🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

शुक्रवार, एप्रिल ०९, २०२१

शेळगाव छत्री येथे लसीकरण शिबिरात अनेकांनी घेतली कोरोना कोविडची लस

 


  नायगांव : शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक व्यक्तीने कोरोणा कोवीडची लस घेणे गरजेचे असल्याने शेळगाव छत्री येथील काही नागरिक नायगांव रुग्णालय व सुजलेगाव येथील उपकेंद्र येथे जाऊन कोरोणाची लस घेतले असले तरी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने गावातील सर्वजण सुरक्षित राहण्यासाठी गावातच लसीकरण शिबिर घेतल्याने या शिबिरात अनेकांनी कोरोना कोवीडची लस घेतली आहे.

     प्रत्येक गावातच कोरोना कोवीडचे लसीकरण शिबिरे आयोजित करण्याचे शासन निर्णयानुसार घेण्याचे ठरले असल्याने तालुक्यातील शेळगाव छत्री येथे ग्रामपंचायतचे सरपंच जळबा शंकरराव वाघमारे व ग्रामसेवक रामेश्वर मुदखेडे यांनी सदर शिबिर आयोजित केले होते, सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सी. एच. ओ. च्या डॉ. अश्विनी आनंदराव लोखंडे ,अंगणवाडी कार्यकर्ती कुशवर्ता नागोराव लव्हाळे, मनीषा रोकडोबा एलपे,आशा वर्कर नंदा माधवराव कुराडे, ए.एन.एम,ए.आय,कोंचमवाड , एम पी डब्ल्यूचे ए.ए. शिंदे पि.एस.ओ अनिल शिंदे या कर्मचाऱ्यांनी शेळगाव छत्री येथील गाव नागरिकांना या कोरोना कोविड लसीकरण शिबिराचा लाभ मिळवून दिला. तर उपसरपंच प्रतिनिधी बालाजी सालेगावे, संजय चौंडे, माधव पांडे, अविनाश अनेराये, आनंदा नामेवार यांचे या शिबिरास सहकार्य लाभले.

आयकर कॉलनी मध्ये उद्यान आणि जेष्ठ नागरिकांना साठी विरंगुळा केंद्राची विरेंद्र म्हात्रे याची मागणी

 



 नवी मुंबई : सीबीडी परिसरातील आयकर कॉलनी हि नवी मुंबई तील एक प्रशासकीय वसाहत आहे. या वसाहतीमध्ये अनेक वर्षा पासून शेकडो नागरिक राहत आहेत. या वसाहती मध्ये अनेक जेष्ठ नागरिक आहेत. जे त्यांच्या मोकळ्या वेळेत बाहेर फिरताना दिसतात. यापैकी अनेक जेष्ठ नागरिक हे सरकारी नोकरी तुन निवृत्त झालेले दिसतात. या परिसरातील जेष्ठ नागरिक संघ समितीने आयकर कॉलनी , गिरीदर्शन सोसायटी सेक्टर २१, २२ येथील मोकळा भूखंड आहे त्या ठिकाणी जेष्ठ नागरिक यासाठी विरंगुळा केन्द्र आणि उद्यान याची मागणी केलेली आहे. कारण सायंकाळी आम्ही सर्व जेष्ठ नागरिक जेव्हा घरा बाहेर पडतो. त्यावेळी जवळ पास उद्यान नसल्याने आम्हाला लांब जावे लागते. आणि एवढे लांब जाऊन परत चालत घरी येताना आमची दमछाक होते. त्यामुळे आम्हला इथेच जवळ पास फुटपाथ वरती कधी उभे राहून प्रसंगी फुटपाथवर बसून गप्पाचा फड मांडावा लागतो. हि आमची अडचण आहे. 


आयकर काँलनी मधील जेष्ठ नागरिक व समाजसेवक भिमसेन तपासे यांनी या गोष्टीला दुजोरा देऊन हि गोष्ट सत्य असल्याचे सांगितले. त्याच प्रमांणे नवी मुंबईतील धडाडीचे नवी मुंबई काँग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव विरेंद्र म्हात्रे यांनी या विषयी नवी मुंबई पालिका आयुक्त व उद्यान आधिकारी यांना निवेदन देऊन मागणी केली आहे. यावेळी प्रकाश गुरव, हारीषचंद्र पांडे व आयकर वसहती तील नागरिक उपस्थित होते.

रेमडिसीवीरचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश • रेमडिसीवीर तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांकडून उत्पादकांची बैठक

काळा बाजार होऊ नये म्हणून इंजेक्शनवरील एमआरपी कमी करावी


मुंबई, दि. ८ : राज्यात जाणवणाऱ्या रेमडिसीवीर इंजेक्शनच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या इंजेक्शनचे उत्पादन करणाऱ्या सात कंपन्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. महाराष्ट्राला रेमडिसीवीरची कमतरता भासू नये यासाठी उत्पादन दुप्पट करावे. रुग्णालयांमध्ये रेमडिसीवीरचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक नेमतानाच उत्पादक कंपन्यांनी थेट शासकीय रुग्णालये आणि जिल्हाधिकाऱ्यांना इंजेक्शनचा पुरवठा करावा. काळा बाजार होऊ नये म्हणून त्याची एमआरपी कमी करावी, अशा सूचना आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी यावेळी केल्या.

बैठकीस अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. रामास्वामी, अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे, राज्य आरोग्य सेवा सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्यासह सिप्ला, झायडस, हेट्रो, डॉ. रेड्डी, सन फार्मा, ज्युबिलिएंट या कंपन्यांचे प्रमुख अधिकारी आणि इंडीयन फार्मास्युटीकल्स असोशिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

यासंदर्भात अधिक माहिती देतांना आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले, राज्याला सध्या दररोज 50 हजार रेमडिसीवीर इंजेक्शनचा पुरवठा होत आहे. सध्याची वाढती रुग्णसंख्या पाहता एका अंदाजानुसार एप्रिल अखेर दिवसाला किमान दीड लाख इंजेक्शनची आवश्यकता भासू शकते. त्यासाठी उत्पादन दुप्पट करावे.


कंपन्यांनी वाढीव उत्पादनाला सुरूवात केली असून त्याची प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन उत्पादन यायला किमान 20 दिवस लागतील. त्यानंतर राज्यात त्याचा तुटवडा जाणवणार नाही. सध्या राज्यातील तुटवड्याची स्थिती लक्षात घेऊन काही कंपन्यांनी आयात करण्यासाठी ठेवलेला साठा महाराष्ट्राला देण्याचे मान्य केले आहे. मात्र पुढील काही दिवस इंजेक्शनच्या वापरावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. कंपन्यांच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे 70 टक्के पुरवठा महाराष्ट्राला केला जात आहे.

खासगी रुग्णालयांमध्ये लक्षणे नसलेल्या रुग्णांना हे इंजेक्शन दिले जाऊ नये त्याचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथके नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे पथक खासगी रुग्णालयांना अचानक भेटी देऊन रेमडिसीवीर वापराबाबत माहिती घेतील.

सध्याच्या तुटवड्याच्या काळात या प्रमुख उत्पादक कंपन्यांनी इंजेक्शनचा पुरवठा थेट शासकीय रुग्णालयांना करावा. जिल्हाधिकाऱ्यांकडे त्याचा पुरवठा केल्यास त्यांच्या माध्यमातून खासगी रुग्णालयांना रेमडिसीवीरचा पुरवठा करण्यात येईल, अशी यंत्रणा करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले. यामुळे काळाबाजार रोखण्यास मदत होईल असे त्यांनी स्पष्ट केले.

इंजेक्शनवरील छापील एमआरपी कमी कराव्यात अशी0 सूचना आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केली. राज्यात कुठेही 1100 ते 1400 रुपये या किमतीत रेमडेसीवीर मिळाले पाहिजे, असे सांगतानाच डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समिती या कंपन्यांशी चर्चा करून इंजेक्शनची किंमत निश्चित केली जाईल, असे श्री. टोपे यांनी सांगितले.

येत्या रविवारी(ता.11) होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्याचा एकमताने निर्णय; परिस्थिती पाहून परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर केल्या जातील

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची रविवारी 11 एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे

जनसंपर्क कक्ष ( मुख्यमंत्री सचिवालय)

मुंबई, दि ९ एप्रिल :  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी म्हणजे ११ एप्रिल २०२१ रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ची संयुक्त पुर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. 

राज्यातील कोरोना स्थिती लक्षात घेऊन या परीक्षेच्या तारखा  एमपीएससी मार्फत नव्याने घोषित केल्या जातील असे ही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.   ते पुढे म्हणाले की, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत  असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आणि विद्यार्थी आणि विविध राजकीय पक्षांचे यासंदर्भातील  मत आणि मागण्या विचारात घेऊन हा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.

ही परीक्षा पुढे ढकलल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही तसेच परीक्षा फॉर्म भरतांनाचे  विद्यार्थ्यांचे वय गृहित धरले जाणार असल्याने वयाची ही अडचण येणार नसल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

बैठकीस  गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,  जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार, विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड यांच्यासह आयोगाचे प्रभारी सचिव संघ तवरेज आदी मान्यवर उपस्थित होते.

बैठकीत उपस्थितांना राज्यातील कोरोना स्थिती आणि करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्यसचिवांनी दिली.

बैठकीत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी उपस्थित सर्व मंत्री आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्याशी साकल्याने चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. बैठकीत कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ही परीक्षा पुढे ढकलावी अशी विद्यार्थ्यांचीही मागणी असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1380470490280689668?s=19

https://twitter.com/Awhadspeaks/status/1380456839008124930?s=19

आता खालील आदेश रद्द समजावा

[ महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त (पुर्व) परीक्षा केंद्र

परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड (जिमाका) दि. 8 :- महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा-2021 परीक्षा रविवार 11 एप्रिल 2021 रोजी नांदेड जिल्ह्यातील 66 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कळवले आहे. 

नांदेड जिल्ह्यातील विविध 66 विद्यालय, महाविद्यालयातील केंद्रावर सकाळी 11 ते दुपारी 12 या कालावधीत परीक्षा होणार असून त्यासाठी 18 हजार 816 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. परीक्षेचे कामकाज सुरळीत व शांततेत पार पडावे यासाठी परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरातील फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार परीक्षेच्या दिवशी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित असलेले अधिकारी, कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.]

अवैध दारू व शिंदी विक्री करणा-यावर रामतिर्थ पोलिसांनी छापा टाकून १६,३६२ रूपयांचा मुद्देमाल केला जप्त,दोघांविरोधात गुन्हा दाखल

 


रामतिर्थ(नांदेड) : कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला.लाॅकडाउन काळात अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकान बंद ठेवण्यात आली. माञ या काळात अवैध देशी दारू व शिंदी विकणा-या दोघांना पकडून रामतिर्थ पोलीस स्टेशन मध्ये दारू बंदी गुरनं 73/21 कलम 65(ई) व दारू बंदी गुरनं 74/21 कलम 65(ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त खबरी नुसार नरसी येथील महेबुब नगर मध्ये अवैध देशी दारू व शिंदी ची विक्री चालू असल्याची माहीती मिळताच रामतिर्थ पोलिस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांनी छापा टाकला असता आरोपीने आपले ताब्यात विना परवाना बेकायदेशीर रित्या देशी दारुच्या बाटल्या,प्रो गुन्ह्याच्या मालाची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात बाळगलेला मिळून आला. आरोपी पांडुरंग लिंगूराम सूर्यवंशी रा.नरसी ता.नायगाव यांच्याकडून १४,९७६/- रूपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त करून त्याच्या विरोधात पोलीस काॅन्स्टेबल अनिल रिंदकवाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दारू बंदी गुरनं 73/21 कलम 65(ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दुस-या घटनेत महेबुब नगर मध्ये छापा टाकला असता आरोपीने आपले ताब्यात विना परवाना बेकायदेशीर रित्या देशी दारुच्या बाटल्या व पांढ-या रंगाची सिंदी, प्रो गुन्ह्याच्या मालाची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात बाळगलेला मिळून आला. त्या ठिकाणी १३८४/--रूपये किमतीची देशी दारू व शिंदी जप्त करून आरोपी विठ्ठल लक्ष्मण गायकवाड रा. नरसी ता.नायगाव यांच्या विरोधात पोलीस काॅन्स्टेबल अनिल रिंदकवाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दारू बंदी गुरनं 74/21 कलम 65(ई) नुसार रामतिर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध दारू,शिंदी विक्री करणा-यांचे धाबे दनानले आहेत.

सदर गुन्ह्याचा तपास सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनखाली बिट जमादार मिरदोडे हे करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस काॅन्स्टेबल अनिल रिंदकवाले, विलास भोळे,प्रल्हाद आडे, यांनी केली आहे.
सर्व सामान्य नागरीकांकडून पोलीसांच्या या कारवाई बद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.पुढील दारु बंदी काळात पोलीसांकडून या बेकायदा दारु विक्री करणा-यांवर अशाच कारवाया व्हाव्यात असे बोलल्या जात आहे.



Popular posts लोकप्रिय पोस्ट