गुरुवार, डिसेंबर २३, २०२१
शाळा व्यवस्थापन समिती (SMC) व पालक शिक्षक संघ (PTA) यांना शाळा सुरू होईपर्यंत दिलेली मुदतवाढ संपुष्टात आणून नव्याने समित्या स्थापन कराव्यात
शैक्षणिक वर्ष 2020-2021 मध्ये सुद्धा शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत.त्यामुळे शालेय व्यवस्थापन समिती ,पालक शिक्षक संघ व कार्यकारी समितीची नव्याने स्थापना करण्यात आली नाही. शैक्षणिक वर्ष 2021-22 च्या 01 डिसेंबर पासून प्राथमिक शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने मंत्रिमंडळ बैठकीत मांडला होता. त्याला आरोग्य विभाग तसेच बालरोग तज्ज्ञांच्या कृती दलाने परवानगी दिली.कोरोनामुळे मागील २० महिन्यांहून अधिक काळ शाळा न पाहिलेली मुले शाळेत जायला लागली. ग्रामीण भागांतील पाचवी ते बारावी आणि शहरी भागांतल्या आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय याआधीच घेतला आहे. मात्र पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबत अनेक मतमतांतरे होती. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा वेळेत सुरू होणे आवश्यक आहे, असे मत शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करत होते. यानंतर या प्रस्तावाबाबत आरोग्य विभागाचा अभिप्राय घेऊन कृती दलाच्या तज्ज्ञांशीही चर्चा करुन ग्रामीण भागात पहिली ते चौथी आणि शहरी भागांत पहिली ते सातवीचे वर्गही ऑफलाइन सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
केंद्र सरकारने सन २००२ च्या ८६ व्या संविधान विशोधन अधिनियमान्वये अनुच्छेद २१ (अ) मध्ये प्राथमिक शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराचा समावेश केला आहे. त्यानुसार सहा ते चौदा वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणारा अधिनियम, Right of Children to Free and Compulsory Education Act, २००९ (No. ३५. २००९), केंद्र शासनाने पारित करून तो भारत सरकारच्या २७/०८/२००९ च्या राजपत्रात प्रसिद्ध केला आहे. तसेच, भारत सरकारच्या दिनांक १६/०२/२०१० च्या राजपत्रात सदर अधिनियम दिनांक ०१/०४/२०१० पासून संपूर्ण भारतात (जम्मू व काश्मिर वगळता) लागू केला असल्याचे नमूद केले आहे.
शाळा व्यवस्थापन समितीच्या रचनेच्या अटी व शर्ती पुढील प्रमाणे असतील
अ) पालक सदस्यांची निवड पालक सभेतून करण्यात येईल.
अधिनियमातील कलम २२ अनुसार शाळा व्यवस्थापन समितीला पुढील कार्ये पार पाडावी लागतील.
६) अन्य अशैक्षणिक कामांचा बोजा शिक्षकांवर पडणार नाही यांचे संनियंत्रण करणे.
८) शाळा मान्यतेसाठी निश्चित केलेल्या मानके व निकष यांच्या पालनांचे संनियंत्रण
१६) शाळागृह, इतर शालेय बांधकाम, तसेच किरकोळ व विशेष दुरुस्त्यांवर देखरेख
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
Popular posts लोकप्रिय पोस्ट
- लाच प्रकरण : रामतिर्थ पोलीस स्टेशनच्या लाचखोर हेड कॉन्स्टेबल सह होमगार्ड 5,000 रुपयांची लाच घेताना नांदेड एसीबीच्या पथकाने मुसक्या आवळल्या
- आता ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या मासिक सभेला उपस्थित राहण्यापासून कुणी नकार देऊ शकत नाही
- VIDEO : मुगाव जि.प शाळेचा वाचाळवीर मुख्याध्यापक शेख नजीर विरुद्ध पालकासोबत अभद्र भाषेचा वापर करुन शिवीगाळ केल्याप्रकरणी निलंबनासह विभागीय चौकशीची कारवाई प्रस्तावित
- जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम कोमवाडला सात वर्ष सक्तमजुरी 18 लाख 82 हजार रुपये रोख दंड
- मध्य प्रदेशच्या मुलीचे महाराष्ट्राच्या मुलासोबत झाले फेसबुक प्रेम-पोलीस स्टेशन मधीच जमली सोयरीक,पोलिस निरीक्षका वसुंधरा बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाला विवाह संपन्न
- लाचखोर महिला नायब तहसीलदार,रेशन दुकानदार संघटनेच्या अध्यक्षासह तिघांना लाच घेताना अॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले
- अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी नांदेडच्या तत्कालीन लाचखोर सुनिल नागेश खमितकर या नराधमाकडून (समाज कल्याण अधिकारी,जि.प.लातूर) मुलीकडे पैसे आणि शरीरसुखाची मागणी_योगिता चौधरी यांचा गंभीर आरोप
- जुलै,२०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्हयात उद्भवलेल्या पुरपरिस्थिमुळे शेतीपिकांच्या नुकसानीकरिता आर्थिक मदत वाटप करण्यासाठी ३६५ कोटी निधी वितरित
- झोपेत असताना सापाने दंश केल्याने उपचारादरम्यान मरवाळी जि.प शाळेच्या एका गुणवान विद्यार्थीनीचा मृत्यू
- दंड वसूल : विद्यमान सरपंचानेच मोडले लग्नाचे नियम,मग काय महिला ग्रामसेवक यांनी वर पित्यास ठोठवला तब्बल 50 हजाराचा दंड