पोस्ट्स

एप्रिल ४, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रेमडेसविर,मेडिकल,ऑक्सीजनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई–अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे

इमेज
  राज्यात केवळ सात दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे. त्यामुळे सर्व रक्तपेढ्यांनी तसेच स्वयंसेवी संस्थांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून रक्तदान शिबिरे आयोजित करावी मुंबई, दि. ४ एप्रिल : सध्या महाराष्ट्रात कोविडच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असून, संभाव्य वाढणाऱ्या रुग्णांचे हित लक्षात घेऊन मेडिकल ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिले. या संदर्भात रेमडेसिविर इंजेक्शनचे उत्पादक व मेडिकल ऑक्सीजन उत्पादक यांच्या प्रतिनिधींसमवेत बांद्रा येथील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात मंत्री श्री.शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे, रेमडेसिविर इंजेक्शन व मेडिकल ऑक्सिजनचे उत्पादक यांचे प्रतिनीधी तसेच अन्न व औषध प्रशासन, वैद्यकीय शिक्षण विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यात केवळ सात दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे. त्यामुळे सर्व रक्त...

कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय

इमेज
जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय )  अर्थचक्राला धक्का नाही, श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी सर्व प्रकारची वाहतूक सुरु मात्र गर्दीची ठिकाणे बंद खासगी कार्यालयांना घरूनच काम केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु रात्री संचारबंदी तर दिवसा जमावबंदी मुख्यमंत्र्यांचे सहकार्याचे आवाहन विरोधी पक्षांनाही विश्वासात घेतले मुंबई, दि 4 एप्रिल : कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंन्त याची अंमलबजावणी केली जाईल. हे निर्बंध लावतांना एकीकडे राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावणे तसेच कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे. शेतीविषयक कामे , सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील मात्र खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणी बंद राहतील. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय झाला. या निर्णयानंतर मुख्यम...

नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेवर "अशोकराज" : विरोधी पॅनलचा केला दारुण पराभव, पण खा.चिखलीकरला धूळ चारण्यात अपयश

इमेज
 नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत २१ पैकी १७ जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीच्या समर्थ सहकार पॅनलचे सर्व नेते, कार्यकर्ते व उमेदवारांचे अशोकराव चव्हाण यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. आज झालेल्या मतमोजणीत महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने 13, राष्ट्रवादी काँग्रेसने 3 तर शिवसेनेने 1 जागा जिंकून विरोधकांवर एकतर्फी मात केली आहे. अशोक चव्हाणांकडून भाजपच्या पॅनेलचा धुव्वा, परंतु खा.चिखलीकरला धूळ चारण्यात अपयश नांदेड, दिनांक 4 एप्रिल 2021 :  नांदेड जिल्ह्यात मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी झालेल्या मतदानाची रविवारी मतमोजणी पार पडली असून अखेर जिल्हा बँकेवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे अखेर 'राज' आले असून 21 पैकी 17 जागा महाविकास आघाडीने मिळवत एकहाती सत्ता संपादित केली आहे. या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजपाप्रणीत व खा. चिखलीकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनल चा पूर्ण धुव्वा उडाला असून केवळ चार जागांवर त्यांना समाधान मानावे लागले आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे.परंतु चिखलीकर पिता-पुत्राचा परा...