🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

शुक्रवार, ऑक्टोबर ०१, २०२१

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर परिक्षेत्रातील नंदुरबार युनिटचे पोलीस उपअधीक्षक शिरीष जाधव सेवावृत्त

 


नंदुरबार : नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शिरीष जाधव हे पोलीस खात्याच्या 33 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर गुरुवार, 30 सप्टेंबर 2021 रोजी सेवानिवृत्त झाले. याप्रसंगी सहकारी कर्मचाऱ्यांतर्फे त्यांना प्रेमाचा निरोप देण्यात आला.

सेवानिवृत्तीच्या छोटेखानी झालेल्या कार्यक्रमास त्यांच्या पत्नी ज्योती शिरीष जाधव, मुलगा अनिकेत जाधव, ऋषीकेश जाधव, सासुबाई प्रमिला पाटील तसेच नंदुरबार एसीबीचे निरीक्षक समाधान वाघ, पोलीस हवालदार उत्तम महाजन, दीपक चित्ते, अमोल मराठे, संदीप नावडेकर, संजय गुमाणे, मनोहर बोरसे आदी उपस्थित होते.


तक्रारदारांना नेहमीच न्यायाची भूमिका 

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना उपअधीक्षक शिरीष जाधव म्हणाले की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) आलेल्या तक्रारदारांना नेहमीच न्याय देण्याची भूमिका वठवली मात्र काम करीत असताना खोट्या तक्रारींना कधीही थारा दिला नाही. शिवाय लोकसेवकांवर अन्याय होवू दिला नाही. सेवेचे व्रत प्रामाणिकपणे अंगीकारत पोलीस खात्यातील 33 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत असल्याने काहीसे दुःख असले तरी बदली, बढती व सेवानिवृत्त हा कामाचा भाग असल्याचेही ते म्हणाले.


तब्बल 51 आरोपींवर ट्रॅप

लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बदली झाल्यानंतर नंदुरबार पोलीस उपअधीक्षक शिरीष जाधव यांच्या कार्यकाळात तब्बल 51 लाचखोरांवर एसीबीने ट्रॅप केले. जाधव यांनी आतापर्यंत मुंबई, अहमदनगर, रायगड, ठाणे ग्रामीण, धुळे, दोंडाईचा, मुंबई, वरळी आदी ठिकाणी सेवा बजावल्यानंतर नंदुरबार एसीबीतही प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले.

Tags : #सेवानिवृत्ती

Popular posts लोकप्रिय पोस्ट