DCP सारख्या ज्या IPS मंडळी आहेत, जे स्वतःला पृथ्वीवरचे समजतच नाहीत,परग्रहावरुन कुठुनतरी आपण आलेले आहोत, खालच्या वर्गाचे जे दुय्यम दर्जाचे कर्मचारी आपले पारंपरिक गुलाम आहेत असे समजून चालतात वागतात म्हणत... दत्तात्रय नाईक नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने ऑडिओ क्लिप केली व्हायरल
Audio विरार,दि 31 जुलै 2021 : बिर्याणीच्या ऑर्डरची ती ऑडिओ क्लिप हे षडयंत्र’म्हणा-या पुणे परिमंडळ 1 च्या DCP प्रियंका नारनवरेच्या विरुद्ध एका दत्तात्रय नाईक नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने चॅलेंज देत दुसरी ऑडिओ क्लिप व्हायरल केली आहे. विरार येथील दत्तात्रेय काशिनाथ नाईक या पोलीस कर्मचाऱ्यांने व्हायरल केलेल्या ऑडिओ क्लिप मध्ये असे म्हटले आहे की, "DCP सारख्या ज्या IPS मंडळी आहेत, जे स्वतःला पृथ्वीवरचे समजतच नाहीत,परग्रहावरुन कुठुनतरी आपण आलेले आहोत, खालच्या वर्गाचे जे दुय्यम दर्जाचे कर्मचारी आपले पारंपरिक गुलाम आहेत असे समजून चालतात वागतात. आणि मग लिडरशिपच्या गोष्टी करतात,लिडरशिप म्हणून तुम्ही सौजन्याचा, प्रामाणिकपणाचा,कर्तव्यपरायणतेचा,सचोटिचा आदर्श तुम्हाला घालून द्यायचे असेल तर तुम्ही असं जेवण बिवण स्वतः साठी, आपल्या नव-यासाठी आणण्यासाठी अशी अधिनस्त कर्मचा-यांना तुम्ही मुळात आदेशच द्यायचे नाही.तुम्ही म्हणता की ते क्लिप हि इडिटिंग केलेली आहे थोडासा संवाद माझा आहे, म्हणजे असं आहे का? तुम्हाला फक्त मटन बिर्याणीच हवी होती, नंतर बोंबिल,नंतर सुप तुमचं एका ह्याच्यावरपण भागत नाही आहे ह...