🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

मंगळवार, मार्च २३, २०२१

लाचखोर ग्रामसेवकासह खाजगी इसम ८ हजाराची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले

लाच देणे आणि घेणे दोन्ही कायद्याने गुन्हा

*सापळा अहवाल*

▶️ युनिट - औरंगाबाद,

▶️ तक्रारदार- पुरुष, वय-41

▶️ आरोपी लोकसेवक:- 1. श्री.चरणसिंग असरामसिंग राजपूत ,वय 36 , पद- ग्रामसेवक,वर्ग (३)नेमुणक- कोळघर, जि.औरंगाबाद  

2. (खाजगी इसम) ज्ञानेश्वर परमेश्वर आवारे, वय 55 वर्ष राहणार कोळघर, जि.औरंगाबाद

#लाचेची मागणी- 8000/-रूपये दि.22/03/2021

#लाच स्वीकारली-8000/-रुपये 

दि.22/03/2021          

▶️ कारण - यातील आलोसे लोकसेवक यांनी तक्रारदार यांचे वडिलांनी खरेदी केलेली मोकळी जागा तक्रारदार यांचे नावावर करण्यासाठी 8000/- लाचेची मागणी करून आरोपी क्र.2 खाजगी इसम यांचे मार्फत सदर लाच स्वीकारली.

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.

▶️ सापळा अधिकारी, श्री नंदकिशोर क्षीरसागर पोलीस निरीक्षक ला प्र वि औरंगाबाद

▶️मार्गदर्शक-मा. डॉ.राहुल खाडे,पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि. औरंगाबाद

मा.डाॅ. अनिता जमादार मॅडम. अपर पोलीस अधीक्षक,

 मा .श्री.गावडे पोलिस उपअधीक्षक ला.प्र.वि.औरंगाबाद.

➡️सापळा पथक

 ईप्पर, नागरगोजे, देसाई, उमेश जाधव, उगले , ठाकूर, श्रीसुंदर.

टोल फ्री क्रमांक : १०६४

www.acbmaharashtra.gov.in

✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

लाचखोर अपर तहसीलदार ४ लाख ७० हजाराची लाच मागणी करुन, १ लाख ५० लाच घेताना अडकला एसीबी पथकाच्या जाळ्यात

लाच देणे आणि घेणे दोन्ही कायद्याने गुन्हा

 आदरणीय सर, जयहिंद

सापळा अहवाल

▶️ युनिट - जालना,

▶️ तक्रारदार- पुरुष, वय- 40 वर्ष

▶️ आरोपी लोकसेवक:- श्री.किशोर अवचितराव देशमुख ,वय 50 वर्षे, पद-अपर तहसिलदार, औरंगाबाद, जि.औरंगाबाद (वर्ग-1 )

▶️ लाचेची मागणी- 4,70,0000/- व  

▶️ स्विकृती, 1,50,000/-रु. दिनांक 22/03/2021 रोजी                            

▶️ कारण - यातील तक्रारदार यांचा वाळू ठेकेदारी व्यवसाय असुन, शासनाच्या अधिकृत वाळुचे टेंडर मधुन वाळू वाहतूक दरम्यान अपर तहसीलदार औरंगाबाद यांचा पोलीस स्टेशनला लावलेल्या गाड्यांचा चांगला अहवाल पोलीस स्टेशनला पाठविण्यासाठी 3,20,000/-रु. व टेंडर मधिल वाळू हायवा द्वारे माहेवारी वाहतूक करु देण्यासाठी 1,50,000/-रुपये प्रमाणे अशी दि.10/03/2021 रोजी मागणी करुन त्यापैकी माहेवारी वाळू वाहतूक करु देण्यासाठी तक्रारदार यांचेकडून 1,50,000/ रुपये लाच स्वतः स्वीकारली असतांना दि.22/03/2021 रोजी आलोसे यांना ताब्यात घेतले आहे.

▶️स्विकृती ठिकाण-MTDC रेस्ट हाऊस समोरील क्रांती चौककडे जाणारे रोडवर आलोसे यांचे खाजगी वाहनांमध्ये

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.

▶️मार्गदर्शक-मा. डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. औरंगाबाद,

मा.डाॅ. अनिता जमादार मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. औरंगाबाद.

➡️सापळा अधिकारी, श्री.रविंद्र निकाळजे, पोलीस उपअधीक्षक , ला.प्र.वि.जालना.

▶️सापळा पथक, पोनि.श्री.शेख, पोकाॅ. श्री.ज्ञानेश्वर म्हस्के, श्री.जावेद शेख, श्री. गणेश चेके. ला.प्र.वि.जालना.

टोल फ्री क्रमांक : १०६४

www.acbmaharashtra.gov.in

✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

मन हेलावून टाकलेल्या भोकरच्या दिवशी बु.येथील ५ वर्षीय बालिकेवरील अत्याचार व खून प्रकरणात गुन्हेगार नराधम सालगड्यास भोकर जिल्हा सत्र न्यायालयाने २२ दिवसात दिली फाशीची शिक्षा- न्या.एम.एस.शेख यांचा ऐतिहासिक निकाल

 हा न्यायनिवाडा अवघ्या २२ व्या दिवशी लागल्याने अशा प्रकारचा निकाल राज्यात पहिलाच असल्याचे बोलल्या जात आहे. खऱ्या अर्थाने पिडीतेला न्याय मिळाल्याच्या भावना अनेकांच्या चेहऱ्यावर दिसुन येत होत्या





भोकर (दि. २३ मार्च) : ५ वर्षीय बालीकेवर पाशवी अत्याचार करुन तिची निर्घृन हत्या केलेल्या अमानुष घटनेचे सबंध महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटलेल्या गुन्ह्यातील आरोपी विरुद्धचा गुन्हा सिद्ध झाल्याने भोकर जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायधीस मुजीब एस शेख यांनी फाशीची शिक्षा सुनावली आहे.

                सदरील गंभीर गुन्ह्याचा खटला भोकर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात चालविण्यात आला होता.हा निर्णय ऐकण्यासाठी तालुक्यातील अनेकांनी भोकर न्यायालयात गर्दी केली होती,जलदगती न्यायालयाप्रमाणे सदरील गंभीर गुन्ह्याचा निकाल अवघ्या बावीस दिवसात दिल्याने पीडित मयत व कुटूंबियास न्याय मिळाला असल्याची प्रतिक्रिया जनसामान्यातून व्यक्त होत आहे.

                  दिवशी बु.ता.भोकर,जि.नांदेड येथील एका शेतक-याच्या ५ वर्षीय निष्पाप बालीकेवर अमानवीय,नैसर्गिक व अनैसर्गीक अत्याचार करुन तिची निर्घुन हत्या सालगड्याने केल्याची संतापजनक अमानुष घटना दि.२० जानेवारी २०२१ रोजी घडली होती.या प्रकरणी पिडीत मयत मुलीच्या वडीलांनी फिर्याद दिल्यावरुन मुलीस पळवून नेऊन अत्याचार करुन खून केल्याचा व बाल लैंगीक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) नुसार आरोपी बाबूराव उखंडू सांगेराव उर्फ बाबूराव माळेगावकर(३५) रा.दिवशी बु.याच्या विरुद्ध भोकर पोलीस स्टेशन मध्ये गु.र.न.34/2021 कलम 363,302,376(अ),376(2)(जे)(एम),376(अब),377 भादवी व कलम 4,6,8,10,12 POCSO ACT नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.तसेच भोकर पोलीसांनी आरोपीस त्याच दिवसी घटनास्थळावरुन सबळ पुराव्यानिशी अटक केली होती.

         सबंध मानवतेला काळीमा फासणा-या त्या अमानुष अत्याचार व खूनाच्या घटनेने भोकर तालुक्यासह महाराष्ट्राचे मन पार हेलाऊन गेले होते.यामुळे सदरील आरोपीस कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी व हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा अशी मागणी विविध स्तरातून होत होती.विविध पक्ष,सामाजिक संघटना,महिला संघटनांनी यास्तव मोर्चे,धरणे,रास्ता रोकोसह आदी आंदोलने केली होती.तर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन भोकर उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाळ रांजणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी तपासचक्र गतीमान करुन सखोल तपासाअंती अवघ्या १९ दिवसात सदरील गुन्हाचे दोषारोपपत्र दि.१० फेब्रुवारी २०२१ रोजी भोकर जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायालयात दाखल केले. दि.१ मार्च २०२१ रोजी पासून न्यायालयात सदरील खटल्याची तपासणी सुरु झाली.दरम्यानच्या काळात न्यायालयाने १५ साक्षीदार तपासले.यात सरकारी वकील अॅड.रमेश राजुरकर व आरोपीचे वकील यांच्यात झालेल्या युक्तीवादाअंती आणि साक्षीदाराची साक्ष, घटनास्थळावरील सबळ पुरावे, वैद्यकीय अहवाल आदी आरोपी विरुद्ध गेले.यावरून आरोपी विरुध्दचा सर्व कलमांनुसारचा गुन्हा अखेर सिद्ध झाला होता.व आरोपीस न्यायालयाने बाजू मांडण्याची संधी दिली होती, एकूणच सर्व कलमानुसार सबळ पुराव्यानिशी गुन्हा सिद्ध झाल्याने जिल्हा न्यायाधीश मुजीब एस.शेख यांनी दि.२२ मार्च २०२१ रोजी उपरोक्त आरोपीस सर्व कलमानुसार कलम 363,302,376(अ),376(2)(जे)(एम),376(अब),377 भादवी व कलम 4,6,8,10,12 पोक्सो कायद्यानुसार आरोपीस दोषी धरुन फाशीच्या शिक्षेशिवाय पर्याय नाही म्हणून आरोपीस फाशीची शिक्षा सुनावली आहे.सरकारी वकिल ऍड. रमेश राजूरकर यांना फिर्यादी पक्षा तर्फे खटल्या दरम्यान न्यायालयिन कामकाजात ऍड.स्वप्नील कुलकर्णी व ऍड. सलीम यांनी सहकार्य केले आहे तर पैरवी अधिकारी म्हणवून पो.ना.फेरोज खान यांनी काम पाहिले आहे.

                  सबंध मानवतेला काळीमा फासणारी ती घटना असल्यामुळे सदरील गंभीर गुन्ह्यातील क्रुरकर्मी आरोपीचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय ॲड.बळवंत कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली भोकर अभिवक्ता संघाने घेतला होता.त्यामुळे येथील एकाही वकीलांने आरोपीचे वकीलपत्र घेतले नव्हते.म्हणून लिगल ऐड कायदा तरतुदीनुसार न्यायालयाने आरोपीस एक वकील दिला होता.या खटल्यातील ही एक विशेष बाब आहे.

     असा गंभीर गुन्हा समाजात पुन्हा करण्याची हिम्मत करू नये म्हणून आशा क्रूरकर्मी आरोपीस फाशीची शिक्षा योग्यच आहे.एका पाच वर्षीय निष्पाप चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणे हा प्रकार अमानवीय व पशुतुल्य आहे अशा गुन्हयातून आरोपीस शिक्षा कमी झालीतर समाजात पुन्हा क्रूरकर्मी गुन्हेगार वृती वाढते म्हणून असे आरोपी शिक्षेतून सुटू नयेत नाहीतर त्यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा अर्थातच कठोरात कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे.त्याच अनुषंगाने मयत पीडितेस कुटूंबियास न्यायमिळवून देण्याचा आम्ही व न्यायालयाने कायद्याचा सन्मान करत यथोचित प्रयत्न केला आहे. म्हणून ही दिलेली शिक्षा योग्यच याच बरोबर पीडितेच्या कुटूंबियास कायद्यानुसार भरीव आर्थिक मदत मिळावी अशी विनंती ही मा. न्यायालयास आम्ही केली आहे असेही सरकारी वकील अॅड. रमेश राजूरकर यांनी म्हटले आहे.

मा.जिल्हा व सत्र न्यायालय भोकर यांचे न्यायालयातील श्री एम.एस शेख यांचे न्याय निर्णय २२/०३/२०२१

न्यायलयीन आदेश:आदेश तारखेने शोधा

प्रकरण सूची ⁄ दैनिक प्रकरण सूची

✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

31 एप्रिल 2021 नंतर मिळणार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 8 वा हप्ता,लवकरच नोंदणी करुन घ्या


नांदेड : आपण जर शेतकरी असाल आणि आपली पंतप्रधान-किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी केली नसेल तर लवकर नोंदणी करुन घ्या, कारण या योजनेसाठी शेवटची तारीख 31 मार्च 2021 देण्यात आली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 8 वा हप्ता 31 एप्रिल, 2021 नंतर मिळण्यास सुरुवात होणार आहे. 

या योजनेचे पैसे केवळ त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या नावाची नोंदणी केली आहे. हा हफ्ता थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान-किसान योजनेचा २ हजार रुपयांचा हप्ता होळीच्या आधी म्हणजेच 31 एप्रिल नंतर तुमच्या खात्यात जमा होणार आह

6 हजार मिळवायचे असतील तर लवकर नोंदणी करा

जर आपल्याला पंतप्रधान-किसान सन्मान निधी योजनेचे 6 हजार रूपये मिळवायचे असतील तर 31 मार्च पूर्वी नोंदणी करुण घ्या. या योजनेअंतर्गत नाव नोंदवण्यासाठी आपल्याला आपले सेवा केंद्र किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये ही नावाची नोंदणी करता येऊ शकेल. यासह शेतकरी आपली कागदपत्रं गावातील तलाठी कार्यालयात जमा करुनही नाव नोंदणी करु शकतो.तसेच New farmer registration form वर स्वतः आपल्या नावाची नोंदणी करु शकता.

हप्ता जमा झाला की नाही?

तुमच्या खात्यात PM-Kisanचा हप्ता जमा झाला की नाही, हे एकतर तुम्हाला मोबाईलवर मेसेजद्वारे कळवलं जातं किंवा https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर लॉगिन करुन पैसे जमा झालेत का नाही हे कळू शकेल.

यासाठी Farmer corner मधील beneficiary status या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तिथं तुम्हाला आधार नंबर, बँकेचा खाते क्रमांक किंवा मोबाईल नंबर यापैकी एक पर्याय माहिती टाकायची आहे. त्यानंतर get data या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मग हप्ताविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळते.

✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

Popular posts लोकप्रिय पोस्ट