कोण म्हणतं या जगात देवदूत नसतो?, याचा साक्षात प्रत्यय वांगणी रेल्वे स्थानकात पाहायला मिळाला आहे
Mumbai Train Incident Video सेंट्रल रेल्वेमधील एक अंगावर काटे आणणारा हिडिओ समोर आला आहे. यात पॉईटमनने अवघ्या 7 सेकंदामध्ये एका चिमुकल्याचा जीव वाचवला
 |
| Railway Point Man Rescue A Boy |
- ही घटना वांगणी स्टेशनवरील सीसी टीव्हीत कैद झाली
- मुंबईचा एक रेल्वे कर्मचारी या छोट्या मुलाला देवदूत बनून आला
- रेल्वेचा हा पॉईंट मॅन ख-या जगातील सुपर हिरो ठरला
वांगणी(मुंबई),दि 17 एप्रिल : कोण म्हणतं या जगात देवदूत नसतो?, याचा साक्षात प्रत्यय वांगणी रेल्वे स्थानकात पाहायला मिळाला आहे.येथे एक लहान मुलगा आईच्या हातातून सुटून थेट रेल्वे ट्रॅकवर पडला आणि समोरुन भरधाव वेगाने गाडी येत होती. ही आई जीवाच्या आकांताने मुलाला वाचवण्यासाठी ओरडत होती. तेव्हा रेल्वेचा एक पॉईंटमन देवदितासारखा धावून आला आणि आपल्या जीवाची पर्वा न करता या चिमुकल्याचे प्राण वाचवलले.
नेमकं काय घडलं?
एक आंधळी आई 17 एप्रिलला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास आपल्या मुलाला घेवून प्लॅटफॉर्मवरुन जात होती. तेवढ्यात तो मुलगा आईच्या हातातून सुटून ट्रॅकवर पडला. त्या माऊलीला हे कळालं की आपला मुलगा ट्रॅकवर पडलाय, पण काहीही दिसत नसल्याने तिला कळेना काय करावं, तेवढ्यात तिला ट्रेनचा आवाज आला. तेव्हा ही आई जीवाच्या आकांताने आपल्या मुलाला वाचविण्यासाठी आरडाओरड करु लागली. याचवेळी विरुद्ध बाजुच्या प्लॅटफॉर्मवर असलेल्या वागंणी स्टेशनवरील पॉईंटमन मयुर शेळके यांनी सर्व प्रकार पाहिला आणि प्रसंगावधान राकत त्याने थेट ट्रॅकवर उडी घेतली.
भरधान येणाऱ्या मेलसमोर धावत त्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता त्या मुलाचे प्राण वाचविले. मयुर शेळके या पॉईंटमनच्या धाडसामुळे ट्रॅकवर पडलेल्या छोट्या मुलाचे प्राण वाचले आहेत. मयुर यांच्या धाडसाचा हा सर्व प्रकार तिथल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
पाहा हा थरारक व्हिडीओ –
असं म्हणतात की देव तारी त्याला कोण मारी. असेच काहीसे मुंबईच्या वांगणी रेल्वे स्टेशनवरील एका छोट्या मुलासोबत घडले आहे. अनेकदा असे घडते की कोणीतरी देवदूत पणून मदतीला धावून येते. मुंबईचा एक रेल्वे कर्मचारी असाच या छोट्या मुलासाठी देवदूत बनून आला आणि त्याने प्राण वाचवले. तो जर धावत आला नसता तर आज काही वेगळेच चित्र असते.ही घटना वांगणी स्टेशनवरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. आई आपल्या मुलाला घेऊन प्लॅटफॉर्मवरून चालत जात असते. यावेळी मुलाचा हात सुटतो आणि तो रेल्वे रुळावर पडतो. समोरून पाहतो तर काय भरधाव वेगाने -एक्सप्रेस येत असते. हे सर्व रेल्वेच्या पॉईंट्समनला दिसले.
त्याचक्षणी तो वा-याच्या वेगाने तिथे धावत येतो आणि मुलाला वर प्लॅटफॉर्मवर ठेवतो आणि स्वतः ही लगेच वर चढतो. असे करत असतान यात त्याचा स्वत:चाही जीव गेला असता. मात्र त्याने असा कोणताही विचार केला नाही. त्यावेळी त्याच्यासाठी त्या मुलाचा जीव वाचणे सर्वात महत्त्वाचे होते.
अनेक सिनेमांमध्ये आपण सुपरहिरो बघतो. जो स्वत:च्या जीवाची पर्वा न करता लोकांचे जीव वाचवतो. रेल्वेचा हा पॉईट्समन खऱ्या जगातील सुपरहिरो ठरला. मयुर शेळले असे या पॉईट्समनचे नाव आहे. त्यांच्या या शौर्याबद्दल रेल्वेनेही ट्वीट करून त्यांचे कौतुक केले आहे.
✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा