🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

शनिवार, फेब्रुवारी १३, २०२१

भविष्यातील जगाच्या गरजा लक्षात घेऊन रोबोट सारखे नाविन्यपूर्ण प्रशिक्षण केंद्र महत्वाचे -पालकमंत्री अशोक चव्हाण


 उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत 

औद्योगिक यंत्र मानव प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन 

नांदेड,(दि.13 फेब्रुवारी) :- भविष्यातील जगाच्या गरजा या पूर्णत: अभियांत्रिकी क्षेत्राशी निगडीत होत चालल्या आहेत. या क्षेत्रातील संशोधन व माणसांच्या कल्पनांनुसार ज्या गरजा दृष्टिपथात आहेत त्याचे आविष्कार व प्रात्याक्षिक शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना आत्तापासूनच अभियांत्रिकी संस्थांमधून देणे गरजेचे आहे. श्री गुरुगोविंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेच्या यांत्रिकी विभागातील औद्योगिक यंत्र मानव प्रशिक्षण केंद्र हे यादृष्टिने मोठे योगदान देईल असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या केंद्राची माहिती घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांना हे केंद्र नवीन दिशा देईल असा विश्वास व्यक्त केला. 

श्री गुरुगोविंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेच्या यांत्रिकी विभागातील औद्योगिक यंत्र मानव प्रशिक्षण केंद्राचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. याचबरोबर आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार श्यामसुंदर शिंदे, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने, तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ, श्री गुरुगोविंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेचे संचालक डॉ. यशवंत जोशी, सहसंचालक प्रा. महेश शिवणकर आदी उपस्थित होते.




✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा.चिखले
7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा


डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रसादने मागितले बक्षिस लाचलुचपत विभागाने पंचांना ठेवले साक्षिस


 *सापळा अहवाल* 


▶️ युनिट- औरंगाबाद

▶️ तक्रारदार- पुरुष, वय-46 वर्ष


▶️ आरोपी  लोकसेवक:- श्री.प्रसाद दुर्गादास कुलकर्णी, वय 32 वर्षे, पद- कनिष्ठ सहायक  मुद्रणालय,डॉ. बाबासाहेब  आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद ,    

 

▶️ लाचेची मागणी- 1,000/- 

       रूपये

▶️ लाच स्वीकारली -1000/- रुपये


▶️ लाचेची मागणी व स्वीकृती

      दिनांक 13.02.2021 रोजी      

                                 

▶️  कारण -  तक्रारदार  हे वार्षिक  दैनंदिनी चे पुरवठादार असून तक्रारदार यांचे वार्षिक दैनंदिनी 2021 चे बिल लेखाविभाग येथे जमा करून दिल्याचे, बक्षिस म्हणून   तक्रारदार यांचेकडे 1000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती पंच साक्षीदारा समक्ष 1000/- रुपये लाच एपीआय कॉर्नर औरंगाबाद स्वतः स्वीकारली.


▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.


 ▶️ सापळा अधिकारी, श्रीमती रेशमा सौदागर, पोलीस निरीक्षक ,ला.प्र.वि.औरंगाबाद.


▶️मार्गदर्शक-मा. डॉ राहुल खाडे पोलीस अधीक्षक  

मा.डाॅ. अनिता जमादार मॅडम.अपर पोलीस अधीक्षक,

मा.ब्रम्हदेव गावडे, पोलीस उप अधीक्षक, 

➡️सापळा पथक,  पो.ना .रवींद्र  आंबेकर , पो .ना.बाळासाहेब राठोड पो. अ. कपिल गाडेकर पो.अं. चांगदेव बागुल , ला. प्र. वि. औरंगाबाद.


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा.चिखले

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com


राज्यपालांनी अखेर भेट दिलीच : मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीला


मुंबई, दि. १२ : मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी येथे भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नतीने निवड झालेल्या देशभरातील अधिकाऱ्यांच्या १२२ व्या आरंभिक प्रशिक्षण शिबिराचा समारोप राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी राज्यपालांनी अधिकाऱ्यांना संबोधित केले तसेच प्रमाणपत्रे प्रदान केली.

प्रशिक्षण शिबिरात १४ राज्यांमधून ५९ प्रशासकीय अधिकारी सहभागी झाले होते. अकादमीचे संचालक संजीव चोपडा, प्रशिक्षण शिबीर समन्वयक विद्या भूषण, यावेळी उपस्थित होते.


Governor addresses IAS officers at Lal Bahadur Shastri Administration Academy at Mussoorie

Mumbai, Date 4 : Governor Bhagat Singh Koshyari presided over the Valedictory function of the 122nd Induction Training Programme of IAS officers at the Lal Bahadur Shastri National Academy of Administration (LBSNAA) in Mussoorie. The Governor addressed the officers and presented certificates.

Fifty nine officers promoted to the IAS from 14 States participated in the training programme. Director of LBSNAA Sanjeev Chopra, Course Coordinator Vidya Bhushan, were prominent among those present.
 

राष्ट्रीय प्रशासन अकादमी

✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा.चिखले

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com


फौजदार चांदणे हर्सूल कारागृहात रवाना : रात्रपाळीची ड्युटी न बदलण्यासाठी महिनेवारी लाच मागणे पडले महागात

निवृतीला उरले होते अवघे काही दिवस


 औरंगाबाद,(दि. ११ फेब्रुवारी) : रात्रपाळीची ड्युटी न बदलण्यासाठी दोन हवालदारांना दरमहा 6 रुपयांची लाच मागणा-या शहर पोलीस मुख्यालयातील लाचखोर फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ( Anti Corruption Bureau)शुक्रवारी (दि. 11) अटक केली. न्यायालयाने त्याची रवानगी हर्सुल कारागृहात केली आहे

राजकुमार उत्तमराव चांदणे (57) अटक केलेल्या आरोपी फौजदाराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार दोन्ही हवालदार हे पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. तर राखीव पोलीस उपनिरीक्षक म्हणून आरोपी चांदणे तेथे कार्यरत आहे. आरोपीने त्यांच्या ड्युटी रात्रपाळीवरुन दिवस पाळी अशी केली. तक्रारदार यांना रात्रपाळीची ड्युटी हवी असल्यामुळे त्यांनी आरोपी चांदणे यांच्याकडे विनंती केली असता त्याने मनासारखे काम हवे असेल तर प्रत्येकी तीन हजार यानुसार दोघांचे 6 हजार दर महिन्याला द्यावे लागतील, असे सांगितले. यामुळे त्या दोन्ही हवालदारांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आरोपी चांदणेची तक्रार केली.

8 डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधकचे उप अधीक्षक रुपचंद वाघमारे आणि कर्मचाऱ्यानी लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता आरोपीने लाच मागितल्याचे सिध्द झाले. एसीबीकडे आपली तक्रार झाल्याचा संशय आरोपी चांदणेला आल्याने त्याने लाचेची रक्कम घेतली नाही. दरम्यान तो रजेवर गेला होता. लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे शुक्रवारी याप्रकरणी आरोपीविरुध्द बेगमपुरा ठाण्यात गुन्हा दाखल केला. या नंतर एसीबीच्या पोलिसांनी शुक्रवारी दुपारी उपनिरीक्षक चांदणे याला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चांदणे ची रवानगी हर्सुल कारागृहात केली.

निवृतीला उरले होते अवघे काही दिवस

आरोपी फौजदार चांदणे हा सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर होता. त्याने वयाची 57 वर्ष काही महिने ओलांडली होती. राखीव निरीक्षक यांची बदली झाल्यामुळे चांदणेकडे पोलीस निरीक्षकपदाचा पदभार होता. यातच त्याने कर्मचाऱ्यांकडुन वसूली सुरू केल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान एसीबीला तक्रार प्राप्त झाल्यामुळे चांदणे आज पकडला गेला आहे.


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा.चिखले

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com


लोकसेवक राहुल कोळी, परि.पोउपनि यांनी तक्रारदार यांचेकडे रु 30,000/- लाच स्विकारताना रंगेहात पकडले


 आदरणीय सर

*यशस्वी सापळा*

▶️ युनिट -नवी मुंबई 

▶️ *तक्रारदार*-पुरुष,वय-32 वर्षे  रा. सानपाडा, नवी मुंबई 

▶️ *आरोपी-* श्री.राहूल शत्रुघ्न कोळी, वय- 29 वर्षे, पद- परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक, सत्र क्र. 117, (वर्ग -2), नेमणूक सानपाडा पोलीस ठाणे, नवी मुंबई रा. ए/806, लामेर सोसायटी, साईनगर, पनवेल, नवी मुंबई.      

▶️ *लाचेची मागणी*-30,000/-रू 

▶️ *लाच स्विकारली-*  30,000/रु.

▶️ *हस्तगत रक्कम-* 30,000/-रु.

▶️ *लाचेची मागणी -* 

ता.12/02/2021

▶️ *लाच स्विकारली -* ता. 1३/02/2021

▶️  *लाचेचे कारण -*.  

यांतील तक्रारदार यांचे वडिलांनी त्यांचे मालकीचा दुकानगाळा श्री चुन्नीलाल खाटनावलिया  यांना भाडेतत्वावर दिला होता. परंतु श्री चुन्नीलाल यांनी काही महिन्यानंतर दुकान गाळ्याचे भाडे न दिल्यामुळे तक्रारदार यांनी श्री चुन्नीलाल यांना दुकान गाळा खाली करण्यास सांगितले होते. त्यानंतर कोविड संक्रमणाच्या काळात ते दुकानगाळा मालक यांना काहीएक न सांगता गावी निघून गेले. त्यानंतर तक्रारदार यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये सदर दुकानगाळ्यास श्री चुन्नीलाल यांचे लॉक असतानाही स्वतःचे लॉक लावले होते. त्यामुळे श्री चुन्नीलाल व तक्रारदार यांच्यात वाद होऊन श्री चुन्नीलाल यांनी तक्रारदार यांचे वडिलांविरुद्ध सानपाडा पोलीस ठाणे येथे तक्रार अर्ज केला होता. सदरचे प्रकरण मिटविन्यासाठी लोकसेवक राहुल कोळी, परि.पोउपनि यांनी तक्रारदार यांचेकडे रु 30,000/- लाचेची मागणी करून मागणी केलेली लाचेची रक्कम स्वीकारली असता रंगेहात पकडण्यात आलेले आहे.                  

▶️ *पर्यवेक्षण अधिकारी*

पोउपअधी ज्योती देशमुख

▶️ *सापळा पथक-* 

पोनि शिवराज बेंद्रे, पोहवा नितीन पवार, पोना संतोष ताम्हाणेकर, पोशि मंगेश चव्हाण,पोशि अमोल चौगले, 

▶️ *मदत पथक-*

पोनि नितीन खैरनार, पोहवा प्रदिप जाधव,पोशि सचिन माने, चापोहवा रतन गायकवाड

▶️ *आरोपीचे सक्षम अधिकारी-*                                                                मा. पोलीस महासंचालक , म . रा मुंबई. 

*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*

अँन्टी करप्शन ब्युरो, नवी मुंबई 

दूरध्वनी क्र 022-27833344

*@ टोल फ्रि क्रं. 1064*

================

✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा.चिखले

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com


राज्य शासकीय कार्यालयासाठी पाच दिवसांचा आठवडा-मंत्रीमंडळ निर्णय वर्षपूर्ती




मुंबई : 12 फेब्रुवारी 2020
 सामान्य प्रशासन विभाग

राज्य शासकीय कार्यालयासाठी

 पाच दिवसांचा आठवडा

राज्यातील शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. आता केंद्राप्रमाणे राज्यातील शासकीय कार्यालयांना प्रत्येक महिन्यातील सर्व शनिवारी व रविवारी सुट्टी राहील. यासोबतच दररोज ४५ मिनिटाचे वाढीव काम अधिकारी व कर्मचार्यांना करावे लागेल. या निर्णयाची अंमलबजावणी २९ फेब्रुवारी पासून होईल.

मुंबई सह सर्व कार्यालयांसाठी एकच वेळ

सध्या बृहन्मुंबईतील कार्यालयांची कामकाजाची वेळ सकाळी ९.४५ ते सायं. ५.३० अशी आहे. ती

आता सकाळी ९.४५ ते सायं.६.१५ अशी होईल. शिपायांसाठी कामकाजाची वेळ सकाळी ९.३० ते सायं. ६.३० अशी राहील. बृहन्मुंबई बाहेरील शासकीय कार्यालयांसाठी देखील ही वेळ ९.४५ ते सायं . ६.१५ अशी राहील. बृहन्मुंबई बाहेरील शासकीय कार्यालयांसाठी सकाळी १०.०० ते सायं. ५.४५ अशी कामाची वेळ सध्या आहे. मात्र आता पाच दिवसाचा आठवडा केल्यामुळे मुंबई आणि मुंबई बाहेरील सर्व कार्यालयाना एकच वेळ निश्चित करण्यात आली आहे. सध्याच्या या कार्यालयीन वेळेमध्ये दुपारी १ ते २ या वेळेमधील जास्तीत जास्त अर्ध्या तासाची भोजनाची वेळ देखील अंतर्भूत आहे.

यांना लागू नाही

ज्या शासकीय कार्यालयांना कारखाना अधिनियम किंवा औद्योगिक विवाद लागू आहे किंवा ज्यांच्या सेवा अत्यावश्यक म्हणून समजल्या जातात अशा कार्यालयाना व शासकीय महाविद्यालये, तंत्रनिकेतने, शाळा, पोलीस दल, अग्निशमन दल, सफाई कामगार यांना पाच दिवसाचा आठवडा लागू नाही. ज्या कार्यालयाना पाच दिवसाचा आठवडा लागू नाही त्यांची नावे पुढील प्रमाणे-

अत्यावश्यक सेवा : शासकीय रुग्णालये, चिकित्सालये, पोलीस, कारागृहे, पाणी पुरवठा प्रकल्प, अग्निमशन दल, सफाई कामगार. शैक्षणिक संस्था : शासकीय महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये, शाळा, तंत्रनिकेतने. जलसंपदा विभाग : दापोडी, सातारा, वर्धा, अकोला, अहमदनगर, अष्टी, खडकवासला, नाशिक व नांदेड येथील कर्मशाळा. नागपूर, भंडारा येथील मध्यवर्ती कर्मशाळा तसेच जलसंपदा व सार्वजनिक विभागांतर्गत क्षेत्रिय कामावरील व प्रकल्पांवरील नियमित आस्थापना, स्थायी व अस्थायी आस्थापना व रोजंदारीवरील क्षेत्रिय कामगार व कर्मचारी. सार्वजनिक आरोग्य विभाग : व्हॅक्सिन इन्स्टिट्यूट नागपूर. महसूल व वन विभाग : बल्लारशा, परतवाडा व डहाणू येथील एकात्मिकृत घटके, अलापल्ली येथील सॉ मिल, विभागीय वन अधिकारी यांच्या नियंत्रणाखालील परतवाडा व बल्लारशा येथील वर्कशॉप, शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालये, पुणे. सामान्य प्रशासन विभाग : शासकीय परिवहन सेवेचा कारखाना विभाग. कृषी विभाग : दुग्धशाळा विकास विभागांतर्गत दुग्ध योजना. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग : शासकीय मुद्रणालये. कौशल्य व उद्योजकता विकास : सर्व आयटीआय.

केंद्र शासनाप्रमाणे राजस्थान, बिहार, पंजाब, दिल्ली, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पाच दिवसांचा आठवडा लागू आहे. सध्या दुसरा व चौथा शनिवार कार्यालयीन सुट्टी असते. पाच दिवसाच्या आठवड्याच्या प्रस्तावामुळे शासकीय कार्यालयातील वीज, पाणी, वाहनांचे डिझेल, पेट्रोल या खर्चामध्ये बचत होणार आहे. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना कुटुंबाना वेळ देणे शक्य होवून त्यांच्या जीवनमानाचा स्तर उंचावेल.

प्रतिवर्ष कामाचे तास वाढणार

सध्याच्या कार्यालयीन वेळेमुळे वर्षातील सरासरी कार्यालयीन दिवस २८८ होतात. भोजनाचा ३० मिनिटांचा कालावधी वगळून प्रतिदिन ७ तास १५ मिनिटे प्रतिदिन कामाचे तास होतात. यामुळे एका महिन्यातील कामाचे तास १७४ तर एका वर्षातील कामाचे तास २०८८ इतके होतात.

पाच दिवसाच्या आठवड्यामुळे वर्षातील सरासरी कार्यालयीन दिवस २६४ होतील. मात्र, कामाचे ८ तास होतील. परिणामतः एका महिन्यातील कामाचे तास १७६ तर वर्षातील कामाचे तास २११२ इतके होतील. म्हणजेच प्रतिदिन ४५ मिनिटे, प्रतिमहिना २ तास आणि प्रतिवर्ष २४ तास इतके कामाचे तास वाढतील.


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा.चिखले

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com


Popular posts लोकप्रिय पोस्ट