🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

मंगळवार, डिसेंबर ३१, २०२४

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री सुधीर खोडवे यांचे उत्कृष्ट कार्या बदल पोलीस अधीक्षक नांदेड यांनी बक्षीस देवुन केला सन्मान...

 

By संजय चिखले मरवाळीकर

नांदेड,दि.३० डिसेंबर: अनैतीक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथे नेमणुकीस असलेले श्री सुधीर भालचंद्र खोडवे यांनी दिनांक 10 डिसेंबर, 2024 रोजी सायंकाळी 07.30 वा. चे सुमारास नांदेड उत्तरचे आमदार श्री बालाजीराव कल्याणकर यांच्या घराजवळील स्टेट बँकेसमोर उभ्या असलेल्या कारने पेट घेतला असता बघ्याची गर्दी जमली असता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री सुधीर भालचंद्र खोडवे, हे तिथुन जात असतांना त्यांनी जमलेली गर्दी पाहुन सदर ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी चारचाकी वाहन क्रमांक एमएच-20/ईई-7982 ही जळत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी कोणीही मदतीला जात नव्हते अशावेळी त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखुन समोर असलेल्या बेकरी य आजुबाजूला असलेल्या घरातुन बकेटमध्ये पाणी घेतले आणि आगीवर नियंत्रण मिळविले. विशेष म्हणजे आग बघणारे अनेक जण होते कांही तर मोबाईलमध्ये शुटींग करीत होते परंतु कोणीही ही आग विझविण्याकरीता धावुन आले नाही. आगीमुळे निर्माण होणारा पुढील अनर्थ टळला आहे. त्यांनी या पुर्वी सुध्दा उत्तम कामगीरी केली आहे.


त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगीरीमुळे त्यांनी केलेले हे कार्य निश्चितच प्रशंसनीय असून पोलीस दलाचे नावलौकीक वाढवणारे आहे. त्यामुळे श्री अबिनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी बक्षीस व प्रशस्तीपत्र देवुन सन्मान केला आहे.


श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, श्री सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, डॉ. अश्विीनी जगताप, गृह पोलीस अधीक्षक नांदेड, यांनी त्यांचे उत्कृष्ट कामगीरी बदल कौतुक केले आहे.

(श्री सुधीर भालचंद्र खोडवे हे पुर्वी नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे कार्यरत होते.)


शुक्रवार, डिसेंबर २७, २०२४

वृत्त क्र.1232 - स्वामित्व योजने अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतमध्ये आज सनद वाटप

प्रधानमंत्री आभासी पद्धतीने लाभार्थ्याशी संवाद साधतील 

 राज्याच्या स्वामित्व योजनेला देशभरात मान्यता


By संजय चिखले मरवाळीकर

नांदेड दि. 26 डिसेंबर : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागाच्या स्वामित्व योजनेला देशभरात मान्यता मिळाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील 50 लाखाहून अधिक घरमालकांना मालमत्ता कार्डचे या योजने अंतर्गत वितरण करण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत उद्या दिनांक 27 डिसेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतींना सनद वाटप होणार आहे. 

लाभार्थ्यांना माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, आमदार तुषार राठोड ,अन्य लोकप्रतिनिधींच्या व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सनद वाटप करण्यात येईल. तसेच देशभरातील लाभार्थ्यांशी यावेळी प्रधानमंत्री संवाद साधतील. 

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सकाळी 11 वाजता स्वामित्व योजने अंतर्गत सनद वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. 

विभागात विशेष शिबिर घेवून सनद वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, महसूल, भूमीअभिलेख व अन्य विभागातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

प्रधानमंत्री यांच्या हस्ते स्वामीत्व हक्क योजनेअंतर्गत 50 लाखाहून अधिक घरमालकांना मालमत्ता कार्डचे , सनदचे ई वितरण होणार आहे .तसेच या योजनेतील काही लाभार्थ्यांची प्रधानमंत्री थोडक्यात संवाद साधतील. 

स्वामित्व योजनेचे फायदे  

अत्याधुनिक ड्रोनच्या सहाय्याने गावाठाणातील मिळकतीचे अचूक मोजमाप, नकाशा आणि मालमत्ता पत्रक तयार करणे सोपे व सुलभ झाले आहे, सिमा निश्चिती आणि मोजमापाची कामे आता अधिक प्रभावीपणे आणि वेळेत पूर्ण होतील,मालमत्तेची कायदेशीर मालकी आणि सुरक्षिततेची हमी,कर्ज मिळण्याची सुलभ सुविधा, जमीनीशी संबंधित मतभेदाचे त्वरित निराकरण,मालमत्तेचे विभाजन अधिक सुलभ, गावांच्या आर्थिक प्रगतीला नवी दिशा व चालना मिळणार आहे. त्यातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

00000




 

मंगळवार, डिसेंबर २४, २०२४

संघटन पर्व: भाजपा राष्ट्रीय सदस्यता अभियान - २०२४ अनुषंगाने भाजपा नांदेड दक्षिण ची जिल्हा कार्यशाळा संपन्न

By संजय चिखले मरवाळीकर

नांदेड,दि.२३ डिसेंबर: विष्णुपुरी, नांदेड येथील शैक्षणिक प्रतिष्ठान सहयोग कॅम्पस या ठिकाणी सोमवार, दिनांक २३ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२:०० वाजताच्या दरम्यान भारतीय जनता पार्टी नांदेड दक्षिण जिल्हा च्या वतीने सदस्यता नोंदणी अभियानाचे जिल्हा संयोजक डॉ.माधवराव पाटील उच्चेकर यांच्या विनंतीवरून जिल्हाध्यक्ष मा.डॉ.संतुकराव हंबर्डे यांचे अध्यक्षतेखाली संघटन पर्व: भाजपा राष्ट्रीय सदस्यता नोंदणी अभियान - २०२४ अंतर्गत जिल्हा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा कार्यशाळेला सुरुवात करण्या आधी दीपप्रज्वलन करून भारत माता, डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भारत माता की जय च्या जयघोषाने पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

मार्गदर्शक म्हणून विभाग संघटनमंत्री मा.संजयजी कौडगे होते, तसेच या कार्यशाळेस मा.खासदार,मा.आमदार,प्रदेश पदाधिकारी व प्रदेश कार्यकारिणी सदस्य,प्रदेश मोर्चा पदाधिकारी,जिल्हा पदाधिकारी,जिल्हा मोर्चा अध्यक्ष,आघाडी, प्रकोष्ठ, सेल जिल्हा संयोजक,मंडळ अध्यक्ष व सरचिटणीस,माजी जि. प. सदस्य,सोशल मिडिया संयोजक,सदस्यता अभियान जिल्हा समिती,विस्तारक या अपेक्षितांची उपस्थिती अनिवार्य होती.या कार्यशाळेच्या माध्यमातून भाजपा सदस्य नोंदणी अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या.

या प्रसंगी मंचावर जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे मराठवाडा विभागीय संघटनमंत्री संजयजी कौडगे, प्रदेश सचिव देविदासजी राठोड, भाजपा ज्येष्ठ केरबाजी सावकार बिडवई, जिल्हासरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड, डॉ. माधव पाटील उच्चेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सतीश अण्णा गोड, यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे सर्व मोर्चा व प्रकोष्ठचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रामुख्याने व मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टी नांदेड दक्षिण जिल्हा संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियान अंतर्गत जिल्हा कार्यशाळेचे आयोजन आज शैक्षणिक...

Santuk Hambarde यांनी वर पोस्ट केले सोमवार, २३ डिसेंबर, २०२४

सोमवार, डिसेंबर १६, २०२४

शासन मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींबाबत नक्कीच सकारात्मक निर्णय घेईल-डॉ हनुमंत भोपाळे

 

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींची सहविचार सभा
संजय चिखले पाटील मरवाळीकर

नायगाव बा.(जि:नांदेड), दि.१४ डिसें २०२४- काय गोड तर काम गोड असते. कामाला सुस्वभावाची जोड असेल आणि आपल्याकडे कौशल्य अन् क्षमता असेल तर नक्कीच भवितव्य आहे, त्यामुळे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेमध्ये काम करत असलेल्या युवकांनी सकारात्मक राहून प्रशिक्षणकार्य पूर्ण करावे. नक्कीच शासन प्रशिक्षणार्थींना न्याय देईल असा आशावाद मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण संघटनेचे संस्थापक प्रोफेसर डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण राज्य संघटनेच्या वतीने नायगाव तालुक्यातील गंगणबीड येथील महादेव मंदिराच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सहविचार सभेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

महाराष्ट्रातील शैक्षणिक पात्रताधारक युवक आणि युवतींना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारकडून प्रशिक्षण घेण्याची संधी देण्यात आली आहे. बारावी पास, पदविका आणि पदवी पदव्युत्तर विद्यार्थ्यांना अनुक्रमे सहा, आठ आणि दहा हजार रूपयांचे विद्यावेतन देण्याचे निश्चित केले, पण विद्यावेतन वेळेवर मिळत नाही. तसेच हे विद्यावेतन तुटपुंजे असल्याने प्रशिक्षणार्थींना हेळसांड होत आहे. नियमानुसार काम आणि वेळेवर द्यावे. ही प्रशिक्षणार्थींची मागणी न्याय्य असून सरकारने या मागणीचा सकारात्मक विचार करून ती मागणी पूर्ण करावी. सहा महिन्यानंतर आम्हाला काय भवितव्य आहे, या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. भोपाळे म्हणाले की, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी आमचे लाडके भाऊ जिथे काम करत आहेत तिथेच कायम (पर्मनंट) होतील, असे आश्वासन दिले आहे. हे आश्वासन ते नक्कीच पूर्ण करतील.

9 जुलै 2024 च्या जीआरमध्ये या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग, आस्थापना यांना योग्य वाटल्यास व उमेदवारांची इच्छूकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील. शासनाने तसा निर्णय घेण्यासंबंधी आस्थापना यांना आदेशित करून आस्थापना पगार देणार नसेल तर शासनाने त्यांचा पगार देण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती त्यांनी शासनाला केली. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील
लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणींच्या संदर्भात सकारात्मक आहेत त्यामुळे युवकांनी निराश होऊ नये. लवकर मिनी मंत्रालय समजल्या जाणा-या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत,महायुतीने विधानसभेवर झेंडा फडकवला आणि त्यांना महाराष्ट्रातील मिनी मंत्रालयावरदेखील त्यांना झेंडा फडकावयाचा आहे. त्यामुळे ते नक्कीच लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणांना नाराज करणार नाहीत आणि म्हणून शासन नक्कीच सकारात्मक निर्णय घेईल अशी आशा वाटते असे प्रतिपादन प्रोफेसर हनुमंत भोपाळे यांनी केले.
या प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रारंभी मंदिर परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले

यावेळी भोपाळे यांनी युवकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची सकारात्मक उत्तरे दिली.या सहविचार सभेला गंगाधर बालाजी शिंदे, वाघमारे हनुमंत मधुकर ,जाधव इंद्रजीत गोविंदराव, कांबळे राजेश शिवाजी, नरसीकर आकाश नंदकिशोर, पवार संतोष शंकर, दासरवाड गंगाधर शिवाजी, लुटके लक्ष्मण पंढरी, मंगेश बालाजीराव आनेमवाड, मिटके साईनाथ सुरेश,कोमल विठ्ठल शिंदे, भगवान संभाजी पांचाळ ,शिवप्रसाद आनंदराव मिर्झापुरे, सुरज कोंडीबा गलांडे, सचिन अनुरथ शेळके, भारती राजाबुवा शंकर, चिखले अवधूत शिवाजी, मुतखेडे विनोद शिवाजी, परडे राहुल बालाजी ,लव्हाळे नारायण उत्तमराव ,होळकर गजानन साहेबराव, कदम कृष्णा रावसाहेब, पांडे शिवराज दादाराव, जुने विठ्ठल रावसाहेब, वाघमारे केशवराव साहेब सूर्यवंशी कल्याण योगेश्वर संभाजीराव भोगे निखिल विश्वनाथ ,जगदीश गंगाधर भिलवंडे , कैलास गोविंदराव पांचाळ ,जगदीश बालाजी नरहरे, श्यामसुंदर लिंगुराम कर्वेडकर , गोरगे मनमत नागोराव, गजले जगदीश व्यंकटराव, बसवेश्वर शिवाजी महाजन, नरेश शंकराव अरगुलवार, शैलेश संभाजी स्वामी, अनिरुद्ध साहेबराव भदर्गे ,बोरगे शिवाजी गुलाबराव, मुर्के साहेबराव प्रभाकर, दासरवाड हनुमंत गंगाधर, बालाजी साहेबराव दुरे, प्रसाद उत्तमराव पांडे, सचिन बालाजी पगलवाड, सरस्वती लक्ष्मण गजलेकर, सुनील बालाजीराव हांडे, माधव देविदास खांडरे, धीरज गोविंद शिंदे, साबळे परमेश्वर रावसाहेब, कैलास दगडू शिरसे , रहमान सत्तार बिरबल, मोईन हैदराबाद शेख, दशरथ रंगराव पवार , योगेश्वर वसंतराव भालेराव , नितीन पिराजीराव महादळे, शिरसे अनिकेत आईनाथ, कदम अरुणा संतोष, जाधव राजेश्वर अशोक, कपिल रामराव गोंशेट्वाड, बारदेसंगम रमेशराव संतोष, भिवाजी तेलंग साईप्रसाद गंगाधरराव जळपतवार ,गणेश प्रभू पुरी, हैदर रहमान शेख, अनिता संतोष तेलंग, रोडे सुप्रिया राजाराम, पवार वैष्णवी माधवराव, सोनूताई धनराज कदम, मंगेश विलासराव देशमुख, अमित शिवकुमार भांगे, पिराजी पांडुरंग श्रीमलवार, श्रीकांत बाबना बहनवाड, तिरुपती व्यंकटराव डोईफोडे, मारुती संभाजी चेरकेवाड,मानसिंग संतोषसिंह तोर, प्रेमुलवाड शिवकुमार माधवराव, चक्रधर मुरलीधर पुयड, जयराम नामदेव गाडेकर, सचिन राजाराम दासरवाड, उंबरे रोहित सोपानराव, शिवदास हरिदास कुराडे, ज्ञानेश्वर गंगाधर तोडे, संतोष सुधीर भिसे, साईनाथ चंद्रकांत जिंके, विजयकुमार नारायण अमृतवार, जयश्री विलास वाघमारे, श्रीनिवास नागनाथ करपे, रमेश अर्जुन कांबळे, यशवंत कांबळे, प्रदीप शिवराम राठोड, पांडुरंग बाबाराव राठोड, ज्ञानेश्वर नागोराव देगावे, गजानन केशव सूर्यवंशी, जाधव हनुमंत गोविंदराव, कापसे व्यंकट आनंदराव, गायकवाड प्रसाद चांदू, हेमलवाड गंगाप्रसाद, सय्यद जबार पीरसाब, जोंधळे प्रदीप अशोकराव, साईनाथ गंगाधर चंदनकर, परमेश्वर साहेबराव कांबळे, संदीप मारुती मस्के आदींची उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर घंटेवाड, बालाजी मंडलापुरे, परमेश्वर कांबळे, ज्ञानेश्वर तोडे, प्रसाद पांडे, प्रदीप जोंधळे आदींनी परिश्रम घेतले.

गुरुवार, डिसेंबर १२, २०२४

रब्बी हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर

 

प्रधानमंत्री फसल बीमा योजना

संजय चिखले

मुंबई, दि.१२ : राज्य शासनामार्फत रब्बी हंगामामध्ये देखील शेतकऱ्यांना एक रूपयात पीक विमा योजना लागू केली आहे. तरी शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घेऊन आपल्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा पिकाचा विमा उतरवावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२४ आहे.

राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना २०१६-१७ पासून राबविण्यात येत आहे. खरीप हंगाम २०२३ पासून महाराष्ट्र शासनामार्फत एक रूपयात पीक विमा योजना लागू केली आहे. याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे. चालू रब्बी हंगाम २०२४-२५ मध्ये योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारच्या पीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in या संकेतस्थळास भेट द्या.

महाराष्ट्रात रब्बी हंगामातील गहू, हरभरा तसेच रब्बी कांदा पिकासाठी भाग घेण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२४ आहे. तर उन्हाळी भात व उन्हाळी भुईमुग या पिकांसाठी ही मुदत ३१ मार्च २०२५ पर्यंत आहे. गतवर्षी रब्बी हंगाम २०२३-२४ मध्ये विमा योजनेत साधारणता ७१ लाख विमा अर्ज प्राप्त झाले होते.

स्त्रोत: महासंवाद

Popular posts लोकप्रिय पोस्ट