🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

रविवार, एप्रिल ११, २०२१

महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र लोकराज्य मासिक (मराठी)मार्च २०२१.pdf तसेच सर्व मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती मासिक वाचा एकाच ठिकाणी

 माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित होत असलेले 'लोकराज्य' मासिक महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र आहे

लोकराज्य मासिक (मराठी)

सशक्त, कर्तृत्ववान, महिलाशक्ती

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित होत असलेले 'लोकराज्य' मासिक महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र आहे. मराठी, इंग्रजी (महाराष्ट्र अहेड), हिंदी, गुजराती व उर्दू अशा पाच भाषेत प्रसिद्ध होणाऱ्या या मासिकाला तब्बल सात दशकांची यशस्वी परंपरा लाभली आहे. मार्च १९४७ पासून प्रसिद्ध होणारे हे नियतकालिक राज्याचा जडणघडीचा बोलका साक्षीदार ठरले आहे. महत्त्वपूर्ण घडामोडी, मंत्रिमंडळ निर्णय, विविध क्षेत्रातील माहितीचा खजिना म्हणजे लोकराज्य. विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती यामुळे हे मासिक सर्वसामान्य वाचकांसोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या गळ्यातील ताईत बनले आहे. त्यामुळेच लोकराज्य हे मराठी मासिक देशातील सर्वाधिक खपाचे मासिक म्हणून ऑडिट ब्युरो ऑफ सक्युर्लेशन (अेबीसी)ने अधिकृत मोहोर उमटवली आहे.

मराठी लोकराज्यची इंग्रजी आवृत्ती असलेले ‘महाराष्ट्र अहेड’ हे नियतकालिक मार्च 1955 पासून प्रकाशित होत आहे. राज्यात उर्दू भाषाही मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. अल्पसंख्याक नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना, निर्णय व महत्त्वपूर्ण घडामोडी पोहोचवण्याचे काम उर्दू भाषेतील लोकराज्य जानेवारी 1974 पासून यशस्वीपणे करत आहे. राज्यात हिंदी भाषिकांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे शासन राबवत असलेल्या विविध योजना, उपक्रम, निर्णय व महत्त्वपूर्ण घडामोडींची माहिती राज्यातील हिंदी भाषकांपर्यंत पोहोचावी या दृष्टीने 1976 पासून हिंदी भाषेतून लोकराज्य प्रसिद्ध केले जात आहे. राज्यात मुंबई व इतर काही ठिकाणी गुजराती भाषकांची मोठी संख्या पाहता गुजराती भाषेतूनही लोकराज्य प्रकाशित करण्यात येत आहे.

लोकराज्य मासिक मराठी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇

लोकराज्य (मराठी) मार्च २०२१.google drive

लोकराज्य मासिक मराठी डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇

लोकराज्य (मराठी) मार्च २०२१.pdf

सर्व मराठी लोकराज्य मासिक पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇

https://dgipr.maharashtra.gov.in/lokrajya-marathi



लोकराज्य मासिक (हिंदी) मार्च-2020

स्त्री से सुपर वुमन

लोकराज्य महाराष्ट्र सरकार का मुखपत्र है। लोकराज्य पत्रिका में राज्य सरकार के महत्त्वपूर्ण निर्णय, विभिन्न विशेषज्ञों की राय, मंत्रियों के साक्षात्कार, विभिन्न विभागों की जानकारी, सरकारी गतिविधियों और योजनाओं की जानकारी शामिल है। यह राज्य सरकार के सूचना और जनसंपर्क निदेशालय द्वारा मासिक प्रकाशित किया जाता है और लगभग साढ़े चार लाख प्रतियाँ वितरित करता है। प्रतियोगी परीक्षा के लिए उपस्थित होने वाले छात्रों द्वारा पत्रिका का सबसे अधिक उपयोग किया जाता है। इसमें सरकार के फैसले, इसके पीछे की भूमिका और अध्ययन शामिल हैं। यह इन छात्रों के लिए राज्य में सामान्य ज्ञान, प्रशासनिक विकास से अवगत होने का एक आसान तरीका है। महाराष्ट्र सरकार द्वारा लोकराज के विशेष मुद्दों को विभिन्न कार्यों, सरकारी नीतियों, कला, संस्कृति, भाषा आदि पर प्रकाशित किया जाता है। इस पत्रिका के अंग्रेजी संस्करण को महाराष्ट्र अहेड के नाम से जाना जाता था।

लोकराज्य मासिक हिंदी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇

Lokrajya (Hindi) March 2020.Google drive

लोकराज्य मासिक हिंदी डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇

Lokrajya (Hindi) March 2020.pdf

सर्व हिंदी लोकराज्य मासिक पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇

https://dgipr.maharashtra.gov.in/lokrajya-hindi


Lokrajya (Urdu) Mar-2020

اردو لوک راجیہ

ریاست میں اردوزبان بڑے پیمانے پربولی جاتی ہے ۔ اقلیتی طبقات کے افراد تک حکومت کی سبھی یوجنا ئیں ،فیصلے اوررونما ہونے والے تمام تر اہم واقعات کو پہنچانے کے کام اردو زبان میں لوک راجیہ جنوری ۱۹۷۴؁ سے کامیابی کے ساتھ انجام دے رہا ہے۔ اقلیتی طبقات کی عوام کے نقطہ نظر سے کار آمد اور مفید یوجنائیں اور فیصلوں کی معلومات اس میںخاص طور سےپیش کی جاتی ہے ۔

लोकराज्य मासिक उर्दू वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇

Lokrajya-Urdu-Mar2020.google drive

लोकराज्य मासिक उर्दू डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇

Lokrajya-Urdu-Mar2020.pdf

सर्व उर्दू लोकराज्य मासिक वाचण करण्यासाठी येथे खालील क्लिक करा👇

https://dgipr.maharashtra.gov.in/lokrajya-urdu


લોકરાજ્ય (ગુજરાતી) मार्च-2020

લોકરાજ્ય (ગુજરાતી)

લોકરાજ્ય એ મહારાષ્ટ્ર સરકારનું મુખપત્ર છે. લોકરાજ્ય સામયિકમાં રાજ્ય સરકારના મહત્વના નિર્ણયો, વિવિધ નિષ્ણાતોના મંતવ્યો, મંત્રીઓના ઇન્ટરવ્યુ, વિવિધ વિભાગોની માહિતી, સરકારી પ્રવૃત્તિઓ અને યોજનાઓ વિશેની માહિતી વિશેના મહત્વપૂર્ણ લેખ છે. રાજ્ય સરકારના માહિતી અને જનસંપર્ક નિયામક દ્વારા માસિક પ્રકાશિત કરવામાં આવે છે અને લગભગ સાડા ચાર લાખ નકલોનું વિતરણ કરવામાં આવે છે. સ્પર્ધાત્મક પરીક્ષા આપવા માટે આવતા વિદ્યાર્થીઓ દ્વારા મેગેઝિનનો વધુ ઉપયોગ કરવામાં આવે છે. તેમાં સરકારના નિર્ણયો, તેની પાછળની ભૂમિકા અને અભ્યાસનો સમાવેશ થાય છે. આ વિદ્યાર્થીઓને રાજ્યમાં સામાન્ય જ્ knowledgeાન, વહીવટી વિકાસ અંગે જાગૃત થવાની સરળ રીત બનાવે છે. લોકરાજ્યના વિશેષ મુદ્દાઓ મહારાષ્ટ્ર સરકાર દ્વારા વિવિધ કૃતિઓ, સરકારની નીતિઓ, કળાઓ, સંસ્કૃતિ, ભાષા, વગેરે પર પ્રકાશિત કરવામાં આવે છે. આ સામયિકની અંગ્રેજી આવૃત્તિ આગળ મહારાષ્ટ્ર તરીકે જાણીતી હતી.

लोकराज्य मासिक गुजराती पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇

Lokrajya-Gujrathi-Mar2020.google drive

लोकराज्य मासिक गुजराती डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक कराा👇

Lokrajya-Gujrathi-Mar2020.pdf

सर्व गुजराती लोकराज्य मासिक वाचण करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇

https://dgipr.maharashtra.gov.in/lokrajya-gujrathi


https://dgipr.maharashtra.gov.in/user/login


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

👊1️⃣ लाचलुचपत सापळा कारवाई (whatsapp group)

👊2️⃣लाचलुचपत सापळा कारवाई (whatsapp group)

👊3️⃣ लाचलुचपत सापळा कारवाई (whatsapp group)

रेमडेसिवीरच्या सुरळीत पुरवठ्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष आरोग्य विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

 


मुंबई : राज्यात रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भात आज राज्याचे आरोग्य आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे.

राज्यात जाणवणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यावर उपाययोजना करण्यासाठी नुकतेच आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी इंजेक्शन उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली होती. त्यावेळी आरोग्यमंत्र्यांनी जिल्हास्तरावर रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी यंत्रणा तयार करण्याचे निर्देश आयुक्तांना दिले होते. त्यानुसार काल सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आरोग्य आयुक्तांना पत्र पाठविण्यात आले आहे.

राज्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुख्यत: खाजगी रुग्णालयात रेमडेसिवीरची मागणी वाढत आहे. त्याचप्रमाणे खाजगी औषध दुकानदारांकडून जास्त दराने त्याची विक्री होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव काळात रेमडेसिवीरचा पुरवठा जिल्ह्यांमध्ये सुरळीत होण्याच्या दृष्टीने निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अंतर्गत सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या ऑक्सिजन नियंत्रण कक्षामध्ये रेमडेसिवीर बाबत तक्रार सुद्धा स्वीकारण्यात याव्यात आणि त्याचे निराकरण स्थानिक अन्न औषध प्रशासन कार्यालयामार्फत करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात दिल्या आहेत.

जिल्हास्तरावर तांत्रिक समिती गठित करून त्यामार्फत खाजगी रुग्णालयात रेमडेसिवीरचा उपयोग योग्य पद्धतीने होत आहे किंवा नाही याची खातरजमा करावी. रेमडेसिवीरची गरज भासल्यास राज्य स्तरावरील अन्न औषध प्रशासनच्या राज्यास्तरीय नियंत्रण कक्षाशी संपर्क करुन योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश पत्रात दिले आहेत.

अजय जाधव..१०.४.२०२१

Tags: रेमडेसिवीर

आरोग्य विभागाची संघटनात्मक संरचना-मंत्रालय स्तर


आरोग्य विभागाची संघटनात्मक संरचना-राज्य स्तर 

रेमडिसीवीरचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश • रेमडिसीवीर तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांकडून उत्पादकांची बैठक

लाचखोर महिला पोलीस नाईक व लाचखोर पोलीस शिपाई या दोन लाचखोरांनी अटक न करण्यासाठी 3 हजार लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून या लाचखोरांनाच बेड्या घातल्या

 


आदरणीय महोदय 

*यशस्वी सापळा कारवाई*

▶ *घटक* - अमरावती 

▶ *तक्रारदार* - पुरूष, वय 33 वर्ष रा.नांदगाव खंडेश्वर जि.अमरावती. 

▶ *आलोसे* -

1.सुषमा रामेश्वरराव येवतकर, वय 32 वर्ष, पद - महिला पोलीस नाईक, ब. नं.1935 पो. स्टे. नांदगाव खंडेश्वर जि. अमरावती ग्रामीण

2.श्री. रवींद्र हरीनारायण बोन्द्रे, वय 35 वर्ष, पद - पोलीस शिपाई, ब. नं.940

पो. स्टे. नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती ग्रामीण 

▶ *लाच मागणी रक्कम* -4,000/- रूपये 

▶ *लाच स्वीकारली रक्कम* ताडजोडीअंती 3,000/- रूपये 

▶ *पडताळणी* -

 दि. 08/04/2021 व दि.09/04/2021

➡ *सापळा कारवाई* - 

दि. 09/04/2021,

▶ **घटना स्थळ* -

 पो. स्टे.नांदगाव खंडेश्वर 

▶ *कारण* - तक्रारदार यांचेविरुद्ध पो. स्टे. नांदगाव खंडेश्वर येथे भा. दं. वि. कलम 324 प्रमाणे गुन्हा नोंद असून सदर गुन्ह्याचा तपास आलोसे क्र.1 यांचे कडे असून सदर गुन्ह्यात तक्रारदार यांना अटक न करण्यासाठी अलोसे क्र 1 व आलोसे क्र 2 यांनी 4000/-रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 3,000/- रुपये लाच सापळा कारवाई दरम्यान अलोसे क्र 1 यांनी पंचासमक्ष स्वीकारल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले.. पुढील कारवाई सुरू आहे..

 *मार्गदर्शन* -

▶मा. श्री. विशाल गायकवाड, पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती. 

श्री.अरुण सावंत, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वी.अमरावती परिक्षेत्र, अमरावती.

श्री. गजानन पडघन, पोलीस उपअधीक्षक.ला.प्र.वी.अमरावती

▶️ *सापळा व तपास अधिकारी* - श्री.संतोष वि. इंगळे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वी.अमरावती.

▶ *कारवाई पथक* -

श्री.संतोष वि. इंगळे, पोलीस निरीक्षक, WHC माधुरी साबळे, NPC प्रमोद धानोरकर, NPC युवराज राठोड, चालक HC अकबर हुसेन 

▶ *आलोसे यांचे सक्षम अधिकारी* मा. पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण



*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा 

लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग अमरावती पोलीस उप अधीक्षक गजानन पडघन 

मो. नं.9923738100

*@दुरध्वनी क्रं - 0721-2552355, 2553055

*@टोल फ्रि क्रं 1064*

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वेबसाईट

----------------------------------------



✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com



टँकर मंजुरीचे अधिकार आता प्रांताधिकाऱ्यांना–पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील

 


कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईच्या निवारणासाठी टँकर मंजूर करण्याचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहेत अशी माहिती, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

पाणीटंचाईचे निवारण करण्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे टँकर्सची तरतूद करण्यात येते. या अनुषंगाने यंदाही टँकर्सची तरतूद करण्यात आलेली आहे. आजवर जिल्ह्यातील टँकरच्या मंजुरीचे अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांनाच होते. तथापि, सध्या कोविड-१९ म्हणजेच कोरोनाच्या प्रतिकारासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे जिल्हाधिकाऱ्यांवर कामाचा बोजा आलेला आहे.यातच ठिकठिकाणी स्थलांतर करणाऱ्या मजूर व नागरिकांसाठी निर्माण केलेल्या शिबिरांकरिता स्थानिक स्वराज्य संस्थेकडून पुरेसा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होऊ शकत नसल्यास टँकरद्वारे पिण्याच्या साधारण वापरासाठी पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या अनुषंगाने टँकर मंजुरीचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना असल्यास संबंधितांना पिण्याच्या पाण्याचा तातडीने पुरवठा करता येणार आहे.त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.


कोविडचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी कडक निर्बंध आवश्यक; सर्वांच्या सूचनांचाही विचार–मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 सर्व पक्षांनी एकमुखाने शासनाच्या निर्णयांना सहकार्य करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन


कोविडचे अनर्थचक्र थांबवायचे असेल आणि झपाट्याने वाढणारा संसर्ग थोपवायचा असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील, विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या सूचनांचाही निश्चितपणे विचार केला जाईल. मात्र सर्व पक्षांनी एकमुखाने याबाबतीत राज्य सरकार घेत असलेल्या निर्णयांना सहकार्य करावे व लोकांमध्ये जागृती निर्माण करावी. ही लढाई कोरोनाने आपल्यावर लादलेली असून लोकांच्या जीवाला पहिले प्राधान्य द्यावेच लागेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्यातील कोविड परिस्थिती आणि उपाययोजना यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी ऑनलाईन बैठकीत संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे-पाटील, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, अमित देशमुख, तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील आदींनी सहभाग घेऊन आपल्या सूचना मांडल्या.

प्रारंभी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी कोविड परिस्थिती आणि निर्माण झालेल्या आव्हानाला शासन कसे तोंड देत आहे त्याची माहिती दिली.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले, कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील. आपल्याला प्रथम जीव वाचविण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही जर आरोग्याची आणीबाणी असेल तर प्राधान्य हे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला असले पाहिजे.  विरोधी पक्षनेत्यांनी दिलेल्या सूचनांवर निश्चितपणे गांभीर्याने विचार  केला जाईल, त्यांनी चांगल्या सूचना मांडल्या आहेत. विशेषत: रेमडेसिव्हीर उपलब्धता, चाचण्यांचे रिपोर्ट लवकर मिळणे, प्रयोगशाळाना यासाठी सूचना देणे, ऑक्सिजन उपलब्ध व्हावा म्हणून काटेकोर नियोजन अशा त्यांच्या सूचनांवर शासन कार्यवाही करेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आपण सर्वसमावेषक नियोजन करू तसेच सर्व घटकांचा यात विचारही करू पण आता या क्षणी वेगाने वाढणारी रुग्णवाढ थांबवायची कशी हा प्रश्न आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये लोक घरी होते. त्यामुळे रुग्ण व रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे सोपे होते. आता जेव्हा की सर्व खुले झाले आहे तेव्हा यात व्यावहारिक अडचणी येतात ते केंद्राने समजून घ्यावे

हातावर पोट असणाऱ्या वर्गाची सगळ्यांनाच चिंता

मुख्यमंत्री म्हणाले, एकीकडे लसीकरण वाढविण्याची खूप गरज आहे. यूकेने दोन महिने आधीच कडक लॉकडाऊन केला पण त्या काळात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवून नागरिकांना संरक्षित केले. आज युवा पिढीला लस देण्याची गरज आहे. फायझर कंपनी तर १२ ते १५ वयोगटातील मुलांना लस देण्याचे नियोजन करतेय. कडक निर्बंध लावताना गरीब, श्रमिक, हातावर पोट असणाऱ्या वर्गाला त्रास होऊ नये ही सर्वांचीच  भूमिका आहे. त्यादृष्टीने जरुर विचार झाला पाहिजे आणि केला जाईल पण दररोज झपाट्याने वाढणारा संसर्ग आणि रुग्णवाढ काहीही करून प्रथम रोखणे अतिशय गरजेचे आहे.

सर्वानुमते एकमुखाने निर्णय घेऊन या संकटावर मात कशी करावी ते ठरविले पाहिजे. यासाठी लोकांमध्ये आपण सर्व पक्षांनी जागृती केली पाहिजे. रुग्णसंख्या इतक्या वेगाने वाढते आहे की, आज आपण लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला नाही तर उद्या आपोआपच लॉकडाऊनसारखी परिस्थिती उद्भवेल. कोरोना सर्वानांच टार्गेट करीत आहे. त्यात सगळे आले. हातावर पोट असलेला वर्ग सगळ्या विभागांत आणि क्षेत्रात आहे त्यामुळे विचार करायचा तर सगळ्यांचाच करावा लागतो. आज परिस्थिती बिकट बनत चालली आहे. टास्क फोर्सच्या तज्ञांचे म्हणणेदेखील आम्ही सातत्याने विचारात घेत आहोत. एका बाजूला जनभावना आहे पण दुसऱ्या बाजूला कोरोनाचा उद्रेक आहे , अशा परिस्थितीत ही लढाई जिंकायची असेल तर थोडी कळ तर काढावीच लागेल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मी गेल्या काही दिवसांपासून विविध क्षेत्रातील लोकांशी बोलतो आहे, काल मी खासगी रुग्णालयांच्या संचालकांशी पण बोललो. राज्य शासनाला सहकार्य करण्याची सगळ्यांची तयारी आहे. सर्व पक्षीय नेत्यांना माझे आवाहन आहे की राज्यातील जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन जो काही निर्णय घेतला जाईल त्याला आपले सहकार्य द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील यांनी आपल्या सूचना मांडल्या. रेमडेसिवीर उपलब्धता, ऑक्सिजन नियोजन, लॉकडाऊन लावण्यापूर्वी संतुलित भूमिका घेणे आदी विषय त्यांनी मांडले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबविण्यासाठी कडक पावले उचलावी लागतील तसेच या औषधाचा अतिरेकही थांबवावा लागेल.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रत्येक नगरपरिषद व पालिकेकडे लिक्विड ऑक्सिजन साठा टँक उभारण्यासाठी आवश्यक तो निधी देऊन तात्काळ कार्यवाही करावी असे सुचविले.

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ऑक्सिजन कमतरता वाढल्याने प्रश्न उद्भवले असून कडक निर्बंध लावून रुग्ण वाढ रोखावी असे सांगितले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, तसेच आमदार नाना पटोले, प्रधान सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास. डॉ तात्याराव लहाने यांनीदेखील विचार मांडले.

Tags: कडक निर्बंध

Popular posts लोकप्रिय पोस्ट