| PM मोदींनी PM-KISAN योजनेअंतर्गत 10 वा हप्ता जारी केला |
दिल्ली,दि.01 जानेवारी 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शेतकरी बाधवांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी किसान सन्मान योजनेचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला मोदी सरकारच्या वतीनं देशातील शेतकऱ्यांना गिफ्ट मिळालं आहे.पंतप्रधान कार्यालयाने 29 डिसेंबर रोजी एक निवेदन जारी करुन सांगितलं होतं की, 1 जानेवारी 2022 रोजी दुपारी 12.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदीं पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता हस्तांतरित करण्याची घोषणा करतील. त्यानुसार आज पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत दहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे.
देशभरातील 10 कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 20 हजार कोटी रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे. किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. दर चार महिन्यांनी दोन हजारांचा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. त्यातील 1 जानेवारी 2022 ते 31 मार्च 2022 या तीन महिन्यांचा दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.
Releasing the 10th instalment under PM-KISAN scheme. https://t.co/KP8nOxD1Bb
— Narendra Modi (@narendramodi) January 1, 2022
PM श्री @narendramodi जी, द्वारा #PMKISAN योजना के तहत 10 करोड़ से अधिक लाभार्थी किसान परिवारों को 20,000 करोड़ रु से अधिक की धनराशि और लगभग 351 #FPO को 14 करोड़ रु से अधिक का इक्विटी अनुदान जारी कर किसान उत्पादक संगठनों के लाभार्थियों से संवाद रहे हैं.https://t.co/S0SUXadQ65
— Narendra Singh Tomar (@nstomar) January 1, 2022
Modi released the amount to #beneficiaries at an event held through video conference. The central government has transferred over ₹1.61 lakh crore to more than 11.5 beneficiary farmer families under the scheme so far.#PM #farmers #PMKISAN @pmkisanyojana #PMKisanSammanNidhi
— PM Kisan Yojana (@pmkisanyojana) January 1, 2022
#PMKisanScheme : पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमाhttps://t.co/TchO8VwA7v
— श्री.संजय ब्रम्हानंद पाटील चिखले मरवाळीकर (@SanjayChikhale5) January 1, 2022