🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

मंगळवार, मार्च ०२, २०२१

अपसंपदा प्रकरण : परिवहन सेवा, ठाणे महानगरपालिका येथील अधिकारी/कर्मचारी व खाजगी इसम यांच्याविरूध्द बेकायदेशीर कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.

प्रेस नोट दिनांक                                      ०२/०३/२०२१
 

ठाणे ( ०२ मार्च) : परिवहन सेवा, ठाणे महानगरपालिका येथील अधिकारी/कर्मचारी व खाजगी इसम यांच्याविरूध्द बेकायदेशीर कृत्य म्हणजे अपसंपदा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.

  1. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग/घटक : ठाणे
  2. कलम : भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम (संशोधन २०१८) सन १९८८ चे कलम १३(१)(क)(ड), १३(२) व भा.दं.वि.सं कलम ४६५,४६७,४६८, ४७१,१२०(ब)
  3. लोकसेवकाचे नाव व कार्यालय : (१) श्री.अशोक नागुराव करंजकर, तत्कालीन परिवहन व्यवस्थापक, परिवहन सेवा,ठाणे ( तत्कालीन प्रतिनियुक्तीवर असलेले उप जिल्हाधिकारी दर्जाचे) (२) श्री. श्रीकांत सरमोकदम,तत्कालीन परिवहन व्यवस्थापक, परिवहन सेवा, (सेवानिवृत्त) (३) श्री.कमलाकर वासुदेव दीक्षित, तत्कालीन परिवहन उप व्यवस्थापक, ठाणे (सेवानिवृत्त) (४) श्री.अजित व्दारकानाथ निच्हाळे, तत्कालीन मुख्यलेखापाल, परिवहन सेवा, ठाणे (सेवानिवृत्त) (५) श्री.गुरूकुमार पंडुरंग पेडणेकर,तत्कालीन वाहतुक अधिक्षक, परिवहन सेवा, ठाणे (बडतर्फ) (६) श्री पिटर जॉन पिंटो, तत्कालीन अंतर्गत लेखा परिक्षक, परिवहन सेवा, ठाणे (सेवानिवृत्त ) (७) श्री.लक्ष्मीकांत धनराज धुमाळ, | व्यवसाय-नोकरी सुरक्षा अधिकारी, परिवहन सेवा,ठाणे (८) श्री.दिलीप सदाशिव | कानडे, तत्कालीन वाहतुक निरीक्षक सध्या आगार व्यवस्थापक अतिरिक्त कार्यभार कर्मचारी व प्रशासन अधिकारी, परिवहन सेवा, ठाणे (९) खाजगी इसम श्री.प्रविण | माथुरभाई सोलंकी, प्रोप्रायटर मे.सोल्युशन्स अॅडव्व्हटयझिंग, ठाणे १०) खाजगी इसम श्री.भावेश प्रभुदास भिंडे, मॅनिजींग डायरेक्टर गुज्जु अॅडस् प्रा लि. व इतर
  4. अपसंपदा रक्कम : ६,७३,५५,९४६/-रुपये(सहा कोटी न्याहत्तर लाख पंचावन्न हजार नऊशे सेहेचाळीस रुपये)

थोडक्यात हकिकत : सन २००८ ते २०१८ या कालावधीत परिवहन विभाग, ठाणे महानगरपालिकेचे वरील नमुद लोकसेवक यांनी परिवहन सेवा, ठाणे महानगरपालिकेच्या ४७० बस प्रवासी निवान्यांच्या मुळ जागी बांधा वापरा आणि हस्तांतरीत करा (Built, Operate & Transfer) या तत्वावर बस प्रवासी निवारे बांधुन त्यावर जाहिरात प्रदर्शित करण्याचे हक्क देणेबाबत ठेका मिळण्याकरिता ठाणे परिवहन सेवेकडून घेण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेमध्ये (अ) लखोटा कमांक १ मध्ये जॉईन्ट व्हेंचरची तरतुद नसताना सुध्दा मे सोल्युशन अॅडव्हर्टायझिंग यांनी मे विश्वर | पब्लिसिटी, मे झेनिथ आउटडोअर व मे गुज्जु अँड प्रायव्हेट लिमीटेड या कंपन्याची बनावट कन्सोर्टीयम डिड तयार करुन ती खरी असल्याचे भासविले तसेच सदर कंपनीची लगतच्या तीन वर्षाचे नफातोटा व ताळेबंदीबाबतची अपुर्ण कागदपत्रे जोडली असताना सुध्दा मे.सोल्युशन अॅडव्हटायझिंग यांनाच ठेका मिळावा म्हणुन त्यांना बेकायेदशीरपणे सहाय्य केले व मे.सोल्युशन अँडव्हटायझिंग यांना ठेका मिळवुन दिला.(ब) निविदा प्रक्रीये मधील लखोटा क्रमाक २ उपडते वेळी मे.एक्सल अॅडव्हर्टायझिंग अॅण्ड मार्केटिंग,ठाणे यांचे प्रतिनिधी श्री कृष्णा कोबनाक हे हजर असल्याचे उपस्थिती पत्रावर दर्शविण्यात आलेले आहे.परंतु छाननी समितीने श्री कृष्णा कोबनाक हे हजर नसताना त्यांची बनावट सही खरी असल्याचे भासवुन मे सोल्युशन अॅडव्हर्टायझिंग, ठाणे यांना बेकायदेशिर रित्या ठेका मिळवुन देण्यास मदत केलेली | आहे(क) मे.सोल्युशन अँडर्व्हटायझिंग यांना सदरचा ठेका मिळाल्यानंतर त्यांने | करारनाम्यानुसार अटी व शर्तीची पुर्तता केलेली नसताना सुध्दा बेकायदेशीरपणे त्यास | इसारा रक्कम १०,००,०००/- रुपये परत केली. (ड) मे.सोल्युशन अॅडव्हटायझिंग यांचे एकुण देकारप्रमाणे म्हणजे ८,६२,६३,४५०/- रुपयाच्या २५ टक्के घ्यावयाची बँक गॅरटी रक्कम २,१५,६५,८६३/- रुपये इतकी होत असताना सुध्दा त्यांचे कडून फक्त ९ बसेसच्या एकत्रीत किंमत रक्कम रू.२,०७,६३,४५०/- यावरील २५ टक्के इतकी रक्कम रू. ५१,९०,८६३/- ची बँक गॅंटी घेतली आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे परत केलेली इसारा रक्कम १०,००,०००/- रूपये व एकुण देकारचे कमी घेतलेले बँक गॅरटीचे १,६३,७५,५००/- रुपये तसेच ठाणे महानगरपालिकेच्या जाहिरात विभागाचा जाहीरात कर रुपये ४,९९,८०,९४६ असे एकुण ६,७३,५५,९४६/ - रुपयाचे ठाणे महानगर पालीकेचे हेतुपुरस्सर व जाणीवपुर्वक आर्थीक नुकसान व तितकाच ठेकेदार यांचा आर्थीक फायदा करुन दिला म्हणुन नमुद लोकसेवक व खाजगी इसमांविरुध्द बरिलप्रमाणे दि.०१/०३/२०२१ रोजी २३:०९ वा दाखल करण्यात आला आहे.

लचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबदद्ल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेशी संपर्क करावा.

संपर्क पत्ता - ला.प्र.वि., ठाणे, मध्यवर्ती कारागृहासमोर, ठाणे पश्चिम ४००६०१

संकेतस्थळ - acbmaharashtra@mahapolice.gov.in

ई-मेल :- spacbthane@mahapolice.gov.in

ऑनलाईन तक्रार

अॅप्लीकेशन :- acbmaharashtra.net

टोल फ्री नं - १०६४

दुरध्वनी क्र. :- ०२२-२०८१३५९८/२०८१३५९९

व्हॉटस् अॅप क्र. ১- ९९३०९९७७००


(ज्योती देशमुख) 

पोलीस उप अधीक्षक, अॅन्टी करशन ब्युरो, नवी मुंबई


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular posts लोकप्रिय पोस्ट