🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

बुधवार, जून ०२, २०२१

लाच प्रकरण : उत्पादन शुल्कचा महा लाचखोर पोलीस निरीक्षक(PI) 50 हजाराची लाच स्वीकारताना चतुर्भुज

 


बीड: बेकायदेशीर दारू उत्पादनाच्या गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेताना उत्पादन शुल्कचे पोलीस निरीक्षक दत्ता दिंडकर यांना पकडले.

सूत्रांच्या माहितीनुसार, दारूच्या गुन्ह्यातून नाव काढण्यासाठी ७५ हजाराची डिमांड करण्यात आली होती. तडजोड अंती अखेर ५० हजाराची लाच घेताना दिंडकर यांना पकडले असल्याची माहिती येत आहे.औरंगाबाद एसीबी पथकाने  कारवाई केली असून एकच खळबळ उडाली आहे.

ब्राह्मण समाजाच्या प्रलंबीत मागण्या त्वरित मान्य करन्या साठी प्रयत्न करावे,देवेंद्र फडणवीस यांच्या कडे नांदेड आ.भा.ब्राह्मण महासंघाची मागणी


नांदेड,दि 02 जून :  ब्राह्मण समाजाच्या प्रलंबीत मागण्या त्वरित मान्य करन,कोरोना काळात नव्या संकटाशी सामना देणाऱ्या ब्राह्मण समाजाला जीवन जगण्या साठी उभारी मिळावी या साठी प्रयत्न करून न्याय हक्क मिळवून देण्याची मागणी विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री,देवेंद्र फडणवीस हे नांदेड मुक्कामी आले असता त्यांच्या कडे प्रदेश अध्यक्ष निखिल भाऊ लातूरकर यांच्या मारदर्शनाखाले निवेदनाद्वारे नांदेड जिल्हा आ.भा.ब्राह्मण महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे..

  मागील अनेक वर्षापार ब्राह्मण समाजाच्या मागण्या प्रलंबितच आहेत, या मागण्या साठी वेळोवेळी वेगवेगळ्या पध्दतीने लोकशाही पध्दतीने आंदोलने करण्यात आली . आपण मुख्यमंत्री असताना आझाद मैदानावर आंदोलन ही केले असे असताना आपण शिष्टमंडळा समोर मागण्या तत्वतः मान्य असल्याचे सांगितले होते व याबाबतीत लवकरच निर्णय करु असे आश्वासन दिलेले होते. 

    अद्याप पर्यत महाराष्ट्र शासनानाकडे या मागण्या प्रलंबितच आहेत याबाबतीत वेळोवेळी स्मरणपत्रे ही दिली आहेत. तरी आपणास विनंती करण्यात येते की, ब्राह्मण समाजात अतिशय गरीबी व हालाखीच्या अवस्थेत अनेक ब्राह्मण कुटुंब आहेत .यातच या कोविड महामारीत अनेक ब्राह्मण पुजारी वर्गावर अत्यंत हालाखीची अवस्था झालेली असल्यामुळे या मागण्या बाबतीत आपण गांभीर्य पुर्वक विचार करून महाराष्ट्र शासनाकडून या मागण्या मान्य करून घ्यावी अशी आपणास विनंती करनारे निवेदन नादेड येथे आ.भा.ब्राह्मण महासंघ शाखा नांदेड यांच्या पुढाकारातून देण्यात आले आहे.

     ब्राह्मण समाजाच्या शासन दरबारी प्रलंबीत मागण्या खालील प्रमाणे मागण्या,ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे,, ब्राह्मण पुरोहितास मासिक पाच हजार रुपये मानधन द्यावे , के जी टू पि जी शिक्षण मोफत करावे

,ब्राह्मण समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वस्तीगृह करावीत, ब्राह्मण समाजावर अर्वाच्य भाषेत होणाऱ्या टीका व महापुरुषावर होणाऱ्या अर्वाच्य टीका या साठी

कायद्याची निर्मिती करावी., कुळात गेलेल्या जमिनी परत मिळवून द्याव्यात, वेदपाठशाळेस अनुदान द्यावे

, पारंपरिक मंदिरे पारंपारिक पध्दतीने चालत आलेल्या विश्वस्तास परत द्यावीत

  आपणास विनंती करण्यात येते की आपण ब्राह्मण समाजाच्या मागण्या मान्य करून द्याव्यात व समाजावर होत असलेल्या अन्यायास प्रतिबंध करावा अशी मागणी करण्यात आली आहे.या निवेदनावर जिल्हाध्यक्ष विजयजी जोशी ( महानगर) .,जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पांडे (ग्रामीण ) सौ.स्वाती कुलकर्णी सौ. प्रितीताई वडवळकर

सौ. भाग्यश्री कुलकर्णी , सौ. अपर्णाताई मोकाटे . संपदा कुलकर्णी सौ. प्रणिता कुलकर्णी,डाँ मनीषा तिवारी,जयश्री बंगाळे,आनंत राखे,श्याम कुलकर्णी,मंगेश देशपांडे, हरिप्रसाद पांडे ,संजू गुरू बेल्थरकर,अरुण देसाई,,या सह महिला जिल्हा आघाडी पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



Popular posts लोकप्रिय पोस्ट