अहमदनगर,दि 12 जुलै : आलोसे क.१) बाळासाहेब कचरु जाधव, मंडळ अधिकारी, समनापूर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर, २) मनोज ज्ञानेश्वर मंडलीक, समनापूर तलाठी कार्यालयातील खाजगी मदतनिस इसम, रा. माळीवाडा नेहरु गार्डन जवळ, संगमनेर, जि. अहमदनगर यांनी ८,०००/- रुपये लाचेची रक्कम स्विकारल्याने अटक केले बाबत
यातील तक्रारदार यांनी त्यांचे चुलत्यास शेतजमिन विक्री केली होती. सदर विक्रीदस्तामध्ये चुकीचे क्षेत्र नमुद्र झाले होते. त्या दस्ता आधारे शेतीची फेरनोंद झाली होती. तक्रारदार यांनी सदर फेरनोंद रद्द करणेकरीता अर्ज दिला होता. खरेदीचे फेर मंजूर करतेवेळेस रद्द लेखा प्रमाणे खरेदीनोद रद्द करण्याचे काम करून देण्यासाठी आलोसे क१) बाळासाहेब क जाधव, मंडळ अधिकारी, समनापूर ता. संगमनेर, जि. अहमदनगर यांनी आरोपी क.२) मनोज ज्ञानेश्वर मंडलीक, समनापूर तलाठी कार्यालयातील खाजगी मदतनिस इसम. रा.माळीवाडा नेहरु गार्डन जवळ, संगमनेर, जि. अहमदनगर यांचे मध्यस्थीने तकारदार यांचेकडे १०,०००/ रुपये लाचेची मागणी केल्यामुळे तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर कार्यालयात तक्रार दिली.
सदर तक्रारिवरुन ला प्र वि अहमदनगर पथकाने पडताळणी करून सापळा आयोजित केला असता आलोसे क१) बाळासाहेब कचर जाधव, मंडळ अधिकारी, समनापूर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर यांनी आरोपी क.२) मनोज ज्ञानेश्वर मंडलीक, समनापूर तलाठी कार्यालयातील खाजगी मदतनिस इसम यांचे मध्यस्थीने तक्रारदार यांचेकडून १०,०००/ रुपये लाचेची मागणी केली व तडजोडीअंती ८,०००/- रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम दि.१२/७/२०२१ रोजी पंच व साक्षीदार यांचे समक्ष स्विकारली असता त्यांना पकडण्यात आले आहे.
लाचलुचपत विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारसंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तकार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्यशी संपर्क करावा. संपर्क पत्ता ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र नाशिक कार्यालय
✍️✍️✍️


