🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

रविवार, सप्टेंबर २६, २०२१

माहूर गडावरील 'रोप वे' ला गती ! राज्य शासन व 'वॅपकॉस'मध्ये करार


नांदेड दि. 26 सप्टेंबर 2021 :- रेणुकामातेचे देवस्थान असलेल्या माहूर गडावर 'रोप वे' उभारण्यासंदर्भात राज्य शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या 'वॅपकॉस लिमिटेड' मध्ये करार झाला आहे. यामुळे माहूर गडाच्या विकासकामाला गती मिळाली आहे. 

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत बांधकाम विभागाच्या औरंगाबाद विभागाचे मुख्य अभियंता दिलीप उकिर्डे आणि 'वॅपकॉस'चे प्रतिनिधी दीपांक अग्रवाल यांनी औरंगाबाद येथे या करारावर स्वाक्षरी केली. माहूर गड येथील रेणुकादेवी मंदीर, श्री दत्त शिखर मंदीर, अनुसया माता मंदिरासाठी 'रोप वे' उभारणे तसेच रेणुकादेवी मंदिरासाठी 'फुट ओव्हर ब्रीज' व 'लिफ्ट' उभारण्याच्या कामाला केंद्रीय मार्गनिधी अंतर्गत सुमारे 51 कोटी रूपयांची मंजुरी मिळाली आहे. 

या विकास कामाबाबतच्या करारावर स्वाक्षरी झाल्याने साडेतीन शक्तीपिठांमध्ये समावेश असलेल्या रेणुकामातेच्या मंदिरात 'रोप वे'ने जाऊन दर्शन घेण्याचे भाविकांचे स्वप्न लवकर पूर्णत्वास येत आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर विशेषतः वयोवृद्ध भाविकांचा त्रास कमी होणार असून, माहूर गडाला भेट देणाऱ्या नागरिकांमध्ये मोठी वाढ होणे अपेक्षित आहे. त्यातून या तीर्थक्षेत्राच्या विकासासमवेत जिल्ह्यातील पर्यटन स्थळाच्या विकासालाही आता गती मिळेली आहे.

शुक्रवार, सप्टेंबर १७, २०२१

महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम 1981 मधील महत्वाच्या तरतुदी ! रजेची सर्वसाधारण तत्वे

 


महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम 1981

मधील महत्वाच्या तरतुदी


रजेची सर्वसाधारण तत्वे

1. रजा हक्क म्हणून मागता येत नाही (नियम 10)

2. रजा मंजूर करणारा सक्षम अधिकारी प्राधिकारी लोकसेवेच्या निकडीमुळे रजा नाकारु शकतो किंवा रद्द करु शकतो. (नियम 10)

3. रजा मंजूर करणा-या प्राधिका-यास कर्मचा-याने मागितलेल्या रजेचा प्रकार बदलता येत नाही. त्यासाठी कर्मचा-याची लेखी विनंती असली पाहिजे. (नियम 10)

4. कर्मचारी सेवेत असताना त्याच्या विनंतीवरुन भूतलक्षी प्रभावाने एका प्रकारच्या रजेचे दुस-या प्रकारच्या रजेत परिवर्तन करता येते. मात्र त्यावेळी तशी रजा अनुज्ञेय असली पाहिजे. रजेच्या परिवर्तनामुळे जादा देण्यात आलेल्या रकमेची वसुली केली जाते किंवा थकबाकीची रक्कम दिली जाते. (नियम 4)

5. अनुपस्थितीचा कालावधी भुतलक्षी प्रभावाने असाधारण रजेत परिवर्तीत करता येतो. अशा प्रकारची रजा ही उपभोगण्यापुर्वी अर्ज करुन मंजूर करुन घेतली जात नाही. अनुपस्थिती नियमित करण्यासाठी ही रजा नंतर मंजूर केली जाते. (नियम 63(6))

6. कोणत्याही प्रकारची रजा सतत 5 वर्षाहून अधिक कालावधीकरीता मंजूर करता येत नाही. पुर्वी 5 वर्षे अनुपस्थित राहिल्यास नोकरी गमवावी लागत होती (BCSR) पण आता सलग रजा मंजुरीस प्रतिबंध नियम 16

7. रजेच्या कालावधीत नोकरी किंवा व्यवसाय सक्षम प्राधिका-याच्या पूर्व मंजुरीशवाय स्वीकारता येत नाही. 24 तास सरकारी नोकर हे तत्व या मागे असल्याने अशी परवानगी सहसा मिळत नाही. (नियम 16)

8. राजपत्रित कर्मचा-यास शासकीय वैदयकीय अधिका-याच्या वैदयकीय प्रमाणपत्राच्या आधारे वैदयकीय कारणास्तव रजा मंजुर करता येते. अराजपत्रित कर्मचा-यांना नोंदणीकृत वैदयक व्यवसायीच्या वैदयकीय प्रमाणपत्राच्या आधारे वैदयकीय रजा मंजुर करता येते. (नियम 40)

9. रजा मंजुर करणा-या सक्षम प्राधिका-याला स्वेच्छा निर्णयानुसार दुसरे वैदयकीय मत घेता येते. सामान्यत: रजेचा अर्ज आल्याबरोबर म्हणजे रजा चालू असताना ही कार्यवाही अपेक्षित. कर्मचारी परत हजर होताना ही कार्यवाही केली जाते व ती निरुपयोगी ठरते. (नियम 41)

10. वैदयकीय कारणास्तव रजेवर असलेल्या कर्मचा-याने वैदयकीय स्वास्थ्य प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय त्याला कामावर घेता येत नाही. (नियम 47)

11. रजा संपल्यानंतर कामावर अनुपस्थित राहिल्यास शिस्तभंगाची कार्यवाही (नियम 48)

12. रजा संपण्याचा दिवस ते कामावर रुजू होण्याचा दिवस या दरम्यानचा संपूर्ण कालावधी (रविवार व सुट्टया धरुन) अनुपस्थितीचा काळ म्हणून धरण्यात येते. (नियम 49)

13. रजेच्या मागे किंवा पुढे जर सार्वजनिक सुट्टया असतील तर त्या जोडून घेता येतील. कार्यालयीन कामकाज करणा-यांना ही सवलत मिळते पण Field मध्ये जर पर्यायी कर्मचारी उपलब्ध असेल तरच हा लाभ मिळेल.

14. राजीनाम्यामुळे कर्मचा-याच्या शिल्लक रजेवरील हक्क सामान्यत: संपतो. परंतु सरकारी कर्मचा-याने आपल्या पदाचा राजीनामा देवून शासनाच्या अन्य विभागास नामनिर्देशनाने नेमणूक स्वीकारल्यास तो राजीनामा तांत्रिक दृष्टया त्या पदाचा समजावा. शासकीय सेवेचा नाही त्यामुळे राजीनाम्याच्या दिवशी शिल्लक असलेली सर्व रजा नवीन नियुक्तीच्या ठिकाणी हिशोबात घेण्यात यावी. (नियम 22)


रजेचे प्रकार

देय व अनुज्ञेय रजा

1) अर्जित रजा - नियम 50 व 51

2) अर्धवेतनी रजा - नियम 60

3) परीवर्तीत रजा - नियम 61

4) अनर्जित रजा - नियम 62

5) असाधारण रजा - नियम 63


विशेष रजा

1) प्रसूति / गर्भपात रजा - नियम 74

2) विशेष विकलांगता रजा - नियम 75

     (हेतुपुरस्कर झालेल्या इजेबद्दल)

3) विशेष विकलांगता रजा - नियम 76

     (अपघाती इजेबद्दल

4) रुग्णालयीन रजा - नियम 77

5) खलाशांची रजा - नियम 78

6) क्षयरोग / कर्करोग / कुष्ठरोग /   

   पक्षघात रजा - नियम 79 व परिशिष्ट -3

7) अध्ययन रजा नियम

(टीप : अनु क्र. 3 व 4 हे ही अर्धवेतनी रजेचाच उप प्रकार आहे.)


देय व अनुज्ञेय रजेची वैशिष्टये  


(1) अर्जित रजा – नियम 50

1. प्रत्येक कॅलेंडर वर्षाच्या जानेवारी आणि जुलै महिन्याच्या 1 तारखेस‍ प्रत्येकी 15 दिवस याप्रमाणे दोन हप्त्यांमध्ये ही रजा जमा केली जाते.

2. ही रजा 300 दिवसांच्या कमाल मर्यादेपर्यंत साठविता येते. 300 दिवस झाल्यावर पुढील सहामाहिच्या सुरुवातीला 15 दिवस अनुज्ञेय असतात पण, 300 + 15 असे दाखवावे व घेतलेली रजा प्रथम 15 दिवसातुन वजा करावी च 300 पेक्षा जास्त शिल्लक राहिलले दिवस व्यपगत होतील. मात्र एकाच वेळी सलग 180 दिवसापर्यंत ही रजा मंजुर करता येते.

3. प्रत्येक पूर्ण कॅलेंडर महिन्याना अडीच दिवस दराने ही रजा जमा केली जाते.

4. सेवेचा कॅलेडर महिना पूर्ण नसल्यास तो महिना सोडावयाचा असतो.

5. असाधारण रजा / अकार्य दिन / निलंबन या कालावधी साठी 1/10 या दराने ही रजा कमी केली जाते. मात्र 15 दिवसापेक्षा जास्त कपात करता येणार नाही.

6. रजेचे दिवस अपूर्णांकात असल्यास ते पुढील दिवसांशी पूर्णांकात केले जातात.

7. शक्यतोवर‍ परिशिष्ट - 5 मधील नमुना – 1 मध्ये या रजेसाठी अर्ज करावयाचा असतो.

8. रजा वेतन :- रजेवर जाण्यापूर्वीच्या दिवशी ज्या दराने वेतन आहरित केलं त्याच दराने सुंपूर्ण रजा काळात “रजा वेतन” मिळेल. वेतनवाढ जरी रजा काळात आली तर वेतनवाढ मिळते परंतु प्रत्यक्ष लाभ रजा संपवून हजर झाल्यावर मिळेल.


(2) अर्धवेतनी रजा

1. प्रत्येक कॅलेंडर वर्षाच्या जानेवारी आणि जुलै महिन्याच्या 1 तारखेस‍ प्रत्येकी 10 दिवस याप्रमाणे दोन हप्त्यांमध्ये ही रजा आगाऊ जमा करण्यात येते.

2. ही रजा पूर्ण कॅलेंडर महिन्याना 5/3 या दराने जमा करण्यात येते.

3. कॅलेंडर महिना पूर्ण नसल्यास तो महिना सोडावयाचा असतो.

4. अकार्य दिनाच्या कालावधीसाठी ही रजा 1/18 या दराने कमी केली जाते.

5. रजेचे दिवस अपूर्णांकात येत असल्यास ते नजीकच्या दिवसांत पूर्णांकित केले जातात.

6. ही रजा कोणत्याही कारणास्तव घेता येते.

7. या रजेच्या साठवणुकीवर मर्यादा नाही.

8. या रजेसाठी विहित नमुन्यात अर्ज करावयाचा असतो. (परिशिष्ट -5 नमुना -1)

9. रजा वेतन :- या काळात रजेवर जाण्यापूर्वीच्या दिवशी ज्या दराने वेतन आहरित केलं त्याच दराच्या 50% वेतन व त्यावर आधारित महागाई भत्ता मिळतो मात्र, घरभाडे भत्ता व शहर पुरक भत्ता मागील महिन्याच्या दराने अनुज्ञेय.


(3) परिवर्तीत रजा – नियम 61

ही रजा वैदयकीय प्रमाणपत्रावर खालील अटींच्या अधीन राहून मंजूर केली जाते.

1. कर्मचारी कामावर परत येण्याची रजा मंजूर करणा-या अधिका-याची खात्री पटली पाहिजे.

2. पूर्णवेतनी रजेच्या स्वरूपात मंजूर केली जाते.

3. दुप्पट दिवस अर्धवेतनी रजेच्या खाती टाकले जातात.

4. कर्मचारी सेवेत परत न आल्यास या रजेचे रुपांतर अर्धवेतनी रजेत केले जाते व अति प्रदानाची रक्कम वसूल करण्यात येते.

5. रजा वेतन :- अर्जित रजेवर गेल्यावर मिळते   

   त्याचदराने म्हणजे पूर्ण दराने रजा वेतन अनुज्ञेय 

अपवाद – खालील प्रकरणी ही रजा मंजूर करण्यासाठी वैदयकीय प्रमाणपत्राची आवश्यकता नसते.

1. प्रसुती रजेला जोडून 60 दिवसांच्या मर्यादेपर्यंत बालसंगोपनासाठी

2. लोकहितास्तव उच्च अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी 90 दिवसांपर्यंत.

3. विपश्चनेसाठी 14 दिवसांपर्यत, तीन वर्षातून एकदा / संपूर्ण सेवेत 6 वेळा 

4. शिक्षक संवर्गासाठी प्रत्येक सहामाहित त्यांना अनुज्ञेय 10 दिवस  

     अर्धवेतनी रजेएवढी 5 दिवस पूर्ण वेतनी रजा शासन निर्णय दि. 

     6/12/96 प्रमाणे घेता येईल. मात्र या रजेस अर्जित रजा असे  

     संबोधले आहे.


(4) अनर्जित रजा – नियम 62

1. कोणतीच रजा शिल्लक नसल्यास ही रजा मंजूर करता येते. म्हणजेच हा रजचा over draft आहे.

2. ही रजा अर्धवेतनी स्वरुपात मंजूर करता येते.

3. संपूर्ण सेवेच्या कालावधीत 360 दिवसांपर्यंत ही रजा मंजूर करता येते.

4. एकावेळी वैदयकीय प्रमाणपत्राखेरीज 90 दिवसांपर्यंत व वैदयकीय प्रमाणपत्र धरून जास्तीत जास्त 180 दिवसांपर्यंत ही रजा मंजूर करता येते.

5. ही रजा मंजूर केल्यानंतर जेवढी अर्धवेतनी रजा अर्जित होते त्या रजे मधून अनर्जित रजा वजा करता येते.


6. ही रजा मंजूर केल्यानंतर कामावर परत न आल्यास रजा वेतनाची वसुली केली जाते.


7. ही रजा फक्त सेवेत कायम असलेल्या कर्मचा-यांनाच मंजूर करता येते.


8. रजा वेतन :- अर्धवेतनी रजेप्रमाणे रजा वेतन या रजेत मिळते.


(5) असाधारण रजा – नियम 63

1. कोणतीही रजा अनुज्ञेय नसेल किंवा असताना देखील स्पष्टपणे असाधारण रजेची मागणी केली तरच ती रजा मंजूर करता येते.

2. कायम सेवेतील कर्मचा-याला कोणत्याही प्रकारची रजा 5 वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी मंजूर करता येत नाही.

3. अस्थाई कर्मचा-यांना ही रजा खालील मर्यादेर्यंत मंजूर करता येते :-

4. कोणताही कर्मचारी - वैदयकीय प्रमाणपत्राशिवाय - 3 महिन्यांपर्यंत.

5. तीन वर्षाच्या सेवेनंतर -वैदयकीय प्रमाणपत्राच्या आधारे 6 महिन्यांपर्यंत.

6. पाच वर्षाच्या सेवेनंतर - वैदयकीय प्रमाणपत्राच्या आधारे 12 महिन्यांपर्यंत.

7. एक वर्षाच्या सेवेनंतर - कर्करोग, मानसिक रोग यासाठी - 12 महिन्यांपर्यंत.

8. एक वर्षाच्या सेवेनंतर - क्षयरोग, कुष्ठरोग यासाठी - 18 महिन्यांपर्यंत

9. तीन वर्षाच्या सेवेनंतर - लोकहितार्थ उच्च अभ्यासक्रमासाठी - 24 महिन्यांपर्यंत

10. रजा वेतन :-या रजमध्ये वेतन व महागाई भत्ता अनुज्ञेय नाही पण रजेवर जाण्यापुर्वी ज्या दराने घरभाडे भत्ता व स्थानिक भत्ता दिला जात होता ते मात्र घरभाडयावर त्या मुख्यालयात कर्मचारी खर्च करतोय असे प्रमाणपत्र सक्षम अधिका-यांना देणे गरजेचे आहे. शा. नि. दि. 4/9/2000. याबाबतची खात्री सक्षम अधिका-याने करणे गरजेचे असून त्यांचे समाधान झाल्यावर सदर फायदा देता येईल.


विशेष रजेची वैशिष्टये

(1) प्रसुती रजा / गर्भपात रजा - नियम 74

1. महिला शासकीय कर्मचा-यांना प्रसुती रजा खालीलप्रमाणे अनुज्ञेय ठरते :-

2. पुर्वशर्त :- दोनपेक्षा कमी हयात मुले असावीत.

3. महिला कर्मचा-यांना 180 दिवस. पूर्ण वेतनी रजेच्या स्वरुपात.

4. शासन निर्णय दि. 15/1/2016 अन्वये स्थायी /अस्थायी महिला कर्मचा-यांना पुर्ण वेतन अनुज्ञेय.

5.अस्थायी महिला कर्मचा-यांकडून सेवा समाप्तीनंतर दोन वर्षे सेवा करण्याची हमीपत्र लिहून घ्यावे.

6. याशिवाय शा. नि. 28/7/1995 प्रमाणे या रजेस बालसंगोपनासाठी 60 दिवसांची परावर्तीत रजा व अनर्जित रजा किंवा अनुज्ञेय रजा धरुन 1 वर्षापर्यंत मंजूर करता येईल.

7.विकलांग अपत्य असल्यास महिला कर्मचारी व पत्नी नसलेले पुरुष कर्मचारी हयांना संपुर्ण सेवेत 730 दिवस विशेष रजा अनुज्ञेय (शा. नि. 21/9/2016)

गर्भस्त्राव / गर्भपात

1. प्रसुती रजेच्या वरील अटी व शर्तींच्या अधीन राहून संपूर्ण सेवेच्या कालावधीत 45 दिवस. परंतु दोन पेक्षा कमी हयात अपत्ये ही अट यासाठी लागू नाही.

2. दत्तक मुलांसाठी विशेष रजा शा. नि. वित्त विभाग क्रमांक अरजा/2495/26/सेवा 9 दिनांक 26/10/1998

3. मुल 1 वर्षाचे आत असल्यास 180 दिवस

4. मुल 1 वर्षाचे पुढे असल्यास 90 दिवस

5. स्वत:चे एक अपत्य असतानाही घेता येईल.

6. या रजेस जोडून बाल संगोपन अअ (E L सुद्धा) घेता येईल. शा. नि. वि. वि. 15/3/2017


(2) विशेष विकलांगता रजा

(अ) हेतूपुरस्पर झालेल्या इजेबद्दल – नियम 75

1.पदाच्या कर्तव्याचे योग्य पालन करीत असताना त्याच्या परिणाम किंवा हेतुपुरस्पर झालेली इजा.

2. विकलांगता घटना उदभवल्यापासून तीन महिन्याच्या आत उघड होणे आवश्यक.

3. तथापि सक्षम प्राधिका-याची खात्री पटल्यास झालेला विलंब क्षमापित करता येतो.

4. रजा कोणत्याही एका विकलांगतेच्या परिणामी 24 महिन्यापेक्षा अधिक असता कामा नये.

रजा वेतन -

1. पहिल्या 120 दिवसांसाठी – अर्जित रजा वेतनाइतकी 

2. उरलेल्या कालावधीसाठी – अर्धवेतनी रजेइतकी. 

3. स्वेच्छेनुसार कर्मचारी आणखी जास्तीत जास्त 120 दिवसांच्या कालावधीसाठी अर्जित रजा वेतन घेऊ शकतो. अशावेळी रजा अर्धवेतनी रजेच्या खाती खर्ची


2) रुग्णालयीन रजा – नियम 77

वर्ग – 4 चे कर्मचारी व यंत्रसामुग्री, स्फोटके द्रव्ये, विषारी औषधे हाताळणारे वर्ग -3 चे कर्मचारी यांनाच फक्त अनुज्ञेय असते.

पदाची कर्तव्ये पार पाडत असताना

रजेचा कालावधी जास्तीत जास्त 28 महिने

रजा वेतन – 

पहिल्या 120 दिवसांसाठी – अर्जित रजा वेतनाएवढी

उरलेल्या कालावधीसाठी – अर्धवेतनी रजा वेतनाएवढी


4) क्षयरोग/कर्करोग/कुष्ठरोग/पक्षघात रजा – नियम 79 व परिशिष्ट -3

1. ही रजा मंजूर करण्यासंबंधीचे नियम  

2. परिशिष्ट -3मध्ये नमूद करण्यात आले आहेत.

 नियम – 1- व्याप्ती

रोजंदारी /अंशकालीन कर्मचारी वगळून सर्व कर्मचा-यांना लागू आहेत.

स्थायी – सर्व सवलती अनूज्ञेय

अस्थायी – तीन वर्षाची सेवा – सवलती अनुज्ञेय

1. 1 ते 3 वर्ष सेवा – आर्थिक व पूर्ण वेतनी क्षयरोग रजा सोडून इतर सवलती.

2. एक वर्षापेक्षा कमी सेवा – कोणतीही सवलत अनुज्ञेय नाही. (शासकीय इस्पितळातील मोफत उपचार सोडून)

3. निलंबनाधीन कर्मचा-यास वरीलप्रमाणे अनुज्ञेय.

4. रजेसाठी तपासणी – मु्ंबई -जी.टी./जे .जे. रुग्णालय

5. अन्यत्र महाराष्ट्रात – जिल्हा शल्य चिकित्सालय किंवा नजीकचे शासकीय रुग्णालय.

6. तपसणी खर्च आकारला जात नाही.

7. प्रथम खात्यावर शिल्लक असलेली अर्जित रजा. तद्नंतर एक वर्षाच्या मर्यादेपर्यंत क्षयरोग रजा – तद्नंतर वैदयकीय सल्ल्यानुसार असाधारण रजा. सर्व प्रकारच्या रजांच्या कालावधीची मर्यादा तीन वर्ष.

8. सक्षम प्राधिकारी – प्रादेशिक‍ अधिकारी / विभाग प्रमुख

9. रजेवर असताना उपचार – शासकीय / खाजगी वैदयकीय अधिकार

10. कामावर रुजू होण्यासाठी वैदयकीय तपासणी – वैदयकीय मंडळाचे प्रमाणपत्र

11. आर्थिक सवलत – विशेष आहार खर्च, विशेष औषधांचा खर्च, आरोग्यधामाचा खर्च 

12. दुस-या /तिस-या वेळी सवलती मंजूर करण्यास सक्षम प्राधिकारी –

13. विभागप्रमुख – दुस-यांदा

14.शासन – तिस-यांदा

15. पुनर्नियुक्ती – वैदयकीय प्रमाणपत्राच्या आधारे नियुक्ती प्राधिकारी पुनर्नियुक्ती देऊ शकतात. प्रथम नियुक्तीच्या वेळी वैदयकीय तपासणी झाली असल्यास पुनर्नियुक्तीच्या वेळी वैदयकीय तपासणीची आवश्यकता नसते.पूर्वीच्या सेवा व वेतन संरक्षित केले आहे.

क्षयरोग रजा मंजूरी

1. कर्करोग / कुष्ठरोग/पक्षाघात झालेल्या शासकीय कर्मचा-यांना क्षयरोग सवलती लागू आहेत. तसेच शा. नि. दि. 20/01/2005 प्रमाणे एड्सग्रस्तांनाही सदर सवलत अनुज्ञेय केली आहे परंतु एचआयव्ही पॉझिटिव्ह यांना मात्र अनुज्ञेय नाही.

2. क्षयरोग सवलती तीन हयात मुलांएवढे मर्यादेत असलेल्या कुटुंबाच्या कर्मचा-यास अनुज्ञेय ठरतात. दि. 20/3/2005 पासून शासनाने छोटया कुटुंबाची मर्यादा दोन हयात अपत्यांची संख्या विहित केली असल्याने या तारखेनंतर तिसरे अपत्य कुटुंबात वाढल्यास अशा कुटुंबातील कर्मचा-यास सदर सवलत मिळणार नाही.

सेवानिवृत्त सवलती बंद होतात.

रजा वेतन :- 

अर्जित रजेप्रमाणे या रजा काळात पुर्ण दराने वेतन अनुज्ञेय.


अध्ययन रजा

1. कर्तव्यक्षेत्राशी संबंध असलेल्या विषयातील उच्च शिक्षण / पाठयक्रम भारतामध्ये किंवा भारताबाहेर पूर्ण करण्यासाठी

2. कमीत कमी पाच वर्षाची सेवा

3. रजा संपल्यावर कामावर परत येणे आवश्यक –कमीत कमी 3 वर्षे सेवा करणे गरजेचे आहे.

4. हक्क म्हणून मागता येत नाही.

5. एकाच व्यक्तीला वारंवार मंजूर करता येत नाही.

6. भारताबाहेरील अभ्यासक्रमासाठी अभ्यासक्रम भारतात उपलब्ध नसल्याने सक्षम प्राधिका-याचे प्रमाणपत्र आवश्यक.

7. अभ्यासक्रम/प्रशिक्षण लाकहिताच्या दृष्टीने निश्चित लाभदायक असल्याचे सक्षम प्राधिका-याचे प्रमाणपत्र आवश्यक.

8. रजा कालावधी 12 ते 24 महिने.


किरकोळ रजा

1. रजेचा प्रकार नाही. पूर्व परवानगी आवश्यक.

2. कर्तव्य काळातून दिलेली तात्पुरती सूट.

3. वर्षाच्या 8 दिवस अनुज्ञेय.

4. सार्वजनिक सुट्टीस जोडून / अधेमधे घेता येईल.

5. सार्वजनिक सुट्टीस जोडून सलग 7 दिवसांपेक्षा जास्त काळ घेता येत नाही.

6. सेवा पुस्तकात नोंद नाही / स्वतंत्र नोंदवहीत हिशोब ठेवणे

शासन निर्णय वित्त्‍ा विभाग -

1. एलव्हिइ 1482 सीआर 90/एसईआर 9 दि. 24/3/1982 2. ने.मि.र./प्र.क्र.52/98 सेवा – 9 दि. 21/12/1998.


मोबदला सुट्टी

1. निम्नश्रेणी कर्मचा-यांनी सार्वजनिक सुट्टी मध्ये केलेल्या कामाचा मोबदला सुट्टी.

2. एका कॅलेंडर वर्षात एका वेळी तीन पेक्षा जास्त साठवता येत नाही.

3. पुढील कॅलेंडर वर्षात उपयोगात आणता येणार नाही.

4. जादा कामाचा आर्थिक फायदा दिल्यास मोबदला सुट्टी अनुज्ञेय नाही.

शा. नि. साप्रवि/क्र.पी 13/1397/वी/दि.16/7/64

सोमवार, सप्टेंबर १३, २०२१

नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू ! मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी ही आहे शेवटी तारीख...

 


  • मतदार नोंदणी करण्यासाठी त्वरा करा.....

दिनांक ९ आॕगस्ट २०२१ पासून ते ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत  नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू झाला आहे.तरी १ जानेवारी२०२२ पर्यंत वय वर्षे १८ पूर्ण होणाऱ्या नवीन मतदारांनी खालील कागदपत्रांसह  मतदान केंद्रस्तरिय अधिकारी   [B L O] यांच्याकडे संपर्क साधावा.


🛑 नवीन मतदार नोंदणीसाठी कागदपत्रे

➡️ घरातील मुलगा/मुलगी यांच नाव मतदार यादीत नाव नोंदणीसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.

१) जन्म पुरावा-शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट

२) रहिवासी बाबत स्वयंघोषणा दाखला स्वत:च्या सहीचा

३) आधार कार्ड झेरॉक्स

४) २ पासपोर्ट साईज फोटो

५) घरातील नात्यातील(आई, वडील, भाऊ, बहीण)यांपैकी एकाचे ज्यांचे नाव अगोदर मतदार यादीत समाविष्ठ असेल तर त्यांच्या मतदान ओळखपत्राची झेरॉक्स


➡️ घरातील सुनबाईचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.

१)जन्म पुरावा-शाळा सोडल्याचा दाखला/बोनाफाईड सर्टिफिकेट

२)रहिवासी बाबत स्वयंघोषणा दाखला स्वत:च्या सहीचा

३)२ पासपोर्ट साईज फोटो

४)माहेरच्या गावात मतदार यादीत नाव असेल तर ते नाव कमी केल्याचा दाखला.

५)माहेरच्या गावात मतदार यादीत नाव नसेल तर यादीत नाव नसल्याचा दाखला

६)पतीचे मतदार ओळखपत्र झेरॉक्स

७)लग्नपत्रिका किंवा विवाह नोंदणी दाखला


🔵संपर्क🔵

आपल्या गावातील वार्डनुसार बीएलओ

➡️ अंतिम मुदत - 30/09/2021


🔵  टीप - १ जानेवारी २०२२ ला आपले वय १८ वर्ष  पाहिजे असे सर्व स्त्री व पुरुष मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी पात्र🔵


✍ मतदारांनी आपली नावे नोंदवून घ्यावीत

"चला मतदार होवू या,

 लोकशाही प्रबळ करु या"

e-Shram Card : असंघटित क्षेत्रातील कामगार ज्यांचा पीएफ कापला जात नसेल आणि ईएसआयसीचा लाभ मिळत नसेल तर त्वरीत मोफत ई-श्रम कार्ड काढून घ्या



 नवी दिल्ली : दि १३ सप्टेंबर २०२१ – e-Shram | जर तुम्ही असंघटित क्षेत्रात काम करणारे श्रमिक आहात आणि तुमचा पीएफ कापला जात नसेल आणि ईएसआयसीचा लाभ मिळत नसेल, तसेच तुमचे वय 16 वर्षापेक्षा जास्त आणि 60 वर्षापेक्षा कमी आहे आणि इन्कम टॅक्स भरत नसाल तर ताबडतोब e-Shram कार्डसाठी अप्लाय करा. यामुळे एक रुपये देखील खर्च न करता दोन लाख रुपयांचा दुर्घटना विमा मिळण्याचा अधिकार तुम्हाला मिळू शकतो. याशिवाय आणखी खुप फायदे आहेत.

नोंदणी करण्याचे ठिकाण
व्यक्ती स्वता आपली नोंदणी आपल्या मोबाईलवर करू शकते तसेच देशभरातील आपल्या जवळच्या कोणत्याही  कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC Center), महा ई सेवा केंद्र (MAHA-E Seva Kendra),  ग्रामपंचायत कार्यालयामधील आपले सरकार सेवा केंद्राच्या संगणक परीचालकाकडे (डाटा एन्ट्री ऑपरेटर) देेेखील करु शकता. नोंदणीच्या नंतर व्यक्तीला युनिव्हर्सल अकाऊंट नंबरसह ई-श्रम कार्ड जारी होईल. रजिस्ट्रेशनसाठी सरकारने 14434 टोल फ्री नंबरसुद्धा ठेवला आहे, जिथे योजनेसंबंधी सर्व माहिती घेता येऊ शकते. या पोर्टलद्वारे राज्य सरकार सुद्धा आपल्या कामगारांचे रजिस्ट्रेशन करू शकतात.


27 लाख कामगारांनी केली नोंदणी

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत असंघटित क्षेत्रातील 27 लाख कामगारांनी आतापर्यंत ’e-Shram’ पोर्टलवर नोंदणी केली आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री रामेश्वर तेली यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात म्हटले की, e-Shram पोर्टलवर असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी विविध शिबिरांचे आयोजन केले जात आहे. या पोर्टलचा जास्तीत जास्त प्रचार आणि पसार केला पाहिजे.

कशासाठी आहे ही योजना

केंद्रीय मंत्र्यांनी म्हटले की, सर्व असंघटित कामगारांचा एक राष्ट्रीय डेटाबेस तयार केल्याने सरकारला असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी योजना आणि शेवटच्या स्तरापर्यंत वितरणावर लक्ष देण्यास मदत होईल.


रजिस्ट्रेशनमुळे कोणता फायदा होईल

केंद्रीय मंत्र्यांनी म्हटले की, 

पोर्टलवर नोंदणी केल्याने दोन लाख रुपयांचा अपघात विमा मिळेल.

 जर कुणी कर्मचारी e-Shram पोर्टलवर नोंदणीकृत आहे आणि अपघातात त्याचा मृत्यू झाला किंवा स्थायी अपंगत्व आले तर त्याच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये आणि अंशता अपंगत्व आल्यास एक लाख रुपये मिळतील.

 नोंदणी केल्यानंतर कामगारांना एक युनिक खाते क्रमांक प्रदान केला जाईल,
जो विशेष प्रकारे प्रवासी मजूरांसाठी सामाजिक सुरक्षा योजना,
रेशन कार्ड इत्यादीची पोर्टेबिलिटी सोपी बनवेल.


रविवार, सप्टेंबर १२, २०२१

येलो (Yellow) अलर्ट : नांदेड जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

 


 पूर परिस्थितीत नागरिकांनी सतर्क / जागरूक रहावे  


नांदेड, दि. 12 सप्टेंबर 2021 :- मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने आज दिलेल्या सूचनेनुसार 13 व 14 सप्टेंबर या कालावधीत नांदेड जिल्ह्यासाठी येलो (Yellow) अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार 13 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. तर 14 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरीकांनी पुढील प्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

वादळ, मेघ गर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना : काय करावे आणि काय करु नये 

पुढील गोष्टी करा : विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. 

पुढील गोष्टी करु नका : आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. 

पूर परिस्थितीत : काय करावे आणि काय करू नये 

पूर येण्यापूर्वी : अफवांकडे दुर्लक्ष करा, शांत रहा, घाबरू नका. आपत्कालीन परिस्थितीसाठी एस.एम.एस. चा उपयोग करा. आपले मोबाईल फोन चार्ज करून ठेवा. हवामानातील बदलांची अद्ययावत माहितीसाठी रेडीओ ऐका, टी.व्ही. पहात रहा, वर्तमानपत्र वाचत रहा. गुरेढोरे /पशूच्या सुरक्षिततेची सोय सुनिश्चित करून घ्या. सुरक्षित जगण्यासाठी आवश्यक वस्तूंसह आपत्कालीन कीट तयार ठेवा. आपली कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तू जलरोधक (वाटर-प्रूफ) बॅग मध्ये ठेवा. जवळपास असलेली निवारा/पक्के घराकडे जावयाचे सुरक्षित मार्ग जाणून घ्या. सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांच्या निर्देशनाचे पालन करा. कमीत कमी एका आठवड्यासाठी पुरेसे खाण्याजोगे अन्न आणि पिण्यासाठी पाणी साठवा. पूर असलेल्या क्षेत्रातील कालवे, नाले, ड्रेनेज वाहिन्या यापासून नागरिकांनी सतर्क / जागरूक रहावे.

पूर दरम्यान : प्रवाहात प्रवेश करू नका. सिवरेज लाईन, गटारे, नाले, पूल,नदी, ओढे इत्यादी पासून दूर रहा. विद्युत खांब आणि पडलेल्या वीज लाईन पासून दूर रहा. ओपन ड्रेन किंवा धोक्याच्या ठिकाणी चिन्हे (लाल झेंडे किंवा बॅरीकेड्स) सह चिन्हांकित करा. पुराच्या पाण्यामध्ये चालू नका किंवा गाडी चालवू नका. लक्षात ठेवा, दोन फुट वाहणारे पुराचे पाणी मोठ्या मोटारींना सुद्धा वाहून नेऊ शकते. ताजे शिजलेले किंवा कोरडे अन्न खा. आपले अन्न झाकून ठेवा. उकळलेले / क्लोरीन युक्त पाणी प्या. आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी जंतुनाशकाचा वापर करा. 

पूर येऊन गेल्यानंतर : मुलांना पुराच्या पाण्यामध्ये किंवा जवळपास खेळू देऊ नका. कोणतीही खराब झालेली विद्युत वस्तू वापरू नका, त्यापूर्वी तपासणी करा. सूचना दिल्या असल्यास, मुख्य स्विचेस आणि विद्युत उपकरण बंद करा तसेच ओले असल्यास विद्युत उपकरणांना स्पर्श करू नका. तुटलेली विद्युत खांब आणि तारे, तीक्ष्ण वस्तू आणि मोडतोड अथवा पडझड झालेल्या वस्तूंपासून सावध रहा. पुरातील पाण्यात वाहून आलेले अन्न खाऊ नका. मलेरिया पासून बचाव करण्यासाठी डासांच्या जाळीचा वापर करा. सापांबद्दल सावधगिरी बाळगा कारण पुरामध्ये सर्पदंश होण्याची शक्यता असते. जर गटार लाईन फुटली असेल तर शौच्यालयाच्या किंवा पिण्याच्या पाण्याचा नळ वापरू नका.आरोग्य विभागाने सांगितल्याशिवाय नळाचे पाणी पिऊ नका. 

पूर आल्यावर सुरक्षित ठिकाणी जाण्याची वेळ आल्यास : घरातील वस्तू पलंगावर आणि टेबल्सवर ठेवा. शौच्यालयाच्या वाडग्यात वाळूच्या बॅग्स ठेवा आणि सांडपाणी परत येऊ शकते (बॅक फ्लो). ते टाळण्यासाठी सर्व ड्रेन होल झाकून ठेवा. वीज आणि गॅस कनेक्शन बंद करा. उंच मैदान/सुरक्षित निवारा येथे जा. आपत्कालीन कीट, प्रथमोपचार बॉक्स, मौल्यवान वस्तू आणि महत्त्वाची कागदपत्रे आपल्या बरोबर घ्या. खोल, अज्ञात पाण्यात प्रवेश करू नका; पाण्याची खोली तपासण्यासाठी काठी वापरा. जेंव्हा सक्षम अधिकारी आपल्या घराची तपासणी करून ते राहण्यास योग्य असल्याबाबत सांगतील व घरी परत जाण्याची परवानगी देतील तेंव्हाच घरात प्रवेश करा. कौटुंबिक संप्रेषण योजना बनवा. ओली झालेली प्रत्येक गोष्ट स्वच्छ आणि निर्जंतुक करा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी केले.

शनिवार, सप्टेंबर ११, २०२१

बाल लैंगिक प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यातील संशयितास मदत करण्यासाठी मागितली लाच ! लाचखोर सहायक पोलीस निरीक्षक समाधान वसंत बिलेला लाज कशी नाही वाटली ?

 


सांगली : मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकास २५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. समाधान वसंत बिले (वय ४२) असे त्या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. बाललैंगिक प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यातील संशयितास मदत करण्याच्या अमिषाने बिले याने लाच मागितली होती. त्याच्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बाललैंगिक प्रतिबंधक कायद्यांतर्गत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल झाली होती. त्या तक्रारीवरून एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी चौकशीची प्रक्रिया सुरू होती. पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान बिले यांनी संबंधित संशयिताला या गुन्ह्यातून बाहेर काढू, असे सांगितले. गुन्हा दाखल करत नाही, असे म्हणत मोठ्या रकमेच्या लाचेची मागणी केली.

संशयिताची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्याने पैसे देण्यास नकार दिला. अखेर चर्चेअंती तडजोड होऊन २५ हजार रुपये बिले यांना देण्याचे ठरले. याबाबतची तक्रार संशयिताने लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे २७ ऑगस्ट रोजी केली. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. बिले यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर बुधवारी रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाईसाठी सापळा रचला.

लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी पोलीस अधिकारी बिले याला मिरजेतील हिरा हॉटेल परिसरात बोलावण्यात आले. याठिकाणी लाचेची रक्कम स्वीकारताना पोलीस अधिकाऱ्यास रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या फिर्यादीनुसार लाचखोर पोलीस अधिकारी बिले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिले याच्या घराची झडती घेतली असून, अधिक तपास सुरू आहे. गंभीर गुन्ह्यात संशयिताला मदत करण्यासाठी बिले याने मोठ्या रकमेची मागणी केली होती. संशयितांना वाचवण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यानेच लाच घेतल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

गुरुवार, सप्टेंबर ०९, २०२१

येसगी येथील मांजरा नदीवरील जुना पुल क्षतिग्रस्त झाल्याने वाहतुकीस प्रतिबंध पर्याय मार्गाचा वापर करण्याबाबत अधिसूचना निर्गमीत

 


नांदेड, दि. 8 सप्टेंबर २०२१ :- बिलोली तालुक्यातील येसगी येथील मांजरा नदीवरील जुना पुल क्षतिग्रस्त झाल्यामुळे हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. त्याऐवजी पर्याय मार्गाचा वापर करण्याबाबत जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी अधिसूचना निर्गमीत केली आहे.

येसगी येथील मांजरा नदीवरील जुना पुलावरील मार्ग प्रतिबंध करण्यात आल्याने पर्यायी मार्ग जाण्या-येण्यासाठी पुढील प्रमाणे राहील. बिलोली शहराकडून बोधनकडे जाणारी वाहतुक ही बिलोली-कुंडलवाडी-धर्माबाद ते राज्य सीमेवरून बोधनकडे या मार्गे तर नांदेडहून हैद्राबादकडे जाणारी वाहतूक नांदेड-नरसी-देगलूर-मदनूर हैद्राबाद हा पर्यायी मार्ग राहील.

मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 मधील तरतुदीनुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी संबंधित विभागाने उपाययोजना करुन 8 सप्टेंबर 2021 पासून पुढील आदेशापर्यंत नमुद केलेल्या पर्यायी मार्गान सर्व प्रकारची वाहने वळविण्यास मान्यता दिली आहे.

लाचखोर कांबळे नावाच्या तलाठ्याने 25 हजाराची लाच मागितल्याने एसीबी पथकाने घेतले ताब्यात

 


*== प्रेसनोट ==*

*लाच मागणी कारवाई*

▶️ *युनिट -* नाशिक.

▶️ *तक्रारदार-* पुरुष, वय - 41 वर्ष, रा. मु.पो. शिरसमनी, ता. कळवण, जि. नाशिक 

▶️ *आलोसे-*  

श्री जयवंत केदु कांबळे,

वय 48, व्यवसाय-नौकरी, तलाठी, वर्ग -03, सजा-ओतूर, तहसील कार्यालय, कळवण, जि. नाशिक                                                      

▶️ *लाचेची मागणी-* 25,000/-₹

▶️ *लाचेची मागणी तारीख - 

 18/08/2021

▶️ *लाचेचे कारण -*.  

तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या शेतजमिनी चे 7/12 उताऱ्यावर नाव लावून नोंद टाकण्यासाठी लोकसेवक तलाठी श्री. कांबळे यांनी 30,000/- रूपयांची मागणी करून तडजोडीअंती 25,000/- रुपयांची मागणी केली म्हणून गुन्हा.                  

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत. ▶️ *सापळा अधिकारी -* जयंत शिरसाठ ,पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.,नाशिक. 

▶️ *सापळा पथक -* पोना/नितीन कराड, पोना/प्रभाकर गवळी, पोना/प्रवीण महाजन व पोना/शरद हेंबाडे

सर्व नेमणूक- लाप्रवि, नाशिक.           

▶ *मार्गदर्शक-* *1)* मा.श्री. सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.

*2)* मा.श्री. निलेश सोनवणे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. 

३) मा.श्री.सतीश भामरे सो, पोलीस उपअधीक्षक, वाचक, लाप्रवि, नाशिक.

▶ *आलोसे सक्षम अधिकारी-* मा. जिल्हाधिकारी, नाशिक.                                                                      

--------------------------------------

*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*

*अँन्टी करप्शन ब्युरो नाशिक*

*@ टोल फ्रि क्रं. 1064*

===================

लहान-मोठ्या पुराने सतत पाण्याखाली येणाऱ्या पुलांच्या नव्याने उभारणीबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय - सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

  


नांदेड, दि. 8 सप्टेंबर २०२१ :- नांदेड जिल्ह्यातील भौगोलिक रचना, गोदावरीसह इतर लहान-मोठ्या नद्या, नाले आणि ओढ्यांना येणारे पूर यात मोठ्या प्रमाणात लहान पुलांचे, ठरावीक ठिकाणी रस्त्यांचे अतोनात नुकसान होते. याचबरोबर जीवत हानीही वारंवार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. अतिवृष्टी झाली की सातत्याने यात होणारी हानी लक्षात घेता अशा जागेवर नव्याने पाण्याखाली न येणाऱ्या उंचीचे पूल उभारण्याबाबत गंभीरतेने विचार सुरू असून लवकरच याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. 

नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आढावा बैठक आज रात्री उशीरा त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त सुनिल लहाने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे व सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. 

ग्रामीण व राज्य महामार्गावरील सर्वच पुलांची पाहणी करणे आवश्यक झाले आहे. जे पूल अथवा पुलाचा काही भाग ज्या ठिकाणी वाहून जातो, जे पूल जलमय होतात अशा पुलांची वर्गीकरण करुन त्यांना प्राधान्यक्रमानुसार दुरुस्त करणे व त्याबाबत पर्यायी नियोजनाबाबतच्या सूचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. याचबरोबर पावसाळ्यामध्ये सातत्याने अपघात होणारी ठिकाणे निश्चित करुन त्याठिकाणी अपघात होऊ नये यासाठी क्रॅशबार अथवा इतर पर्याय आहेत का याची तपासणी करण्याचे त्यांनी निर्देश दिले. 

राष्ट्रीय महामार्गाची स्थिती ही अत्यंत दयनीय झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. यात औरंगाबाद ते नांदेड पर्यंत, नांदेड ते अहमदपूर-लातूर, नांदेड ते हदगाव, नांदेड ते देगलूर व पुढील मार्गावर मोठ्या प्रमाणावर दुरुस्तीची गरज आहे. याचाही सविस्तर आढावा घेण्याचे निर्देश त्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना देऊन याबाबत केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करुन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

सन 2006 नंतर नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नदी-नाल्यांना पूर आल्याने मोठे नुकसान झाले आहे. यात बऱ्याच ठिकाणी शेतातील उडीद व इतर पिके हातची आलेली गेलेली आहेत. काही ठिकाणी शेतातील मातीही खरबडून गेली आहे. शेतकऱ्यांना यातून सावरण्यासाठी पिक विमा योजना व इतर स्तरावर मदत करण्यासाठी तातडीने पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी कृषि विभागाला दिले.

जिल्ह्यातील 7 तलावांना हानी पोहचली असून 2 तलाव फुटले आहेत. 5 तलावांची दुरुस्ती आवश्यक आहे. ही दुरुस्ती तातडीने करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित विभागाला दिले. जिल्ह्यातील या अतिवृष्टीमुळे झालेल्या एकुण नुकसानीचा अंदाज घेऊन कामाचे प्राधान्यक्रम व यासाठी मदत व पूनर्वसन विभाग, जिल्हा परिषद आणि जिल्हा नियोजन विकास आराखड्याद्वारे नेमके कोणती कामे होऊ शकतील याचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना दिले. 

नांदेड महानगरात जवळपास 400 घरांमध्ये पाणी घुसले. यामुळे 580 लोकांना विस्थापीत केले असून त्यांची व्यवस्था मनपातर्फे केली जात आहे. विविध सेवाभावी संस्था मदतीसाठी पुढे येत असल्याची माहिती यावेळी मनपा आयुक्त सुनिल लहाने यांनी दिली. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे छायाचित्रासह सादरीकरण केले. याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांनी सादरीकरण केले.

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 53.90 मि.मी. पाऊस

  


नांदेड,दि. 8 सप्टेंबर २०२१ :- जिल्ह्यात सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11.28 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 53.90  मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात दिवसभरात एकुण 168.40 मिलीमीटर पाऊस झाला आहे.  

जिल्ह्यात सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11.28 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 31.2 (111.50), बिलोली 102 (258.90मुखेड- 205.1(497.20कंधार 91.5 (201.40), लोहा- 104.10 (200),हदगाव 10.5 (157.80),भोकर 16.80 (161.40देगलूर 87.1(192.60किनवट- 12.20 (140.30), मुदखेड 19.40 (89.10हिमायतनगर 36.90 (187.30माहूर- 1.70 (76.10 धर्माबाद- 47.90 (137.10), उमरी 20.50 (157) अर्धापूर 39.90 (161.70नायगाव- 71.90 (194.30याप्रमाणे आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा गोदावरी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग

 


नांदेड (जिमाका) दि. 8 :- सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून व यापूर्वी विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा वाढला आहे. याचबरोबर आज 8 सप्टेंबर रोजी निम्न दुधना प्रकल्पातून 36 हजार 640 क्युसेस विसर्ग पूर्णा नदीपात्रात सुरु आहे. माजलगाव या मोठ्या प्रकल्पातून 21 हजार 700 क्युसेस पाण्याचा विसर्ग चालू आहे. पुर्णा प्रकल्पाच्या (येलदरी व सिद्धेश्वर) पाणलोट क्षेत्रातुन पूर्णा नदीत 16 हजार क्युसेस विसर्ग चालू आहे. सिद्धेश्वर धरणाखाली मोठ्याप्रमाणावर पाऊस झाल्याने पुर्णा ब्रिजजवळ 1 लाख 18 हजार क्युसेस विसर्ग चालू आहे. या सर्व नद्यांचे पाणी गोदावरी नदीला येऊन मिळते. यामुळे विष्णुपुरी प्रक्ल्पातूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. 

विष्णुपुरी प्रकल्पाच्या 15 दरवाजातून 2 लाख 41 हजार 518 क्युसेस पाण्याचा विसर्ग चालू असल्याने गोदावरी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा वाढणे स्वाभाविक आहे. हा विसर्ग नियंत्रित रहावा यादृष्टीने विष्णुपुरी प्रकल्पाद्वारे तो नियंत्रीत करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न केला जात असला तरी नदीपात्रात पाण्याचा प्रवाह व येवा कमी झालेला नाही. नांदेड येथील जुन्या पुलावर आज 8 सप्टेंबर रोजी सायंकाळपर्यंत पाणी पातळी 352.40 मिटर इतकी आहे. इशारा पातळी 351 तर धोका पातळी 354 मीटर इतकी आहे. इशारा पातळीचा विसर्ग 2 लाख 13 हजार क्युसेस व धोका पातळीचा विसर्ग 3 लाख 9 हजार 774 क्युसेस आहे. 

विष्णुपुरी प्रकल्पातून सोडलेला विसर्ग व गोदावरी नदीत चालू असलेला विसर्ग यामुळे पाण्याची पातळी कमी झालेली नाही. त्यामुळे शहरातील नदीकाठच्या सर्व नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आला आहे. 

उर्ध्व मानार प्रकल्प व निम्म मानार प्रकल्पही शंभर टक्के भरला आहे. उर्ध्व पैनगंगा धरण 94.9 टक्के भरल्याने धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास गेटचे पाणी सोडण्यात येईल, अशा इशारा नांदेड पाटबंधारे विभागाने दिला आहे. यामुळे जिल्ह्यातील गोदावरी, पैनगंगा, पुर्णा, मानार नदीकाठच्या गावातील नागरिकांनी अधिक सतर्क राहून जिल्हा प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दोन लाचखोर सहायक पोलीस निरीक्षक एकाच दिवशी एकाच परिक्षेत्रातील दोन घटकातील पथकाच्या जाळ्यात

 

*Respected sir*

*Trap Case Report:*

➡ घटक :- पुणे

➡ तक्रारदार :- पुरूष,२२ वर्ष.

➡ आरोपी :- 

1)लोकसेवक- राहूल अशोक पाटील,वय-३३, पद- सहायक पोलीस निरीक्षक, नेमणूक- विमानतळ पोलीस स्टेशन, पुणे शहर. 

2) खाजगी इसम- संतोष भाऊराव खांदवे, वय - 45 वर्षे रा. लोहगाव , पुणे

▶️पडताळणी :- 07/9/2021,08/09/2021

➡️सापळा:-दि.08/09/2021

➡️ लाचेची मागणी : सुरुवातीस

रू.5,00,000/- (पाच लाख)

➡️तडजोडीअंती :- 300000/-रुपये 

➡️ लाच स्विकारली :- 

रु.1,00,000/-

➡ हकीकत:- तक्रारदार यांचे वडीलांवर विमानतळ पोलीस स्टेशन येथे फसवणुकीचा दाखल गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यामध्ये जामीन मिळण्यास मदत होईल यासाठी तपासात आवश्यक ती मदत करण्यासाठी नमूद आरोपीनी पाच लाख रुपयांची लाच मागणी करून आरोपी क्रं. 2 याने तडजोडीअंती 3,00,000/-रु. लाच मागणी करून 1,00,000/- रुपये लाच स्वीकारली .आरोपी लोकसेवक क्रमांक 1 यानी त्यास प्रोत्साहन दिले.

➡️पडताळणी व सापळा पथक:

पोलीस निरीक्षक - सुनील क्षीरसागर. 

पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे

पो.हवा. अंकुश माने

पो.शि. दिनेश माने.

म.पो.शि. पूजा पागिरे.    

चालक पो.शि.राऊत

ला.प्र.वि.पुणे युनिट .

➡️ मार्गदर्शन अधिकारी: -

 श्री राजेश बनसोडे पोलीस अधीक्षक,लाप्रवि पुणे परिक्षेत्र.

श्री सुरज गुरव,अपर पोलीस अधीक्षक,लाप्रवि पुणे.

श्री सुहास नाडगौडा,अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि पुणे.


*Respected sir,*

*TRAP Case Report:*

➡ घटक :- सांगली

➡ तक्रारदार :- पुरुष वय       

       41 वर्ष.

➡ आरोपी लोकसेवक :- 

   समाधान वसंत बिले

वयं 42, सहाय्यक पोलीस निरीक्षक नेमणुक मिरज ग्रा. पो. ठाणे जि. सांगली वर्ग 2

➡️पडताळणी दिनांक :-  

 27/8/21, 1/9/21, 7/9/21, 8/9/21

➡️सापळा दिनांक :- 8/9/2021       

➡️ लाच मागणी :-

 रु. 25,000 

➡️ लाच स्विकारली :-

 रु. 25,000/- 

➡ हकीकत :- तक्रारदार त्यांचे नातेवाईक यांना पो. ठाणेत दाखल गुन्ह्यात आरोपी न करणेसाठी आलोसे यांनी 25,000 रु. लाच मागणी करुन स्विकारताना रंगेहात पकडले आहे.

➡ सापळा पथक : - पो उप अधीक्षक सुजय घाटगे, सलीम मकानदार, पो.कॉ. अविनाश सागर, अजित पाटील, चालक पोना पवार.

➡मार्गदर्शन अधिकारी :- 

श्री राजेश बनसोडे,

पोलीस अधीक्षक, ला प्र वि पुणे परिक्षेत्र.

श्री सुरज गुरव, अपर पोलीस.अधीक्षक ला प्र वि पुणे परिक्षेत्र

 श्री. सुहास नाडगौडा, 

 अपर पोलीस अधीक्षक, ला प्र वि पुणे परिक्षेत्र

बुधवार, सप्टेंबर ०८, २०२१

प्रत्येक विभाग प्रमुखांनी प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचे त्वरीत पंचनामे करावेत - जिल्हाधिकारी

 


नांदेड, दि. सप्टेंबर 2021 : जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे जिल्ह्यातील सर्व तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांशी संवाद साधून आढावा घेतला. सप्टेंबरच्या तारखेपासून जिल्ह्यात काही भागात अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात कृषिक्षेत्राचे नुकसान झाल्याच्या विविध घटना समोर आल्या आहेत. यात काही ठिकाणी मनुष्यहानीसह शेतकऱ्यांचे पशुधनही वाहून गेले आहे. काल सप्टेंबर रोजी नाले व लहान नदी असलेल्या पुलांवरुन पाणी वाहू लागल्याने काही ठिकाणची वाहतुकही विस्कळीत झाली होती. या सर्व परिस्थितीचा एकत्रित आढावा तात्काळ घेण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रत्येक विभाग प्रमुखांना प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले.

जिल्ह्यातील अतिवृष्टीचा हवामान विभागाने दिलेला इशारा लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी तात्काळ संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांचे कृती दल स्थापन केले आहे. जिल्ह्यातील सर्व पाझर तलावांची सद्यस्थिती व उपलब्ध असलेला पाणीसाठा याचा आढावा घेण्याचे जबाबदारी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. काही भागात नाल्याच्या काठावर अथवा इतरत्र जर विविध जनावरे वाहून आल्याचे आढळले असल्यास त्याचा तात्काळ पंचनामा करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

जिल्ह्यात आतापर्यंत तीन वेळा विविध नैसर्गिक आपत्तीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले आहे. यातील जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये नुकसानीची ज्या शेतकऱ्यांनी माहिती देऊन पंचनामे करुन घेतले आहेत त्यांच्या व्यतिरिक्त सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची काळजीपूर्वक पंचनामे करणेपाण्याच्या प्रवाहामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमीनी जर कुठे खरडून गेले असतील तर त्याचेही माहिती घेऊन पंचनामे करणे यावर सर्व शासनाच्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी जागेवर थांबून तात्काळ कामाला गती देण्याचेही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

सोयाबीनकापूसज्वारीतूर या पिकांचा ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आहे व आताच्या पावसात ज्यांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत पाहणी करण्याचेही आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.

अक्षम्य दिरंगाई : नुकसान भरपाईसाठी पीक नुकसानीची माहिती कंपनीस कळविणे आवश्यक-असे जिल्हाधिका-याने केलेल्या आवाहनाच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या पत्राला जिल्हा माहिती अधिकारी याच्याकडून प्रसिद्धीच नाही



 प्रेस नोट

   महाराष्ट्र शासन

नुकसान भरपाईसाठी पीक नुकसानीची माहिती कंपनीस कळविणे आवश्यक -जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर

नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील दोन तिन दिवसांपासून अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी नाल्यांना पुर मेऊन शेती क्षेत्राचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशावेळी विमा संरक्षित क्षेत्राला नुकसान भरपाई मिळणेसाठी झालेल्या नुकसानीची पूर्वसूचना संबंधीत विमा कंपनीस 72 तासामध्ये कळविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केले आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भुस्खलन, गारपीट, ढगफुटीअथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसगीक आग या नैसर्गीक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसुचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिकस्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येते. या जोखीमेंतर्गत शेताचे क्षेत्र पडलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा ओसंडुन वाहणारी विहिर किंवा पुराचे पाणी शेतात शिरून दिर्घकाळ जलमय राहिल्यामुळे शेती क्षेत्राचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे नुकसान भरपाई दावा दाखल करता येतो.

तथापी विमा दावा मंजूर होणेसाठी झालेल्या पीक नुकसानीची माहिती पुर्वसुचना कंपनीस देणे गरजेचे आहे. त्यासाठी पीक विमा धारक शेतकन्यांनी गुगल प्ले स्टोअर वरून Crop Insurance हे अँप डाउनलोड करून त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती भरावी किंवा 18001035490 या टोल फ्री क्रमांकावर किंवा supportagri (@iffcotokio.co.in या पत्यावर मेलवर नुकसानीची पूर्वसूचना द्यावी.

तथापी काही तांत्रीक अडचणीमुळे शेतकरी वरील माध्यमांद्वारे विमा कंपनीस पुर्वसुचना देऊ न शकल्यास तालुका प्रतिनिधी, इफ्को टोकीयो विमा कंपनी किंवा संबंधीत तालुका कृषि अधिकारी कार्यालयास किंवा आपल्या गावातील संबंधित कृषि सहाय्यक यांचेकडे ऑफलाईन अर्ज सादर करावे.


जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

नांदेड (०३)


जा.क्र./तंत्र-4/ प्रतिदियो/ 3244/2021 

कार्यालय

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड

date. 07/09/2021


प्रति,

जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड यांना माहितीस्तव देण्यात येत असून वरील बातमी प्रसिद्धीस देण्यात यावी.

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

नांदेड (०३)


 

वरील प्रमाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांचे आदेश बातमी व प्रसिद्धीस देण्यात यावे म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी जिल्हा माहिती अधिकारी यांना काल दि.07/09/2021 पत्र दिले आहे,त्या आदेशाची तात्काळ प्रसिद्धी होणे आवश्यक असताना जिल्हा माहिती अधिका-याने कार्यालयाच्या ब्लॉग वर अद्याप प्रसिद्धी दिलेली नाही, सदरील कामात अक्षम्य दिरंगाई,हयगय, निष्काळजीपणा केल्याबद्दल नैसर्गिक आपत्ती अधिनियम 2005 च्या कलमान्वये जिल्हाधिकारी कारवाई करतील काय?



पूरसदृश्य परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा मुख्यालयात आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन

 


  • संततधार पावसाने नांदेड जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
  • पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा
  •  जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडून विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी
  •  नांदेड जिल्हा मुख्यालयात आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन 

नांदेड, दि. 7 सप्टेंबर 2021 :- नांदेड जिल्ह्यात गत काही दिवसांपासून पाऊसाचे प्रमाण वाढल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. विष्णुपुरी प्रकल्पात पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात वाढल्याने आज 7 सप्टेंबर रोजी 12 दरवाजे उघडण्यात आले आहेत. गोदावरी नदी पात्रातील वाहते पाणी, जिल्ह्यातील विविध तालुक्यात झालेली संततधार यामुळे लहान मोठ्या नदी-नाल्यांना आज पूर आल्याने अनेक ठिकाणची वाहतुक खोळंबली तर नदीकाठच्या काही सखल भागात पाणी शिरले. जिल्ह्यातील संभाव्य‍ परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेऊन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाला सज्जतेच्या सूचना देऊन लोकांपर्यंत सर्वतोपरी सहकार्य पोहचविण्यासाठी सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे प्रत्यक्ष विविध ठिकाणी भेट देऊन प्रशासनाला सूचना देत असून संपुर्ण परिस्थितीवर देखरेख ठेवून आहेत. त्यांनी आज देगलूर, लोहा, मुखेड, कंधार, नायगाव, नांदेड, बिलोली तालुक्यातील परिस्थितीची पाहणी करुन संबंधित यंत्रणांना सूचना करुन मदत कार्याला गतीमान केले.    

मेथी येथील यादव जळबा हिवराळे हे 52 वर्षाचे पुरुष वाहून गेल्याने त्यांचे शोधकार्य सुरु असल्याची माहिती मुखेड तहसिलदार यांनी दिली आहे. मुखेड-कौठा रोडवरील नाल्याच्या पुलावरुन माजी आमदार किशनराव राठोड यांचे पुत्र भगवान राठोड व त्यांचा मुलगा संदिप राठोड हे आपल्या चारचाकी वाहनात वाहून गेले. ते मुखेडकडे येत होते. त्यांच्यासोबत असलेला त्यांचा सेवक उद्धव देवकते हा सुखरुप बाहेर पडल्याची माहिती देगलूर उपविभागीय अधिकारी शक्ती कदम यांनी दिली. 

दिनांक 6 सप्टेंबर रोजी रात्री अचानक पाऊसाचा जोर वाढल्यामुळे नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे एक व्यक्ती पुरात अडकली होती. या व्यक्तीची प्रशासनामार्फत सुखरुप मुक्तता करण्यात आली. मुखेड तालुक्यातील मोतिनाल्यात एक व्यक्ती अडकला होता. या व्यक्तीचीही सुखरुप मुक्तता करण्यात आली आहे. याचबरोबर बाऱ्हाळी, थोटवाडी नाल्यात 3 व्यक्ती अडकले असून त्यांना सुखरुप काढण्यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न केले जात आहेत. 

नरसी-देगलूर व नरसी-बिलोली या महामार्गावर दुपारी 1.30 वाजल्यापासून वाहतूक बंद झाल्याचे बिलोली तहसीलदार यांनी कळविले. अर्धापूर तालुक्यातील शेलगाव (बु) व सांगवी या गावाचा दुपारी 3.15 पासून तात्पुरता संपर्क तुटला आहे. देगलूर तालुक्यातील लाखा, तपशेलगाव, सुगाव, मनसकरगा या गावाचा दुपारी 3.30 पासून संपर्क तुटला आहे. बिलोली तालुक्यातील आरळी, अटकळी, दुगाव, कासराळी, लघुळ या गावातील कुटुंबे तात्पुरती स्थलांतरीत करण्यात आली आहेत. याचबरोबर लोहगाव येथील लघुपाटबंधारे विभागांतर्गत जिल्हा परिषदेचा तलाव, कंधार तालुक्यातील गनातांडा, पानशेवडी येथील तळे फुटल्या बाबत संबंधित तहसिलदाराने कळविले आहे. 

हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथील संतोष सुर्यवंशी यांचे दोन बैल 6 सप्टेंबरला वीज पडून मयत झाल्याबाबत संबंधित तहसिलदार यांनी कळविले आहे. कंधार तालुक्यातील कवठा येथील मारोती घोरपे यांची एक म्हैस पुरात वाहून मयत झाली आहे. बिलोली तालुक्यातील सावळी येथे आज एक गाय, एक वासरू पुरात वाहून मयत झाल्याची माहिती संबंधित तहसिलदार यांनी दिली आहे. 

जिल्हा प्रशासनातर्फे पूरसदृश्य परिस्थितीवर नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्हा मुख्यालयात आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. यात जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, तहसिलदार विजय अवधाने, नायब तहसिलदार राजेश लांडगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपअभियंता गावंडे, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता निळकंठ गव्हाने, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे उपअभियंता महेश गट्टुवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नरमीटवार यांचा समावेश आहे.


Tags : #आपत्कालीन#नियंत्रण#कक्ष 

पूर अथवा महापूर आल्यास (पीडीएफ, 2.2 एमबी)

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन

टोल फ्री :

02462 – 248418


राज्य आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्र राज्य

नियंत्रण कक्ष –

दूरध्वनी 022-22027990

फॅक्स: 022-22026712


जिल्ह्यातील प्रकल्प साठ्याच्या पाणी पातळीत वाढ ; गोदावरी, पैनगंगा, पुर्णा, मानार नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन-नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता स.को.सब्बीनवार

 


नांदेड, दि. 7 सप्टेंबर 2021 :- आज 7 सप्टेंबर 2021 रोजी निम्न दुधना प्रकल्पातून 4 हजार 320 क्युसेस विसर्ग पूर्णा नदीपात्रात सुरु आहे. माजलगाव या मोठया प्रकल्पातून 97 हजार क्युसेस विसर्ग सुरु आहे. पुर्णा प्रकल्पाच्या येलदरी व सिध्देश्वर पाणलोट क्षेत्रात पूर्णा नदीत 6 हजार 242 क्युसेस विसर्ग सुरु आहे. सिध्देश्वर धरणाखाली मोठया प्रमाणावर पाऊस झाल्याने पुर्णा पुलाजवळ 76 हजार क्युसेस विसर्ग सुरु आहे. या सर्व नद्याचे पाणी गोदावरी नदीला मिळते. पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमाणात पाऊस झाल्याने विसर्गात वाढ होत आहे. सद्यस्थितीत नांदेड शहराच्या खालील बाजूस तेलंगणा राज्यातील पोचमपाड धरण सुध्दा 100 टक्के भरले असून तेथून 3 लाख 6 हजार क्युसेस विसर्ग सुरु आहे. पोचमपाड प्रकल्प धरल्याने गोदावरी नदीत फुगवटा निर्माण होतो. 

विष्णुपुरी प्रकल्पाच्या 12 दरवाज्यातून 1 लाख 72 हजार क्युसेकने विसर्ग सुरु आहे. नदीमधून येणारा येवा जास्त असला तरी विष्णुपुरी प्रकल्पाद्वारे तो नियंत्रित करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहील व विसर्ग नियंत्रित केला जाईल. तथापि संततधार पावसामूळे येव्यात मोठया प्रमाणात वाढ होत आहे.

सध्या जुन्या पुलावर पाणीपातळी 351.10 मिटर आहे. इशारा पातळी 351 मिटर, तर धोका पातळी 354 मिटर इतकी आहे. इशारा पातळीचा विसर्ग 2 लाख 13 हजार क्युसेस व धोका पातळीचा विसर्ग 3 लाख 9 हजार 774 क्युसेस आहे. 

विष्णुपुरी प्रकल्पातून सोडलेला विसर्ग व शहरात सुरु असलेल्या संततधार पावसामूळे पाणी पातळीत झपाटयाने वाढ होत आहे. त्यामूळे शहरातील नदी काठच्या सर्व नागरीकांना अत्यंत सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. उर्ध्व मानार प्रकल्प व निम्न मानार प्रकल्पही 100 टक्के भरले असल्याने त्यांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस / अतिवृष्टी झाल्याने पाणी नदीत सोडण्यात येत आहे. उर्ध्व मानार प्रकल्पातून आज सायंकाळी 4 वाजता 25 हजार क्युसेसने पाणी नदीपात्रात सोडले आहे. उर्ध्व पैनगंगा धरण 91 टक्के भरल्याने धरण्याच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास तेथील दरवाजे उघडुन पाणी सोडण्यात येईल. गोदावरी, पैनगंगा, पुर्णा, मानार नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे व वेळोवेळी सोडण्यात येणाऱ्या विसर्गाची माहिती जलसंपदा विभागाच्या नियंत्रण कक्षाच्या दु. क्र. 02462 263870 या क्रमांकावर उपलब्ध होईल, असे आवाहन नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता स.को.सब्बीनवार यांनी केले आहे.


Tags : #गोदावरी#पैनगंगा#पुर्णा#मानार#नदी

राज्यातील पूर स्थितीचा अहवाल (वर्ष २०२१-२२)

महत्वाच्या धरणांचा पाणीसाठा व सोडलेला विसर्ग (राज्यातील पूर स्थितीचा अहवाल) 07/09/2021.pdf

महत्वाच्या धरणांचा पाणीसाठा व सोडलेला विसर्ग (राज्यातील पूर स्थितीचा अहवाल) 06/09/2021.pdf

महत्वाच्या धरणांचा पाणीसाठा व सोडलेला विसर्ग (राज्यातील पूर स्थितीचा अहवाल) 05/09/2021.pdf

महत्वाच्या धरणांचा पाणीसाठा व सोडलेला विसर्ग (राज्यातील पूर स्थितीचा अहवाल) 04/09/2021.pdf

महत्वाच्या धरणांचा पाणीसाठा व सोडलेला विसर्ग (राज्यातील पूर स्थितीचा अहवाल) 03/09/2021.pdf

महत्वाच्या धरणांचा पाणीसाठा व सोडलेला विसर्ग (राज्यातील पूर स्थितीचा अहवाल) 02/09/2021.pdf

महत्वाच्या धरणांचा पाणीसाठा व सोडलेला विसर्ग (राज्यातील पूर स्थितीचा अहवाल) 01/09/2021.pdf

#नैसर्गिकआपत्ती#अतिवृष्टी#मुख्यालय : कंधार तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुखांनो ; सर्व मंडळ अधिका-यांनो ; सर्व तलाठ्यांनो ; सर्व ग्रामसेवकांनो ; सर्व कृषी सहायकांनो मुख्यालयी थांबा-तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी कंधार

 


तहसिल कार्यालय,कंधार

मेल tahkandhar@gamil.com

संचिका क्र.: 2021/नै आ./मु.ह/कावि

दुरध्वनी क्र. 02466 223424

दिनांक : 07/09/2021 मंगळवार


प्रति,

१. सर्व कार्यालय प्रमुख ता. कंधार

२. सर्व मंडळ अधिकारी ता. कंधार

३. सर्व तलाठी ता. कंधार

४. सर्व ग्रामसेवक ता. कंधार

५. सर्व कृषी सहाय्यक ता. कंधार


विषय:- मुख्यालयी उपस्थित राहणे बाबत.

संदर्भ:- मा. जिल्हाधिकारी, नांदेड यांचे अतिवृष्टीच्या अनुषंगाने सुचना दिनांक ०७.०९.२०२१

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने नांदेड जिल्हयात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. कंधार तालुक्यात काल पासुन मुसळधार पाऊस चालू असून त्यामूळे नदी, नाले दुधडी भरून वाहत आहेत. सततच्या पावसामुळे वित्त व जिवीत हानी होण्याची शक्यता नाकरता येत नाही.

तरी सर्व कार्यालय प्रमुख यांना यादवारे सूचित करण्यात येते की, आपण आपले मुख्यालयी उपस्थित रहावे. सक्षम अधिकारी यांचे पूर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडू नये तसेच, आपले अधिनस्त कर्मचारी यांनाही त्यांचे संबंधित गावात अतिवृष्टी बाबत गावांमध्ये सर्तकतेचा इशारा देण्याच्या सूचना दयाव्यात. जिवीत व वित्त हानी झाल्यास या कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती शाखेस अवगत करावे.

सदरील कामात हयगय किंवा निष्काळजीपणा केल्यास नैसर्गिक आपत्ती अधिनियम २००५ च्या विविध कलमान्वये कार्यवाही करण्यात येईल याची गांभीयाने नोंद घ्यावी.


व्यंकटेश मुंडे

तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी,

कंधार


प्रतिलीपी

१. मा.जिल्हाधिकारी नांदेड यांना माहितीस्तव सविनय सादर.

२. मा.उपविभागीय अधिकारी,कंधार यांना माहितीस्तव सविनय सादर.

व्यंकटेश मुंडे

तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी,

कंधार


Tags: #नैसर्गिकआपत्ती#अतिवृष्टी#मुख्यालय#कंधार#कार्यालयप्रमुख#मंडळअधिकारी#तलाठी#ग्रामसेवक#कृषीसहायक

सोमवार, सप्टेंबर ०६, २०२१

पत्रकार कल्याण योजनेच्या मार्गदर्शक सूचनांचा आढावा घेण्यासाठी समिती गठित

 


नवी दिल्ली - 3 सप्टेंबर २०२१ : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्रकार कल्याण योजनेच्या मार्गदर्शक सूचनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयाने वरिष्ठ पत्रकार आणि प्रसारभारतीचे सदस्य अशोक कुमार टंडन यांच्या नेतृत्वाखाली एक दहा सदस्यीय समिती नियुक्त केली आहे.ही समिती या योजनेसाठी सध्या असलेल्या मार्गदर्शक तत्वांचा आढावा घेणार असून, त्यात बदल करण्यासाठी आवश्यक त्या शिफारसी सूचवणार आहे. पत्रकारीतेच्या क्षेत्रात, अलीकडच्या काळात बदललेली परिस्थिती तसेच कोविड-19 मुळे अनेक पत्रकारांचा झालेला मृत्यू या सगळ्या पार्श्वभूमीवर, हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.

    पत्रकार कल्याण योजना गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात असून त्याचे निकष आणि मार्गदर्शक तत्वामध्ये बदल करण्याची गरज आहे. त्याशिवाय, अधिस्वीकृतीधारक असलेल्या व नसलेल्या पत्रकारांना या कल्याणकारी योजनेत समानतेने बघण्याची गरज असून, त्यांनाही या योजनेचे लाभ मिळवून देणे महत्वाचे आहे.

    ही समिती येत्या दोन महिन्यात आपला अहवाल देणार आहे.तिच्या शिफारसींच्या आधारावर जास्तीत जास्त पत्रकारांना लाभ मिळू शकेल, अशा रीतीने नवी मार्गदर्शक तत्वे तयार करणे सरकारला शक्य होईल.अशोक टंडन यांच्या नेतृत्वाखालील या समितीत, द वीक चे निवासी संपादक, सच्चिदानंद मूर्ती, मुक्त पत्रकार शेखर अय्यर, न्यूज 18 चे अमिताभ सिन्हा, बिझनेस लाईन चे शिशिर कुमार सिन्हा, झी न्यूजचे विशेष प्रतिनिधि रवींद्र कुमार, पांचजन्यचे संपादक हितेष शंकर, हिंदुस्थान टाइम्स च्या स्मृति काक रामचंद्रन, टाइम्स नाऊचे अमित कुमार, इकॉनॉमिक टाइम्सच्या वसुधा वेणुगोपाल, आणि पत्रसूचना कार्यालयाच्या अतिरिक्त महा संचालक श्रीमती कांचन प्रसाद या सदस्यांचा  समावेश आहे.

पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या आदेशानुसार जिल्हयातील पिक विमाधारक शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीच्या 25 टक्के आगाऊ रक्कम देण्याचे जिल्हाधिका-याचे विमा कंपनीस निर्देश-जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे


  • सोयाबीनच्या उत्पादकतेत ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट ; हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अधिसुचना जिल्ह्यात लागू
  • जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली माहिती

नांदेड, दि. 3 सप्टेंबर 2021 :- नांदेड जिल्हयातील सर्व तालुक्यांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना सन 2021-22 अंतर्गत प्रतिकुल हवामान परिस्थिती (Mid-Season Adversity) अधिसुचना लागु केली. जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या पडलेल्या खंडामुळे सोयाबीनच्या फुलांची गळ तर शेंगा परिपक्व न झाल्याने पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसुन आले आहे. अशास्थितीत जिल्हयातील पिक विमाधारक शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीच्या 25 टक्के आगाऊ रक्कम मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ अधिसूचना काढण्याबाबत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सूचना दिल्या होत्या. विमाधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी ही अधिसुचना लागु केली आहे.

नांदेड जिल्हयात 26 जुलै ते 16 ऑगस्ट या 21 दिवसाच्या कालावधीत पावसाचा खंड पडल्याने काही भागात सोयाबीनचे नुकसान दिसून आले. जिल्हयामध्ये समितीमार्फत याबाबत सर्वेक्षण करण्यात आले असून जिल्हयातील सर्व तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादकतेमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. 

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या शासन निर्णयानुसार हंगाम कालावधीत प्रतिकुल परिस्थिती जसे पुर, पावसातील खंड, दुष्काळ आदी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये सरासरी उत्पन्नाच्या 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमा धारक शेतकऱ्यांना 25 टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्याची तरतुद आहे.

समितीच्या सर्वेक्षण अहवालानुसार नांदेड जिल्हयातील सर्व तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादनामध्ये 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षीत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सोयाबीन, कापुस, तुर व ख. ज्वारी या पिकांसाठी हंगामातील प्रतिकुल परिस्थिती (Mid-Season Adversity) अधिसूचना लागु केली आहे. सर्व पात्र विमाधारक शेतकऱ्यांना विहीत मुदतीत नुकसान भरपाई आगाऊ रक्कम अदा करणेबाबत विमा कपंनीस निर्देश दिले.

तालुकानिहाय सायोबिन उत्पादकतेत घट : 

नांदेड तालुका 62.33, अर्धापुर 55.00, मुदखेड 61.67, बिलोली 61.98, धर्माबाद 61.74, नायगाव 60.00, मुखेड 60.37, कंधार 61.69, लोहा 64.00, हदगाव 59.75, हिमायतनगर 66.65, भोकर 64.73, उमरी 60.27, देगलूर 60.72, किनवट 68.79, माहूर 67.19 याप्रमाणे सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत अपेक्षित उत्पादकतेत येणारी घट टक्केवारी मध्ये आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली आहे.

चौकट

पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी जिल्ह्यासाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अधिसूचना लागू केली आहे

0000

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरिप हंगाम २०२० व रब्बी हंगाम २०२०-२०२१ पासून तीन वर्षांकरिता राज्यात राबविणे बाबत

Blogspot - जिल्हा माहिती कार्यालय,नांदेड महाराष्ट् शासन, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

facebook - जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड

शनिवार, सप्टेंबर ०४, २०२१

नागरिकांनी गणेश उत्सव व पोळा सण साधेपणाने साजरा करावा-अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे


नायगाव :  कोविड -१९  तिसऱ्या संभावें लाटेचा विचार करून गेल्या वर्षीच्या नियमाप्रमाणेच याही वर्षीचा गणेश उत्सव म्हणजेच दिनांक  १० सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या गणेश उत्सवासाठी मागील वर्षीचेच नियम कायम करण्यात आले असून गणेश मूर्ती स्थापना व विसर्जन करताना कसल्याही प्रकारची मिरवणूक  काढण्यात येऊन नये  मिरवणुकांवर प्रशासनाने कोरोनाच्या संकटामुळे बंदी घातली  गणेश उत्सव व बैलपोळा हा सण साध्यापनाने  साजरा करावा असे मत अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी मांडले

या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डाँ.सिद्धेश्वर धुमाळ व पो.नि.अभिषेक शिंदे यांनी  आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत उपस्थितांना शासनाच्या नियमावली प्रमाणेच उत्सव साजरे करा असे बोलतांना व्यक्त केले.तरुण मंडळींमध्ये वर्षभर वाट पाहून मोठ्या जल्लोषात साजरा होणारा गणेश उत्सवावर व वर्षभर शेतक-यांच्या खांद्याला खांदा लावून शेतात राहणा-या बैलाचा आनंदाचा सण म्हणजे बैलपोळा या सणावर कोरोनाचे संकट आले आहे शहरी भागाबरोबर ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. 

ही साखळी तोडण्यासाढी प्रयत्न केले जात आहेत त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कोरोना या संसर्गजन्य विषाणूचा व्यापक प्रसार होवू नये, यासाठी खबरदारी चा उपाय म्हणून सण उत्सवावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. असे ही मोरे यांनी सांगितले

दिनांक १० सप्टेंबर पासून उत्सव सुरु होत आहेत त्यानुषंगाने  गणेश उत्सव मंडळाने  मिरवणूका काढू नये असे आवाहन नायगाव पोलीस ठाण्याचे  पोलिस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी केले. तसेच अगदी साध्या पद्धतीने  गणेश उत्सव हा सन साजरा करून समाजात आदर्श निर्माण करावा,अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे ही ते म्हणाले,तर शासकीय ग्रामीण रुग्णालय नायगाव च्या वतीने गणेश मंडळाच्या सर्वच सदस्य यांनी कोविड  लसीकरण करून घ्यावे असे वैदयकिय  अधिकारी कांबळे यांनी आवाहन केले व  गणेश मंडळानी सॅनीटायजर, मास्क ,तापमापक मशीन वापरुन  समाजउपयोगी उपक्रम राबवून गणेश उत्सव साजरा करावा  असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी  सिद्धेश्वर धुमाळ यांनी केले. 

यावेळी शांतता कमिटीच्या बैठकीस जिल्हा अतिरिक्तपोलीस अधीक्षक निलेश मोरे ,उपविभागीय पोलीस अधिकारी  डाँ.सिद्धेश्वर धुमाळ , आ. राजेश पवार , कल्याण ,प्रा डॉ.जीवन चव्हाण ,देविदास पाटील बोमनाळे , पञकार तथा जिल्हाउपाध्यक्ष  बाळासाहेब पांडे , मराठी पत्रकार संघाचे नूतन तालुका अध्यक्ष नागेश पाटील कल्याण , एस. एम मुदखेडकर , माधव मामा कोकुरले , माधव पाटील चव्हाण ,शेख अरिफ ,तालुका कार्यध्यक्ष माधव धडेकर , पत्रकार तथा तंटामुक्ती अध्यक्ष माधव बैलकवाड , शहर अध्यक्ष विश्वांभर वन्ने , केरबा रावते ,विरेंद्र डोंगरे , सुधाकर भद्रे , प्रा. गडमवार , मनोहर तेलंग, गोविंद नरसीकर, गंगाधर गंगासागरे, प्रल्हाद भंडारे ,नागोराव भोसले ,अंकुशकुमार देगावकर ,सरपंच  प्रतिनिधी साहेबराव कांबळे , नायगाव शहरासह तालुक्यातील गणेश मंडळाच्या प्रतिनिधींची व  नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती


चौकट =

पांडे यांच्या मागणीवरून मांजरम पोलीस चौकीला तात्काळ तीन कर्मचारी नियुक्त 

शांतता समितीच्या बैठकीत पुण्यनगरीचे पत्रकार बाळासाहेब पांडे यांनी असा प्रश्न उपस्थित केला होता कि मौजे मांजरम येथे पोलीस चौकीच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन बरेच वर्ष उलटले तरी त्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना निवासी राहण्याचा अभाव असल्याचे सांगितल्याने अति.पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी लगेच त्या मागणीची अंमलबजावणी करून त्या पोलीस चौकी मध्ये तीन पोलीस कर्मचारी नियुक्त केले व मुकामी राहण्याचे सांगितले  त्यामुळे बाळासाहेब पांडे यांनी त्यांचे आभार मानले.

मराठी पत्रकार संघाचे ता. अध्यक्ष नागेश कल्याण , कार्यध्यक्ष = माधव धडेकर , प्रसिद्धी प्रमुख = संजय चिखले मरवाळीकर

नांदेड PRC दौ-यात झाली आर्थिक वसूली-संजय चिखले यांनी समिती प्रमुखांकडे केली तक्रार

 


नांदेड,दि 4 सप्टेंबर 2021 : पंचायती राज समिती नांदेड दौ-याचे कारण पुढे करून पंचायत समिती माहूर येथे आर्थिक वसूली झाल्याची चर्चा जिल्ह्यात आहे.जिल्ह्यात सर्वंच पंचायत समितीत असा प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भातील सखोल चौकशी करण्याची मागणी PRC समिती प्रमुख मा.संजय रायमुलकर यांच्याकडे त्यांचे स्वीय सहाय्यक यांच्यामार्फत आज दि 4/9/2021 रोजी मेलद्वारे/What's app द्वारे करण्यात आली. 

   दि.2 ते 4 तारखेदरम्यान पंचायती राज समितीचा नांदेड दौरा आयोजीत करण्यात आला आहे.सदर दौ-यादरम्यान गट क्र.5 मधील भोकर,किनवट,माहूर या मार्गावरील पंचायती राज समिती दौरा व अभिलेखे तपासणी तसेच अधिका-यांची साक्ष घेणे सुरू होते. याच दौ-याचे कारण पुढे करून पं.स.माहूर अंतर्गत विभाग प्रमुखांकडे आर्थिक वसूलीचे उद्दिष्ट देण्यात आल्याच्या चर्चा तालुक्यात रंगू लागल्या आहेत. सदर वसूली ही विभाग प्रमुख व त्यांच्या कनिष्ठ अधिका-यांवर सोपवले असल्याचे चर्चेतुन समजते.यासंदर्भात पंचायत समिती माहूरचे गटविकास अधिकारी व अधिनस्त विभाग प्रमुख, अधिकारी व काही ठराविक कर्मचारी यांच्या मार्फत वसूली करण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याची खात्याअंतर्गत चौकशी करणे गरजेचे आहे. आर्थिक वसूलीच्या बैठका गुप्तपणे घेतल्याचेही समजते..सदरांच्या खात्यातुन देवघेव होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून त्यांच्या खात्याचीही सखोल चौकशी झाली पाहिजे. सदर वसूली कोणासाठी करण्यात आली होती?? कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आली?? या प्रकरणाची आपण सखोल व तात्काळ चौकशी करावी अन्यतः आम्हाला रितसर तक्रार दाखल करावी लागेल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

      समितीतील गट.क्र. 5 मधील प्रमुख सन्माननीय आमदार विक्रम काळे हे गटविकास अधिकारी माहूर यांचे खुपच कौतुक करत होते..यावरून सदर प्रकरणात काही काळे बेरे झाले नाही ना? अशी शंका सर्वसामान्य नागरीकांच्या मनात येत आहे. नांदेड जिल्ह्यात किनवट व माहूर तालुक्यात अदिवासी व डोंगरी भाग असल्याने तेथे अनेक आर्थिक लाभाच्या योजना राबवल्या जात आहेत पण सदर योजना सर्वसामान्य नागरीकापर्यत पोहचतात का?? ग्राम पंचायत स्तरावरून निधी खर्च झाला का?? या व इतर अनेक मुद्यासंदर्भात पंचायत राज कमिटीने चर्चा करून शासन आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते. पण अधिकारी व पंचायती राज कमिटीतील सन्माननीय आमदार यांची मिलीभगत तर नाही ना??असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडल्याशिवाय राहणार नाही..

    लोकशाही ख-या अर्थाने जीवंत ठेवायची असेल तर आणि सर्वसामान्य नागरीकांचे हित जोपासायचे असेल तर पदाधिका-यांचा अधिका-यांवर अंकुश असणे गरजेचे आहे. पण जेथे पदाधिकारी चुकीच्या मुद्याला पाठीशी घालत असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी कोणाकडे दाद मागावी हा यक्ष प्रश्न आहे..

    या आशयाचे निवेदन सन्माननीय प्रमुख PRC दौरा नांदेड यांच्या नावाने संजय चिखले यांनी आज दिले आहे व त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता ,ते मिटिंगमध्ये व्यस्त असल्याचे त्यांच्या स्वीय सहाय्यक मा.रुपेश गणात्रा यांनी सांगितले व चिखले यांनी दिलेल्या तक्रारीची प्रींट काढून सन्माननीय प्रमुख PRC यांच्या लक्षात सदर मुद्दा आणून देण्याचे अश्वासन त्यांनी दिले.

पंचायती राज समिती दौऱ्या दरम्यान अधिकारी कर्मचाऱ्यांकडून आर्थीक वसूली केल्या संदर्भातील चौकशी करणे बाबत.pdf

Popular posts लोकप्रिय पोस्ट