🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

बुधवार, जानेवारी १२, २०२२

लाच प्रकरण : लाचखोर तलाठी समाधान काळे २५ हजार रुपये लाच मागितले वरुन एसीबीने मुसक्या आवळल्या

 


अक्कलकोट,दि १२ जानेवारी : शेतातील रस्ता वहिवाटी साठी खुला करून देण्यासाठी अर्जावर सुनावणी होऊन निकाल तुमच्या बाजूने लावून देतो म्हणून वीस हजाराची लाच मागितली त्यामुळे तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी अटक केले.

समाधान बाळासाहेब काळे, वय ३३, वर्ष व्यवसाय नोकरी, पद तलाठी सज्जा खानापूर, तहसिल अक्कलकोट, रा समर्थ नगर, अक्कलकोट जि. सोलापूर असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे.

तक्रारदार यांनी त्यांच्या मौजे अंकलगे येथील शेतजमिनी मधुन जाणे येण्याकरीता तसेच शेतमालाची ने आण करण्याकरीता वहीवाटी रस्ता खुला करुन मिळणेबाबत तहसिलदार कोर्ट, अक्कलकोट येथे सादर केलेल्या अर्जावर • सुनावणी होवुन तक्रारदार यांच्याबाजुने निकाल लावुन सदर निकालाची प्रत देण्याकरीता यातील आलोरो समाधान काळे तलाठी सज्जा खानापुर, तहसिल अक्कलकोट यांनी २५,००० रुपयांची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता २० हजार रुपयांची मागणी केली, हे सिद्ध झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तलाठी काळे बुधवारी ताब्यात घेतले त्याच्या विरोधात अक्कलकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई संजीव पाटील, पोलीस उप अधिक्षक अॅन्टीकरप्शन ब्युरो सोलापुर उमाकांत महाडिक पोलीस निरीक्षक, पोहवा/सोनवणे, पोना/ श्रीराम घुगे, पोकों/उमेश पवार व पोकों/ स्वप्नील सणके सर्व नेम अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

*Respected sir*

*Demand Case Report:*

➡ घटक :- सोलापूर

➡ तक्रारदार :- पुरुष 45 वर्ष

➡ आरोपी लोकसेवक :- समाधान बाळासाहेब काळे, वय 33 वर्षे, पद तलाठी, सज्जा खानापूर, तहसील अक्कलकोट, जिल्हा सोलापूर

▶️पडताळणी दिनांक :- 22/12/2021 ,

 ➡️लाचेची मागणी:-25,000/- रुपयांची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता म्हणून 20,000/- रुपयांची मागणी केली आहे

➡️ गुन्हा दाखल दिनांंक:- 12.01.2022 रोजी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण, भ्र.प्र.अधि.सन 1988 चे कलम 7, 7 (अ) प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.

➡ हकीकत :- यातील आलोसे यांनी दिनांक 22/12/2021 रोजी झाले पडताळणी कारवाई दरम्यान यातील तक्रारदार यांचे मौजे अंकलगी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथे शेत असून सदर शेतातून जाण्या - येण्या करीता तसेच शेतमालाची ने-आण करण्याकरिता वहिवाट मिळणेबाबत तहसील कोर्ट अक्कलकोट येथे सादर केलेल्या अर्जावर सुनावणी होवून तक्रारदार यांच्या बाजूने निकाल लावून सदर निकालाची प्रत देण्याकरिता स्वतःसाठी तसेच वरिष्ठांना देण्याकरिता असे सांगून 25,000/- रुपयांची लाचेची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता म्हणून 20,000/- रुपयांची मागणी केली म्हणून त्यांच्याविरुद्ध भ.प्र. अधि. कलम 7, 7अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

➡ पर्यवेक्षण अधिकारी:- श्री.संजीव पाटील, सहा.पोलीस आयुक्त, ला.प्र.वि.सोलापूर.

➡ सापळा पथक : - 

पो.नि. उमाकांत महाडिक,

पो.अंमलदार :- पोहेका /सोनवणे, पोना /श्रीराम घुगे, पोशि/ उमेश पवार, पोशि/ स्वप्निल सन्नके व चापोकाॅ/शाम सुरवसे सर्व नेम- ला. प्र .वि. सोलापूर युनिट.

➡मार्गदर्शन अधिकारी :- 

श्री राजेश बनसोडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र.  

श्री. सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे.

श्री सुहास नाडगौडा अपर पोलीस अधीक्षक ला.प्र.वि. पुणे

Popular posts लोकप्रिय पोस्ट