वीस हजाराची लाच घेताना सहायक संचालकास पकडले
बीड (दि. ०१ मार्च) : लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले असून पाटोदा येथे एकाला तर माजलगावमध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांना रंगेहात लाच घेताना पकडले होते. त्यानंतर सोमवार (दि.१) रोजी बीड येथील लेखा परीक्षण कार्यालयात लाचलुचपत
प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. या कारवाईने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
किरण घोटकर हे लेखा परिक्षण कार्यालयात सहायक संचालक लेखा परीक्षण (वर्ग १) या पदावर कार्यरत आहेत. यामध्ये त्यांनी फिर्यादीकडून कामा करीता वीस हजाराची लाच मागितली होती.त्यानुसार सोमवारी रात्री किरण घोटकर याला वीस हजाराची लाच घेताना उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे यांच्या टिमने त्यांना पकडले. या प्रकरणी उशीरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.
सदरची कारवाई मा.डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, लाप्रवि औरंगाबाद, मा.डॉ. अनिता जमादार, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि औरंगाबाद, श्री.बाळकृष्ण हनपुडे पाटील, पोलीस उप अधीक्षक, बीड यांचे मार्गदर्शनासाली पोलीस निरीक्षक श्री. राजकुमार पाडवी, व पोलीस अगलवार हनुमान गोरे,मनोज गदळे,प्रदिप वीर,सत्यनारायण खेत्रे,स्नेहलकुमार कोरटे व चालक अमंलवार म्हेत्रे ,ला.प्र.वि.बीठ युनिट यांनी कारवाई केली आहे.
✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा