पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नायगाव अधिवक्ता संघाच्या वतीने जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा

इमेज
  जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस   नायगाव/संजय चिखले मरवाळीकर मराठा आरक्षणासाठी नायगाव येथील अधिवक्ता संघ ही सरसावला आहे.सबंध महाराष्ट्रासह तालुक्यात मराठा आरक्षणावरून राण पेटलेला पाहुन मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश व्हावा व मराठा आरक्षणासाठी सराटी येथे उपोषण करित असलेल्या मनोज जरांगे यांना पाठबळ मिळावे यासाठी मराठा समाजाचा ओबीसी समावेश आरक्षणाचा मुद्द्यावर लवकरात लवकर निर्णय व्हावा या अनुषंगाने एक ठराव संमत करून तो ठराव नायगाव तहसीलदार मंजुषा भगत यांचेकडे सुपूर्द करण्यात आला. नायगाव अभिवक्ता संघ नेहमीच वेगवेळ्या सामाजिक कार्यात अग्रेसर असतो. तालुक्यातील व संबंध राज्यातील मराठा बांधवांची मराठा आरक्षणाची मागणी व अवश्यकता लक्षात घेऊन अंतरवली सराटी येथे अमरण उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास नायगाव अभिवक्ता संघाच्या पाठिंब्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करून घेण्यात आला त्याचीच एक प्रत आज दि. 01 नोव्हेंबर रोजी सदर ठराव नायगाव तहसीलदार सौ. मंजुषा भगत यांचेकडे सुपूर्द करण्यात आला.  यावेळी नायगाव अभिव्यक्ता संघाचे अध्यक्ष ऑडव्होकेट निलेश देशप...