बिलोली,दि ०१ सप्टेंबर २०२१ : शहरातील ऐतिहासिक दर्गा मस्जीद चे तात्पुरते मुतवल्ली यांच्या गैरकारभाराची चौकशी करुन तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी तहसिलदार व महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.
बिलोली शहरातील नवाब सरफराज खान दर्गा व मस्जीद कला येथील मुतवल्ली हे नागरिकांना न जुमानता स्वतः च्या मर्जीप्रमाणे मनमानी कारभार करीत आहेत.महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या मालकीच्या असलेल्या ईनामी जागेवर नियमबाह्य व अनाधिकृतपणे जागा भाडयाने,किरायने,गहान ठेवून एका व्यापाऱ्यांकडून एका दुकानास दरमहा अंदाजे चार हजार प्रमाणे जवळपास ६० दुकाने भाड्याने देवुन महिन्याकाठी लाखो रुपये उत्पन्न जमा करित आहेत जे कि सर्व अनाधिकृत आहे.दर्गा व मस्जीद येथे येणा-या नागरिकांसाठी सोयी,सुविधा व मुलभूत गर्जा उपल्बध करुन दिले जात नाही. याबाबत विचारणा केली असता उध्दटपणे "काय करायचे ते करा, कुठे जायचे ते करा"असे बोलुन जनतेला अपमानीत करुन बोलतात.ईनामी जमिनीवर अनाधिकृत थाटण्यात आलेल्या दुकानदारांकडून येणा-या पैशांचा व जमा खर्चाचा हिशेब दिला जात नाही.वक्फ मंडळाची ईनामी(भोगवटदार दोन) ही जमीन सर्रासपणे विक्री केली जात आहे,तसेच नियमबाह्य रित्या वाटर प्लाॕन्ट चालु आहे,परिसरात हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेले सरफराज खान दर्गा ही प्रसिध्द आहे.तसेच पुरातत्व विभागाकडे पर्यटन स्थळ म्हणुन मान्यता आहे.परंतु बाहेर गावाहुन येणार्या भाविकांना राहण्यासाठी खोली,स्वंयपाकगृह,शुध्द पिण्याच्या पाण्याची व बसण्याची सोय नाही.
आदि बाबत तात्काळ रितसर चौकशी करुन यास जबाबदार असलेल्या मुतवल्ली यांना पदावरुन हटविण्यात यावे या व ईतर मागण्याचे निवेदन मा.वक्फ मंञी,मा.मुख्यकार्यकारी अधिकारी वक्फ मंडळ,मा.जिल्हाधिकारी नादेड,वक्फ अधिकारी नादेड यांना देण्यात आले.सदरिल निवेदनावर एजाज फारुखी,शेख वाजीद,नईम फारुखी,शेख मुश्ताक,अब्दुल रशीद,अखिल सिद्दीकी,ईसरार फारुखी,रियाज सिद्दीकी,वाजीद मन्नान,खाजी मुशिरोद्दीन,म.सलीम यासीन,अ. रऊफ,साबेर पटेल, अहेमदखान,मि.तफजुल बेग, वहीद बेग बाखर बेग,सिराज पटेल,साजीद कुरेशी आदिंच्या च्या स्वाक्षरी आहेत.

