🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

मंगळवार, ऑक्टोबर २६, २०२१

राजधानीत ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ साजरा

 


नवी दिल्ली,दि २८ ऑक्टोबर २०२१ : महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात आज ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ साजरा करण्यात आला. या निमित्त ‘भ्रष्टाचारविरूध्द लढा देण्याची….’ प्रतिज्ञा घेण्यात आली.

राज्यात दरवर्षी ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ आयोज‍ित करण्यात येतो. यावर्षी 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2021 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी ‘स्वतंत्र भारत @७५ : सचोटीतून आत्मनिर्भरतेकडे’ ही संकल्पना घेऊन केला जाणार आहे.

याअंतर्गत कोपरनिकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात अपर मुख्य सचिव तथा निवासी आयुक्त श्याम लाल गोयल यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचा-यांना ‘भ्रष्टाचारविरूध्द लढा देण्याची…… ’ प्रतिज्ञा दिली. याप्रसंगी सचिव व आयुक्त (गुंतवणुक व राजशिष्टाचार), अपर निवासी आयुक्त निरूपमा डांगे आणि सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपावार यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र परिचय केंद्रात दक्षता जनजागृती सप्ताह साजरा

महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ साजरा करण्यात आला. जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक(अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी  उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना ‘भ्रष्टाचारविरूध्द लढा देण्याची……’ प्रतिज्ञा दिली. यावेळी माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.

Tags: 

Vigilance Awareness Week 2021 : लाप्रवि नागपूर परिक्षेत्रीय कार्यालय येथे दक्षता जनजागृती सप्ताह निमित्त "भ्रष्टाचार निर्मुलन शपथ" कार्यक्रम संपन्न

 


नागपूर,दि २६ ऑक्टोबर २०२१ : दरवर्षी दक्षता जनजागृती आयोजन करण्यात येते यावर्षी दिनांक २६ ऑक्टोबर ते ०१ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत जनजागृती सप्ताह साजरा करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. त्यानिमीत्त लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर परिक्षेत्रातील सर्व घटकातर्गत "स्वतंत्र भारत @ ७५ सचोटीतून आत्मनिर्भरतेकडे" या संकल्पनेने राज्यात कोविड १९ चा प्रादुर्भाव असल्याने शासनाव्दारे निश्चित केलेल्या कोविड नियमांचे पालन करून विविध कार्यक्रम पार पाडण्यात येणार आहेत.

शासनाचे निर्देशानुसार सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालयामध्ये "भ्रष्टाचार निर्मुलन शपथ" घेवून दक्षता जनजागृती सप्ताहानी सुरवात करण्यात येते. त्यानुसार आज दिनांक २६/१०/२०२९ रोजी सकाळी ११.०० वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर परिक्षेत्रीय कार्यालय नागपूर येथे तसेच लाप्रविच्या सर्व घटक कार्यालयात शपथ घेवून दक्षता जनजागृती सप्ताहाची सुरवात करण्यात आली.

त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर परिक्षेत्रीय कार्यालय व वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गोदिया व गडचिरोली या घटक कार्यालयामार्फत शहरी व ग्रामीण परिसरात सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालये, प्रशासकीय परिसर इत्यादी ठिकाणी भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत पोस्टर्स / पॅनर्स तसे कार्यक्रम घेवून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. तसेच सर्व प्रसारमाध्यमांद्वारे समाज माध्यमांद्वारे भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. भ्रष्टाचार निर्मुलन करण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात "लाच घेणे अथवा लाच देणे गुन्हा आहे" असे नमुद करून त्यावर प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाचा पत्ता, फोन नंबर नमुद असलेले फलक/ पोस्टर्स लावण्याबाबत सर्व घटक कार्यालयांना आवश्यक सुचना देण्यात आलेल्या आहेत. भ्रष्टाचार निर्मुलनाच्या कामात तसेच दक्षता जनजागृती सप्ताहामध्ये स्थानिक नागरिकांचा सहभाग होण्याकरीता तसेच नागरिकांमध्ये जनजागृती होण्यकरीता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असुन भ्रष्टाचारा संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणा-या लोकसेवाविरुध्द(अधिकारी / कर्मचारी) काही तक्रार असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर परिक्षेत्रीय कार्यालय येथे श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक, श्री मिलींद तोतरे, अपर पोलीस अधीक्षक यांचे उपस्थितीत शपथ कार्यक्रम घेण्यात आला असुन त्याकरीता कार्यालयातील सर्व अधिकारी व अमलदार उपस्थित होते.

कार्यालयाचा पत्ता : पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो कार्यालय, नागपूर नागपूर दुसरा माळा, प्रशासकीय इमारत क. १,सिव्हील लाईन्स, नागपूर

दुरध्वनी क्रमांक ०७१२२५६१५२०

टोल फ्री क्रमांक १०६४


संबंधित बातम्या 

‘स्वतंत्र भारत @ 75 : सचोटीतून आत्मनिर्भरतेकडे’ ! भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे आयोजन

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ – परिवहनमंत्री तथा महामंडळ अध्यक्षाची घोषणा

 


मुंबई, दि. 25 ऑक्टोबर 2021 : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ करण्यात आली असून दिवाळीची भेट म्हणून अधिकाऱ्यांना 5 हजार रूपये तर कर्मचाऱ्यांना 2500 रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाच्या अध्यक्षांनी केली.

निर्णयाचा लाभ एसटी महामंडळाच्या सुमारे ९३ हजारांहून अधिक कर्मचारी-अधिकाऱ्यांना होणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला होणार पगार यंदा नोव्हेंबरच्या 1 तारखेला म्हणजे दिवाळीपूर्वी होणार आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होण्यासाठी सकारात्मक सहकार्याबद्दल मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री श्री.अजित पवार यांचे परिवहन मंत्र्यांनी आभार मानले.

महागाई भत्त्यात वाढ करावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या कर्मचाऱ्यांना 12 टक्के महागाई भत्ता मिळत आहे, त्यात आणखी 5 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 17 टक्के होणार असल्याचे परिवहन मंत्री तथा महामंडळ अध्यक्षांनी यावेळी सांगितले.

Popular posts लोकप्रिय पोस्ट