🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

गुरुवार, मार्च ११, २०२१

शिक्षणाचे धडे शिकविणारा शासकीय माध्यमिक आश्रमशाळेचा लालची मुख्याध्यापक निघाला लाचखोर,क्रीडा शिक्षकाकडून २ हजार लाच घेताना अडकला एसीबीच्या जाळ्यात

 


प्रेसनोट

दिनाक-०९/०३/२०२१

शासकीय माध्यमिक आश्रमशाळा आंबेसरी, ता डहाणू जि.पालघर येथील मुख्याध्यापक यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे (कॅम्प पालघर) यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले.

१) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग/घटक - पालघर कॅम्प अॅन्टी करप्श व्युरो, ठाणे अंतर्गत.

२) गुन्हा नोंद कमांक - डहाणू पोलीस ठाणे

३) कलम - भ्रष्टाचार प्रतिबध अधिनियम १९८८ (सुधारणा २०१८) चे कलम प्रमाणे

४) लोकसेवकाचे नाव व कार्यालय - आरोपी उत्तम हिंदुराव भोसले वय ५३ वर्षे मुख्याध्वयापक, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, आंबेसरी, ता डहाणू. जि.पालघर वर्ग -२ ए/१०१, साईसंस्था हिल केस्ट, टेंबीपाडा रोड, भांडुप प. मुबई

५) मागितलेल्या लाचेची रक्कम २,०००/--रूपये 

६) स्विकारलेली लाचेची २,०००/- रुपये

यातील तकारदार हे शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, आवेसरी, ता डहाणू, जि.पालघर येथे किडा शिक्षक असून आलोसे हे सदर आश्रम शाळेचे मुख्याध्यापक आहेत. तकारदार याचे पगारंबिल मंजूर करण्यासाठी आलोसे यानी ३,०००/ रूपये लाचेची मागणी केली म्हणून तकारदार यांनी दिनाक ०९/०३/२०२१ रोजी अंन्टी करप्शन ब्युरो ठाणे (कॅम्प पालघर) कार्यालयात तकार दिली आहे.

थोडक्यात हकीकत - तक्ररदार यांनी दिलेल्या तक्ररीचे अनुषंगाने दिनांक ०९/०३/२०२१ रोजी तक्ररदार याना आरोपी लोकसेवक यांचे कार्यालयात पंचासह पाठवून पड़ताळणी केली असता. आरोपी लोकसेवक यांनी तक्ररदार याचेकडे त्याचे कामाचे अनुपंणाने तडजोडी अंती २,०००/- रूपये लाचेची मागणी केली. सदर लाचेची रक्कम लागलीच दि.०९/०३/२०२१ रोजी १९.३० वा. च्या सुमारास शासकीय माध्यमिक आश्रमशाळा आंबेसरी, ता डहाणू, जि पालघर येथे आलोसे यांच्या रूममध्ये स्विकारली असता नमूद आलोसे यांना अॅन्टी करप्शन व्युरो, ठाणे, (कॅम्प पालघर) कार्यालयाचे सापळा पथकाकडून रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

पालघर जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे (कॅम्प पालघर) यांचेशी संपर्क करावा.

संपर्क पत्ता - लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे (कंम्प पालघर) पालघर प. ४०१ ४०४

संकेतस्थळ - www.acbmaharashtra@mahapolice.gov.in

ई-मेल - acbmaharashtra@mahapolice.gov.in

ऑनलाईन तक्रार - acbmaharashtra.net

टोल फ्री - 1064

दुरध्वनी व क्रमांक - 02525-297297

मोबाईल क्रमांक - -9850158810/ 9923699430



✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक कर

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular posts लोकप्रिय पोस्ट