🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

मंगळवार, मार्च ०२, २०२१

मुख्याध्यापक तथा शाळेचा सचिव निघाला लाचखोर,मग काय शिक्षकाने केले एसीबीच्या हवाली_शिक्षण क्षेत्रात खळबळ


 भंडारा (०२ मार्च) : पोलीसनामा ऑनलाइन - थकीत वेतनाचे देयक मंजुरीसाठी पाठवण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्विकारताना शाळेच्या मुख्याध्यापकाला भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई तुमसर तालुक्यातील देव्हाडी पेथील श्रीराम हायस्कुलमध्ये मंगळवारी (दि.2) सकाळी दहाच्या सुमारास करण्यात आली. श्रीकात बाबुराव साखरवाडे असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. तसेच साखरवाडे हा श्रीराम शिक्षण संस्थेचा सचिव आहे, या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार यांचे सासरे श्रीराम हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. ते सेवानिवृत्त झाले आहेत. चौथ्या वेतन आयोगाचे थकबाकीचे देयक तयार करुन देणे, जुलै 1999 ते जुन 2001 चे थकीत वेतन देयक पथकाकडे पाठविणे आणि सेवा समाप्ती प्रकरणातील 2003 ते 2007 या सेवानिवृत्ती कालावधीतील काल्पनीका वेतन वाढ लावुन सेवापुस्तिका अद्ययावत करणे आणि शिक्षणाधिकायाकडे पाठवणे यासाठी तक्रारदाराच्या सासऱ्याला पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

तक्रारदार यांच्या तक्रारीनुसार लाचलुचप प्रतिबंधक विभागाच्या अधिकान्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली असता श्रीकांत साखरवाडे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज सकाळी दहाच्या सुमारास देव्हाडी येथे सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून 10 हजार रुपये लाच घेताना मुख्याध्यापक साखरवाडे याला रंगेहाथ पकडण्यात आले. साखरवाडे याच्यावर लवलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक रश्मी नदिडकर, अपर पोलीस अधीक्षक राजेश दुइलवार, मिलिंद तोतरे, पोलीस उपअधीक्षक महेश चाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, कुरजेकर, रोशनी गजभिये, सुनील हुकरे, दिनेश धार्मीक, राजेंद्र कुरुडकर, कुणाल कडव, दिपीका राठोड यांनी केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.



✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular posts लोकप्रिय पोस्ट