🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

गुरुवार, मे १३, २०२१

महात्मा बसवेश्वरांच्या जयंती निमित्ताने दि-१४ मे २०२१,शुक्रवार रोजी नायगाव येथे प.पु.गणाचार्य शिवाचार्य महाराज,मुखेडकर यांच्या उपस्थितीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

 


नायगाव,दि 13 मे : समतानायक,बहुजन उद्धारक ,लोकशाहीचे जनक ,क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्ताने लिंगायत समाज नायगाव तालुक्याच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर चौक,नायगाव बाजार येथे दि.१४ मे २०२१,शुक्रवार सकाळी नऊ वाजता पासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.बाराव्या शतकात विषमता प्रचंड वाढलेली असताना लिंगायत विचारधारेच्या माध्यमातून वैचारिक क्रांती महात्मा बसवेश्वरानी घडवून आणली होती.

तालुक्याच्या मुख्य ठिकाणी घेण्यात आलेल्या बैठकीत यंदा देशासह-महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट असल्या कारणाने आपणही समाजाचे काही तर देणे लागते.हीच शिकवण महात्मा बसवेश्वरानी आपल्या वचन साहित्याच्या माध्यमातून दिली.याचाच एक भाग म्हणजे लिंगायत समाज नायगाव तालुक्याच्या वतीने महामानवाच्या जयंती निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे उदघाटन प.पु.सिध्ददयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून प.पु.गणाचार्य शिवाचार्य महाराज,मुखेडकर असणार आहेत.रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी जास्तीतजास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून समाज उपयोगी कार्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन संयोजन समितीचे राजूआप्पा बेळगे,विठ्ठल बेळगे, अविनाश अनेराये,केशव पांडागळे आदींनी केले आहे.

शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख शिवाजीराव पन्नासे यांच्यावतीने नायगाव कोविड सेंटर(CCC) व साई माऊली कोविड सेटर येथे सॅनिटाजझर,हॅड ग्लोव्हज,एन ९५ चे मास्क व बिस्कीटाचे वाटप

 


नायगाव : शिवसेना संपर्कप्रमुख आनंदराव जाधव व शिवसेना खा. हेमंत पाटिल यांच्या मार्गदर्शनाने व शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत 10 तारखेला शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख शिवाजीराव पन्नासे व शिवसैनिक सौ. सरस्वती शिवाजी पन्नासे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत साई माऊली सार्वजनिक कोविड सेंटर व शासकिय कोविड सेंटर नायगाव येथे सॅनिटाजझर हँड ग्लोज, एन ९५ चे मास्क सर्जिकल मास्क,एंटिसेप्टीक लिक्विड,बिस्किटाचे वाटप करण्यात आले.     


शिवसेनेचे नायगाव उपतालुकाप्रमुख शिवाजी पन्नासे हे गेल्या वीस वर्षापासुन सतत सामाजिक काम करत असतात. सध्या कोरोनाची दुसरी लाट आहे यामध्ये आपला जिव धोक्यात घालून रुग्ण बरे होण्यासाठी काम करीत आहेत. डॉक्टर मंडळी नर्सेस, दवाखान्याचा संपूर्ण स्टाफ, त्यांचा सन्मान व्हावा व रुग्नांणा दिलासा मिळावा त्यांना मदत व्हावी या साठी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पन्नासे उदात्त अंतःकरणाने निस्वार्थ सेवा करतात.      

    यापुर्वी कोरोना काळात त्यांनी कोरोना योध्यांना मास्क, सॅनिटायझर व अनेक गरजु कुंटुबांना भाजीपाला, गुरुजी रुग्णालय नांदेड येथे गरजु रुग्णांना जेवनाचे डबे वाटप केले आहे. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख उमेश मुंडे शहर प्रमुख माधव कल्याण, उपतालुकाप्रमुख शिवाजी पन्ना डॉ. एच आर गुंटुरकर, डॉ. विश्वास चव्हाण डॉ. नरेश देवणीकर व दोन्ही कोविड सेंटर कर्मचारी युवा सेना शहर प्रमुख शेरसिंग टाक, उपशहरप्रमुख केशव पांडागळे, शाखा प्रमुख दत्ता सुरकुतवाड, राजेश पांचाळ, विजय कांबळे, भगवान फुगारे अनेक जन उपस्थित होते.

धक्कादायक : गडचिरोलीतील आरमोरी तालुक्याचा माजी आमदार गेडामच्या मुलाने कोवीड सेंटरच्या नोडल अधिका-यास मारहाण केल्याचा निंदनीय प्रकार समोर आला आहे,डॉक्टरवर हल्ला करणारी तीन दिवसात सलग दुसरी घटना

 

माजी मंत्री काँग्रेस आमदार रंजीत कांबळे ने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा ऑडिओ व्हायरल झाला होता नंतर त्या आमदारावर गुन्हा दाखल करण्यात आला.या घटनेला दोनही दिवस उलटले नाहीत तर आज आरमोरीचा माजी आमदार गेडामच्या मुलाने कोवीड सेंटर मधील नोडल अधिका-यास मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे,त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडिया वर व्हायरल झाला आहे.

गडचिरोली,दि 12 मे : जिल्ह्यातील आरमोरी तालुक्याच्या मुख्यालय स्थळी असणाऱ्या कोव्हिड सेंटरमधील नोडल अधिकारी डॉ अभिजित मारबत यांना माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या मुलाने मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या मुलाचं नाव लॉरेन्स गेडाम असून याने ऑन ड्युटी असणाऱ्या नोडल अधिकाऱ्यास मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. याबाबत डॉ अभिजित मारबत यांच्याशी संपर्क केला असता ते रात्री उशिरापर्यंत आरमोरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याच्या कामी व्यस्त होते.

डॉ मारबत हे गेल्या दोन वर्षापासून दुर्गम समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात वैद्यकीय सेवा देत आहेत. माजी आमदार पुत्राकडून त्यांना झालेली मारहाण निषेधार्ह असून याविरुद्ध जिल्ह्यातील डॉक्टर्स यांनी तीव्र निषेध नोंदविला आहे. आता या मारहाणीचे तीव्र पडसाद राज्यात उमटण्याची चिन्हे आहेत. या प्रकरणी पोलिसांवर राजकीय दबाव येण्याची शक्यता असून पोलिसांनी याबाबत कठोर पावले उचलावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे


Popular posts लोकप्रिय पोस्ट