🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

मंगळवार, मार्च ०९, २०२१

एकाच पोलीस स्टेशनमधील पो.निरिक्षक,सहायक पो.निरिक्षक व हवालदार यांनी २.५० लाख लाचेची मागणी करून १ लाख लाच स्वीकारताना चतुर्भुज

 कितने लाचखोर थे,तीन सरकार_एक पो.निरिक्षक,दोन सहायक पोलीस निरीक्षक,तीन पोलीस जमादार


प्रेसनोट

दि. ०७/०३/२०२१

कामशेत पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस अमलदार यांचेवर लाच स्वीकारले प्रकरणी कारवाई.

  1. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व घटक : पुणे घटक
  2. गुन्हा नोंद क्रमांक : कामशेत पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण, गु.र.नं. ९०/२०२१
  3. कलम : भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम,कलम -७,१२
  4. आरोपीचे नाव व कार्यालय : आरोपी लोकसेवक - १) अरविंद दौलत चौधरी , वय - ५० वर्षे पद - पोलीस निरीक्षक, वर्ग १,२) प्रफुल्ल प्रभाकर कदम, वय - ३३ वर्षे पद सहायक पोलीस निरीक्षक, वर्ग २,३) महेश विनायक दाँडकर, वय - पद - पोलीस हवालदार, वर्ग ३
  5. मागणी केलेली लाचेची रक्कम : २,५०,०००/-(अडीच लाख रूपये)
  6. लाच स्वीकारली रक्कम : १,००,०००/- (एक लाख रूपये)

थोडक्यात माहिती-पडताळणी दिनांक :- दि. ०५/०३/२०२१ व दि.०६/०३/२०२१, सापळा दिनांक :- ०६/०३/२०२१

तक्रारदार यांचे मामा यांचेवर फसवणुकीची केस दाखल असून जामीनाबाबत म्हणणे सादर करण्यासाठी आरोपी लोकसेवक क्र १ व ३ यांनी मागणी करून ती क्र. ३ यांनी स्वीकारली. आरोपी लोकसेवक क्र. ०२ यांनी सदर लाच मागणीस प्रोत्साहन दिले म्हणून कामशेत पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून मा. विशेष न्यायालयाने अटक आरोपींना दिनांक १०/०३/२०२१ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे. गुन्हयाचा तपास श्रीमती अलका सरग, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. पुणे युनिट या करत आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक श्री. राजेश वनसोडे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सुरज गुरव, ला.प्र.वि. पुणे, श्री. सुहास नाडगौडा, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत कार्यालयास खालील नमुद क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन श्री. राजेश बनसोडे,पोलीस उप- आयुक्त/पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी केले आहे.


(श्रीहरी पाटील)

सहायक पोलीस आयुक्त/पोलीस उपअधीक्षक (प्रशासन ) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे.


*Respected Sir*

*Trap Case Report*

➡ घटक :- पुणे.

➡ तक्रारदार :- पुरुष 32 वर्ष

➡ आरोपी लोकसेवक :  

1) अरविंद दौलत चौधरी. वय-50.            

        पोलीस निरीक्षक- वर्ग-1,

2)प्रफुल्ल प्रभाकर कदम.वय - 33.               

   सहायक पोलीस निरीक्षक - वर्ग -2

 3)महेश विनायक दौंडकर .वय-39 

पोलीस हवालदार - वर्ग-3, सर्व नेमणूक - कामशेत पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण.

➡ सुरवातीस लाचेची मागणी:-2,50,000/- 

➡️ तडजोडीअंती लाचेची मागणी :- 2,00,000/- 

➡ लाच स्विकारली : 100,000/-

▶️पडताळणी दिनांक:-05/03/2021 व  

  06/03/2021

▶️ सापळा दिनांक :- 06/03/2021

➡ हकीकत :- यातील तक्रारदार यांचे मामा यांचेवर फसवणूकची केस दाखल असून, जामीनाबाबत म्हणणे सादर करण्यासाठी आरोपी लोकसेवकानी 200000/- ( दोन लाख ) रुपयांची लाच मागणी करून, क्र.3 यानी 100,000/- ( एक लाख ) रुपये लाच स्वीकारली असता रंगेहात ताब्यात घेतले आहे .

➡ सापळा पथक :-

 पोलीस निरीक्षक - अलका सरग,

पोलीस निरीक्षक - सुनील क्षीरसागर,

पोलीस निरीक्षक -सुनील बिले, 

पोलीस नाईक - वैभव गिरीगोसावी, पोलीस शिपाई -रतेश थरकार, 

पो.शि.गणेश भापकर पो.शि.किरण चिमटे,

चालक पोलिस शिपाई - अभिजित राऊत, पांडुरंग माळी, ला प्र वि पुणे युनिट .

➡मार्गदर्शन अधिकारी :- 

मा श्री राजेश बनसोडे.

पोलीस अधीक्षक ला प्र वि, पुणे परिक्षेत्र.

मा श्री सुरज गुरव . अपर पोलिस अधीक्षक , ला.प्र.वि, पुणे.

मा श्री सुहास नाडगौडा. अपर पोलिस अधीक्षक , ला.प्र.वि, पुणे.

मो श्रीमती सीमा मेहेंदळे. पो. उप अधीक्षक लाप्रवि पुणे युनिट.


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक कर

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular posts लोकप्रिय पोस्ट