🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

मंगळवार, फेब्रुवारी १६, २०२१

दुकानाच्या साईन बोर्ड संदर्भात कारवाई न करण्याकरीता २,२५,००० मागणी करुन ६०,००० लाच घेतल्याने तिन आलोसे जेरबंद

 

प्रेसनोट 

दि. १५/०२/२०२१

यातील फिर्यादी यांचे दुकानाच्या साईन बोर्ड संदर्भात यहन्मुंबई महानगर पालिका येथे कारवाई न करण्याकरीता यातील आलोसे यांनी फिर्यादीकडे रु.२.२५.०००/- रक्कमेची लाचेची मागणी करुन,तडजोडीअंती रु.६०.०००/- लावेची रक्कम स्विकारली म्हणुन गुन्हा नोद.

लाचलुचपत प्रतिवधक विभाग :- मुबई विभाग

गुन्हा नाद कमांक :- ०६/२०२१

कलम :- ७, १२ भ्र प्र. अधिनियम १९८८

आरोपीतांचे नाव व कार्यालय :- १)निरीक्षक, अनुज्ञापन विभाग म.न.पा., पी/नॉर्थ वार्ड, मालाड (पश्चिम), मुंबई 

२) श्री.हरिश्चंद्र नानाभाऊ घेगडमल, वय ५३ वर्षे, पद-निरीक्षक, अनुज्ञापन विभाग, म.न.पा., पी/नॉर्थ वार्ड, मालाड (पश्चिम), मुंबई 

३) श्री.सुदेश कलथ्यूर पॉल,वय ४२ वर्षे -खाजगी इसम

 मागणी केलेली लाचेची रक्कम :- रु.२,२५,०००/-

 स्विकारलेली लाचेची रक्कम :-  रु.६०,०००/

  थोडक्यात माहिती अशी की फिर्यादी हे चारकोप परिसरात रहात असुन, त्याच्या दुकानाच्या साईन बोर्ड संदर्भात कारवाई न करण्याकरीता आलोसे क्र. १ व २ यांनी फिर्यादीकडे रु.२,२५,०००/- रक्कमेची लाचेची मागणी केली.

सदरची रक्कम फिर्यादीस लोकसेवक यांना दयावयाची नसल्याने फिर्यादीने दिनांक ११/०२/२०२१ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वरळी मुंबई येथे प्रत्यक्ष येवून, लेखी तक्रार दिली.

फिर्यादी यांच्या तक्रारीवरून दिनांक ११ /०२/२०२१ रोजी पडताळणी केली असता, आलोसे ब्र. १ व २ यांनी फिर्यादी यांच्या दुकानाच्या साईन बोर्ड संदर्भात कारवाई न करण्यासाठी तडजोडीअंती रू. ६०,०००/- रक्कमेची लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून आज दि.१५/०२/२०२१ रोजी सापळा कारवाई दरम्यान | आलोसे क्र. १ व २ यांनी रु.६०,०००/- लाचेची रक्कम मागणी करून आलोसे क्र.१ याने आरोपी क्र. ३ या खाजगी इसमाकडे लाचेची रक्कम देण्यासाठी सांगितलेवरून आरोपी क्र.३ यांनी लाचेची रक्कम स्विकारली असता दोन लोकसेवक व एक खाजगी इसम यांस रंगेहात पकडण्यात आले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई विभागातर्फ नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारा संबधीत काही माहिती असल्यास अगर लाच मागणा-या लोकसेवकाबद्दल तक्रर असल्यास लावलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई विभागाशी संपर्क साधावा.

संपर्क- लाचलुचपत प्रतियंधक विभाग, मुंबई विभाग ९१. सरपोचखानवाला रोड, वरळी, मुंबई ३०

संकेतस्थळ-acbmaharastra.gov.in

ई-मेल-१)acbwebmail@mahapolice.gov.in २)addicpacbmumbai@mahapolice.gov.in.

ऑनलाईन तक्रर अर्ज-www.acbmaharasIra.nct. टोल फ्री क्रमांक. १०६४


(आबासाहेब पाटील )

सहायक पोलीस आयुक्त,प्रशासन) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई

👇 लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची वेबसाईट/संकेतस्थळ

www.acbmaharashtra.gov.in


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा.चिखले

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com



शेतातील खदाणीचा व पिकांचा पंचनामा करण्याकरिता मंडळ अधिका-याने स्वतःसाठी व तलाठ्यासाठी मागितले ५०,००० मग काय एसीबीने घेतले ताब्यात


 *लाच मागणी अहवाल* 

▶️ युनिट- औरंगाबाद

▶️ तक्रारदार- पुरुष, वय-46 वर्ष

▶️ आरोपी लोकसेवक:- श्री., अप्पासाहेब मुरलीधर गोराडे, वय -50 वर्षे, पद-मंडळ अधिकारी, चिखलठना औरंगाबाद ,    

▶️ लाचेची मागणी- 50,000/- रूपये

▶️ लाचेची मागणी दिनांक 24.07.2020 रोजी                                  

▶️ कारण - तक्रारदार यांचे मावस दाजीचे शेतातील खदाणीचा व पिकांचा पंचनामा करण्यसाठी स्वतः साठी 25000/रुपये व तलाठी यांच्या साठी 25000/ रुपये असे एकून 50000/रुपये लाचेची मागणी पंच समक्ष केली.आलोसे याना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याचि प्रकिया चालू आहे. 

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.

 ▶️ सापळा अधिकारी,गणेश धोक्रट, पोलीस निरीक्षक ,ला.प्र.वि. औरंगाबाद.

▶️मार्गदर्शक- मा. डॉ राहुल खाडे पोलीस अधीक्षक  

मा.डाॅ. अनिता जमादार मॅडम.अपर पोलीस अधीक्षक,

मा.ब्रम्हदेव गावडे, पोलीस उप अधीक्षक, 

➡️सापळा पथक, पो.ना .सुनील पाटील , पो .ना.विजय बाम्हदे पो.अं. मिलिंद ईप्पर , चालक पो.अ.चांगदेव बागुल , ला. प्र. वि. औरंगाबाद.

👇 लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची वेबसाईट/संकेतस्थळ

www.acbmaharashtra.gov.in


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा.चिखले

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com


कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारची पाच लाखांची मदत जाहीर-महाराष्ट्र सरकारने देखील अनुकरण करावे_एस.एम.देशमुख यांची मागणी

 



मुंबई,(दि.१६ फेब्रुवारी) :  महाराष्ट्रात कोरोनानं 54 पत्रकारांचे प्राण घेतले.त्यांच्या कुटुंबियांनी राज्य सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी सातत्यानं मराठी पत्रकार परिषदेने केली असली तरी सरकार त्याबाबत कोणताच निर्णय घ्यायला तयार नाही. मात्र आता केंद्र सरकारने कोरोनानं मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांच्या नातेवाईकांना पाच लाख रूपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.मराठी पत्रकार परिषद केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करीत असल्याची भूमिका एस.एम.देशमुख यांनी मांडली आहे.

    माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार कल्याण समितीची एक बैठक सोमवारी पार पडली.या बैठकीत ज्या पत्रकारांचे निधन कोरोनानं झालंय अशा 39 पत्रकारांची माहिती केंद्र सरकारकडं उपलब्ध झाली त्या सर्व पत्रकाराच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.

    पत्रकारांना मदत करता यावी यासाठी पत्रकार कल्याण निधीच्या कोषात जवळपास दीड कोटी रूपये अतिरिक्त राशीची तरतूद करण्याचा निर्णय देखील नरेंद्र मोदी सरकारने घेतला आहे.देशातील सर्व राज्यांच्या पत्रकार या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मराठी पत्रकार परिषदेकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार राज्यात कोरोनानं 54 पत्रकारांचे निधन झाले आहे.त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत मिळावी यासाठी मराठी पत्रकार परिषदेने पाठपुरावा केल्यानंतरही सरकारने त्यासंबंधीची भूमिका घेतलेली नाही.

    आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुलढाणा येथील कार्यक्रमात कोरोनानं मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती.मात्र ती घोषणाही हवेतच विरली.राज्य सरकारने आतातरी निर्णय घेऊन जे पत्रकार कोरोनानं गेले त्यांच्या नातेवाईकांना किमान पाच लाख रूपयांची मदत करावी अशी मागणी एस.एम.देशमुख यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे..


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा.चिखले

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com


भुमी अभिलेख कार्यालयाचा उप अधिक्षक जयदिप मधुकर शितोळे 15,000/- रुपयांची लाच घेतांना चतुर्भुज

 

कार्यालय पोलीस उप अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, जालना

टोल फ्री क्रमांक-१०६४

कार्यालय दूरध्वनी क्र :- ()2482-220252


प्रेस नोट ::

दिनांक :- 15.02.2021.

१) आरोपीचे नाव व पता :-लोकसेवक श्री जयदिप मधुकर शितोळे वय 30 वर्ष लायसाय नोकरी उप अधिक्षक, भुमी अभिलेख कार्यालय, पैठण, जि. औरंगाबाद रा बालाजी विहार रो हाऊस D 12 पैठण, ता. पैठण जि. औरंगाबाद मुळ रा. तुंगत ता. पंढरपुर जि. सोलापुर (वर्ग-2) 

२) गुन्हा घ ता व ठिकाण :- 15.02.2021 रोजी तालुका भुमी अभिलेख कार्यालय पैठण,जि औरंगाबाद येथे

३) लाचेची रक्कम :- १५००० रुपये

याबाबत हकीगत अशी की, यातील तक्रारदार यांनी तक्रार दिली की, त्यांचे वडीलांचे नावे असली बिडकीन ता.पैठण जि.औरंगाबाद येथील सिटी सव्हे नं 1259 मधील जागा वाटणीपत्राव्दारे त्यांचे वाटयाला आलेली 129.5 चौ.मी क्षेत्रफळाची नोंद सिटी सर्व्हेला करण्यासाठी त्यांनी अर्ज दिला होता, सदरचा अर्ज पुरढील कार्यवाहीसाठी तालुका भुमी अभिलेख,पैठण यांचे कडेेे पाठवल्याने त्यांनी उप अधिक्षक, तालुका भुमी अभिलेख पैठण यांचेकडे जावून त्यांचे वाटयाचे क्षेत्रफळाची नोंद करणे बाबत विचारणा केली असता तेथील उप अधिक्षक श्री. जे. एम. शितोळे यांनी, तुमच्या क्षेत्रफळाची नोंद करायची असेल, तर तुम्हाला मला 20,000/- रुपये दयाचे लागेल, असे म्हणुन तक्रारदार यांचेकडे 20,000/- रूपये लाचेची मागणी केली. सदर कामासाठी तक्रारदारास उप अधिक्षक श्री. जे. एम. शितोळे यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यानी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना येथे संपर्क साधुन तक्रार दिली. सदर तक्रारीवरून दि. 15.02.2021 रोजी पडताळणी केली असता उप अधिक्षक श्री. जे. एम. शितोळे यांनी तक्रारदार यांचेकडे 20.000/- रूप लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच दि. 15.02.2021 रोजी आलीसे उप अधिक्षक श्री. जयदिप मधुकर शितोळे यांनी तक्रारदार यांचेकडुन तडजोडीअंती 15.000/- रुपये लाचेची रक्कम स्वतः पंचासमक्ष स्विकारली असतांना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालनाचे पथकाने उप अधिक्षक, तालुका भूमी अभिलेख कार्यालय, पैठण जि. औरंगाबाद येथे रंगेहाथ पकडले.

लोकसेवक श्री. जयदिप मधुकर शितोळे वय 30 वर्ष व्यवसाय नोकरी उप अधिक्षक, भूरमी अभिलेख कार्यालय, पैठण, जि. औरंगाबाट रा बालाजी बिहार रो हाऊस D I2 पैठण. ता. पैठण जि. औरंगाबाद मुळ पा. तुंगत ता. पंढरपुर जि. सोलापूर (वर्ग-2) यांचे विरुध्ध गुन्हा दाखल करण्याबाबत पुढील कार्यवाही चालु आहे.

सदरची सापळा कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. डॉ. राहुल खाडे, अपर पोलीस अधिक्षक डॉ. अनिता जमादार, ला.प्र.विभाग औरंगाबाद यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस उप अधिक्षक श्री. रविंद्र डी.निकाळजे. तसेच कर्मचारी श्री. ज्ञानदेय जुंबड, श्री.मनोहर खंडागळे, श्री. अनिल सानप श्री. जञानेश्वर म्हस्के, श्री. गजानन घायवट, श्री. जावेद शेख, श्री. शिवाजी जमधडे, श्री. गणेश चेके, श्री. सचिन राजत श्री. कृष्णा देते. श्री. गणेश बुजाडे, श्री. गजानन कांबळे य चालक श्री. प्रविण खंदारे, श्री. आरेफ शेख यांनी पार पाडली.

तसेच अॅंटी करप्शन ब्यूरो कडून आवाहन करण्यात येते की, कोणी लोकसेचक शासकीय कामासाठी लाचेची मागणी करीत असल्यास किंवा खाजगी व्यक्ती मार्फत कोणी लाचेची मागणी करीत असल्यास 02482-220252, तसेच टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क करावा. तसेच पोलीस उप अधिक्षक जालना मो.नं. 8975762906, पोलीस निरीक्षक मो.नं. 8390757835, 9823216788 वर संपर्क करावा.

पोलीस उप अधिक्षक, ला प्र वि, जालना..

👇 लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची वेबसाईट/संकेतस्थळ

www.acbmaharashtra.gov.in


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा.चिखले

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com


महावितरणच्या नांदेड परिमंडळाचे साडेपाच हजार कोटींचे वीज बिल थकले-घरगुती,वाणिज्यिक,औद्योगिक ग्राहकांचा समावेश



नांदेड,(दि. 16 फेब्रुवारी) : मागील १० महिन्यांत नांदेड परिमंडळातील २ लाख २१ हजार ७९८ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांनी एकदाही वीज बिल न भरल्यामुळे महावितरणची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली आहे. त्यामुळे या थकबाकीदारांचा वीज पुरवठा तोडून वसुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नांदेड परिमंडळातील सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडे ५ हजार ४३४ कोटी ४९ लाख रुपयांची थकबाकी आहे.

लाॅकडाऊन काळात जनता घरात असताना महावितरणचे कर्मचारी वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी जीवाची पर्वा न करता परिश्रम घेत होते. घरगुती ग्राहकांची वीज मागणी रेकाॅर्डब्रेक होती. त्यात रीडिंग व वीज बिलाची छपाई बंद असल्याने ग्राहकांना छापील बिलाऐवजी मोबाइल मेसेजवर बिले देण्यात आली. ही बिले सरासरीने व कमी होती. प्रत्यक्षात जून महिन्यापासून रीडिंग सुरू होताच रीडिंगनुसार बिले देण्यात आली. मात्र, यापूर्वीची बिले न भरल्याने थकबाकी हप्ते करण्यात आले. एकरकमी भरणाऱ्यांना सवलत देण्यात आली.

नांदेड परिमंडळामध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक लघुदाब वर्गवारीतील ४ लाख ४२ हजार ५६२ ग्राहकांकडे ५२४ कोटी ५६ लाख रुपये थकीत असून, त्यातील दहा महिन्यांत एकदाही वीज बिल न भरणारे २ लाख २१ हजार ७८ ग्राहक आहेत. त्यांच्याकडे ३४२ कोटी ९१ लाख येणे बाकी आहे.

चौकट- थकबाकीदारांचा वीजपुरवठा तोडण्याचा निर्णय

वीज ग्राहकांच्या तक्रारी किंवा शंका निरसन करण्यासाठी राज्यभरात ३ हजार २०१ वेबिनार, ५ हजार ६७८ मेळावे घेण्यात आले होते. तसेच १५ हजार ५२४ मदत कक्ष सुरू करण्यात आले होते. त्यापैकी १ हजार ७४२ मदत कक्ष अद्यापही सुरू असून त्यातून आलेल्या ९ लाख ८० हजार ४९९ पैकी ९ लाख ३३ हजार ३२४ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.

वीज उत्पादनासाठी कोळसा आणि तेल यासाठी आगावू पैसे द्यावे लागतात. राज्याला दरवर्षी किमान १२ हजार कोटींचा खर्च केवळ कोळसा आणि तेल यांच्या खरेदी व वाहतुकीवर करावा लागतो. वीज बिल लोकांनी भरलेच नाही तर वीज निर्मिती, वीज खरेदी, पारेषण आणि वितरण यावरील खर्च कसा करणार, असा प्रश्न निर्माण होतो.

👇 कृषी पंप विज जोडणी धोरण-२०२० pdf

कृषी पंप विज जोडणी धोरण-२०२०

👇 महावितरणची अधिकृत वेबसाईट

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित

👇 महावितरणच्या मुख्यालयसह सर्व परिमंडळांची pdf

माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत जनमाहिती अधिकारी यांची यादी – :: Maharashtra State Electricity Distribution Company Limited

👉नांदेड परिमंडळ माहिती अधिकार pdf 

👇View/Pay Bill
https://wss.mahadiscom.in/wss/wss?uiActionName=getViewPayBill


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा.चिखले

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com



गट विकास अधिकारी यांनी तालुका पातळीवर दर ३ महिन्यांनी सरपंच सभा घेण्याबाबत_शासन परिपत्रक

 



महाराष्ट्र शासन

ग्रामविकास विभाग शासन परिपत्रक क्रमांकः व्हीपीएम- २०२०/प्र.क्र. १६१/पंरा-३

बांधकाम भवन, २५ मर्झबान पथ फोर्ट, मुंबई - ४०० ००१

तारीख : ०९ फेब्रुवारी, २०२१


शासन परिपत्रक :-

ग्रामपंचायतीची कामे वेळेवर होत नसल्याबाबत अनेक तक्रारी / निवेदने शासनास प्राप्त झाली आहेत. याबाबी विचारात घेऊन राज्यात सर्व जिल्ह्यात तालुका पातळीवर गट विकास अधिकारी यांना खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात येत आहेत. 

१) ग्रामपंचायतीची कामे वेळेवर होण्यासाठी गट विकास अधिकारी यांनी तालुका पातळीवर सरपंच सभा आयोजित करावी. 

२) सदर सभेत संबंधित पंचायत समिती विस्तार अधिकारी (पंचायत ) व इतर कर्मचारी, संबंधित सरपंच, ग्रामसेवक यांची आढावा बैठक घेण्यात यावी व ग्रामपंचायतीची कामे वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी/ गान्हाणी/ अडचणींची सोडवणूक करावी

३) सदर सभा दर ३ महिन्यांनी नियमितपणे आयोजित करावी व ज्या दिवशी तक्रार निवारण दिन आहे त्याच दिवशी सदर सभेचे आयोजन करावे. 

४)गट विकास अधिकारी यांनी सभा घेतल्यानंतर कार्यालयीन कामकाजाच्या पाच दिवसात सभेचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करावा.

५) सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित गट विकास अधिकारी यांच्याकडून सदर सभेचा अनुपालन अहवाल एकत्र करून संबंधित विभागीय आयुक्त यांना सात दिवसात सादर करावा.

६) सर्व विभागीय आयुक्त यांनी विभागातील सर्व जिल्ह्यातून झालेल्या सभेचा अनुपालन अहवाल प्राप्त करून एकत्रितपणे शासनास दहा दिवसात सादर करावा.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.


सुहास जाधवर

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन


प्रत,

१. मा. मंत्री (ग्रामविकास), यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई

२.अतिरिक्त मुख्य सचिव (ग्रामविकास व पंचायत राज), यांचे स्वीय सहायक, बांधकाम भवन, २५ मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४०० ००१

३.सर्व उपसचिव/ अवर सचिव/ कक्ष अधिकारी, ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई

४.विभागीय आयुक्त. कोकण, नाशिक, पुणे औरंगाबाद, नागपूर, अमरावती 

५.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हापरिषद (सर्व)

६.गट विकास अधिकारी. पंचायत समिती (सर्व)

७.निवड नस्ती कार्यासन पंरा ३


👇शासन परिपत्रक pdf

गटविकास अधिकारी यांनी तालुका पातळीवर दर 3 महिन्यांनी सरपंच सभा घेणे बाबत

👇 महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट/संकेतस्थळ

www.maharashtra.gov.in

👇नांदेड जिल्हाची अधिकृत वेबसाईट/संकेतस्थळ

www.zpnanded.in

👇जिल्हाधिकारी कार्यालयाची अधिकृत वेबसाईट/संकेतस्थळ

www.nanded.gov.in

#सरपंचसभा


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा.चिखले

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com


Popular posts लोकप्रिय पोस्ट