🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

शनिवार, एप्रिल २४, २०२१

कोरोना निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर 'प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना' पुन्हा सुरू

 मे आणि जून महिन्यात मिळणार मोफत ५ किलो अतिरिक्त धान्य,राज्यातील ७ कोटी लाभार्थ्यांना होणार लाभ


मुंबई, दि 24 एप्रिल : महाराष्ट्रात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता आणि कोरोनाला अटकाव करण्यासाठी राज्य सरकारने केलेले कडक निर्बंध लक्षात घेता सर्वसामान्य जनतेसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजना पुन्हा राबवण्यास केंद्र शासनाने परवानगी दिली आहे. यासंदर्भातील मागणी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री पियुष गोयल आणि खासदार शरद पवार यांना पत्र लिहून केली होती.

आज या संदर्भात केंद्र सरकारने मे आणि जून महिन्यांसाठी मोफत 5 किलो धान्य देणार असल्याची घोषणा केली असल्याने राज्यातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्राद्वारे मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भावाला अटकाव घालण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आल्यामुळे गरीब आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी महाराष्ट्राला प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची पुन्हा एकदा गरज असल्याने ती सुरू करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात खासदार शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना देखील केंद्र सरकारशी चर्चा करण्याची विनंती केली होती. श्री.पवार यांनी देखील या पत्राचा तातडीने विचार करत केंद्र सरकारशी चर्चा केली आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत महाराष्ट्रासाठी सध्या 1 लाख 40 हजार मेट्रिक टन तांदळाची तर 2 लाख 40 हजार मेट्रिक टन गव्हाची गरज असून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी असलेल्या 7 कोटी लाभार्थ्यांपर्यंत आपण हे धान्य पोहोचवू शकतो असे श्री.भुजबळ यांनी प्रधानमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते. आज केंद्र सरकारने घोषित केल्याप्रमाणे देशात 80 कोटी नागरिकांना मे आणि जून महिन्यांमध्ये 5 किलो अतिरिक्त धान्य मोफत दिले जाणार आहे. अन्न, सुरक्षा योजनेच्या राज्यातील सुमारे 7 कोटी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. अंत्योदय योजनेतील लाभार्थी तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी गटातील लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या मोफत धान्याचा लाभ मिळणार आहे.

कोरोना काळात जारी कराव्या लागलेल्या कठोर निर्बंधांमुळे अनेक नागरिकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो. यामुळे समाजातील गरीब घटकाला मदत मिळावी म्हणून केंद्र सरकारने गरीब कल्याण अन्न योजना पुन्हा सुरु करावी अशी भुजबळांनी मागणी केली होती. आज ती मागणी मान्य झाल्यामुळे भुजबळांनी केंद्र सरकार आणि या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे खासदार शरद पवार यांचे आभार मानले आहेत.


Tags: #प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना

✍✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com


राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील कोवीड हॉस्पिटलमध्ये घडत असलेल्या आगिच्या व ऑक्सिजन गळतिच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन जिल्ह्यातील सर्व दवाखाण्याचे फायर ऑडिट करण्याचे आदेश देणार का?

 जिल्ह्यातील सर्व रुग्णालयाचे फायर, ऑक्सिजन ऑडिट करण्याची आवश्यकता


नांदेड, दि 23 एप्रिल : कोरोना काळात कोवीड हॉस्पिटलमध्ये आगिच्या आणि ऑक्सीजन गळतीच्या घटना घडत आहेत,निष्पाप लोकांचे संसार उद्धवस्त होत आहेत, वेळेवर फायर, ऑक्सिजन ऑडिट होत नाही त्यामुळे दवाखान्यात आग लागणे व ऑक्सिजन गळतिच्या वारंवार घटना घडण्याचे प्रकार समोर येत आहेत, यातून शहानपणा घेऊन जिल्हा यंत्रणेने नांदेड जिल्ह्यातील सर्व सरकारी,खाजगी कोवीड सेंटर व ईतर दवाखान्याच्या फायर, ऑक्सिजन ऑडिटचे आदेश देणार का?, देणार तर कधी?,का अशाच एखाद्या घटनेची वाट पहात आहेत असा प्रश्न सामान्य माणसाला पडल्याशिवाय राहणार नाही.

नाशिक आणि विरार येथील रुग्णालयांमध्ये झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा यंत्रणेने जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडीट करतानाच ऑक्सिजन ऑडीट करण्याची गरज निर्माण झाली आहे.नुसते आढावे घेऊन भागणार नाही,'पुढच्यास ठेस मागचा शहाणा' या उक्तीप्रमाणे अशीच एखाद्या अघटीत घटनेची वाट न बघता वेळच्या वेळी कोवीडसह ईतर दवाखाण्याचे फायर ऑडिट तसेच ऑक्सिजन चे ऑडिट करणे महत्वाचे आहे.

रुग्णांना ऑक्सिजन

सर्व रुग्णालयांचे तातडीने फायर ऑडीट करतानाच आगीच्या घटनांची पुनरावृत्ती  टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना  हाती घेण्याचे देखील आवश्यकता आहे.त्यामध्ये रुग्णाला शास्त्रशुद्ध पद्धतीने ऑक्सिजन दिला जात आहे का, तो वाया जावू नये याचे पालन होत आहे याबाबींची तपासणी करावी आणि रुग्णालयांमधील ऑक्सिजनच्या नलिका, साठवणूक यंत्रणा याठिकाणी ऑक्सिजन गळती होत नाहीये ना तो वाया जात नाहीये याची पाहणी करण्याच्या सूचना देणे गरजेचे आहे.

ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर

जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर घेण्यात यावे जेणेकरून सिलेंडर आणि लिक्विड ऑक्सिजनवरील अवलंबत्व कमी करता येईल,त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी पीएसए तंत्रज्ञानावर आधारित ऑक्सिजन प्लांट उभारणे आवश्यक आहे.

✍✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Popular posts लोकप्रिय पोस्ट