लाच प्रकरण : महा लाचखोर महावितरण सहायक अभियंता चोरावर मोर व्हायला जाऊन 30,000 पाई अडकला एसीबीच्या जाळ्यात
प्रेस नोट दिनांक-३०/०६/२०२१ ३० हजार रूपये लाचेची मागणी केली म्हणुन महावितरण शाखा क. १ लातुर च्या सहायक अभियंता शेख मन्सुर नजीर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल. यातील तक्रारदार यांच्या हॉटेलच्या लाईटने मिटर मधून विद्युत प्रवाह काढून थेट लाईटचा वापर करून विज चोरी केली म्हणुन सहायक अभियंता शेख मन्सुर नजीर याने कारवाई न करणेसाठी ३०,०००/- रुपये लाचेची मागणी केली म्हणून दिनांक २९/०६/२०२१ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या कडे तकार प्राप्त झाली होती. तक्ररदार यांचे तक्ररीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर यांच्या कडून दिनांक २९/०६/२०२१ रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता, तक्रारदार यांच्या हॉटेलच्या लाईटचे मिटर मधून विद्युत प्रवाह काढून थेट लाईटचा वापर करून विज चोरी केली म्हणून सहायक अभियंता शेख मन्सुर नजीर याने कारवाई न करणेसाठी ३०,०००/- रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तक्ररदार ३०,०००/- रुपये लाचेची रक्कम घेवून आलोसे शेख मन्सुर नजीर, पद- सहायक अभियंता, वर्ग २. नेमणुक महावितरण कार्यालय लातुर शहर शाखा क १, रा. गरुड चौक लातुर याला देण्याकरीता महावितरण कार्यालय लात...