे क्षेत्र मंत्री गोविंदजी शेंडे, प्रांत मंत्री योगेश्वरजी गर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रांत संघटन मंत्री गणेशजी मोकाशी यांचा या अभियानासाठी विशेष प्रवास, कृष्णाजी देशमुख प्रांत कार्यकर्ते, गजानन पांचाळ प्रांत सहसंयोजक, रविकुमार चटलावार वि.हि.प जिल्हाध्यक्ष, गणेशजी म...

ॲंटी करप्शन ब्यूरो, सातारा यांचे वतीने दक्षता जनजागृती सप्ताह साजरा

इमेज
  संपादक - संजय चिखले मरवाळीकर सातारा,दि.०४ नोव्हेंबर २०२४: राज्यामध्ये प्रतिवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दिनांक ३१ ऑक्टोंबर या जन्मदिवसाचे औचित्य साधून एक आठवडा 'दक्षता जनजागृती सप्ताहाचे (Vigilance Awareness Week) आयोजन करण्यात येते. या वर्षी दिनांक २८/१०/२०२४ ते दिनांक ०३/११/२०२४ या दरम्यान केंद्रीय दक्षता आयोग व महाराष्ट्र शासनातर्फे राज्यभर दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात आलेला आहे. यंदाच्या दक्षता जनजागृती सप्ताहाचे ब्रीदवाक्य' सत्यनिष्ठेच्या संस्कृतीच्या माध्यमातून राष्ट्र समृद्धी ' हे ठेवण्यात आलेले आहे. दिनांक २८/१०/२०२४ ते दिनांक ०३/११/२०२४ या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे अनुषंगाने सातारा जिल्हयातील सातारा, कराड, पाटण, जावली (मेढा), महाबळेश्वर, वाई, खंडाळा, माण, वडूज, लोणंद व फलटण या सर्व तालुक्यातील २७९ शासकीय कार्यालयाचे आवारात व जनजागृती होण्याकरीता टोल फ्रि क्रमांक १०६४ संबंधाने हॅण्डबिलचे वाटप केले. पोस्टर चिकटवले तसेच लोकांना लोकसेवका बद्दल लाच मागणीची   तक्रार देण्याबाबत प्रोत्साहीत करण्यात आलेले आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व नागरीकांची जनजाग...

भ्रष्टाचार रोखण्यासाठी २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान ‘दक्षता जनजागृती सप्ताह’

इमेज
लाचखोरांविरुद्ध कारवाई हा निर्धार  संपादक -संजय चिखले मरवाळीकर  मुंबई, दि. २५: भ्रष्टाचारामुळे समाजाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी दक्षता जनजागृती उपक्रम राबविले जातात. भ्रष्टाचारमुक्त समाजनिर्मितीसाठी नागरिकांचा सक्रीय सहभाग असणे गरजेचे आहे. केंद्रीय दक्षता आयोगाने जाहीर केल्यानुसार 28 ऑक्टोंबर ते 3 नोव्हेंबर 2024 या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहाकरीता यावर्षी सत्यनिष्ठेच्या संस्कृतीच्या माध्यमातून राष्ट्र समृद्धी ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. सप्ताहाचा प्रारंभ येत्या 28 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता भ्रष्टाचार निर्मुलनाच्या प्रतिज्ञेने होणार आहे. कुणीही राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करताना, भ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बृहन्मुंबई विभाग, 91, सर पोचखानवाला मार्ग, वरळी मुंबई येथे संपर्क करावा. तसेच टोल फ्री क्रमांक 1064, दूरध्वनी क्रमांक 022-24921212, अथवा संकेतस्थळ https://acbmaharashtra.gov.in/ , ईमेल acbwebmail@mahapolice.gov.in, addlcpacbmumbai@mahapolice.in, फेसबुक www.facebook....

डॉ. दिगंबर प्रधान यांनी सांभाळला पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचा कार्यभार

इमेज
New S.P ACB Nagpur संपादक- संजय चिखले नांदेड ,दि.१६/०८/२०२४: दिनांक १३ ऑगस्ट २०२४ रोजी महाराष्ट्र शासन गृह विभागामार्फत भारतीय पोलीस सेवा/ राज्य पोलीस सेवेतील अधिकारी यांच्या बदली/पदस्थापनेबाबत आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर आदेशान्वये पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्र येथे डॉ. दिगंबर प्रधान, भापोसे यांची बदली करण्यात आलेली होती. आज दिनांक १६ ऑगस्ट २०२४ रोजी डॉ. दिगंबर प्रधान, भापोसे यांनी श्री राहुल माकणीकर यांचेकडून पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर पदाचा कार्यभार स्विकारलेला आहे. डॉ. दिगंबर प्रधान यांनी त्यांचे वैद्यकीय शिक्षण (एम.बी.बी.एस) शासकीय मेडीकल महाविद्यालय, मिरज जि. सांगली येथून पुर्ण केलेले आहे. सन १९९८ मध्ये त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपअधीक्षक पदी निवड झाली. त्यांनी पोलीस उपअधीक्षक या पदावर तासगावं, मिरज, कराड इ. ठिकाणी कर्तव्य बजावलेले आहे. तसेच पोलीस अधीक्षक या पदावर सांगली, कोल्हापूर, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, महामार्ग सुरक्षा ठाणे इ. ठिकाणी कर...

Dispute Free Village: मरवाळी येथील तंटामुक्त गाव समितीचे पुनर्गठन करण्याची निवेदनाद्वारे मागणी,तुमच्याही ग्रामपंचायतीकडे 15 ऑगस्ट पर्यंत करा मागणी, गावातील तंटे गावातच मिटवा

इमेज
  Dispute Free Village संपादक-संजय चिखले मरवाळी,दि.8 ऑगस्ट 2024: गावात तंटे निर्माण होऊ नयेत, तसेच दाखल असलेले तंटे व नव्याने निर्माण होणारे तंटे लोकसहभागातून सामोपचाराने मिटविण्याची व्यवस्था निर्माण व्हावी आणि सामाजिक शांती प्रस्थापित होऊन राज्याची शांततेतून समृद्धीकडे वाटचाल व्हावी या दृष्टीने तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांच्या संकल्पनेतून 15 ऑगस्ट 2007 पासून 'महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम' राज्यात सुरु करण्यात आली.  नांदेड जिल्ह्यातील नायगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजे मरवाळी/कोपरा ग्रामपंचायत येथील काही सुज्ञ,जागरूक व प्रतिष्ठित ग्रामस्थांना महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष व सदस्यांकडून शासन निर्णयानुसार समितीसाठी घालून दिलेल्या आचारसंहितेचे  कुठलेच पालन करण्यात येत नसल्याची बाब ध्यानात आली. मागिल दोन वर्षात समितीने एकही बैठक घेतली नाही तसेच गावात निर्माण होणाऱ्या तंट्यांबाबत समितीला कसलेच देणं घेणं नसणे,समितीला गावात निर्माण झालेल्या तंट्यात रस नसणे,तंटे/वाद याची माहिती तंटामुक्त गाव समितीकडे देण्यासाठी समितीकडून ग्रामस्थांना आवाहन न करणे...

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (SC-ST) प्रवर्गातील आरक्षणात उपवर्गीकरण करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे धर्माबादेत फटाके फोडून जल्लोषात स्वागत; मोदी हैं तो मुमकिन हैं चे नारे देत सर्वोच्च न्यायालय, केंद्र व राज्या सरकारचे मानले आभार

इमेज
  संपादक-संजय चिखले नांदेड,दि,०६/०८/२०२५:  दि०१ ऑगस्ट २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निकाल दिला ते म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, (SC,ST) प्रवर्गातील समाजाला आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करता येणार आहे ते अधिकार राज्यांना असणार आहेत यामध्ये बऱ्याच राज्यांमध्ये पूर्वी उप आरक्षण म्हणजेच अ, ब, क, ड, असे लागू होते पण 2004 साली त्या निर्णयाला स्थगती दिली होती. पण दिनांक एक ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्थगती उठून एससी एसटी प्रवर्गात उप वर्गीकरण करू शकता असा निर्णय दिलेला आहे.  या निर्णयामध्ये केंद्र सरकारची महत्वपूर्ण भूमिका आहे त्या निर्णयाचा जल्लोषत स्वागत धर्माबाद तालुक्यामध्ये मातंग समाजाच्या वतीने पानसरे चौक, डॉक्टर अण्णाभाऊ साठे चौक, व लहुजी साळवे चौक, या ठिकाणी फटाके फोडून करण्यात आला करण्यात आला. यामध्ये यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य रवींद्र पोतगंटीवार, माजी नगरसेवक संजय पवार, सज्जनगड गाडोड, लो.आं. प्रदेश उपाध्यक्ष व्ही.जी डोईवाड, मराठवाडा सरचिटणीस बी एम गोणारकर(लो. आं.) इंदिरानगर येथील जयंती मंडळाचे अध्यक्ष बीएम सूर्यवंशी उपाध्यक्ष दिल...

Dispute Free Village: ग्रामस्तरीय पर्यायी वाद निवारण (एडीआर) व्यवस्था अर्थात तंटामुक्त गावचा बाजार संपला का❓

इमेज
  तंटामुक्त गाव महाराष्ट्र सरकारच्या गृहखात्याने १९ जुलै २००७ रोजी एमआयएस:१००७/ सीआर-२३८/पीओएल-८ या जीआरद्वारे पर्यायी वाद निवारणासाठी हा नवोन्मेषकारी उपक्रम सुरू केला. महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री तसेच तत्कालीन गृहमंत्री स्वर्गीय आर. आर. पाटील हे या उपक्रमामागील जिवंत प्रेरणा होते. हा उपक्रम कायमस्वरूपी असून, २००७ सालच्या स्वातंत्र्यदिनी त्याचा शुभारंभ करण्यात आला.  विविध न्यायालयांमधील प्रलंबित वाद-खटल्यांचे प्रचंड प्रमाण आणि त्यामुळे अपरिहार्यपणे निकाल देण्यात होणारा विलंब याचा विचार करता, पर्यायी वाद निवारण अर्थात एडीआर ही काळाची गरज आहे. लोकन्यायालये व फास्ट ट्रॅक न्यायालयेही याच कारणासाठी स्थापन करण्यात आली आहेत.  खेड्याच्या स्तरावर अत्यंत किरकोळ मुद्दयांवरून वाद निर्माण होतात. सुरुवातीला यात मोजके लोक गुंतलेले असले, तरीही निराकरण न झाल्यास छोटे मुद्दे मोठे होतात व अधिकाधिक लोक यात गुंतू लागतात. या निराकरण न झालेल्या वादांतून पुढे सामाजिक शांतता व सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. शिवाय फौजदारी व दिवाणी न्यायव्यवस्थांवर अतिरिक्त ताण येतो तो वेगळाच. महात्मा...

बेजबाबदार असलेल्या व्यक्तींची न्यायाधिश सारख्या अतिशय महत्त्वाच्या पदावर नेमणूक होतेच कशी???

इमेज
  संपादक संजय चिखले मुंबई,दि २९/०७/२०२४ :- "कनिष्ठ न्यायालयांचे अनेक न्यायाधीश महत्त्वाच्या गुन्ह्यांमध्ये जामीन न देता सुरक्षित भूमिका घेण्याला प्राधान्य देतात. मात्र अशा खटल्यांमध्ये जामीन अर्जावर विचार करताना सामान्य व्यवहारी ज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे." असे आवाहन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी रविवारी बंगळूर येथे "तुलनात्मक समानता आणि भेदभाव" या विषयावर बर्कले केंद्रीत ११ व्या वार्षिक परिषदेत न्या. चंद्रचूड यांनी मुख्य भाषण करताना आपली मते मांडली. ते म्हणाले की, "जेथे कनिष्ठ न्यायालयांमध्ये जामीन मिळायला हवा, तेथे तो नाकारला जातो. त्यामुळे त्यांना उच्च न्यायालयात जावे लागते. ज्यांना उच्च न्यायालयात जामीन मिळायला हवा होता, तेथे न मिळाल्याने त्यांना सर्वोच्च न्यायालयात जावे लागते. " या विलंबामुळे त्यांना मनमानी पणे अटक होते आणि समस्या वाढतात, याकडे न्या. चंद्रचूड यांनी लक्ष वेधले असलेल्याची दैनिक लोकसत्ता मध्ये दिनांक २९.०७.२०२४ रोजीची बातमी नुकतीच माझ्या वाचण्यात आली."  सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश चंद्रचूड यांना सामान्य ज्ञा...

नायगावच्या SBI,BOI शाखा व्यवस्थापकांनी शेतकऱ्यांच्या खात्याचे अनधिकृत होल्ड लवकरात लवकर काढावे अन्यथा...नायगाव युवक काँग्रेसचा इशारा

इमेज
  संपादक संजय चिखले नायगाव बा,दि.२७/०७/२०२४ : नायगांव तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात स्टेट बँक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ इंडिया या बँकेत खाते असून,या खात्याला शाखा व्यवस्थापकांनी कुठलीही पुर्व सुचना न देता, मोबाईल वर बॅंकेकडून साधा टेक्स्ट मेसेज पाठवण्याची तसदी न घेता होल्ड केल्यामुळे खातेधारक शेतकऱ्यांना विविध कामाकरीता आर्थीक व्यवहार करण्यासाठी अडचणी येत आहेत तसेच शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई जमा रक्कम, पी.एम.किसान योजनेचा खात्यात जमा झालेला हप्ता, दुष्काळी अनुदानाची रक्कम उचलता येत नसल्याने तालुक्यातील पिक कर्ज घेतलेल्या जवळपास सर्वच शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थीक नुकसान होत आहे. सदरील शेकऱ्यांचे शासनाकडून बँक खात्यास होल्ड करण्यात यावे असे कोणते शासन निर्णय असल्यास त्याचा अहवाल शेतकऱ्यांना लेखी स्वरुपात द्यावा. तसेच शेतकऱ्याचे लकवरात लवकर बँक खात्याचे होल्ड काढण्यात यावे.जेणे करून शेतकऱ्यांना बँकेत व्यवहार करण्यास गैरसोय होणार नाही. अन्यथा बैंक खात्यांचे होल्ड नकाढल्यास गांधी गिरी पध्दतीने यूवक कॉग्रेस तालुका नायगांवच्या वतीने आंदोलन करण्यात येऊन सदरील बँकेस कुलूप ला...

प्रचार संपला; 26 एप्रिलला सकाळी 7 पासून मतदान; 48 तासांच्या शांतता कालावधीला सुरुवात प्रशासनाची तयारी पूर्ण ! 25 एप्रिलला सकाळीच पोलिंग पार्ट्या रवाना होणार; जिल्हयामध्ये कलम 144 लागू; सर्वत्र चोख बंदोबस्त

इमेज
WEDNESDAY, APRIL 24, 2024 वृत्‍त क्र.  381   प्रचार संपला ; 26  एप्रिलला सकाळी  7  पासून मतदान   48  तासांच्या शांतता कालावधीला सुरुवात   प्रशासनाची तयारी पूर्ण  ; 25  एप्रिलला सकाळीच पोलिंग पार्ट्या रवाना होणार   जिल्हयामध्ये कलम  144  लागू ;  सर्वत्र चोख बंदोबस्त   शुक्रवार फक्त मतदानासाठी राखीव ठेवा  ;  प्रशासनाचे आवाहन   नांदेड दि.  24  :  16 - नांदेड लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या  48  तासाला बुधवारी सायंकाळी  6  वाजतापासून सुरुवात झाली आहे. या काळात कोणत्याही राजकीय पक्षाला प्रचार करता येणार नाही. जिल्हा प्रशासनाने आयोगाच्या सूचनेनुसार निवडणुकीची पूर्ण तयारी केली असून उद्या सकाळी सात वाजता पासून पोलिंग पार्ट्या रवाना होणार आहे. सोळा नांदेड लोकसभा मतदारसंघातील 2062 मतदान केंद्रावर 18 लक्ष 51 हजार मतदार आपला मताधिकार बजावणार आहेत.   नांदेड लोकसभा मतदारसंघात २३ उमेदवार रिंगणामध्ये आहेत. २६ एप्रिल रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत मतदान होणार आहे. २३ उमेद...

भाजप-महायुती घटक पक्ष राष्ट्रीय स्वराज्य सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.श्रीहरी बागल यांनी पत्रकार परिषद घेऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधील संभ्रम केला दूर

इमेज
संजय पाटील चिखले पुणे,दि.१८:  राष्ट्रीय स्वराज्य सेना राजकीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.श्रीहरी बागल यांनी राम नवमी निमित्त देवाची आळंदी येथे माऊळी चे दर्शन घेऊन पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा घेऊन पत्रकार परिषद घेतली व पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर केला.पुणे येथे पत्रकार परिषद घेण्या आधी श्रीहरि बागल यांनी पश्चिम महाराष्ट्र,मराठवाडा व विदर्भा चा संपूर्ण दौरा करून महाविजय २०२४ साकार करण्यासाठी सर्वांना एकत्र करुन नियोजन बद्ध काम केले आहे.              यावेळी बागल साहेब म्हणाले कि राष्ट्रीय स्वराज्य सेना राजकीय पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष असून महायुतीचा धर्म पाळणे आपले कर्तव्य आहे.व आपण महायुती चे उमेदवार भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आपल्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाज असल्याने काही नाराज लोकांनी राष्ट्रीय स्वराज्य सेना पक्ष लोकसभा २०२४ निवडणूक स्वबळावर लढणार असा संभ्रम निर्माण केला होता तो संभ्रम दुर करून पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दीले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी...