नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी नागेश पाटील कल्याण यांच्या निवडीचा सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन प्रदीप पाटील कल्याण यांच्यासह बालाजी बोरवेलचे मालक राजीव पाटील व मुद्रांक विक्रते यशवंतराव पाटील यांच्या संयुक्तविद्यमाने सत्कार सोहळ्याचे आयोजन
नायगाव,दि २६ ऑगस्ट २०२१ : तालुका मराठी पत्रकार संघाच्या निवडीचा पदाधिकारी पत्रकार बांधवांचे नायगावच्या सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन प्रदीप पाटील कल्याण यांच्यासह बालाजी बोरवेलचे मालक राजीव पाटील व मुद्रांक विक्रते यशवंतराव पाटील यांच्या संयुक्तविद्यमाने नूतन नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या निवडीचा भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून संघटनेत पत्रकारितेच्या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडणारे व समाजसेवेचे काम करणाऱ्या भारतीय राज्यघटनेच्या चौथा स्तंभ असलेल्या सर्व पत्रकार बांधवाच्या सत्कार सोहळ्याचे नायगाव येथील सेवा सहकारी सोसायटीच्या पटांगणात आयोजन करण्यात आले आहे. तालुका मराठी पत्रकार संघाची निवड नुकतीच नायगाव येथील मिलिनियंम इंग्लिश स्कुल चे सभागृहात नायागांव तालुका मराठी पत्रकार संघांचे जेष्ठ पत्रकार विद्यमान बाळासाहेब पांडे, माजी अध्यक्ष माधव मामा कोकुर्ले, दैनिक सामनाचे तालुका प्रतिनिधी भूषणजी पारळकर साहेब, राजीव कुलकर्णी,एस.एम. मुदखेडकर साहेब, दैनिक गाववालाचे नायगाव तालुका प्रतिनिधी माधव चव्हाण, दैनिक प्रजावाणीचे पत्रकार विकास भुरे साहेब यांच्या नेत्रत्वाखाली ...