लाच प्रकरण :महा लाचखोर मुख्याधिका-यासह लाचखोर उद्यान पर्यवेक्षक व ईतर एका लाचखोराला 9 लाख लाच मागणी प्रकरणी गुन्हा दाखल, व महा लाचखोर सहकार अधिकारी 15 हजार लाच घेताना आणि एका लाचखोर वकीलाला 10 हजार लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले
Pune : पुणे अॅन्टी करप्शनचा तिहेरी दणका! 9 लाखाच्या लाच प्रकरणी बडा अधिकारी ACB च्या 'रडार'वर; पुण्यातील वकिलासह शिरूर आणि तळेगाव दाभाडे येथे कारवाई, प्रचंड खळबळ पुण्याच्या लाच लुचपत विभागाने आज तिहेरी कारवाई करत जिल्ह्यात खळबळ उडवून दिली असून,यात एका मोठ्या अधिकाऱ्याचा समावेश आहे. शिरूर, तळेगाव दाभाडे व पुण्यातील एका वकिलाचा समावेश आहे. पिंपरी चिंचवडमधील तळेगाव दाभाडे येथील पालिकेचे मुख्याधिकारी शाम पोशट्टी (सीओ) आणि आणखी एका अधिकाऱ्याने 9 लाख रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले आहे. तक्रारीत लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एसीबीने आज डिमांडचा (लाचेच्या मागणीचा गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली आहे. त्यांना पकडले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. पाहिल्या कारवाईत शिरुर येथील शिवाजी महादु गव्हाणे ( वय 56 ) यांना पकडले आहे. शिवाजी हे शिरूरमधील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात सहकार अधिकारी आहेत. यातील तक्रारदार यांनी त्यांचा सावकारी परवाना नुतणीकरणासाठी अर्ज केला होता. त्यावेळी लोकसेवक शिवाजी यांनी 20 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे...