📢📢📢 औरंगाबाद उच्च न्यायालय वार्ता 📢📢📢
- कोर्टात शपथ पत्र सादर न केल्याने CEO NANDED यांना 5000₹ चा दंड..
- जिल्हा अंतर्गत बदली धोरणाची कोर्टात सुनावणी
औरंगाबाद/नांदेड : आज दि.23/07/2021 रोजी जिल्हा अंतर्गत बदली धोरण शासन आदेश ग्राम विकास विभाग दि.07/04/2021 तसेच जिल्हा परिषद नांदेड यांनी घोषित केलेली (दि.28/04/2021रोजीची यादी) अवघड क्षेत्र यादी यासंदर्भातील आपले प्रकरण रिट याचिका बोर्डावर होते. सुनावणी दरम्यान कोर्टाला
मा.सुविध कुलकर्णी (वकील औरंगाबाद) यांनी कोर्टाला गेल्या तीन तारखांपासून ज़िल्हा परिषद यांचे वकील तारिक पुढे ढकलत आहेत व शपथ पत्र देखील दाखल करत नाही. त्यामुळे मा उच्च न्यायालय यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना रु 5,000/- दंड ठोठावला व पुढील तारखेस शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले.
पुढील सुनावणी 3 आठवडे नंतर ठेवली आहे.
नांदेड जि.प.येथे अवघड क्षेत्राची यादी घोषित करत असताना निकषपात्र शाळा अवघड क्षेत्राच्या यादीतुन वगळण्यात आल्या वारंवार निवेदने व विनंती करूनही यादीत सुधारणा न केल्यामुळे किनवट-माहूर तालुक्यातील शिक्षकांनी कोर्टात याचिका दाखल केली होती.
ॲड सुविध कुलकर्णी
औरंगाबाद.
रमेश बनकर व इतर
जि.प.नांदेड (याचिकाकर्ते)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा