🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

गुरुवार, मार्च ११, २०२१

सेवानिवृत्तदाराचे GIS प्रकरण : जिल्हा कोषागार कार्यालयातील लालची उप लेखापाल सुंदर निघाला लाचखोर,१,००० ची लाच स्वीकारताना लाचखोराला एसीबी(ला.प्र.वि) पथकाने रंगेहाथ पकडले

 


:: प्रेस नोट :: क्रमांक १३७२

दिनांक :- 10.03.2021.

जिल्हा कोषागार कार्यालय, जालना येथील उपलेखापाल श्री. सुंदरराव पुंजाजी वाहुळकर यांना 1,000/- रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालनाच्या पथकाने पकडले.

  1. आरोपीचे नाव,हुद्दा व पत्ता - लोकसेवक श्री. सुंदरराव पुंजाजी वाहुळकर, वय 50 वर्ष व्यवसाय नोकरी, उप लेखापाल जिल्हा कोषागार कार्यालय, जालना रा. समर्थ एसटीडीजवळ, जमुनानगर जालना मुळ रा. कोडी कारला ता.जि. जालना (वर्ग - 3 )
  2. गुन्हा घ ता व ठि - दि-10.03.2021 रोजी अंबड चौफुली वर जालना येथे
  3. लाचेची रक्कम - 1,000/- रुपये.


याबाबत हकीगत अशी की, यातील तक्रारदार यांनी तक्रार दिली की, त्यांचे वडील जुलै 2020 मध्ये जिल्हा परीषद जालना येथुन सेवानिवृत्त झाले असुन, त्यांनी मागील सात महिन्यांपूर्वी जिल्हा कोषागार कार्यालय, जालना येथे वडीलांचे सेवानिवृत्ती नंतर मिळणारे गट विमा योजनेचे (GIS) रक्कम 37,281/- रुपये मंजुर करुन देण्यासाठी अर्ज दिला होता, सदरचे अर्जावरुन त्यांचे वडीलांचे गट विमा योजनेचे (GIS) रक्कम 37,281/- रुपये मंजुर करुन देण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयातील उपलेखापाल श्री. सुंदरराव वाहुळकर यांनी तक्रारदार यांचेकडे 1,000/- रूपये लाचेची मागणी केली. सदर कामासाठी तक्रारदारास उपलेखापाल श्री. सुंदरराव वाहुळकर यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना येथे संपर्क साधून तक्रार दिली.


सदर तक्रारीवरून दि. 10.03.2021 रोजी पडताळणी केली असता उपलेखापाल श्री. सुंदरराव वाहुळकर यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांचे वडीलांचे गट विमा योजनेचे (GIS) रक्कम 37,281/- रुपये मंजूर करुन सदर रकमेचा धनादेश देण्यासाठी 1,000/- रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पण्ण झाले. तसेच आज दि. 10.03.2021 रोजी आलोसे उपलेखापाल श्री. सुंदरराव वाहुळकर यांनी तक्रारदार यांचेकडुन त्यांचे वडीलांचे गट विमा योजनेचे (GIS) रक्कम 37,281/- रुपये मंजूर करुन सदर रकमेचा धनादेश देण्यासाठी 1,000/- रुपये लाचेची रक्कम स्वतः पंचासमक्ष स्थिकारली असतांना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालनाचे पथकाने लक्की ज्युस सेंटर, नुतन वसाहत रोडवर अंबड चौफुलीजवळ, जालना येथे रंगेहाथ पकडले.


लोकसेवक श्री. सुंदरराव पुंजाजी वाहुळकर, वय 50 वर्ष व्यवसाय नोकरी, उप लेखापाल जिल्हा कोषागार कार्यालय, जालना रा. समर्थ एसटीडीजवळ, जमुनानगर जालना मुळ रा. कोडी कारला ता.जि. जालना (वर्ग - 3 ) यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्याबाबत पुढील कार्यवाही चालू आहे.


तसेच अॅन्टी करप्शन ब्युरो कडून आवाहन करण्यात येते की, कोणी लोकसेवक शासकीय कामासाठी लाचेची मागणी करीत असल्यास किंवा खाजगी व्यक्ती मार्फत कोणी लाचेची मागणी करीत असल्यास 02482 220252, तसेच टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क करावा. तसेच पोलीस उप अधिक्षक जालना मो.नं. 8975762906, पोलीस निरीक्षक मो.नं. 8390757835, 9823216788 वर संपर्क करावा.

www.acbmaharashtra.gov.in

पोलीस उप अधिक्षक,

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,जालना.



✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular posts लोकप्रिय पोस्ट