मंगळवार, मार्च ०२, २०२१

तलाठी ४५०० रुपये लाच मागणी करुन ३ हजार लाच स्वीकारताना चतुर्भुज

 

आष्टी (०२ मार्च) : तालुक्यातील मोराळा सज्जाचे तलाठी बाळू बनगे यांनी जमीन नावे करण्यासाठी आणि अनुदान मिळवून देण्यासाठी ४५०० रुपये लाचेची मागणी केली होती. यानंतर तडजोडी अंती ३००० रुपये लाच स्विकारण्याचे त्यांनी मान्य केले असता ते पैसे स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकले. ही कारवाई मंगळवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास बसस्थानक परिसरात करण्यात आली. तलाठी बनगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका शेतकऱ्यास वाटणीपत्राप्रमाणे भाऊ,आई, वडिल, बहिण यांच्या नावे शेती करण्यासाठी आणि अनुदान मिळून देण्यासाठी ४५०० रुपये लाचेची मागणी तालुक्यातील मोराळा सजाचे तलाठी बाळू बनगे यांनी केली होती. याबाबत शेतकऱ्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. यानंतर मंगळवारी बसस्थानक परिसरात तलाठी बनगे यांनी तडजोडी अंती ३००० रुपये स्विकारण्याचे मान्य केले. याचवेळी एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे उपअधिक्षक बाळकृष्ण हानपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी.आय.रविंद्र परदेशी, पोलिस नाईक श्रीराम गिराम, पो शि.भारत गारदे, पो शि संतोष मोरे यांनी केली. या कारवाईने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी विरूद्ध आष्टी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



:: प्रेस नोट ::

दि. ०२/०३/२०२१

आरोपी लोकसेवक श्री.बाळू महादेव जगे वय ५१ वर्ष तलाठी सजा मोराळ ता.आष्टी जि.बीड यांनी ३०००/- (तीन हजार रुपये) लाच मागणी केल्यावरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड यांचेकडुन कारवाई

  1. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : बीड
  2. पोलीस स्टेशन पोलीस ठाणे : आष्टी
  3. गुन्हा नोंद कलम : कलम ७, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८
  4. आरोपीचे नांव व कार्यालय : श्री.बाळु महादेव बनगे वय ५१ वर्ष तलाठी सजा मौराळा ता.आष्टी जि.बीड
  5. मगणी केलेली लाच रक्कम : ३०००/- ( तीन हजार रूपये)

थोडक्यात माहिती : दिनांक १४/०१/२०२१ रोजी तक्ररदार यांनी तक्रर दिली की, तक्ररदार यांचे वडीलाचे नावावरील मौजे वनदेवाडी ता.आष्टी येथील शेत जमीन तहसीलदार आष्टी यांचे वाटणीपत्र आदेशाने तक्ररदार व त्यांचे भाउ,बहीन,आई,वडील यांचे नावे करण्यासाठी तसेच आनुदान मिळवुन देणेसाठी व तकारदार यांचे आई वडील यांचे पगार चालु करण्यासाठी ४५०० रुपये लाचेची मागणी करत आहेत. सदर तकारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,बीड येथे तक्रार दिली.

सदर तकारीच्या अनुषंगाने दिनांक १४/०१/२०२१ रोजी पंचा सम्ष पडताळणी केली असता लोकसेवक श्री. बाळु बनगे यांनी ४५०० रुपयांची मागणी करुन तडजोडअंती ३००० रुपये स्विकारण्याचे मान्य केले. त्यावरून आज दिनांक ०२.०३.२०२१ रोजी सापळा लावला असता लोकसेक्क यांनी पंचासमक्ष ३०००/- रुपये

लाच मागणी करुन लाच रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यावरुन श्री.बाळू महादेव बनगे वय ५१ वर्ष तलाठी सजा

मोराळ ता.आष्टी जि.बीड यांचे विरुद्ध पोलीस ठाणे आष्टी येथे कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

सदरची कारवाई मा.डॉ. राहुल साठे,पोलीस अधीक्षक, लाप्रवि औरंगाबाद, मा.डॉ. अनिता जमादार, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि औरंगाबाद, श्री.बाळकृष्ण हनपुडे पाटील, पोलीस उप अधीक्षक, बीड यांचे मार्गदर्शनााली पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र परदेशी, व पोलीस अमलदार श्री.श्रीराम गिराम,भरत गारदे व चालक अमलदार मोरे ,ला.प्र.वि.बीड युनिट यांनी कारवाई केली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबददल तकार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांचेशी संपर्क साधवा.

संपर्क पत्ता : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,बीड

संकेतस्थळ : acbwebmail@mahapolice.gov.in

ई-मेल : - dyspacbbeed@mahapolice.gov.in

2) dyspacbbeed@gmail.com

ऑनलाईन तकार ॲप्लीकेशन : acbmaharashtra.net

टोल फ्री क्रमांक : १०६४

दुरध्वनी क्रमांक : ०२४४२-२२२६४९

व्हॉटस अप क-९९३०९९७७००]

पोलीस अधीक्षक,लाप्रवि,औरंगाबाद ८८८८८०७२९९

अपर पोलीस अधीक्षक,लाप्रवि,औरंगाबाद :- ९८८११००८१२३

पोलीस उप अधीक्षक लापवि,बीड ९१५८६३२६२६


(बाळकृष्ण पुडे पाटील) 

पोलीस उपअधिक्षक लाचपत प्रतिबंधक विभाग बीड.



✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

जगाच्या पोशिंद्याला कृषी पंप जोडणीचे कोटेशन मंजुर करण्यासाठी १९ हजार लाच मागणी करुन ११ हजार स्विकारल्याने एसीबी मार्फत शेतकऱ्यांनी ४४० चा शॉक दिला


  1.  आरोपीचे नाव,हृद्दा व पत्ता : लोकसेवक श्री. राजू नारायण घाडगे वय 35 वर्ष व्यवसाय नोकरी वरीष्ठ तंत्रज्ञ महावितरण, शाखा तिर्थपुरी, जि. जालना रा. मारुती मंदीराजवळ तिर्थपुरी ता.घनसावंगी जि. जालना
  2. गुन्हा घ ता व ठि : दि- 01.03.2021 रोजी महावितरण कार्यालय,शाखा तिथ्थपुरी, जि. जालना येथे
  3. लाचेची रक्कम : 11,000/- रुपये.

याबाबत हकीगत अशी की, यातील तक्रारदार यांनी तक्रार दिली की, त्यांची मौजे भायगव्हाण ता. घनसावंगी येथे शेती असून त्यांना जायकवाडी कॅनॉल येथुन शेतीसाठी पाणी आवश्यक असल्याने त्यांनी व इतर 3 शेतकरी यांनी कृषी पंपासाठी विदयुत पॉवरची आवश्यकता असल्याने कृषी पंपासाठीचे कोटेशन भरुन महावितरण, शाखा तिर्थपुरी येथे अर्ज होता, सदर तक्रारदार यांना व इतर 3 शेतकरी यांना कृषी पंप जोडणीचे कोटेशन मंजुर करुन देण्यासाठी महावितरण, शाखा तिर्थपुरी येथील वरीष्ठ तंत्रज्ञ श्री. राजू नारायण घाडगे यांनी कोटेशनच्या रक्कमे व्यतिरिक्त स्वतःसाठी 5,000/- रुपये व इतरांसाठी 14,000/- रुपये अशी एकुण 19,000/- रूपये लाचेची मागणी केली. सदर कामासाठी तक्रारदारास वरीष्ट तंत्रज्ञ श्री. राजू नारायण घाडगे यांना व त्यांचे सहकारी यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना येथे संपर्क साधून तक्रार दिली. सदर तक्रारीवरून दि. 24.02.2021 रोजी पडताळणी केली असता वरीष्ठ तंत्रज्ञ श्री. राजू नारायण घाडगे यांनी तक्रारदार यांचे व त्यांचे सोबतचे इतर 3 शेतकरी यांचे जायकवाडी कॅनॉल वरुन विदयुत पंपासाठी कनेक्शन जोडणी कोटेशन मंजुर करुन देण्यासाठी स्वत:चे 5,000/- रुपये व इतरांसाठी 14,000/- रुपये अशी एकुण 19,000/- रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पण्ण झाले. तसेच आज दि. 01.03.2021 रोजी आलोसे वरीष्ठ तंत्रज्ञ श्री. राजू नारायण घाडगे यांनी तक्रारदार यांचेकडून विदयुत पंपाचे कोटेशन मंजूर करुन देण्यासाठी 11,000/- रुपये लाचेची रक्कम स्वतः पंचासमक्ष स्विकारली असतांना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालनाचे पथकाने महावितरण कार्यालय, उपकेंद्र तिर्थपुरी जि जालना येथे रंगेहाथ पकडले.

लोकसेवक श्री. राजू नारायण घाडगे वय 40 वर्ष व्यवसाय नोकरी वरीष्ठ तंत्रज्ञ महावितरण, उपकेंद्र तिर्थपुरी, जि. जालना रा. मारुती मंदीराजवळ तिर्थपुरी ता. घनसावंगी जि. जालना (बर्ग - 3 ) यांचे विरुद्द गुन्हा दाखल करण्याबाबत पुढील कार्यवाही चालु आहे.

तसेच अॅन्टी करप्शन ब्युरो कडून आवाहन करण्यात येते की, कोणी लोकसेवक शासकीय कामासाठी लाचेची मागणी करीत असल्यास किंवा खाजगी व्यक्ती मार्फत कोणी लाचेची मागणी करीत असल्यास 02482-220252, तसेच टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क करावा. तसेच पोलीस उप अधिक्षक जालना मो.नं. 8975762906, पोलीस निरीक्षक मो.नं. 8390757835, 9823216788 वर संपर्क कराया.




✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

अपसंपदा प्रकरण : परिवहन सेवा, ठाणे महानगरपालिका येथील अधिकारी/कर्मचारी व खाजगी इसम यांच्याविरूध्द बेकायदेशीर कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.

प्रेस नोट दिनांक                                      ०२/०३/२०२१
 

ठाणे ( ०२ मार्च) : परिवहन सेवा, ठाणे महानगरपालिका येथील अधिकारी/कर्मचारी व खाजगी इसम यांच्याविरूध्द बेकायदेशीर कृत्य म्हणजे अपसंपदा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.

  1. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग/घटक : ठाणे
  2. कलम : भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम (संशोधन २०१८) सन १९८८ चे कलम १३(१)(क)(ड), १३(२) व भा.दं.वि.सं कलम ४६५,४६७,४६८, ४७१,१२०(ब)
  3. लोकसेवकाचे नाव व कार्यालय : (१) श्री.अशोक नागुराव करंजकर, तत्कालीन परिवहन व्यवस्थापक, परिवहन सेवा,ठाणे ( तत्कालीन प्रतिनियुक्तीवर असलेले उप जिल्हाधिकारी दर्जाचे) (२) श्री. श्रीकांत सरमोकदम,तत्कालीन परिवहन व्यवस्थापक, परिवहन सेवा, (सेवानिवृत्त) (३) श्री.कमलाकर वासुदेव दीक्षित, तत्कालीन परिवहन उप व्यवस्थापक, ठाणे (सेवानिवृत्त) (४) श्री.अजित व्दारकानाथ निच्हाळे, तत्कालीन मुख्यलेखापाल, परिवहन सेवा, ठाणे (सेवानिवृत्त) (५) श्री.गुरूकुमार पंडुरंग पेडणेकर,तत्कालीन वाहतुक अधिक्षक, परिवहन सेवा, ठाणे (बडतर्फ) (६) श्री पिटर जॉन पिंटो, तत्कालीन अंतर्गत लेखा परिक्षक, परिवहन सेवा, ठाणे (सेवानिवृत्त ) (७) श्री.लक्ष्मीकांत धनराज धुमाळ, | व्यवसाय-नोकरी सुरक्षा अधिकारी, परिवहन सेवा,ठाणे (८) श्री.दिलीप सदाशिव | कानडे, तत्कालीन वाहतुक निरीक्षक सध्या आगार व्यवस्थापक अतिरिक्त कार्यभार कर्मचारी व प्रशासन अधिकारी, परिवहन सेवा, ठाणे (९) खाजगी इसम श्री.प्रविण | माथुरभाई सोलंकी, प्रोप्रायटर मे.सोल्युशन्स अॅडव्व्हटयझिंग, ठाणे १०) खाजगी इसम श्री.भावेश प्रभुदास भिंडे, मॅनिजींग डायरेक्टर गुज्जु अॅडस् प्रा लि. व इतर
  4. अपसंपदा रक्कम : ६,७३,५५,९४६/-रुपये(सहा कोटी न्याहत्तर लाख पंचावन्न हजार नऊशे सेहेचाळीस रुपये)

थोडक्यात हकिकत : सन २००८ ते २०१८ या कालावधीत परिवहन विभाग, ठाणे महानगरपालिकेचे वरील नमुद लोकसेवक यांनी परिवहन सेवा, ठाणे महानगरपालिकेच्या ४७० बस प्रवासी निवान्यांच्या मुळ जागी बांधा वापरा आणि हस्तांतरीत करा (Built, Operate & Transfer) या तत्वावर बस प्रवासी निवारे बांधुन त्यावर जाहिरात प्रदर्शित करण्याचे हक्क देणेबाबत ठेका मिळण्याकरिता ठाणे परिवहन सेवेकडून घेण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेमध्ये (अ) लखोटा कमांक १ मध्ये जॉईन्ट व्हेंचरची तरतुद नसताना सुध्दा मे सोल्युशन अॅडव्हर्टायझिंग यांनी मे विश्वर | पब्लिसिटी, मे झेनिथ आउटडोअर व मे गुज्जु अँड प्रायव्हेट लिमीटेड या कंपन्याची बनावट कन्सोर्टीयम डिड तयार करुन ती खरी असल्याचे भासविले तसेच सदर कंपनीची लगतच्या तीन वर्षाचे नफातोटा व ताळेबंदीबाबतची अपुर्ण कागदपत्रे जोडली असताना सुध्दा मे.सोल्युशन अॅडव्हटायझिंग यांनाच ठेका मिळावा म्हणुन त्यांना बेकायेदशीरपणे सहाय्य केले व मे.सोल्युशन अँडव्हटायझिंग यांना ठेका मिळवुन दिला.(ब) निविदा प्रक्रीये मधील लखोटा क्रमाक २ उपडते वेळी मे.एक्सल अॅडव्हर्टायझिंग अॅण्ड मार्केटिंग,ठाणे यांचे प्रतिनिधी श्री कृष्णा कोबनाक हे हजर असल्याचे उपस्थिती पत्रावर दर्शविण्यात आलेले आहे.परंतु छाननी समितीने श्री कृष्णा कोबनाक हे हजर नसताना त्यांची बनावट सही खरी असल्याचे भासवुन मे सोल्युशन अॅडव्हर्टायझिंग, ठाणे यांना बेकायदेशिर रित्या ठेका मिळवुन देण्यास मदत केलेली | आहे(क) मे.सोल्युशन अँडर्व्हटायझिंग यांना सदरचा ठेका मिळाल्यानंतर त्यांने | करारनाम्यानुसार अटी व शर्तीची पुर्तता केलेली नसताना सुध्दा बेकायदेशीरपणे त्यास | इसारा रक्कम १०,००,०००/- रुपये परत केली. (ड) मे.सोल्युशन अॅडव्हटायझिंग यांचे एकुण देकारप्रमाणे म्हणजे ८,६२,६३,४५०/- रुपयाच्या २५ टक्के घ्यावयाची बँक गॅरटी रक्कम २,१५,६५,८६३/- रुपये इतकी होत असताना सुध्दा त्यांचे कडून फक्त ९ बसेसच्या एकत्रीत किंमत रक्कम रू.२,०७,६३,४५०/- यावरील २५ टक्के इतकी रक्कम रू. ५१,९०,८६३/- ची बँक गॅंटी घेतली आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे परत केलेली इसारा रक्कम १०,००,०००/- रूपये व एकुण देकारचे कमी घेतलेले बँक गॅरटीचे १,६३,७५,५००/- रुपये तसेच ठाणे महानगरपालिकेच्या जाहिरात विभागाचा जाहीरात कर रुपये ४,९९,८०,९४६ असे एकुण ६,७३,५५,९४६/ - रुपयाचे ठाणे महानगर पालीकेचे हेतुपुरस्सर व जाणीवपुर्वक आर्थीक नुकसान व तितकाच ठेकेदार यांचा आर्थीक फायदा करुन दिला म्हणुन नमुद लोकसेवक व खाजगी इसमांविरुध्द बरिलप्रमाणे दि.०१/०३/२०२१ रोजी २३:०९ वा दाखल करण्यात आला आहे.

लचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबदद्ल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेशी संपर्क करावा.

संपर्क पत्ता - ला.प्र.वि., ठाणे, मध्यवर्ती कारागृहासमोर, ठाणे पश्चिम ४००६०१

संकेतस्थळ - acbmaharashtra@mahapolice.gov.in

ई-मेल :- spacbthane@mahapolice.gov.in

ऑनलाईन तक्रार

अॅप्लीकेशन :- acbmaharashtra.net

टोल फ्री नं - १०६४

दुरध्वनी क्र. :- ०२२-२०८१३५९८/२०८१३५९९

व्हॉटस् अॅप क्र. ১- ९९३०९९७७००


(ज्योती देशमुख) 

पोलीस उप अधीक्षक, अॅन्टी करशन ब्युरो, नवी मुंबई


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

बाभळगावच्या ग्रामिण रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक सितापे ३ हजारच्या लाचेकरीता एसीबीच्या जाळ्यात


 Respected sir/madam 

* Demand CASE 

➡युनिट       :- नांदेड  

➡तक्रारदार  :- पुरुष वय 48 वर्ष 

➡आरोपी  लोकसेवक  :- 1)श्री प्रमोद बाबुराव सीतापे, वय 40 वर्ष,  व्यवसाय नोकरी कनिष्ठ लीपीक, ग्रामिण रुग्णालय बाभळगाव, ता. जि. लातुर रा. विकासनगर, बार्शी रोड, लातुर

➡ तक्रार प्राप्त  :- दिनांक  02/03/2021

➡ लाचमामागणी पडताळणी दिनांक :- 02/03/2021                  

➡ लाच मागणी रक्कम:- 4,000/- रुपये तडजोडीअंती 3000/-रू                              

➡ कारण:-

            यातील आरोपी लोकसेवक यांनी  तक्रारदार यांना 7 व्या आयोगाच्या सुधारित सेवा अंतर्गत अश्वासीत प्रगती योजनेचा मंजुर झालेल्या 03 लाभांपैकी पहिल्या लाभाची रक्कम तक्रारदार यांचे खात्यावर जमा केली त्याचे बक्षीस / मोबदला म्हणुन 4,000/- रु . लाचेची मागणी करुन तडजोडीअंती 3,000/- रु . स्वीकारण्याचे मान्य केले.

➡️मार्गदर्शक:- मा. श्रीमती कल्पना बारवकर,पोलीस अधीक्षक ला.प्र.वि.नांदेड परिक्षेत्र नांदेड 

मा. श्रीमती अर्चना पाटील,अप्पर पोलीस अधिक्षक ला. प्र.वि. नांदेड  परिक्षेत्र नांदेड    

              ➡️   SO:- श्री विजय डोंगरे पोलीस उपअधिक्षक ला.प्र.वि.नांदेड   

  ➡️TLO:- श्री राहुल  पखाले ,पोलीस निरीक्षक  

ACB नांदेड, टीम पोहेकॉ बालाजी तेलंगे, पोना गणेश तालकोकूलवार, जगन्नाथ अनंतवार, सचिन गायकवाड, शेख मुजीब


प्रेसनोट

दिनांक ०२/०३/२०२१

ग्रामिण रूग्णालय बाभळगांव ता. जि. लातुर येथील कनिष्ठ लिपीक प्रमोद सितापे यांनी यांनी ३,०००/- रू. ची लाच मागणी केल्या बाबत नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कार्यवाही

दिनांक ०२/०३/२०२१ रोजी यातील तक्रारदार यांनी तकार दिली की, "यातील लोकसेवक प्रमोद सितापे हे तकारदार यांना ७ व्या वेतन आयोगाच्या सुधारित सेवा अंतर्गत अश्वासित प्रगती योजनेवा मंजूर झालेल्या ०३ लाभां पैकी पहिल्या लाभाची रक्कम तकारदार यांचे खात्यावर जमा केली त्याचे बक्षींस/ मोबदला म्हणुन ४,०००/- रू. लाचेची मागणी करीत आहेत".

तकारदार यांचे तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड कार्यालयाकडून दिनांक ०२/०३/२०२१ रोजी ग्रामिण रूगणालय, बाभळगांव ता.जि. लातुर परिसारत पंचासमथ्ष केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये लोकसेवकः सितापे यांनी तकारदार यांना उपरोक्त कामासाठी ४,०००/- रू. लाचेची मागणी करून तडजोडीअंती ३,०००/- रू. स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. म्हणुन लोकसेवक प्रमोद बाबुराव सितापे, वय ४० वर्ष, व्यवसाय नोकरी कनिष्ठ लिपीक, ग्रामिण रूप्णालय, बाभळगांव ता.जि. लातुर रा. विकासनगर, बार्शी रोड, लातुर यांचे विरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये पोलीस स्टेशन लातुर ग्रामिण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोनि बी.एच. काकडे लाप्रवि लातूर हे करीत आहे.

सदरची सापळा कार्यवाही पोलीस अधिक्षक श्रीमती कल्पना बारवकर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, पोलीस उप अधिक्षक श्री विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल पखाले, पोहेकॉ बालाजी तेलंगे, पोना गणेश तालकोकुलवार, जगन्नाथ अनंतवार, सचिन गायकवाड, शेख मुजीब यांनी पार पाडली आहे.

तरी सर्व नागरीकांना अवाहन करण्यात येते की, शासकीय अधिकारी/ कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास तसेच त्यांचे लाचेच्या मागणीचे मोबाईल फोनबर लोकसेवक यांचे एसएमएस किंवा व्हिडीओ, ऑडीओ क्लिप असल्यास, भ्रष्टाचार संबधाने काही माहिती असल्यास किंवा माहिती अधिकारात शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केला असेल तर खालील कमाकावर संपर्क करावा.



✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

मुख्याध्यापक तथा शाळेचा सचिव निघाला लाचखोर,मग काय शिक्षकाने केले एसीबीच्या हवाली_शिक्षण क्षेत्रात खळबळ


 भंडारा (०२ मार्च) : पोलीसनामा ऑनलाइन - थकीत वेतनाचे देयक मंजुरीसाठी पाठवण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्विकारताना शाळेच्या मुख्याध्यापकाला भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई तुमसर तालुक्यातील देव्हाडी पेथील श्रीराम हायस्कुलमध्ये मंगळवारी (दि.2) सकाळी दहाच्या सुमारास करण्यात आली. श्रीकात बाबुराव साखरवाडे असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. तसेच साखरवाडे हा श्रीराम शिक्षण संस्थेचा सचिव आहे, या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार यांचे सासरे श्रीराम हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. ते सेवानिवृत्त झाले आहेत. चौथ्या वेतन आयोगाचे थकबाकीचे देयक तयार करुन देणे, जुलै 1999 ते जुन 2001 चे थकीत वेतन देयक पथकाकडे पाठविणे आणि सेवा समाप्ती प्रकरणातील 2003 ते 2007 या सेवानिवृत्ती कालावधीतील काल्पनीका वेतन वाढ लावुन सेवापुस्तिका अद्ययावत करणे आणि शिक्षणाधिकायाकडे पाठवणे यासाठी तक्रारदाराच्या सासऱ्याला पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

तक्रारदार यांच्या तक्रारीनुसार लाचलुचप प्रतिबंधक विभागाच्या अधिकान्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली असता श्रीकांत साखरवाडे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज सकाळी दहाच्या सुमारास देव्हाडी येथे सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून 10 हजार रुपये लाच घेताना मुख्याध्यापक साखरवाडे याला रंगेहाथ पकडण्यात आले. साखरवाडे याच्यावर लवलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक रश्मी नदिडकर, अपर पोलीस अधीक्षक राजेश दुइलवार, मिलिंद तोतरे, पोलीस उपअधीक्षक महेश चाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, कुरजेकर, रोशनी गजभिये, सुनील हुकरे, दिनेश धार्मीक, राजेंद्र कुरुडकर, कुणाल कडव, दिपीका राठोड यांनी केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.



✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com


एकाच पोलीस ठाण्यात एसीबीची दुस-यांदा कारवाई-आरोपी लोकसेवक रणजित कासले पोलीस उपनिरीक्षक लाच घेतांना अटक


 *लाच मागणी अहवाल*

▶️ युनिट - औरंगाबाद,

▶️ तक्रारदार- पुरुष, वय- 25 वर्ष

▶️ आरोपी लोकसेवक:- श्री. रणजित गंगाधर कासले,वय 36 वर्षे, पद-पोलीस उपनिरीक्षक, पोलीस स्टेशन पिशोर,औरंगाबाद(ग्रामीण) (वर्ग-2)

▶️ लाचेची मागणी- 20,000/- 

       रूपये दि.25/2/2021 रोज़ी      

                                ▶️ कारण - यातील तक्रारदार यांच्यावर पो. स्टे पिशोर येथे पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असून त्यांना मा.कोर्टाने तात्पुरताअटकपूर्व जामीन मंजूर करून तपासीक अधिकारी यांना से (म्हणणे)सादर करण्याचे आदेश दिले होते, यातील तपासीक अधिकारी श्री.रणजित कासले यांनी तक्रारदार यांच्या बाजूने चांगला से (म्हणणे) देण्यासाठी तक्रारदार यांचेकडे पंच साक्षीदार समक्ष 20,000/- रुपये लाचेची मागणी केली.

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.

▶️ सापळा अधिकारी, श्री.गणेश धोक्रट , पोलीस निरीक्षक , ला.प्र.वि. औरंगाबाद.

▶️मार्गदर्शक-मा. डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि.औरंगाबाद

मा.डाॅ. अनिता जमादार मॅडम. अपर पोलीस अधीक्षक, श्री.गावडे पोलिस उपअधीक्षक ला.प्र.वि.औरंगाबाद.

➡️सापळा पथक, पो.हवालदार गणेश पंडुरे, पोलिस अंमलदार. सुनील पाटील, अशोक नागरगोजे, चालक पो.अं.देवसिंग ठाकूर.

*📣 ब्रेकींग - पोलीस ठाणे पिशोर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची दुसऱ्यांदा कारवाई.*

*🎥 आरोपी लोकसेवक रणजित गंगाधर कासले पोलीस उपनिरीक्षक लाच घेतांना अटक.*

➿ कन्नड तालुक्यातील पोलीस ठाणे पिशोर येथे आज (मंगळवारी) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुन्हा कारवाई केली आहे.

➿दरम्यान काही महिन्यांपूर्वीच के.टी वाघ या पोलीस अमंलदाराला १००० रुपयांची लाच घेतांना रंगे हाथ पकडण्यात आले होते.

➿ आज मंगळवारी (ता.२) मार्च २०२१ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुन्हा दुसरी कारवाई केल्याने पोलीस दलात मोठी खळबळ माजली आहे.

➿विशेष म्हणजे ह्या न्या त्या गुण्यात पोलीस अमंलदार जर पैसे मागत असतील तर हे दुर्दैवी, लज्जास्पद आहे.

➿जण सामान्य नागरिकांच्या मनामध्ये सद्या पिशोर पोलिसांबद्दल प्रतिमा मलीन झालेली दिसत आहे. अशी देखील चर्चा नागरिकांमध्ये दबक्या आवाज चालू आहे.

➿सद्या पिशोर पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे वाले देखील बोकाळले आहे, गेल्या काही दिवसांपूर्वीच करंजखेड येथे गुन्हे शाखेच्या पोलीसांनी कारवाई केली होती, मात्र याची खबर पिशोर पोलिसांना नसते हे देखील दुर्दैवी आहे.

➿नंतर तेरी भी चुप मेरी भी चुप हीच परिस्थिती बघायला मिळत आली आहे.



✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

बीडमध्ये लाचखोरांनी लाचखोरीचा सपाटच लावला_स्थानिक निधी लेखा परिक्षक कार्यालयाचा सहायक संचालक लेखा परीक्षण (वर्ग १) लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात


 

 वीस हजाराची लाच घेताना सहायक संचालकास पकडले

बीड (दि. ०१ मार्च) : लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले असून पाटोदा येथे एकाला तर माजलगावमध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांना रंगेहात लाच घेताना पकडले होते. त्यानंतर सोमवार (दि.१) रोजी बीड येथील लेखा परीक्षण कार्यालयात लाचलुचपत

प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. या कारवाईने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

किरण घोटकर हे लेखा परिक्षण कार्यालयात सहायक संचालक लेखा परीक्षण (वर्ग १) या पदावर कार्यरत आहेत. यामध्ये त्यांनी फिर्यादीकडून कामा करीता वीस हजाराची लाच मागितली होती.त्यानुसार सोमवारी रात्री किरण घोटकर याला वीस हजाराची लाच घेताना उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे यांच्या टिमने त्यांना पकडले. या प्रकरणी उशीरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.

सदरची कारवाई मा.डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, लाप्रवि औरंगाबाद, मा.डॉ. अनिता जमादार, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि औरंगाबाद, श्री.बाळकृष्ण हनपुडे पाटील, पोलीस उप अधीक्षक, बीड यांचे मार्गदर्शनासाली पोलीस निरीक्षक श्री. राजकुमार पाडवी, व पोलीस अगलवार हनुमान गोरे,मनोज गदळे,प्रदिप वीर,सत्यनारायण खेत्रे,स्नेहलकुमार कोरटे व चालक अमंलवार म्हेत्रे ,ला.प्र.वि.बीठ युनिट यांनी कारवाई केली आहे.



✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

दोन वेळा लाच घेणारा लाचखोर-दुस-यांदा घेतली तब्बल ७० हजाराची लाच,बांधकाम विभागाच्या अधिका-याच्या एसीबीने मुसक्या आवळल्या


नाशिक (०१ मार्च) :  लाच देणे आणि घेणे गुन्हा असला तरी त्याची कुठलीही परवा सरकारी अधिकाऱ्यांना नसल्याचे निष्पन्न होत आहे. सुरगाणा तालुक्यातील रस्त्याच्या कामाचे बील अदा करण्यासाठी तब्बल ७० हजार रुपयांची लाच मागणारा सार्वजनिक बांधकाम विभागाचा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात आला आहे. गंगाराम सीताराम भोये (सहाय्यक अभियंता श्रेणी २) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. भोये याने रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराकडे तब्बल ७० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर या कंत्राटदाराने याप्रकरणी एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीने सापळा रचला. भोये याने रक्कम मागितल्याचे आणि ती स्विकारण्याचा प्रयत्न केल्याचे सिद्ध झाले. त्यामुळए एसीबीच्या पथकाने भोये विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बहाद्दरचे धाडस दुस-यांदा घेतली लाच

विशेष म्हणजे, भोये हा यापुर्वीही लाच घेताना पकडला गेला आहे. ७.९.२००९ रोजी भोये हा १० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आला होता. त्यावेळीही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या घटनेतून कुठलाही धडा न घेता त्याने पुन्हा लाच घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, कुणी लाच मागत असल्यास किंवा देत असल्यास याप्रकरणी एसीबीच्या १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.

👇 लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची वेबसाईट

www.acbmaharashtra.gov.in



✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

E-mail - sanjaybchikhale@gmail.com

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

शेतक-यांच्या कामाची माहिती_प्रलंबित पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करुन कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्याचे डीडीआर अनिल चव्हाण यांचे आवाहन

 

संजय बी.चिखले मरवाळीकर

कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रलंबित पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरण करण्याचे आवाहन

नांदेड (दि. 1 मार्च) :- महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेंतर्गत नांदेड जिल्ह्यातील कर्जमुक्तीस पात्र 11 हजार 500 शेतकऱ्याची सातवी यादी 1 जानेवारी 2021 रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यापैकी 7 हजार 681 शेतकऱ्यांनी अद्याप पर्यंत आधार प्रमाणिकरण केले नाही. या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केल्याशिवाय शेतकऱ्याच्या खात्यात शासनामार्फत कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार नाही. आधार प्रमाणिकरण शिल्लक शेतकऱ्यांनी जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन तात्काळ आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक अनिल चव्हाण यांनी केले आहे.


राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने "महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019" ही 27 डिसेंबर 2019 च्या शासननिर्णयाद्वारे कार्यन्वित केली आहे. 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंतच्या कालावधीसाठी अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या तसेच या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदतीच्या पीक कर्जाचे पुर्नगठन / फेरपुनर्गठन केलेल्या कर्जामधील 30 सप्टेंबर 2019 रोजी रुपये 2 लाखापर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी जिल्हास्तरीय समिती व तालुकास्तरीय समितीकडे वर्ग करण्यात आल्या आहेत अशा शेतकऱ्यांनी तात्काळ आपले तालुक्यातील सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक त्या कागदपत्राची पुर्तता करुन तक्रार निकाली काढून घ्यावी. 


नांदेड जिल्ह्यात या योजनेंतर्गत एकूण 2 लाख 14 हजार 491 शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र असुन त्यापैकी बँकांनी 2 लाख 7 हजार 36 शेतकऱ्याची माहिती पोर्टलवर अपलोड केली आहे. सदर बँकांनी अपलोड केलेल्या माहितीपैकी शासनाने कर्जमाफी पात्र असणाऱ्या 1 लाख 94 हजार 216 शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यापैकी 1 लाख 86 हजार 535 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण प्रक्रिया पुर्ण केली आहे. आधार प्रमाणिकरण प्रक्रिया पुर्ण केलेल्या शेतकऱ्यापैकी 1 लाख 79 हजार 628 शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम 1 हजार 229.22 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. उर्वरीत आधार प्रमाणिकरण केलेल्या शेतकऱ्याच्या खात्यात शासनामार्फत लवकरच कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात येणार आहे. 


आधार प्रमाणिकरण शिल्लक शेतकऱ्यांनी जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन तात्काळ आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे. ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी जिल्हा व तालुकास्तरीय समितीकडे वर्ग करण्यात आल्या आहेत अशा शेतकऱ्यांनी आवश्यक त्या कागदपत्राची पुर्तता करुन तक्रार निकाली काढून घ्याव्यात असेही आवाहन जिल्हा उपनिबंधक अनिल चव्हाण यांनी केले आहे.




👇 महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचे पोर्टल

https://mjpsky.maharashtra.gov.in/

👉शासन निर्णय

👇छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना

http://www.csmssy.mahaonline.gov.in

👉 CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ SHETKARI SANMAN YOJANA 2017 BENEFICIARY LIST DIST-NANDED

👉https://nanded.gov.in/past-notices/chatrapati-shivaji-maharaj-shetkari-sanman-yojana-2017-beneficiary-list-dist-nanded/



✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

E-mail - sanjaybchikhale@gmail.com

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

टुरिस्ट गाईड होण्याची संधी पर्यटन संचालनालयामार्फत मिळणार ऑनलाईन प्रशिक्षण व प्रमाणपत्र


 पर्यटनाची आवड असणाऱ्या होतकरु उमेदवारांना पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण देऊन राज्यात एक हजार टुरिस्ट गाईड तयार करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाने पुढाकार घेतला आहे. या योजनेंतर्गत राज्याच्या विविध भागातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने तयार केलेल्या ऑनलाईन आयआयटीएफ टुरिजम फॅसिलिटेटर सर्टिफिकेशन प्रोग्रामअंतर्गत मोफत पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणानंतर उमेदवारांना महाराष्ट्र शासन प्रमाणित टुरिस्ट गाईड म्हणून प्रमाणपत्र देण्यात येणार असून त्यांना राज्यस्तरावर तसेच विविध पर्यटन ठिकाणी टुरिस्ट गाईड म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी दिली.


महाराष्ट्राचे वैविध्यपूर्ण निसर्गसौंदर्य, अद्वितीय ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा यामुळे राज्यात पर्यटकांचा ओघ वाढत आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला एक समृध्द व आल्हाददायक अनुभव देण्याचा महाराष्ट्र पर्यटन विभागाचा प्रयत्न आहे. भटकंती, प्रवास हा फक्त एक छंद म्हणून न जोपासता त्याला एक शैक्षणिक आणि व्यावसायिक जोड देण्याचा विचार करणाऱ्या राज्यातील इच्छुक उमेदवारांसाठी ही नक्कीच एक सुवर्णसंधी आहे, असे डॉ. सावळकर यांनी सांगितले.


या डिजिटल उपक्रमामुळे विद्यार्थी तथा उमेदवारांना त्यांच्या वेळेनुसार आणि ते ज्या ठिकाणी असतील तेथून, आपल्या सवडीनुसार हे ऑनलाइन शिक्षण घेण्याची संधी प्राप्त होणार आहे. http://iitf.gov.in या पोर्टलवर हिंदी व इंग्रजी भाषेत विविध पर्यटन विषयाच्या महत्त्वाच्या काही अभ्यासक्रमांसोबत सात मॉड्युल्ससह मूलभूत ऑनलाइन कोर्स उपलब्ध आहे. एकूण कार्यक्रम नोंदणी शुल्क २ हजार रुपये असून परीक्षा शुल्क ५०० रुपये आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या १ हजार उमेदवारांना पर्यटन संचालनालयामार्फत नोंदणी शुल्क परत करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागासाठी १८ ते ४० वयोगटातील उमेदवारांनी किमान बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. ४० वर्षापेक्षा जास्त वयाच्या उमेदवाराचे किमान दहावी श्रेणी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.


उमेदवारास ऑनलाईन प्रशिक्षण आणि परीक्षेनंतर इंटर्नशिपची संधी आणि वर्तन कौशल्य प्रशिक्षणही देण्यात येईल. आयआयटीएफचे मूलभूत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर राज्याच्या पर्यटन संचालनालयामार्फत एक दिवसाचे मूल्यांकन प्रशिक्षण घेतले जाईल आणि त्यानंतर “महाराष्ट्र पर्यटन परवानाकृत मार्गदर्शक” अशा स्वरूपात या उमेदवारास अंतिम प्रमाणपत्र देण्यात येईल. यशस्वी उमेदवारांना महाराष्ट्रातील सर्व पर्यटनस्थळे (केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखालील पर्यटनस्थळे वगळता) कोणत्याही पर्यटनस्थळांना सेवा देण्याची परवानगी दिली जाईल. अधिक माहितीसाठी http://iitf.gov.in पोर्टलवर किंवा श्री. योगेश निरगुडे, पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुख्य कार्यालय, मुंबई यांच्याशी दूरध्वनी क्रमांक ०२२-६२९४८८१७ वर किंवा diot@maharashtratourism.gov.in या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

👇 पर्यटन संचालनालयानची वेबसाईट

http://iitf.gov.in


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

गुन्ह्यात जामीन मिळण्यास मदत करण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच घेताना लाचखोर पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात


 नाशिक (दि.०१ मार्च) : गुन्ह्यात जामीन मिळण्यास मदत करण्यासाठी 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन लाच घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस हवालदारावर नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. परशराम लक्ष्मण गांगोटे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. परशराम गांगोडे यांच्यावर अभोणा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांच्याविरोधात अभोणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्ह्यात फिर्यादी व इतर आरोपींना अटक करुन जामीन मिळण्यास मदत करण्यासाठी गांगोडे यांनी 20 हजार रुपयाची लाच मागितली. तक्रारदार यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार 5 फेब्रुवारी 2021 रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता गांगोडे यांनी तडजोडीत 15 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच लाच स्विकारण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले. परशराम गांगोडे यांच्या विरोधात अभोणा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

👇 लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची वेबसाईट

www.acbmaharashtra.gov.in


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

कोरोनात लाचखोरी:'कोरोना'च्या रॅपिड अँटीजन टेस्टचा अहवाल देण्यासाठी कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्याने घेतली लाच,प्रचंड खळबळ



पुणे : (दि. ०१ मार्च) : कोरोनाच्या रैपिड अँटीजन टेस्टचा अहवाल देण्यासाठी कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्याने लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार पुणे लाचलुपतत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी)ने उघडकीस आणला आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. त्या अधिकाऱ्याला दीड हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले आहे.

याप्रकरणी मिलिंद दामोदर कांबळे ( वय 38) असे पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहे. राज्यात देखील काही ठिकाणी लॉकडाऊन केले गेले आहे., तर टेस्टिंग वाढवण्याच्या सूचना देण्यात आले आहे. एकीकडे नागरिक हैराण आहेत. त्यात आता कोरोनात देखील लाचखोरी शिरल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

दौड़ शासकीय रुग्णालयात कांबळे हे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी आहेत. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत ते काम करतात. या रुग्णालयात कोरोनाची टेस्ट केली जाते.

दरम्यान यातील तक्रारदार व त्यांच्या 19 कामगारांनी शासकीय रुग्णालय दौड 26 फेब्रुवारी रोजी केस पेपर काढून कोविड 19 रॅपिड अँटीजेन टेस्ट केलेल्या आहेत. त्याचा अहवाल देण्यासाठी आरोपी लोकसेवक यांनी प्रत्येकी 100 रुपये असे एकूण 1 हजार 900 रुपये लाच तक्रारदार यांच्याकडे मागितली होती. त्याची पडताळणी करण्यात येत होती. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तडजोडीअती दीड हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने लोकसेवक कांबळे यांना रंगेहात पकडले आहे. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

👇 लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची वेबसाईट

www.acbmaharashtra.gov.in


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com