🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

मंगळवार, मे १८, २०२१

लाच प्रकरण : महा लाचखोर सहायक पोलीस उपनिरीक्षक(ASI) पेट्रोल खर्चासाठी फक्त 1500 रुपये लाच स्वीकारताना चतुर्भुज ! एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून ताब्यात घेतले ; हि कारवाई नांदेडच्या टिमने केली आहे

 

Respected sir/madam 

* TRAP CASE 

➡युनिट :- नांदेड  

➡तक्रारदार :- पुरुष वय 30वर्ष 

➡आरोपी लोकसेवक :- 1)श्री संभा बळीराम कदम, वय 55 वर्ष व्यवसाय नोकरी सहायक पोलिस उप निरीक्षक (ASI) पोलिस स्टेशन उमरी जि. नांदेड रा. सांगवी नांदेड

➡ तक्रार प्राप्त :- दिनांक 14/05/2021

➡ लाचमामागणी पडताळणी दिनांक :- 15/05/2021   

 ➡ सापळा कार्यवाही दिनांक :- 18/05/2021   

➡ लाच मागणी रक्कम:- 1,500/- रुपये  

➡ कारण:-

            यातील आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांना त्यांची चुलत पुतणी हिने तिचे पती विरुध्द पोलिस स्टेशन उमरी येथे दिलेल्या तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी पेट्रोल खर्च म्हणुन 1500/- रु. लाचेची मागणी करून ती स्वतः स्वीकारली.

➡️मार्गदर्शक:- मा. श्रीमती कल्पना बारवकर,पोलीस अधीक्षक ला.प्र.वि.नांदेड परिक्षेत्र नांदेड 

मा. श्रीमती अर्चना पाटील,अप्पर पोलीस अधिक्षक ला. प्र.वि. नांदेड परिक्षेत्र नांदेड    

➡️ SO:- श्री विजय डोंगरे पोलीस उपअधिक्षक ला.प्र.वि.नांदेड   

  ➡️TLO:- श्री शेषराव नितनवरे ,पोलीस निरीक्षक  

ACB नांदेड, टीम पोना हणमंत बोरकर, किशन चिंतोरे, अमरजितसिँह चौधरी, मारोती सोनटक्के, शेख मुजीब


नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना ला.प्र.विभागाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की, आपणास कोणी सरकारी नोकर अथवा खासगी इसम सरकारी कामाकरीता लाच मागितली तर अँटी करपशन ब्युरो नांदेड येथे संपर्क साधावा.

मोबाईल नं. श्रीमती कल्पना बारवकर,पोलीस अधीक्षक ला.प्र.वि.नांदेड - 8888841965

श्री विजय डोंगरे पोलीस उपअधिक्षक ला.प्र.वि.नांदेड - +918975769918

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा टोल फ्री क्रमांक-1064

👇 लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची वेबसाईट/संकेतस्थळ

www.acbmaharashtra.gov.in

✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com


कृषी विभागाकडून मरवाळी येथे सोयाबीन उगवणशक्ती प्रात्यक्षिक,जमीन सुपीकता निर्देशांक फलकाचे अनावरण व खत व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन

 


By संजय ब्रम्हानंद पाटील चिखले

नायगाव-मरवाळी,दि 17 मे 2021 : आज रोजी नायगाव तालुक्यातील मौजे मरवाळी येथे संजय पाटील चिखले यांच्या प्रमुख उपस्थितीत जमीन सुपीकता निर्देशांक फलकाचे अनावरण करण्यात आले,त्यानंतर सोयाबीन उगवणशक्ती प्रात्यक्षिक,खत व्यवस्थापन,सरी-वरंबा पद्धतीवर सोयाबीनची लागवड करण्याबाबत माहिती सांगण्यात आली व शेतकरी निवड करण्यात आली.


कृषी सहायक मनुरकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना असे सांगितले की,सोयाबीन पेरणा-या शेतकऱ्यांनी तसेच ज्या शेतकऱ्यांनी पेरणीसाठी आपल्या घरचे बियाणे ठेवले आहे,कृषी सेवा केंद्रातून बियाणे खरेदी करणार आहेत किंवा गावात उपलब्ध असलेल्या सोयाबीन बियाण्याची खरेदी करणार आहेत त्या सर्वांनी सोयाबीन पेरणी करण्या अगोदर बियाण्याची उगवण शक्ती तपासाणी करणे अत्यंत आवश्यक आहे,त्यानुसारच बियाणे पेरणीसाठी वापरावे, शेतकऱ्यांनी आपला उत्पादन खर्च कसा कमी करता येईल याचा विचार करून खरीप 2021 पूर्वी पेरणीचे नियोजन करावे,जमिनिच्या सुपिकतेनुसार खताची मात्रा कशी द्यायची याचे सखोल मार्गदर्शन कृषी सहायक मनुरकर यांच्या कडून मरवाळी येथे करण्यात आले.
सोयाबीन उगवणशक्ती प्रात्यक्षिक करून दाखवतानाचा व्हिडिओ


सोयाबीन हे सरळ वाण व स्वपरागीत पीक असल्याने बियाणे दरवर्षी बदलण्याची आवश्यकता नाही,मात्र पेरणीपूर्वी उगवण चाचणी घेणे आवश्यक आहे. यासाठी सोयाबीनच्या प्रत्येक पोत्यातून प्रातिनिधिक नमुना काढून त्यातील काडीकचरा काढून टाकून नमुना एकत्र करावा,सुती पोते घेऊन ते चांगले भिजवून घ्यावे ते ओले पोते जमिनीवर अंतरावे व काढलेल्या प्रातिनिधिक नमून्यातून सरसकट 100 दाणे दिड ते दोन सेमी च्या अंतरावर 10 दाण्याच्या 10 रांगा ओल्या पोत्याच्या अर्ध्या भागावर ओळीत ठेवावे नंतर शिल्लक अर्धे पोते त्या ठेवलेल्या बियाण्यावर झाकून घ्यावे,बियाण्यासकट पोत्याच्या दोन दोन घड्या पडाव्यात त्या नतर त्या घडी केलेल्या पोत्याला उजव्या व डाव्या बाजूने थोडे गुंडाळून ते सुतळीने बांधून घेऊन घरात खिडिच्या ठिकाणी किंवा सावलीला जेथे पुरेसा सुर्यप्रकाश मिळेल असे सावलीला ठेवावे,एक दिवस आड त्या पोत्यावर व्यवस्थित पाणी शिंपडावे नंतर दोन दिवसांनी ते पोते उघडून उगवण क्षमता तपासावी,कोंब आलेले दाणे वेगळे करून मोजून घ्यावे. सरासरी काढून 100 दाण्यांपैकी 70 किंवा जास्त दाण्याची उगवण झाली असल्यास ते बियाणे पेरणीस योग्य आहे असे समजावे व एकरी 30 किलो या प्रमाणात बियाणे वापरावे जर उगवणशक्ती 70 टक्केपेक्षा कमी आले तर प्रत्येक एक टक्का मागे अर्धा किलो बियाणे जास्तीचे वापरावी.जर उगवण क्षमता 60 % पेक्षा कमी आल्यास त्याचा पेरण्यासाठी वापर करु नये,अश्या प्रकारे घरच्या घरी सोयाबीन उगवण क्षमता तपासून सोयाबीन बियाणे उगवण क्षमतेचा अंदाज येतो.हि चाचणी पेरणीच्या एक-दोन आठवडे अगोदर करावी असे प्रात्यक्षिक करून दाखवत असताना कृषी सहायक मनुरकर यांनी सांगितले.
सोयाबीन उगवणशक्ती प्रात्यक्षिक,खत व्यवस्थापन,सरी-वरंबा पद्धतीवर सोयाबीनची लागवड करण्याबाबत माहिती देतानाचा ऑडिओ



जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सरी-वरंबा पद्धतीवर सोयाबीनची लागवड करावी असेही यावेळी त्यांनी सांगितले.उपस्थितांपैकी काही जनांनी आपल्या शंका मांडल्या, त्यांच्या शंकांचे निरसन ही यावेळी करण्यात आले,यावेळी कृषी सहायक मनुरकर, कृषी मित्र डुमणे,वसंत गुरुजी चिखले,गुरुनाथ पिंपळे,गोविंद तळणे,पप्पू पवळे,राम अण्णा सिंगवाड, विश्वनाथअप्पा स्वामी,दादाराव पाटील पवळे,पंप ऑपरेटर बालाजी मुदखेडे,नारायण मुदखेडे, हणमंत तंबवाड,नामदे वाघमारे,नामदेव गुरुजी लोहकरे, बालाजी लोहकरे आदी शेतकरी, शेतकरी पुत्र उपस्थित होते.

त्या नंतर कोपरा या गावी सोयाबीन उगवणशक्ती प्रात्यक्षिक,जमीन सुपीकता निर्देशांकानुसार खत व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले

मरवाळी येथे घेण्यात आलेल्या सोयाबीन उगवणशक्ती प्रात्यक्षिक प्रयोगात 73% उगवण



Popular posts लोकप्रिय पोस्ट