🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

सोमवार, एप्रिल २६, २०२१

मांजरम परिसरात अवकाळी पावसाचा तांडव, विज पडून म्हैस व वासरू जागीच ठार

 


नायगाव,दि 26 एप्रिल :  मांजरम परिसरात सोमवारी दिवसभराच्या प्रचंड उकाड्या नंतर सायंकाळी पाच वाजता अचानक आकाशात मेघांचे तांडव सुरू झाले जवळपास पाऊण तास मेघ गर्जने सह अवकाळी जोरदार पाऊस झाला यातच हालक्या गारांच्या पावसाने हजेरी लावली विजेने मांजरम येथील शेतकऱ्याची  एक दुभती म्हैस व एका वासराचा जीव घेतला.

दि.२६ सोमवारी सायंकाळी पाच वाजता अचानक आकाशात ढग जमा झाले.दिवसभरच्या प्रचंड उकाड्या मुळे मेघ गर्जने सह पावसाला सुरुवात झाली.जवळपास पाऊन तास जोरदार पाऊस पडला.यातच हालक्या गारा बरसल्या. यातच सायंकाळी व सकाळी शेतीच्या मशागतीसाठी शिवरात असलेल्या व्यक्तींना अवकाळी पाऊसा पेक्षा विजेच्या कडकडाटाची भिती मनात होती. ती घटना घडली मांजरम येथील शेतकरी श्रीराम गणपतराव शिंदे यांच्या जागलीवर बांधलेली दुभती म्हैस व तिचे वासरू विज पडून जागीच ठार झाले तसेच हाळद काढणी सुरू असून याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अवकाळी पावसाने नुकसान झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत.



राज्यातील सर्व रुग्णालयांचे ‘फायर’ आणि ‘ऑक्सिजन ऑडीट’ करा–जिल्हा प्रशासनाला मुख्य सचिवांचे निर्देश;ऑक्सिजन, रेमडेसिवीर, रुग्ण व्यवस्थापनाचा मुख्य सचिवांकडून आढावा

 


मुंबई, दि. २३ एप्रिल : नाशिक आणि विरार येथील रुग्णालयांमध्ये झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडीट करतानाच ऑक्सिजन ऑडीट करण्याचे निर्देश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज जिल्हा यंत्रणेला दिले. ऑक्सिजन टॅंकरना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला असून पोलिस संरक्षणात त्याची वाहतूक करावी आणि परस्पर टॅंकर वळवू नयेत, अशा सूचनाही मुख्य सचिवांनी यावेळी दिल्या.

राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतानाच ऑक्सिजन, रेमडेसिवीरची उपलब्धता, रुग्ण व्यवस्थापन याबाबींचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याशी दूरदृष्यप्रणालीच्या माध्ययातून संवाद साधला. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, आरोग्य आयुक्त डॉ. रामास्वामी, अन्न व औषध प्रशासन आयुक्त परिमल सिंग यांच्यासह विशेष कार्यधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले सचिंद्र प्रताप सिंह, अमीत सैनी, अश्वीन मुदगल (ऑक्सिजन उपलब्धतेसाठी), दीपेंद्र कुशवाह (ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी) आणि विजय वाघमारे (रेमडीसीवीर उपलब्धतेसाठी) उपस्थित होते.

टास्क फोर्सच्या सूचनेनुसार रुग्णांना ऑक्सिजन द्यावा

राज्यातील सर्व रुग्णालयांचे तातडीने फायर ऑडीट करतानाच आगीच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्याचे मुख्य सचिवांनी सांगितले. यासोबतच सर्व रुग्णालयांचे ऑक्सिजन ऑडीट करण्याचे निर्देश मुख्य सचिव श्री.कुंटे यांनी दिले. त्यामध्ये रुग्णाला शास्त्रशुद्ध पद्धतीने ऑक्सिजन दिला जात आहे का, तो वाया जावू नये यासाठी टास्क फोर्सच्या सूचनांचे पालन होत आहे याबाबींची तपासणी करावी आणि रुग्णालयांमधील ऑक्सिजनच्या नलिका, साठवणूक यंत्रणा याठिकाणी ऑक्सिजन गळती होत नाहीये ना तो वाया जात नाहीये याची पाहणी करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर घ्या

सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर घेण्यात यावे जेणेकरून सिलेंडर आणि लिक्विड ऑक्सिजनवरील अवलंबत्व कमी करता येईल, असे मुख्य सचिवांनी सांगितले. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी पीएसए तंत्रज्ञानावर आधारित ऑक्सिजन प्लांट उभारावेत, असेही त्यांनी सांगितले.

ऑक्सिजन टॅंकरला रुग्णवाहिकेचा दर्जा

राज्यात ऑक्सिजन टॅंकरची वाहतूक कुणीही रोखू नये त्यासाठी त्याला रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला आहे. पोलिस संरक्षणात या टॅंकरची वाहतूक करण्यात यावी कुठल्याही प्रकारे ऑक्सिजन टॅंकर वळविण्यात येऊ नये, यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात नियोजनबद्धरित्या ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा असे सांगतानाच आज रात्री (शुक्रवारी) विशाखापट्टणम् येथून रेल्वेद्वारे ऑक्सिजन टॅंकर येणार असून त्यातील चार नागपूर आणि उर्वरित नाशिक येथे पाठविण्यात येतील, असे मुख्य सचिवांनी सांगितले.

यावेळी मुख्य सचिवांनी राज्यातील उपलब्ध ऑक्सिजनचा आढावा घेतला. राज्यात अन्य ठिकाणांहून जो ऑक्सिजन आणला जात आहे त्याच्या साठवणुकीची सुविधा तयार करावी, असे निर्देशही श्री. कुंटे यांनी यावेळी दिले. रेमडेसिवीर उपलब्धतेबाबत प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले

अजय जाधव..२३.४.२०२१

Tags: रुग्णालयांचे ‘फायर’ आणि ‘ऑक्सिजन ऑडीट’



रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं

 रेमेडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या काँग्रेस वाहतूक सेलचा पदाधिकारी हरपिंदर सिंग यास न्यायालयाने 26 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे 


नवी मुंबई : रेमेडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या काँग्रेस वाहतूक सेलचा पदाधिकारी हरपिंदर सिंग यास न्यायालयाने 26 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी हरपिंदर सिंगला रंगेहाथ पकडले आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. हरपिंदर सिंगच्या अटकेमुळे रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजारा करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

रेमडेसिवीर इंजेक्शनचा बाजारात तुटवडा

राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. याच गोष्टीचा फायदा घेऊन काही समाजकंटकांकडून रेमडेसिवीर इंजेक्शन दुप्पट, तिप्पट दरात बाजारात विक्री केली जात आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन कोरोना रुग्णांसाठी जीवनदान ठरत असल्यामुळे त्याची प्रचंड प्रमाणात मागणी आहे. त्याचाच फायदा घेऊन काही समाजकंटक चढ्या दराने इंजेक्शनची विक्री करत आहेत. याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून धडक कारवाई देखील सुरु आहे. अशाच एका कारवाईत पोलिसांनी खारघरमध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला रेमडेसिवीरचा काळाबाजार करताना रंगेहाथ पकडले

 पोलिसांनी आरोपीस कसे पकडले?

आरोपी रेमडेसिवीर इंजेक्शन विक्रीसाठी खारघरमधील लिट्ल वर्ल्ड मॉल समोरील रस्त्यावर येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेतील पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. या जाळ्यात आरोपी अचूकपणे अडकला. दोन रेमडेसीवीर इंजेक्शन घेवून आलेल्या हरपिंदर सिंग (वय 41, रा. कळंबोली) यास अटक केली. त्याच्याकडून जवळपास 5 लाख 18 हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

इंजेक्शनच्या काळाबाजारात कोणकोण सामील?

हरपिंदर सिंगला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता अधिक तपासासाठी न्यायालयाने त्याला 26 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. काँग्रेस वाहतूक सेलचा पदाधिकारी हरपिंदर सिंग याच्या समवेत आजून कोण या रेमडेसिवीरच्या काळाबाजार करण्यात सहभागी आहे, तसेच रेमडेसिवीर त्यांनी कुठून आणले, याबाबत गुन्हे शाखा कसून तपास करीत आहे.

काँग्रेसची भूमिका काय?

विशेष म्हणजे महाआघाडीतील बड्या नेत्यांसोबत आरोपीचे फोटो सोशल मिडीयावर आहेत. त्यामुळे बारामतीप्रमाणेच पनवेल परिसरातील या प्रकाराने चर्चेला उधाण आले आहे. मात्र काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुदाम पाटील यांनी हरपिंदर सिंगने स्वतः महिन्याभराआधी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पक्ष म्हणून आम्ही काय कारवाई करणार? जे घडलं ते अतिशय वाईट कृत्य आहे. मी याचा निषेध करतो, अशी भूमिका स्पष्ट केली.



देशाचे 48 वे सरन्यायाधीस म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिली शपथ

 


नवी दिल्ली,24 एप्रिल : माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर देशाचे 48 वे सरन्यायाधीस म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती नथालापती व्यंकट रमणा यांनी शनिवारी (दि. 24) शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात न्यायमूर्ती रमणा यांना मुख्य न्यायाधीश पदाची शपथ दिली. सरन्यायाधीश पदापर्यंत पोहचणारे आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे रमणा हे पहिले न्यायमूर्ती ठरले आहेत.

सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती रमणा यांच्या नावाला राष्ट्रपतींनी अगोदरच मंजुरी दिली होती. 24 मार्च रोजी न्या.शरद बोबडे यांनी न्या. रमणा यांच्या नावाची शिफारस केंद्राकडे पाठवली होती. न्यायदानाचा 45 वर्षांहून अधिक अनुभव असणारे आणि संवैधानिक प्रकरणांचे जाणकार रमणा यांचा कार्यकाळ 26 ऑगस्ट 2022 रोजी संपुष्टात येणार आहे. वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत ते पदावर राहणार आहेत. अर्थातच ते दोन वर्षांहूनही कमी काळासाठी सरन्यायाधीश पदावर राहणार आहेत.



मानवता धर्माला काळिमा : कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही 6 महिने गर्भवती महिलेचा काही तासातच पतीच्या डोळ्यासमोर मृत्यू

 


कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावरही एका 6 महीन्याच्या गर्भवती महिलेला कोवीड पॉझिटिव्ह आहे असे दाखवून दवाखान्यात भरती करुन घेण्यात आले आणि काही तासातच तिचा मृत्यू झाला, मृत्यू झालेल्या महिलेचा पती आक्रोश करुन सांगत आहे की कोरोना टेस्ट करण्यासाठी आणलेल्या त्याच्या सहा महिन्याच्या गर्भवती पत्नीला कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलेला असताना देखील रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे असे सांगून त्या महिलेला कोवीड हॉस्पिटलमध्ये दाखल करुन घेतले आणि काही तासातच तिचा मृत्यू झाला आहे असे तिच्या नातेवाईकांना सांगण्यात आल्यानंतर हि बातमी ऐकून ते आक्रोश करत आहेत.त्या महिलेला कशा प्रकारे मारण्यात आले हे ते सांगत आहेत.त्या महिलेसह तिच्या गर्भातील सहा महिन्याच्या अर्भकाचा देखील त्या कसाई डॉक्टरांनी जीव घेतला आहे.त्या दवाखान्यात अशा प्रकारे मृत्यूच्या सहा-सात घटना त्याच दिवशी घडलेल्या आहेत असे त्या मृत गर्भवती महिलेच्या पतीने सांगितले आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर फिरत आहे, कसे कसे प्रकार रुगणांसोबत घडत आहेत, त्यांना कोणकोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे हे अशा घटनांमधून समजत आहे.


कसलेहे डॉक्टर? यांना जीवनदायी देवता म्हणावे की मानवरुपी कसाई?एक वेळचा कसाई बरा म्हणण्याची वेळ आली आहे,कारण ते बेजबान जनावरांचे कत्तल करतात,हे डॉक्टररुपी कसाई तर जबान असणा-यांचे कत्तल करत आहेत,एके काळी पुर्वजांनी या डॉक्टरांना माणसातील देव अशी उपाधी दिली आहे.हेच का ते मानुषरुपी देवता? अशा काही नालायक लोकांनी बाकीच्या डॉक्टरांकडे संशयाच्या नजरेने बघण्याची वेळ आणली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही,सगळेच डॉक्टर वाईट असू शकत नाहीत, काही लोकांच्या अशा अमानवी कृत्यांमुळे सर्वांवर बदनामीची वेळ आली आहे.काही डॉक्टरांना पैसा हाच सर्वस्व आहे हे या कोवीडने दाखवून दिले आहे,मानवता धर्म नामशेष होण्याच्या मार्गावर आहे की काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही,अशा डॉक्टरांसाठी वेळीच कायद्यात बदल करून कठोर दंडात्मक शासन निर्णय होणे अत्यावश्यक आहे अन्यथा हे मानवरुपी कसाई निष्पाप लोकांचे संसार उद्धवस्त केल्याशिवाय राहणार नाहीत,पुढील काळात तर खुप भयंकर परिस्थिती निर्माण होणार आहे.लोकं आक्रोश करत आहेत, तडफडून मरण पावत आहेत,हे लवकरात लवकर कुठेतरी थांबले पाहिजे अन्यथा अनागोंदी माजल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की,या व्हिडिओ मधील घटनेसारख्या असंख्य घटना रोज घडत आहेत, टिव्हीवर,पेपरमधून,सोशल मिडियावर रोज बातम्या, व्हिडिओ पाहायला मिळत आहेत,प्रशासन देखील निष्क्रिय बनलेले दिसत आहे,कशाची कशाला सोय नाही.बिमार होऊन दवाखान्यात अशा मानवरुपी कसायांकडून मरण्यापेक्षा घरी राहून स्वतःला सुरक्षित ठेवणे महत्वाचे आहे.



Popular posts लोकप्रिय पोस्ट