पोस्ट्स

2022 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

इमेज
  पंढरपूर, दि.१० :-  इस्कॉनच्या माध्यमातून संपूर्ण विश्वात भगवद्गीतेचा आणि धार्मिक मूल्यांचा प्रसार करण्याचे काम सुरू आहे. मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील  इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य केले जाते, असे प्रतिपादन  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पंढरपूर देवस्थान मंदिर परिसरातील भुवैकुंठ प्रकल्प आणि श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिराच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, उपमहानिरीक्षक सुधीर हिरेमठ, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, लोकनाथ स्वामी महाराज, श्रीकृष्ण चैतन्य स्वामी, सुंदर चैतन्य स्वामी, श्री.प्रल्हाद दास, भक्तीप्रेम स्वामी, कृष्णकांत दास आदि उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, विश्व बंधुत्व, ऐक्य, एकता, सहिष्णूता, शांती निर्माण करण्यासाठी भुवैकुंठ माध्यम ठरेल. इस्कॉनच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या अन्नछत्र व्यवस्थेचा भाविक मोठ्या प्रमाणात लाभ घेतात. १५ एकर जागेत भव्य दिव्य मंदिराची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये गुरुकुल शिक्षण पद्धती...

बातमीची दखल : ग्रामपंचायत कर्मचारी म्हैसाजी कदम ते १०% ग्रामपंचायत मधून सेवा ज्येष्ठतेनुसार "कंत्राटी ग्रामसेवक" तद्नंतर लाचखोर म्हणून सिद्ध झाल्याने सिईओ कडून बडतर्फी; लालचे पाई अशाप्रकारे कायमचे घरी बसावे लागले

इमेज
  लाच घेणे आणि देणे कायद्याने दंंडणीय अपराध आहे २७ डिसेंबर २०२१ रोजी नांदेड न्यूज अपडेट ने प्रसारित केलेल्या बातमीची दखल घेऊन निलंबना ऐवजी बडतर्फी ची कारवाई करण्यात आली. नांदेड,दि १३ जानेवारी : मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांचे आदेश क्र. जाक्र जिपना/आस्था-३/४१६६ दि.२९/११/२०१९ अन्वये श्री. म्हैसाजी आनंदराव कदम,कंत्राटी ग्रामसेवक,पंचायत समिती, नायगाव (खै.) ग्रामपंचायत घुंगराळा यांची १०% ग्रामपंचायत कर्मचा-यामधून सेवा जेष्ठतेनुसार कंत्राटी ग्रामसेवक या पदावर महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग मंत्रालय मुंबई, शासन निर्णय दि.०६ जून २००१ मधील नमूद अटी च्या अधिन राहून नेमणुक देण्यात आली होती. सदर शासन निर्णयातील जोडपत्र-अ. अनुक्रमांक (१६) नुसार नियुक्ती कालावधीमध्ये संबंधित कंत्राटी ग्रामसेवकांकडून गैरवर्तणुक झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची नेमणूक नियुक्त प्राधिका-याकडून रद्द करण्यात येईल अशी स्पष्ट तरतुद विहित आहे. पोलीस निरिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड यांचे पत्र क्र जाक्र एसीबी कार्यवाही/माहिती /प.स.नायगाव ३४६७/२०२१ लाप्रवि /नांदेड दिनांक ०४.१२.२०२९ ...

उरण : हनुमान कोळीवाडा पुनर्वसनासाठी जेएनपीटीचा चालढकलपणा ! ग्रामस्थ पुन्हा एकदा जेएनपीटीत समुद्रमार्गे येणारी जहाजे रोखण्याच्या पवित्र्यात

इमेज
  पोलीसांनी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी उरण,दि 13 जानेवारी 2021 :  गावाला लागलेल्या नैसर्गिक वाळवी, अपुरे पुनर्वसन, नागरी सुविधांचा बनवा, नोकरी व्यवसायासाठी होणारी पायपीट या सर्व न्यायहक्काच्या गोष्टी मिळविण्यासाठी गेली ३७ वर्ष हनुमान कोळीवाडयाच्या ग्रामस्थांनी केलेल्या संघर्षाला अखेर यश मिळून रायगड जिल्हाधिकारी यांच्या प्रयत्नाने जे.एन. पी. टी. कडून अखेर पुनाकरिता २५६ कुटुंबासाठी ७१० गुंठे आवश्यक असणारी जमीन ग्रामस्थांच्या ताब्यात देण्यात आली होती. दि. २८ नोव्हें २०२१ रोजी सर्व ग्रामस्थांनी या जागेवर श्रीफळ वाहून फटाक्यांच्या आतषबाजीत गगनभेदी घोषणा देत नामफलकाचे अनावरण केले होते. मात्र ध्यानीमनी नसताना शासनाचे अधिकारी आणि जेएनपीटीचे अधिका संगनमताने ग्रामस्थांचा छळ व धोका देण्याचे कटकारस्थान करून जागा देण्यासाठी टाळाटाळ केली असल्याने ग्रामस्थांच्या गगनभेदी घोषणा हवेतच विरल्याने हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून ग्रामस्थ पुन्हा एकदा आपल्या परिवारासह चॅनेल बंद आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत. जेएनपीटी बंदरच्या निर्मितीसाठी हनुमान कोळीवाडा हे गाव...

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकरचे सुडबुद्धीचे राजकारण, माझ्याविरुद्धची कारवाई एकाधिकारशाही प्रमाणे-तालुकाध्यक्ष भास्कर पाटील भिलवंडे

इमेज
  पवार साहेब व पक्षश्रेष्ठींवर माझा पुर्ण विश्वास; सुडबुद्धीच्या विचाराचे राजकारण हा आमचा पिंड नाही नायगाव,दि 12 जानेवारी 2021 : मी पक्षासाठी पूर्णवेळ काम करणारा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. माझा शरदचंद्रजी पवार साहेब व पक्षश्रेष्ठींवर पूर्ण विश्वास आहे. सूडबुद्धीच्या विचाराचे राजकारण करणे आमचा कौटुंबिक पिंड नाही मी जिल्हाध्यक्ष पद मागितले हाचं माझा गुन्हा....! यासाठीचं जिल्हाध्यक्षाचा माझ्या विरोधात चाललेला अट्टाहास आहे...असे मत नरसी येथे आयोजित पत्रकार परिषदेत भास्कर पाटील भिलवंडे यांनी मांडले. राष्ट्रवादीत अनेकजण आले आणि गेले पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक सेक्युलर पार्टी म्हणून राष्ट्रवादी चे सर्वे सर्वा शरदचंद्रजी पवार यांच्या विचाराशी जुळवून 2009 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम पक्ष श्रेष्ठी कडून कसलीही अपेक्षा नं करता निरपेक्ष काम करणारा कार्यकर्ता आहे.माझ्याबाबतीत पक्षाने काय आणि कसा निर्णय घेतला यांचा खुलासा माझ्या पर्यंत अजून पोहचला नाही. पण बातमीतील काही अपमानास्पद शब्द व वाक्य यामुळे मी पूर्णपणे दुखावलो आहे. यांचा खुलासा मी काही दिवसात पक्षश्रेष्ठींकडे देणारचं आ...

लाच प्रकरण : गायगोठ्याची वर्क ऑर्डर देण्यासाठी पंचायत समितीच्या लाचखोर कनिष्ठ लिपिकाने लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने मुसक्या आवळल्या

इमेज
  *==* *प्रेसनोट*. *==* *यशस्वी सापळा* ▶️ *युनिट -* जळगाव. ▶️ *तक्रारदार-* पुरुष,वय-54, रा.शेवगे पिंप्री ता.जामनेर जि.जळगाव. ▶️ *आलोसे-*   वसंत पंडीत बारी,वय-५३, व्यवसाय-नोकरी, कनिष्ठ लिपीक पंचायत समिती कार्यालय,जामनेर. रा.शेंदुर्णी ता.जामनेर जि.जळगाव.                                                                                              ▶️ *लाचेची मागणी-* 3,000/-रू. ▶️ *लाच स्विकारली-* 3,000/-रू. ▶️ *हस्तगत रक्कम-* 3,000/-रू. ▶️ *लाचेची मागणी -* दि.11/01/2022  ▶️ *लाच स्विकारली-* दि.13/01/2022 ▶️ *लाचेचे कारण -*.   तक्रारदार यांचे गाईचा गोठा शेडचे बांधणीचे प्रकरण मंजुर झालेले असुन सदर शेडच्या बांधणीचे काम सुरु करण्यासाठी लागणारी वर्क ऑर्डर मिळवुन देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे आलोसे यांनी पंचासमक्ष ३,०००/-र...

लाच प्रकरण : लाचखोर तलाठी समाधान काळे २५ हजार रुपये लाच मागितले वरुन एसीबीने मुसक्या आवळल्या

इमेज
  अक्कलकोट,दि १२ जानेवारी : शेतातील रस्ता वहिवाटी साठी खुला करून देण्यासाठी अर्जावर सुनावणी होऊन निकाल तुमच्या बाजूने लावून देतो म्हणून वीस हजाराची लाच मागितली त्यामुळे तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी अटक केले. समाधान बाळासाहेब काळे, वय ३३, वर्ष व्यवसाय नोकरी, पद तलाठी सज्जा खानापूर, तहसिल अक्कलकोट, रा समर्थ नगर, अक्कलकोट जि. सोलापूर असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या मौजे अंकलगे येथील शेतजमिनी मधुन जाणे येण्याकरीता तसेच शेतमालाची ने आण करण्याकरीता वहीवाटी रस्ता खुला करुन मिळणेबाबत तहसिलदार कोर्ट, अक्कलकोट येथे सादर केलेल्या अर्जावर • सुनावणी होवुन तक्रारदार यांच्याबाजुने निकाल लावुन सदर निकालाची प्रत देण्याकरीता यातील आलोरो समाधान काळे तलाठी सज्जा खानापुर, तहसिल अक्कलकोट यांनी २५,००० रुपयांची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता २० हजार रुपयांची मागणी केली, हे सिद्ध झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तलाठी काळे बुधवारी ताब्यात घेतले त्याच्या विरोधात अक्कलकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई संजीव पाटील, पोल...

नायगाव गटशिक्षणाधिकारी पदी विराजमान अशोक पवळे एक उपक्रमशील शिक्षक-डि.टी जाधव सर

इमेज
    नायगाव,दि ११ जानेवारी : एक स्वच्छ प्रतिमा असलेले व्यक्तिमत्व, निस्वार्थी, निगर्वी, निधर्मी, निष्कलंक, निपुण, निर्णयक्षम, असलेले अनेक मोठ मोठ्या पदावर काम केली. परंतु कोणालाही मी उच्चपदस्थ आहे असे वाटू न देता सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे अन्याय व भ्रष्टाचार या विरुद्ध आवाज उठवणारे क्रियाशील पवळे सर ज्या पदावर काम करतात त्या पदाला न्याय देण्याचे काम आज पर्यंत त्यांनी त्यांच्या सेवा कालावधीत केले आहे. गटशिक्षणाधिकारी हे पद काटेरी मुकुट असून या पदावर काम करत असताना हे पद जिकीरीचे आहे सगळीकडे बजबजपुरी ने उच्छाद मांडला आहे. यावर मात करून यशस्वी वाटचाल करण्याची जबाबदारी सरांनी स्वीकारली आहे. पवळे सरांनी 28 नोव्हेंबर 1985 रोजी ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रात मंगनाळी तालुका कंधार येथून पदार्पण केले आहे. शाळा हेच मंदिर विद्यार्थी हे माझी देवता येईल आकार या चिमुकल्या मनाला, अध्यापनात जीव ही ओतावा  असा दृष्टिकोन ठेवून मुलांमध्ये असलेल्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी अनेक उपक्रम सरांनी सेवा कालावधीत राबविले यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन यांना सन 2009- 10 ला जिल्हास्तरीय गुरू...

आबाबाबा ! ११ लाख लाचेची मागणी ? साडेपाच लाख स्विकारताना महालाचखोर उपजिल्हाधिकारी प्रसेनजीत प्रधानसह लाचखोर सरपंचाच्या एसीबीने मुसक्या आवळल्या

इमेज
  कोल्हापूर,दि ०९ जानेवारी : क्रशर विरोधातील तक्रार अर्ज निकालात काढण्यासाठी सरपंचाकरवी साडेपाच लाखांची लाच घेताना राधानगरी प्रांताधिकारी प्रसेनजित बबनराव प्रधान (रा. न्यू पॅलेसनजीक, कोल्हापूर. मूळ गाव- बीड) याच्यासह फराळे गावचा सरपंच संदीप जयवंत डवर या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून अटक केली. अकरा लाखाची लाचेची मागणी होती. कोल्हापुरात कसबा बावडा रोडवरील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत कागल-राधानगरी प्रांत कार्यालयात रविवारी सुटी दिवशी दुपारी केली. राधानगरी प्रांताधिकारी व फराळे (ता. राधानगरी) गावचे सरपंच लाचप्रकरणी गजाआड झाल्याने जिल्ह्यात खळबळ माजली. राधानगरी तालुक्यातील फराळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीत लिंगाचीवाडी येथे तक्रारदाराचे सिलीका वाळू वाशींग प्लॉंट क्रशर आहे. क्रशरच्या वाहतुकीमुळे रस्ते खराब होत आहेत, घरांना तडे गेलेत असे कारण पुढे करुन राधानगरी प्रात प्रसेनजीत प्रधान व फराळे गावचे सरपंच संदीप डवर यांनी प्लॉटला भेट दिली. तो प्लॉंट बंद करावा अशी नोटीस सरपंच डवर यांनी बजावली. सरपंचांच्या नोटिसी संदर्भातून राधानगरी प्रांताधिकारी प्रधान यांनी संबंधित प्लॉट...

नियुक्ती : नायगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदाचे सूत्र ए.जी. पवळे यांनी स्वीकारले

इमेज
  नायगाव,दि ११ जानेवारी २०२१ : नायगाव पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी पदाचा पदभार शिक्षण विस्तार अधिकारी ए.जी.पवळे यांच्या कडे सुदपूर्द करण्यात आला आसून या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. पूर्वीच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्रीमती लता कोठेकर, शि.वि.अ.नायगाव यांच्याकडे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नायगांव ता. नायगांव या पदाचा अतिरिक्त पदभार होता.तो कमी करून संवितरणासह श्रीमती लता कौठेकर यांच्याकडे असलेला गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नायगांव या पदाचा पदभार कमी करून पवळे अशोक गंगाधर शि.वि.अ. यांच्याकडे अहरण व संवितरणासह सोपविण्यात आला आहे. दि.१० जानेवारी रोजी पवळे यांनी पदभार स्वीकारला असून त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे---‌कलावंत ,मृदंगाचे बोल जाणणारे, पेटीवादक, गाणे ,भजन ,गवळणी, पद यांचा अभ्यास असणारे आणि विद्यार्थ्यांप्रती प्रचंड तळमळ,कळवळा असणारे एकमेव शिक्षक अशोक पवळे सरांचे नाव प्रत्येकाच्या ओठावर आजही गावा गावांमध्ये आणि परिसरामध्ये आदराने घेतले जाते.  अनेक गावचे लाडके गुरुजी म्हणून आजही पवळे सरांना नागरिक ओळखातात. साक्षरता अभियान जोरात चालू होतं,त...

सर्वसामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्याचे काम पत्रकारच करतात-पोलीस निरिक्षक अभिषेक शिंदे

इमेज
  नायगाव,दि ०९ जानेवारी २०२१ : समाजातील वाईट प्रवृतीचा समूळ नायनाट करण्यासाठी पत्रकारांनी निर्भीडपणे लिखाण करावे,अन्यायाच्या विरोधात सर्वसामान्य जनतेचा आवाज हे पत्रकारच बुलंद करतात.पत्रकार वृत्तपत्राविना समाजाची कल्पनाच करवत नाही, चौथा स्तंभ नसेल तर समाजात अराजकता माजेल.प्रशासनावर अंकुश ठेवण्याचे काम हे पत्रकार करत असतात. लोकांच्या अडी अडचणी मांडण्याचे कार्य पत्रकारांनी सदैव करावे,मी राज्य शासनाच्या सेवेतील पाईक या नात्याने मी जोपर्यंत नायगाव पोलीस स्टेशन येथे आहे तोपर्यंत सदैव पत्रकारांच्या सोबत आहे.पत्रकारीता करत असताना समाजकंटकांकडून कुठलीही  धमकी, समस्या आल्यास पत्रकारांनी निसंकोचपणे मला अर्ध्यारात्री फोन करावा,मी सदैव पत्रकारांच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन नायगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी केले. ते नायगाव पोलीस ठाण्याच्यावतीने दर्पणदिनानिमित्त तालुक्यातील पत्रकार बाधंवाच्या आयोजीत करण्यात आलेल्या सत्कारा प्रसंगी बोलत होते.पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या वतीने तालुक्यातील उपस्थित सर्व पत्रकारांचा पेन डायरी व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार सन्मान करण्यात...

"दर्पण दिनी" नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनेे विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना पुरस्कार जाहीर

इमेज
  भालेराव,मिरेवाड,डाँ चव्हाण,डाँ जाधव दाम्पत्य,दत्तू पाटील,पत्रकार शेख वहाब ,पत्रकार विकास भुरे,मालेवाड यांचा समावेश नायगाव,दि ०९ जानेवारी : "सन्मान भूमीपुत्राच्या कर्तृत्वाचा" या सामाजिक सत्कार्याच्या जाणीवेने विविध क्षेञात कृतिशील योगदान देत कर्मभुमीचा लौकिक तेजोमय करणाऱ्या ऊर्जादायी व्यक्तींना गौरविण्याची यशस्वी परंपरा जोपासत "दर्पण दिनी" नायगांव तालुका मराठी पञकार संघाच्या वतिने विविध क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या गुणिजनांना पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. माजी आमदार लोकनेते कै.बळवंतरावजी चव्हाण यांच्या स्मृति प्रित्यर्थ कलाभूषण समाजरत्न पुरस्कार ! चित्रपट अभिनेता उत्कृष्ट कलावन्त.रामेश्वर भालेराव (ज्यु.जाँनी लिव्हर) नायगांव यांना तर,यमुनाई विचार प्रतिष्ठान नायगाव,च्या वतीने कै.यमुनाबाई पवार होटाळकर यांच्या स्मृति प्रित्यर्थ साहित्य शिरोमणी पुरस्कार साहित्योपध्याय वीरभद्र मिरेवाड, नायगांव यांना जाहीर... स्वांतञ्यसैनिक कै.किशनराव पाटील कल्याण यांच्या स्मृति प्रित्यर्थ आदर्श धन्वंतरी व उत्कृष्ट आरोग्यसेवा पुरस्कार शहरी विभागडाँ.विश्वास चव्हाण (नायगांव) याना स्वामी...

बातमीची दखल : नांदेड जिल्ह्यात शालेय व्यवस्थापन समित्या पुनर्गठित करण्याला सुरुवात ! शिक्षणाधिकारी (प्रा) यांनी तात्काळ काढले आदेश ; परंत जिल्हाधिकाऱ्याच्या निर्णयामुळे निवडी लांबणीवर ?

इमेज
  नायगाव,दि.०६ डिसेंबर २०२१ :  "शाळा व्यवस्थापन समिती (SMC) व पालक शिक्षक संघ (PTA) यांना शाळा सुरू होईपर्यंत दिलेली मुदतवाढ संपुष्टात आणून नव्याने समित्या  स्थापन कराव्यात" या मथळ्याखाली २३ डिसेंबर २०२१ रोजी व "धर्माबाद तालुक्यात शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन होऊ शकते तर नायगावसह इतर तालुक्यांना काय अडचण आहे? ते कुणाच्या आदेशाची वाट पाहत बसले आहेत? गटशिक्षण अधिका-यांमध्ये त्यांच्या स्तरावर आदेश काढण्याची हिम्मत नाही का? की अधिकार नाहीत" या मथळ्याखाली ३० डिसेंबर २०२१ रोजी नांदेडन्यूजअपडेटब्लॉग च्या माध्यमातून लगातार दोन बातम्या घेतल्या होत्या.याची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्रा) यांनी काल दिनांक ०५ जानेवारी रोजी "शालेय व्यवस्थापन समिती व पालक शिक्षक संघ बाबत" नांदेड जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी यांचे नावे आदेश काढले आहेत. सविस्तर माहिती अशी की,कोरोनामुळे शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडी रखडल्या होत्या.०४ जून २०२० च्या शासन निर्णयानुसार खालील अटिंवर शाळा सुरू होईपर्यंत शालेय व्यवस्थापन समित्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. शाळा व्यवस...

जाणून घ्या २०२१ मध्ये एसीबीच्या जाळ्यात महाराष्ट्रातील कोणत्या विभागाचे किती लाचखोर अधिकारी, कर्मचारी अडकले ते ! खातेनिहाय, संवर्गनिहाय, परिक्षेत्रनिहाय लाचखोरांची माहिती

इमेज
मुंबई,दि.०२ जानेवारी २०२१ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हा महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा विभाग आहे.भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक कारभार हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ध्येय आहे.    शासन नागरिकांना अनेक सेवा पुरवित असते.कोणत्याही शासकीय कामाकरीता शासकीय लोकसेवकांनी लाचेची मागणी केली तर नागरिकांनी ला.प्र.वि. शी संपर्क साधावा असे आवाहन विभागामार्फत करण्यात येत असते.लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सदैव अशा नागरिकांच्या बाजुने ठामपणे उभे राहतो आणि लाचखोरांविरूद्ध कारवाई करतो.भ्रष्टाचार मुक्त समाज राज्याला प्रगती, समृद्धी आणि सुशासनाच्या युगामध्ये घेऊन जाणार आहे.हे केवळ नागरिकांच्या सक्रिय सहभागाने व सहकार्यानेच शक्य होऊ शकते.    समाजाला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी व विकासाला गती देण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सहकार्य करा. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग प्रत्येक ठिकाणी नागरिकांच्या मदतीसाठी सज्ज आहे. महाराष्ट्रातील शासकीय अधिकारी,कर्मचारी यांच्या विरोधात नागरिकांनी दिलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाद्वारे मागिल दहा वर्षांत सापळा, अपसंपदा, अन्य भ्रष...

PM Kisan Scheme : पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

इमेज
  PM मोदींनी PM-KISAN योजनेअंतर्गत 10 वा हप्ता जारी केला दिल्ली,दि.01 जानेवारी 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शेतकरी बाधवांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी किसान सन्मान योजनेचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत.  नवीन वर्षाच्या सुरुवातीला मोदी सरकारच्या वतीनं देशातील शेतकऱ्यांना गिफ्ट मिळालं आहे.पंतप्रधान कार्यालयाने 29 डिसेंबर रोजी एक निवेदन जारी करुन सांगितलं होतं की, 1 जानेवारी 2022 रोजी दुपारी 12.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदीं पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता हस्तांतरित करण्याची घोषणा करतील. त्यानुसार आज पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत दहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे.   देशभरातील 10 कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 20 हजार कोटी रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे. किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. दर चार महिन्यांनी दोन हजारांचा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. त्यातील 1 जानेवारी 2022 ते 3...