🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

मंगळवार, डिसेंबर ०७, २०२१

 महालाचखोर लोकसेवक मंडळ अधिकारी गब्बरसिंग गारळे याच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने मुसक्या आवळल्या; तलाठ्याविरुद्धच्या तक्रारीच्या सुनावणीचा निकाल बाजूने देण्यासाठी मागितली होती लाच


@७५ : सचोटीतून आत्मनिर्भरतेकडे

  • कारवाई होतेय हे लक्षात येताच तासगावच्या 'मंडलाधिकाऱ्या'ने ठोकली धूम, 'एसीबी'ने पाठलाग करून केले जेरबंद

पुणे,दि.०७ डिसेंबर २०२१ : लोकसेवक गब्बरसिंग तुकाराम गारळे वय ३७ वर्ष मंडल अधिकारी तासगांव, मंडल अधिकारी कार्यालय तासगांव ता. तासगांव जि. सांगली रा. मु.पो. वासुंबे ता. तासगांव जि. सांगली याचे विरूध्द लाच स्विकारले बाबत कारवाई सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई.
तक्रारदार यांनी त्यांचे गावातील सोसायटीमध्ये जमीनीवर कर्ज मिळणेबाबत अर्ज केला आहे. सदर कर्जासाठी जमीनीच्या सातबारा उताऱ्यावर ई कराराची नोंद होणे आवश्यक असल्याने तक्रारदार यांनी ई करार नोंद होणे बाबत तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. सदर अर्जावर ई करार न होण्यासाठी मंडल अधिकारी कार्यालय तासगांव या ठिकाणी तक्रार प्राप्त झाली होती. सदर तक्रारीची सुनावणी गारळे, मंडल अधिकारी तासगांव यांचे समक्ष सुरू होती. सदर तक्रारीचा निकाल तक्रारदार यांचे बाजूने देण्यासाठी गारळे, मंडल अधिकारी तासगांव याने तक्रारदार यांचेकडे १०,०००/- रूपयाची लाच मागणी केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दि.०६.१२.२०२१ रोजी दिला होता.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आज दि.०७.१२.२०२१ रोजी लाचलुचपत ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये लाचखोर लोकसेवक गारळे याने तक्रारदार यांचे विरूध्द सुरू असलेल्या तक्रारीच्या सुनावणीचा निकाल तक्रारदार यांचे बाजूने देण्यासाठी तक्रारदार यांचेकडे प्रथम १०,०००/- रूपये लोचेची मागणी करून चर्चेअंती ८०००/- रूपये लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर लाचखोर लोकसेवक गारळे यांनी तक्रारदार यांना सांगीतले प्रमाणे कॉलेज चौक तासगांव या ठिकाणी सापळा लावला असता लोकसेवक गब्बरसिंग तुकाराम गारळे वय ३७ वर्ष मंडल अधिकारी तासगांव, मंडल अधिकारी कार्यालय तासगांव ता. तासगांव जि. सांगली रा. मु.पो. वासुंबे ता. तासगांव जि. सांगली याने तक्रारदार यांचकडे लाचेची मागणी करून तक्रारदार यांचेकडून ८०००/- रूपये स्विकारलेनंतर त्याला पकडण्यात आले आहे.
लाचखोर लोकसेवक गब्बरसिंग तुकाराम गारळे वय ३७ वर्ष मंडल अधिकारी तासगांव, मंडल अधिकारी कार्यालय तासगांव ता. तासगांव जि. सांगली रा. मु.पो. वासुंबे ता. तासगांव जि. सांगली याचे विरुध्द तासगांव पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राजेश बनसोडे पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, श्री. सुरज गुरव, अपर पोलीस उप आयुक्त/ अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, श्री सुहास नाडगौडा, श्री. अपर पोलीस उप आयुक्त/ अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. सुजय घाटगे पोलीस उप अधीक्षक, गुरूदत्त मोरे पोलीस निरीक्षक, प्रशांत चौगुले, पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार सलिम मकानदार, अविनाश सागर, संजय संकपाळ, रविंद्र धुमाळ, सिमा माने, प्रितम चौगुले यांनी केली आहे..
नागरिकांना आवाहन करण्यात येते की, लाच मागणी संबंधाने तक्रारी असल्यास पोलीस उप अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, बदाम चौक, सांगली येथे अथवा कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०२३३ / २३७३०९५ वर तसेच हेल्प लाईन क्रमांक १०६४ वर तसेच व्हॉट्स अॅप नंबर ७८७५३३३३३३ व मोबाईल नंबर ८९७५६५१२६२ तसेच खालील संकेतस्थळावर संपर्क साधावा.
संपर्क :१) मोबाईल अॅप www.acbmaharashtra.net
२) फेसबुक पेज www.facebook.com-maharashtraACB ३) वेबसाईट www.acbmaharashtra.gov.in

Popular posts लोकप्रिय पोस्ट