पोस्ट्स

मार्च, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वारकरी सांप्रदायाची मुस्कटदाबी अशापद्धतीने किती दिवस करणार आहात ?; बंडातात्या कराडकरांचा सवाल...

इमेज
बंडातात्या कराडकर पोहोचले देहूच्या वेशीवर देहू (२९ मार्च) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी देहू येथील संत तुकाराम महाराज देवस्थानात केवळ ५० लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.  मात्र वारकरी सांप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांनी या निर्णयाविरोधात देहूच्या वेशीवर तीन वाजल्यापासून आंदोलन सुरु करण्याची घोषणा केलीय.  ही घोषणा करताना त्यांनी वारकरी संप्रदायाची मुस्कटदाबी अशापद्धतीने किती दिवस करणार आहात?  असा प्रश्न प्रशासनाला विचारला आहे.  "यंदा देहू येथील तुकाराम बीज कोणत्याही परिस्थितीत वारकरी सांप्रदाय साजरी करणारच, यासाठी आमच्यावर काही गुन्हे दाखल झाले तरी या गुन्ह्यांना सामोरे जायची आमची तयारी आहे,”  असं बंडातात्या कराडकर यांनी दीड आठवड्यापूर्वी सातारा येथे म्हटलं होतं.  हीच भूमिका कायम असल्याचं बंडातात्यांनी स्पष्ट केलं आहे.  “आमच्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत.  देहूकरांनी कोणती भूमिका घ्यावी त्याचं स्वातंत्र्य देहूकरांना आहे.  हा वैयक्तिक निर्णय आहे असं जेव्हा देहूकर म्हणतात तेव...

Deepali Chavan suicide case : दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमारला न्यायालयाने दिली तीन दिवसाची पोलिस कस्टडी...

इमेज
अखेर उप वनसंरक्षक विनोद शिवकुमार निलंबित व्याघ्र प्रकल्पाच्या दिवंगत रेंज ऑफिसर दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येसंदर्भात उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्याविरुद्ध धारणीच्या पोलीस ठाण्यात आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणे संदर्भात कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवकुमार याला स्थानिक गुन्हे शाखेकडून नागपूर येथून अटक करण्यात आली आहे. विनोद शिवकुमार याला तडकाफडकी गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक या पदावरून दूर केले आहे. अमरावती : मेळघाटातील बहुचर्चित दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यास न्यायमूर्ती एम. एस. गाडे यांच्या न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याला धारणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या हरिसाल येथील आरएफओ दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विनोद शिवकुमार हा रातोरात मेळघाटातून फरार झाला होता. मात्र अमरावतीच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून त्याला मोठ्या शिताफिने २६ मार्चला नागपूर रेल्वे स्थानकातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यास अमरावती येथे आणून लगेच काल...

एसीबीची तीन दिवसात दुसरी कारवाई : लाचखोर महिला सहा.पोलीस निरीक्षक (रेल्वे) सह दोन लाचखोरांना साडे बारा हजार घेताना एसीबीने त्यांच्या मागे साडेसाती लावून घेतले ताब्यात पण एक भगोडा लाचखोर लाच घेऊन पळून गेला

इमेज
  लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाची तीन दिवसात दुसरी कारवाई रेल्वे पोलिस कर्मचारी एक लाख रुपयाची लाच स्विकारताना अटक गंगाखेड प्रतिनिधी :- लाचलुचपत विभागाची गंगाखेड तालुक्यातील दि २२ मार्च रोजी तलाठी आणि सरपंच यांना १२,५०० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते. ही घटना ताजी असताना दिनांक २५ मार्च रोजी परळी पोलिसांकडून एक लाख रुपयांची लाच घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षक महिलेसह दोघांना रंगेहात पकडले आहे.  गंगाखेड रेल्वेस्थानकावरील कँन्टीन चालू देण्यासाठी व आॅट्रासिटी गुन्हा दाखल न करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागणार्‍या परळी येथील रेल्वे पोलिस ठाण्यातील एका महिला सहाय्यक पोलिस निरीक्षकासह लाच स्वीकारणार्‍या दोघा पोलिस कर्मचार्‍यांविरीध्द परभणीच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दि.२५ मार्च रोजी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी सुरू होती. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक भरत हुंबे यांच्यासह पोलिस निरीक्षक अमोल कडू यांची तक्रारदाराने भेट घेतली. परळी रेल्वे पोलिस ठाण्याच्या...

विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय रुग्णालयात खाटाच्या माहितीसाठी कोविड-19 चौकशी कक्ष सुरु

इमेज
रुग्णाला महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी रुग्णाचे आधार कार्ड व रेशनकार्ड सोबत आणावे नांदेड, दि 26 :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथील बाह्यरुग्ण विभागात “कोविड-19 चौकशी कक्ष” 24×7 तासासाठी सुरु करण्यात आला आहे. या कक्षात वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता 24 तास उपलब्ध राहणार असून येथील दूरध्वनी क्रमांक 02462-229221 असा आहे. रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी खाटा उपलब्ध आहेत किंवा नाही याची माहिती येथे उपलब्ध करुन दिली जाईल.  जिल्ह्यासह, शहरातील तसेच इतर ठिकाणाहून किंवा रुग्णालयातून संदर्भीत होणाऱ्या रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी 02462-229221 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करुन खाटा उपलब्ध असल्यास रुग्णाला येथे संदर्भीत करावे. रुग्ण संदर्भीत करतांना रुग्णाचे आधार कार्ड व रेशनकार्ड सोबत आणण्यास संदर्भीत करणाऱ्या रुग्णालयाने सांगावे जेणेकरुन रुग्णाला महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत लाभ देता येईल. कोरोनामुळे मृत्त पावलेल्या व्यक्तीच्या देहाच्या अंत्यसंस्कार संदर्भातील माहितीसाठी डॉ. अक्षय गव्हाणे यांचा भ्रमणध्वी क्रमांक 9527895183 येथे सं...

केंद्र सरकारची परवानगी घेऊन बेहिशोबी मालमत्तेने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या IPS अधिका-यांना पाठवले कायमचे घरी

इमेज
 योगी सरकारने अमिताभ ठाकुर यांच्यासोबत आणखी दोन IPS अधिकाऱ्यांना घरी पाठवले आहे._IPS Amitabh Thakur केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर योगी सरकारने हे पाऊल उचलले. लखनऊ : अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडणारे IPS अधिकारी अमिताभ ठाकुर (Amitabh Thakur) यांना उत्तर प्रदेश सरकारने निवृत्त केले आहे. यानंतर अमिताभ ठाकुर यांनी आपल्या लखनऊमधील घराबाहेर लावलेल्या नेमप्लेटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अमिताभ ठाकुर हे लखनऊच्या गोमती नगरमध्ये वास्तव्याला आहे. या घराबाहेर त्यांनी स्वत:च्या नावाखाली पद आणि ‘जबरिया रिटायर्ड’ (Jabira Retired) अशी उपाधी लावून घेतली आहे. त्यांचा हे छायाचित्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (IPS Jabaria retired IPS Amitabh Thakur in UP) योगी सरकारने अमिताभ ठाकुर यांच्यासोबत आणखी दोन IPS अधिकाऱ्यांना घरी पाठवले आहे. केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर योगी सरकारने हे पाऊल उचलले. जनहितार्थ या दोन्ही अधिकाऱ्यांना निवृत्त करण्यात आल्याचे कारण योगी सरकारने दिले. नियमांचे पालन न करणे आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आल्याचेही ...

जामीन म्हणजे काय? जामीन कशी मिळवायची? जामीन किती प्रकारची असते?, जामीनासाठी सातबारा नसेल तर काय करावे?

इमेज
  जामीन करण्यासाठी सातबारा असावा असे काही बंधन नाही,जामीनाचे काही पैसे भरून देखील जामीन मिळविता येतो, न्यायालयाकडे जामीनात सुट मागता येते जामीन म्हणजे काय? (बेल) जामीन म्हणजे एखाद्याने दिलेल्या वचनाची परिपूर्ती किंवा दायित्वाची फेड करविण्याची जबाबदारी पतकरणे. या अर्थाने हमी, हमीदार, प्रतिभू संज्ञांचाही वापर होतो. फौजदारी किंवा दिवाणी कायदेशीर बाबींसंबंधी पकडलेल्या किंवा पकडण्याचा संभव असणाऱ्या व्यक्तीस न्यायालयात उपस्थित राहण्याची हमी घेऊन मुक्त करण्याकरिता न्यायाधिशांनी अनुसरलेली ही एक पद्धती आहे. फौजदारीप्रमाणे दिवाणी कायद्यातही जामीन घेण्याचे अनेक प्रसंग येतात. त्या दृष्टीने कायद्यांत जामीनाकरिता तरतूद करण्यात आली आहे. फौजदारी गुन्ह्याच्या आरोपाखाली पकडलेल्या व्यक्तीस चौकशी होईपर्यंत सोडण्याकरिता जामीनाचा उपयोग होत असल्यामुळे फौजदारी कायद्यात, विशेषतः गुन्हेगाराच्या दृष्टीने जामीनास विशेष महत्त्व आहे. न्यायचौकशीच्या अथवा तपासणीच्या वेळी आवश्यकता पडल्यास उपस्थित राहण्याच्या प्रतिभूतीवर एखाद्याची कारागृहातून, स्थानबद्धतेतून किंवा कोणत्याही प्रकारच्या निर्बंधातून त्याप्रमाणे संभाव्...

दरोडेखोरांना अभय देणार्‍या भाग्यनगरच्या पोलीसांवर कारवाई करण्याची पत्रकारांची मागणी

इमेज
गुन्हा दाखल न करण्यामागे भाग्यनगर पोलीसाचे गौडबंगाल काय आहे? नांदेड,(दि.२५ मार्च) : नांदेड शहरात सध्या कायदा आणि सुव्यवस्थेचे ढिंधवडे निघत आहेत. सुपारीबाज दरोडेखोर आणि पोलीस यांच्या अभद्र युतीतूनच निर्मल होस्टेलवर दरोडा पडला आहे. काही सुपारीबाज दरोडेखोरांनी जवळपास पाच तास लूट करीत असतानाही भाग्यनगरचे पोलीस मात्र कोणाच्या दबावाखाली या दरोड्याकडे दुर्लक्ष करीत होते हे समजत नाही. दरोडा पडून पाच ते सहा दिवस होत आहेत तरीही भाग्यनगरच्या पोलीसांकडून या दरोड्याचा गुन्हा दाखल न करता कायद्याची अमलबजावणी न करता तपास करत असल्याचेच सांगत आहेत. तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करुन तपास करायचे की तपास करुन गुन्हा दाखल करायचे आणि गुन्हेगारांना शोधायचे हेच पोलीसांना समत नाही काय? असा प्रश्न निर्माण होतो आहे. भाग्यनगरचे पोलीस म्हणजे हिटलरशाहीचा नमुना बनत आहे. या पोलीस स्टेशनचे अनेक कारनामे सध्या चर्चित आहेत. कायदा आणि सुव्यवस्था नावालाच शिल्लक असून फक्त आपल्या थैल्या भरण्यासाठीच कायदा व सुव्यवस्थेला फासावर चढवण्याचे काम पोलीस यंत्रणेकडून सुरु आहे. सामान्य नागरीकांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवून गुंड आण...

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनेच्या फिरत्या वाहनाद्वारे प्रसिद्धी उपक्रमाचे उद्घाटन

इमेज
  जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते दोन वाहनांना हिरवी झेंडी नांदेड, दि. 23 मार्च :- विशेष घटक योजनेंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांची माहिती ग्रामीण भागात व्हावी या उद्देशाने फिरत्या वाहनाद्वारे प्रचार-प्रसिद्धीच्या उपक्रमाचे आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, माहिती सहायक अलका पाटील आदी उपस्थित होते. कोरोनाच्या त्रीसूत्रीसह हे वाहन ग्रामीण भागामध्ये जनजागृतीचे काम करेल. सामाजिक न्यायाच्या विविध योजनांची माहिती असलेले हे दोन वाहने जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून जनजागृती करतील. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातून ही वाहने बुधवार 24 मार्च रोजी जिल्ह्यात विविध ठिकाणी मार्गस्थ होणार आहेत. कोरोनाचा वाढत जाणारा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी ग्रामीण भागात त्रीसूत्रीच्या जनजागृतीसह सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांची माहिती या फिरत्या वाहनाद्वारे जिल्ह्यातील गावा...

कुंभार समाज विकास संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदी ॲड.सोनम तोषटवाड

इमेज
  अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या नांदेड महिला जिल्हाध्यक्षपदी ॲड.सोनम तोषटवाड यांची निवड करण्यात आली. नायगाव : अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे कार्य उल्लेखनीय असून कुंभार समाजातील तळागाळातील लोकांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी ही संघटना आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मोहनराव जगदाळे यांच्या आदेशाने व राज्य युवक संपर्क प्रमुख श्रीरामजी तेलंग यांच्या निर्देशानुसार राज्य सचिव मनोहरजी जाधव यांच्या सहीचे नियुक्तीपत्र देऊन ही निवड करण्यात आली आहे. मागील चार महिन्यापुर्वी नांदेड जिल्ह्यात अखिल महाराष्ट्र कुभार समाज विकास संस्थेच्या वतीने साठ इलेक्ट्रिकल चाकांचे वाटप करण्यात आले होते. संघटनेच्या अशा विविध कार्याला समाजातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. नांदेड जिल्ह्यातील अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे संघटन मजबूत करण्यासाठी ही निवड करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बालाजी जोरूळे यांनी दिली. या निवडीबद्दल संतोष इबितदार यांच्या सह अनेक समाज बांधवांनी अभिनंदन केले आहे. ✍️✍️✍️ संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर 7767912933 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा. सापळा...

लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाला २५ हजाराची लाच स्विकारताना एसीबीच्या पथकाने पकडण्याचा प्रयत्न केले असता पिस्टल दाखवून बुलेटणने ठोकर मारुन दुखापत करून लाच घेऊन पळून गेला

इमेज
लाचेची यशस्वी सापळा कारवाई ▶️ *युनिट -* रायगड ▶️ *तक्रारदार-* पुरुष, वय- 47वर्षें,   ▶️ *आरोपी- गणेश जनार्दन कांदेकर , पोलीस उप निरीक्षक माणगाव पोलीस ठाणे ( वर्ग 3) ▶️ *लाचेची मागणी-* /५०,०००/- रुपये,तडजोडी अंती २५,०००/- रुपये ▶️ *लाच स्विकारली-* २५,०००/ रुपये  ▶️ *हस्तगत रक्कम-* __ ▶️ *लाचेची मागणी -* ता.२२/०३/२०२१ ▶️ *लाच स्विकारली -* ता. २४/०३/२०२१ रोजी ११:३०वा.  ▶️ *लाचेचे कारण -*. यातील तक्रारदार यांनी पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा, अलिबाग यांचेकडे केलेल्या तक्रारी अर्जाचे अनुषंगाने गैर अर्जदार यांचेवर गुन्हा दाखल करणे करीता PSI कांदेकर, माणगाव पोलीस ठाणे यांनी तक्रारदार यांचेकडे ५०,०००/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती २५,०००/- रुपये लाचेची मागणी करून आज दि.२४/०३/२०२१ रोजी ११.३० वाजता चे सुमारास काळनदी ब्रिजला लागून असलेल्या रॉयल फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक मॉल मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गा लागत स्वीकारली त्यावेळी पोलीस निरीक्षक श्री.गलांडे व पो ह मोरे व सापळा पथक यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता आलोसे यांना सापळ्याचा संशय आल्याने PSI का...

दुःखद घटना..... जिल्हा परिषद शाळा दरेकसा येथील विद्यार्थीनी कु. साक्षी मुसाहे हीचे ब्रेन हॅमरेज ने निधन..

इमेज
गोंदिया, (दि. 23 मार्च): मागील काही दिवसांपासून शासकीय रुग्णालय नागपूर येथे ब्रेन हँमरेज अटॅक मुळे दाखल असलेली जिल्हा परिषद शाळा दरेकसा पं. स. सालेकसा येथील विद्यार्थीनी कु. साक्षी मुसाहे हीचे आज रुग्णालयात निधन झाले. कु. साक्षी मुसाहे ही जिल्हा परिषद शाळा, दरेकसा येथे इयत्ता 3रीत शिकत होती. अत्यंत गरीब कुटुंबातील असल्याने शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी तिच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्यांच्या आवाहनाला जिल्ह्यातील अनेक शिक्षक, केंद्रप्रमुख व इतर अधिकाऱ्यांनी सढळ हाताने मदत केली. परंतु साक्षीने उपचाराला प्रतिसाद दिला नाही व आज तिची प्राणज्योत मावळली. साक्षीच्या जाण्याने संपूर्ण मुसाहे परिवार दुःखात बुडाला असून जिल्ह्या चा शिक्षण विभाग त्यांच्या दुःखात समाविष्ट असल्याची प्रतिक्रिया शिक्षणाधिकारी(प्राथ.) राजकुमार हिवारे यांनी दिली आहे. ✍️✍️✍️ संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर 7767912933 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा. सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग 👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा www.nandednewsupdate.blogspot.com

लाचखोर ग्रामसेवकासह खाजगी इसम ८ हजाराची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले

इमेज
लाच देणे आणि घेणे दोन्ही कायद्याने गुन्हा *सापळा अहवाल* ▶️ युनिट - औरंगाबाद, ▶️ तक्रारदार- पुरुष, वय-41 ▶️ आरोपी लोकसेवक:- 1. श्री.चरणसिंग असरामसिंग राजपूत ,वय 36 , पद- ग्रामसेवक,वर्ग (३)नेमुणक- कोळघर, जि.औरंगाबाद   2. (खाजगी इसम) ज्ञानेश्वर परमेश्वर आवारे, वय 55 वर्ष राहणार कोळघर, जि.औरंगाबाद #लाचेची मागणी- 8000/-रूपये दि.22/03/2021 #लाच स्वीकारली-8000/-रुपये  दि.22/03/2021           ▶️ कारण - यातील आलोसे लोकसेवक यांनी तक्रारदार यांचे वडिलांनी खरेदी केलेली मोकळी जागा तक्रारदार यांचे नावावर करण्यासाठी 8000/- लाचेची मागणी करून आरोपी क्र.2 खाजगी इसम यांचे मार्फत सदर लाच स्वीकारली. ▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे. ▶️ सापळा अधिकारी, श्री नंदकिशोर क्षीरसागर पोलीस निरीक्षक ला प्र वि औरंगाबाद ▶️मार्गदर्शक-मा. डॉ.राहुल खाडे,पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि. औरंगाबाद मा.डाॅ. अनिता जमादार मॅडम. अपर पोलीस अधीक्षक,  मा .श्री.गावडे पोलिस उपअधीक्षक ला.प्र.वि.औरंगाबाद. ➡️सापळा पथक  ईप्पर, नागरगोजे, देसाई, उमेश जाधव, उगले , ठाकूर, श्रीसुंदर. टोल फ्री...

लाचखोर अपर तहसीलदार ४ लाख ७० हजाराची लाच मागणी करुन, १ लाख ५० लाच घेताना अडकला एसीबी पथकाच्या जाळ्यात

इमेज
लाच देणे आणि घेणे दोन्ही कायद्याने गुन्हा  आदरणीय सर, जयहिंद सापळा अहवाल ▶️ युनिट - जालना, ▶️ तक्रारदार- पुरुष, वय- 40 वर्ष ▶️ आरोपी लोकसेवक:- श्री.किशोर अवचितराव देशमुख ,वय 50 वर्षे, पद-अपर तहसिलदार, औरंगाबाद, जि.औरंगाबाद (वर्ग-1 ) ▶️ लाचेची मागणी- 4,70,0000/- व   ▶️ स्विकृती, 1,50,000/-रु. दिनांक 22/03/2021 रोजी                             ▶️ कारण - यातील तक्रारदार यांचा वाळू ठेकेदारी व्यवसाय असुन, शासनाच्या अधिकृत वाळुचे टेंडर मधुन वाळू वाहतूक दरम्यान अपर तहसीलदार औरंगाबाद यांचा पोलीस स्टेशनला लावलेल्या गाड्यांचा चांगला अहवाल पोलीस स्टेशनला पाठविण्यासाठी 3,20,000/-रु. व टेंडर मधिल वाळू हायवा द्वारे माहेवारी वाहतूक करु देण्यासाठी 1,50,000/-रुपये प्रमाणे अशी दि.10/03/2021 रोजी मागणी करुन त्यापैकी माहेवारी वाळू वाहतूक करु देण्यासाठी तक्रारदार यांचेकडून 1,50,000/ रुपये लाच स्वतः स्वीकारली असतांना दि.22/03/2021 रोजी आलोसे यांना ताब्यात घेतले आहे. ▶️स्विकृती ठिकाण-MTDC रेस्ट हाऊस समोरील क्रांत...

मन हेलावून टाकलेल्या भोकरच्या दिवशी बु.येथील ५ वर्षीय बालिकेवरील अत्याचार व खून प्रकरणात गुन्हेगार नराधम सालगड्यास भोकर जिल्हा सत्र न्यायालयाने २२ दिवसात दिली फाशीची शिक्षा- न्या.एम.एस.शेख यांचा ऐतिहासिक निकाल

इमेज
 हा न्यायनिवाडा अवघ्या २२ व्या दिवशी लागल्याने अशा प्रकारचा निकाल राज्यात पहिलाच असल्याचे बोलल्या जात आहे. खऱ्या अर्थाने पिडीतेला न्याय मिळाल्याच्या भावना अनेकांच्या चेहऱ्यावर दिसुन येत होत्या भोकर (दि. २३ मार्च) : ५ वर्षीय बालीकेवर पाशवी अत्याचार करुन तिची निर्घृन हत्या केलेल्या अमानुष घटनेचे सबंध महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटलेल्या गुन्ह्यातील आरोपी विरुद्धचा गुन्हा सिद्ध झाल्याने भोकर जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायधीस मुजीब एस शेख यांनी फाशीची शिक्षा सुनावली आहे.                 सदरील गंभीर गुन्ह्याचा खटला भोकर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात चालविण्यात आला होता.हा निर्णय ऐकण्यासाठी तालुक्यातील अनेकांनी भोकर न्यायालयात गर्दी केली होती,जलदगती न्यायालयाप्रमाणे सदरील गंभीर गुन्ह्याचा निकाल अवघ्या बावीस दिवसात दिल्याने पीडित मयत व कुटूंबियास न्याय मिळाला असल्याची प्रतिक्रिया जनसामान्यातून व्यक्त होत आहे.                   दिवशी बु.ता.भोकर,जि.नांदेड येथील एका शेतक-याच्या ५ वर्षीय नि...

31 एप्रिल 2021 नंतर मिळणार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 8 वा हप्ता,लवकरच नोंदणी करुन घ्या

इमेज
नांदेड : आपण जर शेतकरी असाल आणि आपली पंतप्रधान-किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी केली नसेल तर लवकर नोंदणी करुन घ्या, कारण या योजनेसाठी शेवटची तारीख 31 मार्च 2021 देण्यात आली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 8 वा हप्ता 31 एप्रिल, 2021 नंतर मिळण्यास सुरुवात होणार आहे.  या योजनेचे पैसे केवळ त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या नावाची नोंदणी केली आहे. हा हफ्ता थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान-किसान योजनेचा २ हजार रुपयांचा हप्ता होळीच्या आधी म्हणजेच 31 एप्रिल नंतर तुमच्या खात्यात जमा होणार आह 6 हजार मिळवायचे असतील तर लवकर नोंदणी करा जर आपल्याला पंतप्रधान-किसान सन्मान निधी योजनेचे 6 हजार रूपये मिळवायचे असतील तर 31 मार्च पूर्वी नोंदणी करुण घ्या. या योजनेअंतर्गत नाव नोंदवण्यासाठी आपल्याला आपले सेवा केंद्र किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये ही नावाची नोंदणी करता येऊ शकेल. यासह शेतकरी आपली कागदपत्रं गावातील तलाठी कार्यालयात जमा करुनही नाव नोंदणी करु शकतो.तसेच  New farmer registration form  वर स्वतः आपल्या नावाची नोंदणी करु शकता. हप्ता ज...

लाचखोर मंडळ अधिकारी व लालची सरपंच बारा हजार पाचशे ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

इमेज
  गंगाखेड प्रतिनिधी :- राणीसावरगाव चे मंडळाधिकारी बालाजी लटपटे व वाघदरा चे सरपंच गोविंद सानप यांना बारा हजार पाचशे रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक क्षेत्र परभणी या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे. ही कारवाई दिनांक २२ मार्च २०२१ रोजी बालाजी लटपटे यांच्या व्यंकटेश नगर येथील घरामध्ये करण्यात आली. परभणी पथकाने सापळा रचुन सरपंच गोविंद सानप व मंडळाधिकारी बालाजी लटपटे यांना लाच स्वीकारताना पंचांसमक्ष रंगेहात पकडले आहे. यातील तक्रारदार यांनी वाघदरा शिवारामधील त्यांच्या आजोबा चे नावे असलेले जमिनीचा कोर्टाकडून झालेल्या तडजोडीचा फेरफार त्यांचे वडील व चुलते यांच्या नावे करून देण्यासाठी मंडळ अधिकारी व सरपंच त्यांच्याकडून १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली असता तडजोडी अंती बारा हजार पाचशे रुपये देण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे तक्रारदार यांनी गंगाखेड येथे मंडळाधिकारी यांच्या घरी गेले सरपंच गोविंद सानप यांच्या हस्ते मंडळाधिकारी लटपटे यांनी ते पैसे स्वीकारल्याने त्याच ठिकाणी परभणी लाचलुचपत प्रतिबंधक अधिकारी यांनी त्यांना सापळा रचून रंगेहात पकडले दोघांनाही रोख रक्कमेसह पोलिसांनी ताब्यात घेतले...

लाचखोर महिला नायब तहसीलदार,रेशन दुकानदार संघटनेच्या अध्यक्षासह तिघांना लाच घेताना अॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले

इमेज
उस्मानाबाद : महिला नायब तहसीलदार, रेशन दुकानदार संघटनेचा अध्यक्ष याच्यासह तिघांना पावणे सात हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. कोरोना काळात मोफत धान्य वाटप प्रकरणात शासनाकडून आलेली मदत देण्यासाठी त्यांनी ही लाच घेतली आहे. नायब तहसीलदार अन दोन रेशन धारक दुकानदाराना पकडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. परविन उमर दराज खान पठाण (वय 47), श्रीरंग साधू डोंगरे (वय 64) आणि विलास ज्ञानोबा पिंगळे (वय 55) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. कळंब तालुक्यातील तहसील कार्यालयात परवीन या नायब तहसीलदार (पुरवठा) आहेत. तर श्रीरंग हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचा तालुका अध्यक्ष आहे. यातील तक्रारदार हे स्वस्त धान्य दुकानदार आहेत. त्यांनी लॉकडाउन काळात मोफत धान्य वाटप केले होते. त्याचे प्रत्येकी एक क्यूँटल मागे 150 रुपये प्रमाणे शासनाकडून बिल मिळते. त्यानुसार तक्रारदार यांना गेल्या तीन महिन्याचे 44 हजार 623 रुपये बिल मंजूर झाले होते. ते बिल काढून देण्यासाठी लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे 6 हजार 693 रुपये ल...

विनम्र आवाहन ……गरीब कुटुंबातील तिसरीत शिकणाऱ्या ब्रेन हॅमरेज ग्रस्त विद्यार्थिनीच्या उपचारासाठी तात्काळ आर्थिक मदतीची गरज…

इमेज
समाजातील दानशूर व्यक्तींनी, शिक्षण क्षेत्रातील अधिकारी, शिक्षक, केंद्रप्रमुख, व इतर कर्मचारी यांनी मदत करण्याचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी केले आवाहन ||दाता भवती वा न वा|| गोंदिया, (दि. 21 मार्च) : जिल्ह्यातील पंचायत समिती सालेकसा अंतर्गत जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा दरेंकसा केंद्र दरेकसा येथील इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी कु.साक्षी दिवाकर मुसाहे हिला ब्रेन हॅमरेज अटॅक आला असून ती नागपूर येथील शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल आहे.गरीब परिवारातील कुटुंब मुलीचा जीव वाचविण्यासाठी संघर्ष करीत आहे. मुलीचे आई वडील दोन्ही रोजंदारीवर काम करणारे मजूर असून हातावर पोट असलेल्या या गरीब कुटुंबांची खूप वाताहत झालेली आहे. त्यासाठी आपल्या सढळ हाताने आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. या कुटुंबासाठी आपला एक मदतीचा हात या उद्धस्त परिवारास पुनश्च उभा राहण्यास मोलाचा ठरणार आहे! करिता समाजातील सहृदय, समाजशील, कर्त्तव्यदक्ष आणि संवेदनशील अधिकारी, शिक्षक, केंद्रप्रमुख, शिक्षण क्षेत्रात कार्यरत सर्व मान्यवरांनी सढळ हाताने मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन जि. प. व. प्रा. शा. दरेकसा चे उच्च श्रेणी मुख्याध्यापक एस. टी. लांजेवार आ...

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात अ‌ॅड.जयश्री पाटील यांनी मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये दिली तक्रार

इमेज
  विधानसभा अध्यक्ष यांच्या परवानगी नंतर पुढील कारवाई केली जाईल_मलबार हिल पोलीस मलबार हिल,दि. 21 मार्च : मलबार हिल पोलीस स्टेशन येथे पत्रकार संजय चिखले यांनी रात्री १०:३० च्या सुमारास फोन करून महाराष्ट्राचे गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांचे विरुध्द कुणी तक्रार दिली आहे काय? ते बरोबर आहे काय? गुन्हा दाखल झाला आहे काय? अशी विचारणा केली तेंव्हा माहिती देताना पोलीस स्टेशनचे पिएसओ शिंदे यांनी सांगितले की,दिवसा एक तक्रार आली आहे,अद्याप गुन्हा एखादा झाला नाही कारण एखादा मंत्री किंवा आमदार यांचे विरुध्द तक्रार आल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याअगोदर विधानसभा अध्यक्ष यांची परवानगी घ्यावी लागते,त्यांनी परवानगी दिल्यानंतर पुढील कारवाई केली जाते. सविस्तर माहिती अशी आहे की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं असून त्यात त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट दिल्याचा दावा केला आहे. या पत्रात सिंग यांनी गंभीर आरोप केले आहेत. या आ...

300 चौ.मी पर्यंतचा घर बांधकाम परवाना ग्रामपंचायतीकडेच,या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सिईओंना पाठवले पत्र

इमेज
 बांधकामासाठीचे विकास शुल्क ग्रामनिधीमध्ये जमा होणार असल्याने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात होणार वाढ – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ ग्रामीण भागातील बांधकाम परवानगीसंदर्भात अधिक स्पष्टीकरणासाठी सूचना निर्गमित मुंबई, दि. १९ : राज्यातील ग्रामीण भागातील ३ हजार २२९ चौरस फुटापर्यंतच्या (३०० चौरस मीटर) भूखंडावरील बांधकामांना नगररचनाकाराच्या परवानगीची गरज नसल्याबाबतचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. याऐवजी ग्रामस्थांना आता बांधकामासाठी काही कागदपत्रे ग्रामपंचायतीकडे सादर करावयाची असून विकास शुल्क आणि बांधकाम कामगार उपकर भरावयाचा आहे. यासंदर्भात अधिक स्पष्टीकरणासाठी ग्रामविकास विभागामार्फत राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्राद्वारे अवगत करण्यात आले असून ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा देणाऱ्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती  ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढणार नगरविकास विभागाने जाहीर केलेल्या युनिफाईड डीसीआर (एकत्रीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली) यास अनुसरुन ...

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीपात्र परिसरात आजपासून कलम 144 लागू

इमेज
  या अगोदर अनेकदा कलम 144 लावण्यात आले होते 27 नोव्हेंबर ते 26 ऑक्टोबर 2019,20 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर 2020,28 डिसेंबर ते 19 जानेवारी 2021 आता 20 मार्च ते 19 एप्रिल 2021 हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड किंवा पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही नांदेड, दि. 19 मार्च :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून शनिवार 20 मार्च 2021 पासून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.  याबंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरी नदीचे पात्र आणि उत्तरे...

जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची 22 मार्चला सोमवारी बैठक, नागरिकांनी तक्रारी देण्याचे समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी यांचे आवाहन

इमेज
नमुना दाखल फोटो नांदेड, दि. 19 मार्च :- जिल्ह्यातील शासनाच्या कोणत्याही कार्यालयामध्ये चालू असलेल्या किंवा आजपर्यंत केल्या गेलेल्या भ्रष्टाचाराबाबत कोणाची काही तक्रार असल्यास अथवा एखाद्या कार्यालयामध्ये होत असलेल्या भ्रष्ट काराभाराबाबतची माहिती असल्यास त्याबाबत लेखी स्वरुपात तक्रार सोमवार 22 मार्च 2021 रोजी आयोजित जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या बैठकीत सादर करावी, असे आवाहन नांदेड जिल्हाधिकारी तथा जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे अध्यक्ष यांच्यावतीने करण्यात आले.  येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी यांचे निजी कक्षात सोमवार 22 मार्च 2021 रोजी दुपारी 3.30 वा. समितीची बैठक आयोजित केली आहे. कोणत्याही शासकीय, निमशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या भ्रष्टाचाराच्याबाबतीत तक्रारीचे निवेदन लेखी स्वरुपात प्रत्यक्ष उपस्थित राहून सादर करावे लागेल. हे निवेदन अध्यक्ष, जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती नांदेड या नावाने सबळ पुराव्यासह दोन प्रतीत सादर करावे लागेल. या बैठकीसाठी सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार असल्यामुळे आपल्या निवेदनाची तातडीने दखल घेव...

जिल्हाधिकारी विपीन इटनकर देगलूरकडे जाताना नायगावला भेट,कोरोना प्रतिबंधक पथकाचे कार्य पाहून व्यक्त केले समाधान

इमेज
नायगाव : जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी आज दि १९ मार्च रोजी सकाळी ११-०० वाजता देगलूर जात असताना अचानक नायगाव येथील अत्यंत वर्दळीचा असलेल्यां डॉ. हेडगेवार चौकात आपले वाहन थांबवून कोरोना प्रतिबंधक उपाय योजना बाबद नागरिकांशी विचारपूस केली. विचार पूस करताना नागरिकांनी दिलेली उत्तरे एकूण समाधान व्यक्त केले.     जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनीनायगावातील काही व्यापारी प्रतीस्थाने व उपहार गृहना भेट देऊन पाहणी केली कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता नायगाव शहरात प्रतिबंधात्मक उपाय योजनांची कडक अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. विनामास्क रस्त्यावर फिरणाऱ्यावर दंडात्मक कार्यवाही करीत बेजबाबदार पणे फिरणाऱ्या लोकांकडून 14 हजार 900 रु दंड वसूल करण्यात आला आहे.     जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे शहरातील उपहारगृहे, मंगल कार्यालये,कोचिंग क्लासेस, सर्वधर्मीय प्रार्थना स्थळे बंद करण्यात आले आहे. यापूर्वी महसूल, नगर पंचायत, पोलीस यांनी संयुक्त पणे शहरातील विविध चौकात आणि शहरातील वर्दळीच्या ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तीनां व वाहनधारकाना दंड आकारून...