पोस्ट्स

जानेवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन'चे लोकार्पण

इमेज
  गुन्हे सिद्धतेकरिता 'मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन' सुरू करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य By संजय चिखले नांदेड, सोमवार,दि.२७ जानेवारी २०२५: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे आज मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे लोकार्पण केले. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ नुसार ७ किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक पुराव्यांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. या सुधारणांचा प्रमुख भाग असलेली 'मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन' महाराष्ट्रात सुरू करण्यात आली आहे. गुन्हे सिद्धतेकरिता अशी सुविधा सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. राज्यात एकूण २५९ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करण्यात येणार असून त्यापैकी २१ पूर्णपणे सुसज्ज व्हॅन्स कार्यरत करण्यात आल्या आहेत, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करून क्राईम सीन ॲप्लिकेशन गुन्हे स्थळावर तपासणी करणार आहे. यामध्ये पुरावे संग्रहित करून बारकोडद्वारे सुरक्षित करण्यात येणार आहे. पुरावे नष्ट करणे, पुराव...

लाखोंचा पगार तरिही भिकारी,सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवारने जमवली २९ लाखांची बेकायदा मालमत्ता

इमेज
      कायदेशीर उत्पन्नाचे तुलनेत १६.६५% अपसंपदा समाजात, पाहुणे राऊळे, नातेवाईक, मित्रमंडळी तसेच जवळची लोकं साहेबांनी लई कमाई केली, कमाई केली सतत चर्चा करत असतात, बहुतांश लोकसेवकांनी ती कमाई अशाच भ्रष्टाचारातून केलेली असावी By संजय चिखले नांदेड, रविवार दि.२६-०१-२०२४: सविस्तर माहिती असी कि,लोकसेवक संजय पुजलवार सध्या सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई कार्यालयाकडून उघड चौकशी करण्यात आली. लोकसेवक यांनी संपादित केलेली मालमत्ता कायदेशीर स्त्रोताद्वारे संपादित केली किंवा कसे याबाबत त्यांना वेळोवेळी संधी देवून माहिती घेण्यात आली. परंतु त्यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत ते पुष्टीदायक पुरावे सादर करू शकले नाहीत. त्यांनी लोकसेवक पद धारण केलेल्या कालावधीत त्यांना प्राप्त असलेल्या कायदेशीर उत्पन्नापेक्षा जास्त किंमतीची मालमत्ता स्वतःचे नावे, त्यांची पत्नी सौ.मनीषा संजय पुजलवार यांच्या नावे संपादित केल्याचे उघड चौकशी अंती निष्पन्न झाले आहे. त्यांनी संपादित केलेली रू. 28,74,146/- किंमतीची मालमत्ता ही त्यांच्या कायद...

महाराष्ट्रात तीन यशस्वी सापळा कारवायामधे चार लाचखोर चतुर्भुज

इमेज
  By संजय चिखले नांदेड,दि.२५-०१-२०२५: आज दिनांक २५ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील ॲंटी करप्शन‌ ब्युरो अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तीन युनिट द्वारे करण्यात आलेल्या तीन यशस्वी सापळा कारवाई मधे ४ लाचखोर आरोपी लोकसेवकांना रंगेहाथ पकडण्यात यश मिळाले आहे.छत्रपती संभाजीनगर युनिट द्वारे शिल्लोड तालुक्यात करण्यात आलेल्या यशस्वी सापळा कारवाईत महसूल सहायक (अनाधिकृत गौण खनिज उत्खनन/वाहतूक पथक) तसेच गडचिरोली युनिट द्वारे पुराडा वनपरिक्षेत्रात करण्यात आलेल्या यशस्वी सापळा कारवाईत वनपाल व सांगली युनिट द्वारे करण्यात आलेल्या यशस्वी सापळा कारवाईत पोलीस हवालदार व पोलीस नाईक ACB च्या जाळ्यात अडकले आहेत. छत्रपती संभाजीनगर लाप्रवि परिक्षेत्र अंतर्गत छत्रपती संभाजीनगर घटक एक कारवाई नागपूर परिक्षेत्र अंतर्गत अंतर्गत गडचिरोली घटक एक कारवाई पुणे लाप्रवि परिक्षेत्र अंतर्गत सांगली घटक एक कारवाई

महाराष्ट्रात दोन यशस्वी सापळा कारवायामधे चार लाचखोर चतुर्भुज

इमेज
  By संजय चिखले नांदेड,दि.२४-०१-२०२५: आज दिनांक २४ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील ॲंटी करप्शन‌ ब्युरो अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दोन युनिट द्वारे करण्यात आलेल्या दोन यशस्वी सापळा कारवाई मधे ४ लाचखोर आरोपी लोकसेवकांना रंगेहाथ पकडण्यात यश मिळाले आहे.धुळे युनिट द्वारे करण्यात आलेल्या यशस्वी सापळा कारवाईत महिला सरपंच व ग्रामसेवक तसेच भंडारा युनिट द्वारे करण्यात आलेल्या यशस्वी सापळा कारवाईत आजी माजी सरपंच जाळ्यात अडकले आहेत. नाशिक लाप्रवि परिक्षेत्र अंतर्गत धुळे घटक एक कारवाई नागपूर लाप्रवि परिक्षेत्र अंतर्गत भंडारा घटक एक कारवाई

आ.चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली शिवराज पाटील होटाळकरांसह अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश : अजित पवारांच्या उपस्थितीत मुंबईत रंगला पक्ष प्रवेश सोहळा

इमेज
  By संजय चिखले मुंबई,दि.२३-०१-२०२५: लोहा - कंधार विधानसभा मतदारसंघाचे आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्यासह नायगाव विधानसभा मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला . पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष जीवन पाटील घोगरे, माजी सभापती व्यंकटराव पाटील गोजेगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य विनायकराव पाटील मांजरमकर, मारोती वाडेकर, माधव पावडे, धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक पाटील वडजे, शिवराज पाटील गाडीवान, संजय पाटील शिंदे, गंगाजी पाटील मुगावकर, सटवाची मोदलवाड, श्रीपत पाटील शिंदे, माधव पाटील उपासे, शिवाजी पाटील पवार, बापूराव पाटील पवार, चंद्रकांत पाटील पवार, गणेश पाटील पव...

महाराष्ट्रात सहा यशस्वी सापळा कारवायामधे कनिष्ठ लिपिक(बीड),सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक(नांदेड),ग्रापं स्तरिय संगणक परिचालक(लातूर),नगर भूमापन अधिकारी (धुळे),उप अभियंता(रायगड),वरिष्ठ मुख्य लेखणिक(सोलापूर) असे सात लाचखोर चतुर्भुज

इमेज
  By संजय चिखले नांदेड,दि.२३-०१-२०२५: आज दिनांक २३ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील ॲंटी करप्शन‌ ब्युरो अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वेगवेगळ्या युनिट द्वारे करण्यात आलेल्या सहा यशस्वी सापळा कारवाई मधे ७ लाचखोर आरोपी लोकसेवकांना रंगेहाथ पकडण्यात यश मिळाले आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर लाप्रवि परिक्षेत्र अंतर्गत बीड घटक एक कारवाई नांदेड लाप्रवि परिक्षेत्र अंतर्गत नांदेड घटक एक कारवाई व लातूर घटक एक कारवाई नाशिक लाप्रवि परिक्षेत्र अंतर्गत धुळे घटक एक कारवाई ठाणे लाप्रवि परिक्षेत्र अंतर्गत रायगड अलिबाग घटक एक कारवाई पुणे लाप्रवि परिक्षेत्र अंतर्गत सोलापूर घटक एक कारवाई