बेजबाबदार असलेल्या व्यक्तींची न्यायाधिश सारख्या अतिशय महत्त्वाच्या पदावर नेमणूक होतेच कशी???
संपादक संजय चिखले मुंबई,दि २९/०७/२०२४ :- "कनिष्ठ न्यायालयांचे अनेक न्यायाधीश महत्त्वाच्या गुन्ह्यांमध्ये जामीन न देता सुरक्षित भूमिका घेण्याला प्राधान्य देतात. मात्र अशा खटल्यांमध्ये जामीन अर्जावर विचार करताना सामान्य व्यवहारी ज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे." असे आवाहन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी रविवारी बंगळूर येथे "तुलनात्मक समानता आणि भेदभाव" या विषयावर बर्कले केंद्रीत ११ व्या वार्षिक परिषदेत न्या. चंद्रचूड यांनी मुख्य भाषण करताना आपली मते मांडली. ते म्हणाले की, "जेथे कनिष्ठ न्यायालयांमध्ये जामीन मिळायला हवा, तेथे तो नाकारला जातो. त्यामुळे त्यांना उच्च न्यायालयात जावे लागते. ज्यांना उच्च न्यायालयात जामीन मिळायला हवा होता, तेथे न मिळाल्याने त्यांना सर्वोच्च न्यायालयात जावे लागते. " या विलंबामुळे त्यांना मनमानी पणे अटक होते आणि समस्या वाढतात, याकडे न्या. चंद्रचूड यांनी लक्ष वेधले असलेल्याची दैनिक लोकसत्ता मध्ये दिनांक २९.०७.२०२४ रोजीची बातमी नुकतीच माझ्या वाचण्यात आली." सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश चंद्रचूड यांना सामान्य ज्ञा...