गोवंशाची अवैध वाहतूक, तस्करी व कत्तलीबाबत माहिती देण्याचे नांदेड जिल्हा पोलिसांचे आवाहन; माहिती देणाऱ्याचे नाव पुर्णपणे गोपनीय ठेवले जाईल
संपादक -संजय पाटील चिखले नांदेड,मंगळवार दि.२६/०५/२०२६ : जिल्ह्यात गोवंशाची अवैध वाहतूक, तस्करी किंवा कत्तल यासारखे बेकायदेशीर प्रकार घडत असल्यास नागरिकांनी त्याबाबतची माहिती प्रशासनाला तातडीने द्यावी, असे आवाहन नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने अधिकृत पत्रकाद्वारे करण्यात आले आहे. बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत नागरिकांचा सहभाग वाढावा आणि सुरक्षेची खात्री मिळावी यासाठी पोलिसांनी महत्त्वाची ग्वाही दिली आहे. अवैध गोवंश तस्करी किंवा कत्तलीबाबत पोलिसांना माहिती देणाऱ्या नागरिकांचे नाव आणि ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन नागरिकांना अशा प्रकारची कोणतीही माहिती मिळाल्यास त्यांनी नांदेड जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष आणि संबंधित विशेष पथक अधिकारी यांच्या खालील अधिकृत क्रमांकांवर तात्काळ संपर्क साधावा: आपत्कालीन क्रमांक : 112 नांदेड जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष : 02462-234504 पीआय भोईटे (PI Bhoiete): +91 83...