महा ई-सेवा केंद्राच्या लाचखोर केंद्र चालकाविरुद्ध तक्रार दिलेला तक्रारदार निघाला फितुर!मग काय?फितूर तक्रारदाराला न्यायालयाने दिली ०२ महीने सश्रम कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा
जळगाव, : तक्रारदार विशाल पंडीत सोनवणे याला आधारकार्ड काढायचे असल्याने तो महा ई-सेवा केंद्र,जामनेर रोड, बोदवड येथे गेेला. तेंव्हा तेथील निलेश देशमुख व चंद्रकांत नामदेव महाजन,ऑपरेटर यांनी आधारकार्ड काढण्यासाठी १६० रुपये लाचेची मागणी केल्याने त्याने ला प्र.वि जळगांव येथे तक्रार दिली होती. सदर तक्रारी वरुन सापळा कारवाई करण्यात आली.दोन्ही आरोपीतांवर अति. जिल्हा व सत्र न्यायालय, भुसावळ येथे स्पेशल केस नं १२/२०१५ अन्वये खटला दाखल करण्यात आला होता. सदरच्या केस मध्ये तक्रारदार विशाल पडीत सोनवणे याची मा. न्यायालयात साक्ष घेण्यात आली. सदर केस मध्ये त्याने खोटी साक्ष दिल्याने सदरची केस ही दि.१३/०१/२०२० रोजी मा. न्यायालयाने निर्दोष केली आहे. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सदर केस मधील फितुर तक्रारदार याचेवर कार्यवाही होण्यासाठी विजय खडसे, सरकारी अभियोक्ता, भुसावळ यांना विनंती केली. त्यानुसार सदर गुन्हयातील तक्रारदार विशाल पंडीत सोनवणे रा, बोदवड याचेविरुध्द मा.न्यायालयात्त खोटी साक्ष दिल्यावरुन CRPC 344 प्रमाणे मा. न्यायालयात दि.११/०२/२०२० रोजी खटला दाखल करण्यात आला. सदरची केस मा. अति. ...