पोस्ट्स

जुलै, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अवयवदान ही एक सामाजिक चळवळ-आरोग्यमंत्री

इमेज
  संजय पाटील चिखले २९ जुलै २०२५ | 📍मंत्रालय, मुंबई अवयवदान ही एक सामाजिक चळवळ अवयवदान ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया न राहता, ती संपूर्ण समाजासाठी एक जागृती निर्माण करणारी जनचळवळ व्हावी, यासाठी माझा विशेष प्रयत्न आहे. ३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राज्यभरात ‘अवयवदान पंधरवडा’ राबवित असताना मी हे ठामपणे सांगू इच्छितो की, एक अवयव एखाद्या रुग्णालाच नव्हे, तर त्याच्या कुटुंबालाही नवजीवन देऊ शकतो. त्यामुळे अवयवदानासंदर्भातील भीती, शंका आणि गैरसमज दूर करून सकारात्मक मानसिकता निर्माण करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मी आरोग्य विभागाला स्पष्ट निर्देश दिले आहेत की, ही मोहीम केवळ एक उपक्रम म्हणून न राबवता, ती एक भावनिक व सामाजिक बांधिलकी म्हणून घेतली जावी. १५ ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात मेंदूमृत रुग्णांचे अवयवदान करणाऱ्या कुटुंबांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात यावा , जेणेकरून त्यांचा समाजात आदर्श निर्माण होईल. माझा विश्वास आहे की, जनतेच्या सक्रिय सहभागामुळे महाराष्ट्र लवकरच अवयवदानाच्या क्षेत्रात देशात आदर्श राज्य म्हणून पुढे येईल. या बैठकीला राज्यमंत्री श्रीमती. मेघना साकोरे - बोर्डी...

३ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत अवयवदान पंधरवडा साजरा होणार

इमेज
संजय पाटील चिखले मुबई, दि. २९ : राज्यात ३ ते १५ ऑगस्ट २०२५ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या अवयवदान पंधरवड्याचे नियोजन प्रभावी व उद्दिष्टपूर्ण असावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. मंत्रालयात अवयवदान पंधरवड्याच्या नियोजनासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, आरोग्य आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, डॉ. शुक्ला यांच्यासह दूरदृष्टी संवाद प्रणालीद्वारे राज्यातील विभागीय अधिकारी उपस्थित होते. मंत्री श्री.आबिटकर म्हणाले की, अनेक रुग्ण आजही अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे ठराविक उद्दिष्ट ठेवून, गतीने आणि जनजागृतीवर भर देत काम करणे आवश्यक आहे. १५ ऑगस्ट रोजी अवयवदान करणारे तसेच लाभार्थी रुग्ण यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात यावा, त्यांना प्रशस्तिपत्र देण्यात यावे आणि माध्यमांसमोर त्यांची मते मांडण्यात यावीत, असेही त्यांनी सांगितले. प्रशिक्षण, कार्यशाळा, नियोजनपूर्व सूचना यांच्या माध्यमातून सर्व अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यात यावे. आजपर्यंत प्रतीक्षेत ...

पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे "लोकमान्य बाळ गंगाधर टिळक" यांची जयंती साजरी

इमेज
संजय पाटील चिखले दि. 23 जुलै 2025 बुधवार रोजी 'लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या महापुरूषांची जयंती पोलीस अधीक्षक कार्यालयात साजरी करण्यात आली. मा.श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली श्री. उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांचे हस्ते महापुरूषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी श्री जे.ई. गायकवाड, पोउपनि तथा जनसंपर्क अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड यांचेसह पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व विभागाचे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन 'लोकमान्य बाळ गंगाधर टिळक' या महापुरूषांना अभिवादन केले. सदर कार्यक्रमाचे नियोजन ग्रेपोउपनि / सुर्यभान कागने, मारोती कांबळे व नरेंद्र राठोड यांनी चांगल्या प्रकारे केले आहे.

नांदेड मध्ये गूंजले संत कबीर परमात्म्याचे अमृत वचन

इमेज
संजय पाटील चिखले नांदेड दिनांक २० जुलै २०२५ रोजी नांदेड च्या हडको बसस्टॉप परिसरातील दत्तकृपा मंगल कार्यालय येथे संत कबीर साहेब यांच्या अपार दयेमुळे आणि रामपाल महाराज यांच्या कृपेमुळे  एक अद्वितीय सत्संग कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने पार पडला. या कार्यक्रमात नांदेड शहरासह संपूर्ण जिल्ह्यातून आणि आसपासच्या परिसरातून हजारो भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. संत रामपाल जी महाराज यांनी ऑनलाईन प्रोजेक्टरच्या माध्यमातून आपल्या अमृतमय प्रवचनातून उपस्थित जनसमुदायाला जीवनातील खरे उद्दिष्ट काय आहे, मोक्षप्राप्तीसाठी कोणता योग्य मार्ग आहे, याचे शास्त्र आधारित ज्ञान दिले. अनेक लोकांनी कबीर परमेश्वराची खरी ओळख आणि त्यांची मोक्षदायक भक्ति पद्धत प्रथमच समजून घेतली. कार्यक्रमात मोफत नामदीक्षा घेण्याची व्यवस्था करण्यात आली होती आणि शेकडो लोकांनी नामदीक्षा घेऊन आपल्या जीवनात आध्यात्मिक परिवर्तनाची सुरुवात केली. उपस्थित भक्तांसाठी चहा-बिस्किटची सुविधा करण्यात आली होती. संपूर्ण वातावरण भक्तिभाव, श्रद्धा आणि आध्यात्मिक ऊर्जा याने भरलेले होते. आयोजकांनी सर्व भक्तगणांचे आभार मानत पुढील काळ...

मरवाळी: शासकीय रस्त्यावरील अतिक्रमणांचा विळखा दूर करण्यास ग्रामपंचायत, बांधकाम विभाग अपयशी

इमेज
      मरवाळी/ता.नायगाव,दि.१३/०७/२०२५ : नायगाव तालुक्यातील  टेंभूर्णी ते कुंचेली (शंकरनगर) दरम्यान करोडो रुपये खर्च करून सिमेंट कॉक्रीट रस्त्याचे काम सुरू आहे .हा रस्ता मरवाळी गावातून जात असून शासन दरबारी म्हणजेच बांधकाम विभागाकडे या रस्त्याची रुंदी ही 33 फुट आहे.मरवाळी गावच्या गावठाण भागातून जाणा-या रस्त्यालगत गावातील काही नागरीकांनी वर्षानुवर्षे व काही अलिकडच्या काळात ग्रामपंचायतीच्या परवानगीने अनाधिकृत अतिक्रमण करून घरे बांधली आहेत,तर काही जणांनी बेकायदा मुरुम टाकून,पत्रे टाकून हा शासकीय रस्ता आपल्या ताब्यात घेतला आहे त्यामुळे सदर रस्त्याची गावातील रुंदी ही 22 फुटापेक्षा कमी होत आहे.  सदर रस्त्यावरील अनधिकृत अतिकृमण काढण्यापेक्षा ग्रामपंचायत, मरवाळी यांनी रस्ता 22 फुटाचा करण्याचा सर्वानुमते चर्चा करुन ठराव घेऊन अतिकृमणास समर्थन देत आहे?, गुत्तेदार करत असलेल्या 22 फुटाच्या रस्त्यामध्ये एका बाजूच्या नालीकरीता जागा सोडल्यास सदर रस्त्याची रुंदी 15 ते 17 फुट इतकीच राहत आहे. या मुळे  शासकीय रस्त्यावर अतिकृमण कायम होण्यास ग्रामपंचायतीच्या निर्णयामुळे एक प्रकारची...

सोसायटी निवडणुकीत शिवराज पाटील होटाळकर यांच्या पॅनलचे 11 पैकी 11 उमेदवार विजयी

इमेज
           संजय चिखले मरवाळी/ता.नायगाव, दि.०६/०७/२०२५: मौजे. होटाळा तालुका नायगाव(खै.) येथील सेवा सहकारी सोसायटी होटाळा चे श्री दत्त विकास पॅनल प्रमुख शिवराज पाटील होटाळकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आज दिनांक 6/7/ 2025 रोजी पार पडली या पॅनलचे 11 पैकी 11 उमेदवार भरघोश मताने निवडून आले.या निवडणूकीत सर्व गावकऱ्यांनी एकतर्फी विजय मिळवून दिला.   विजयी उमेदवार     श्री शिवराज भाऊराव पाटील, शिवाजी संभाजी पवार, विठ्ठल दादाराव पवार, राजेश व्यंकटराव पवार, गोविंद कंदुरके, दत्ता देवराव पवार, उमरेकर दत्ता देवराव, पवळे गोविंद गंगाधर, पवार शिवकांत शामराव, संजय भगवान बन, डोईवाड मोतीराम गंगाराम या सर्व उमेदवाराचे गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.              कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तात्रय भगवानराव पाटील होते, गावातील प्रथम नागरिक गणेश व्यंकटराव पवार हनुमंतराव माली पाटील प्रा.काशीबन सर संग्राम एकाळे. गणेश भद्रे भगवान भद्रे.शिवाजी कोतेवार. मधुकर पवार शंकर पवार व्यंकट पवार गंगाधर येवते प्रकाश पवार रमेश पि...

एका महिलेने बार्टीच्या कुविख्यात सराईत लाचखोरीन कंत्राटी महिला सुजाता पोहरेचा काट्याने काढला काटा

इमेज
 हक्कासाठी लाच का? कुठलाही सरकारी दाखला लाचेशिवाय मिळणे तुमचा हक्क आहे मरवाळी/नांदेड,दि.०३/०७/२०२५: लाच देणे व लाच घेणे हा कायद्याने दंडनीय अपराध आहे , असा फलक सर्वच शासकीय कार्यालयांत लावलेला दिसतो.असे असतानाही लालची लोकसेवक पैशाच्या मोहापायी लाच मागताना सर्रासपणे आढळून येतात.काही प्रकरणात नागरिकांना लाच देण्याची इच्छा नसल्याने ते आपल्या जिल्ह्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार दाखल करुन लाचखोर महिला-पुरुष लोकसेवकास ॲंटी करप्शन ब्युरोच्या हवाली करतात तर लाखों लोकं लाच देणे मजबुरी का नाम महात्मा गांधी समजून लाचखोरांच्या लालसेला बळी पडतात          ॲंटी करप्शन ब्युरो कडून नेहमी आवाहन करण्यात येते की,नागरिकांकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास एसीबीकडे तात्काळ संपर्क साधावा.एसीच एक तक्रार प्राप्त झाली असता त्यावर यशस्वी सापळा कारवाई करण्यात आली आहे... सविस्तर वृत्तांत तक्रारदार यांनी त्यांचे मुलाचे पुढील शिक्षणासाठी अनुसूचीत जातीची जात पडता...