PCR-MCR: नांदेडच्या उप-यास दोन दिवसांची पोलीस कोठडी रिमांड(PCR) तर दुसरीकडे अंबड उपविभागीय कार्यालयातील आरोपीचा वाढीव PCR संपल्यानंतर आता १७ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी (MCR)
संजय चिखले नांदेड, मंगळवार,दि.०४ फेब्रुवारी २०२५: काल दि. 03.02.2025 रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कार्यालय जालना, जि. जालना येथे करण्यात आलेल्या लाच सापळा कारवाईतील आलोसे नामे अमोल रमेश येन्नावार वय 47 वर्ष पद - वरीष्ठ लिपीक, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कार्यालय, जालना जि. जालना ( वर्ग 3) यांना गुन्ह्याचे तपासकामी अटक करून आज दि. 04.02.2025 रोजी मा. श्री. एस. जी. अडके साहेब, विशेष जिल्हा व सत्र न्यायालय, क्र 4, जालना जि. जालना यांचे समक्ष न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने नमुद आलोसेचा गुन्ह्याचे तपासकामी दि. 05.02.2025 रोजी पावेतो पोलीस कोठडी रिमांड (PCR) मंजुर केला आहे. तसेच वाढीव पोलीस कोठडी मध्ये असलेला उपविभागीय अधिकारी कार्यालय, अंबड जि. जालना येथील सापळा कारवाईतील आलोसे नामे देवानंद कारभारी डोईफोडे वय 37 वर्षे, सहाय्यक महसूल अधिकारी, उपविभागीय अधिकारी, कार्यालय अंबड जि. जालना यांचा वाढीव एक दिवसाचा PCR संपत असल्याने आलोसे यास पुन्हा एक दिवसाचे वाढीव PCR चे मागणीसह मा.विशेष न्यायालय अंबड येथे ...